कौन अपना? कौन पराया?
By Admin | Updated: April 25, 2015 14:37 IST2015-04-25T14:37:40+5:302015-04-25T14:37:40+5:30
जगभरात सहा अब्ज लोक आणि त्यांच्या विचारांच्या सहा अब्ज त-हा. पुढय़ात पसाभर माहिती! त्यातली हिण-कुसे कशी पाखडायची? त्यापायी वाहून कसे जायचे नाही? त्यातले नेमके प्रकाशकण कसे उचलायचे? - याचे शिक्षण म्हणजे माध्यम साक्षरता. बरं-वाईट काय, हे एकदा का कळलं, की मग ते भान आयुष्यभर पुरतं.

कौन अपना? कौन पराया?
>- वैशाली करमरकर
'माध्यमे’ या कुटुंबातले इंटरनेट नावाचे माहितीचे आणि करमणुकीचे एक प्रचंड मायाजाल. त्याचा जन्म सर्वसाधारणत: बर्लीनची भिंत पडल्यानंतर सहा एक महिन्यांनी झाला. आणि मग त्याने जणू जगातल्या हर एक भिंती पाडायला घेतल्या. भौगोलिक सीमा आपल्या भूगोलाच्या पुस्तकापुरत्या राहिल्या. या इंटरनेटमुळे माणसांच्या विचारांचा हात पार या खंडापासून तो त्या खंडार्पयत निमिषार्धात पोहोचू लागला.
जगभरात सहा अब्ज लोक. त्यांच्या विचारांच्या सहा अब्ज त:हा. आणि अत्यल्प दरात हे विचार क्षणार्धात इकडून तिकडे पोहोचविणारे हे नवीन माध्यम. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे अशा आधी जन्मलेल्या माध्यमांच्या मुळावर हे धाकटे भावंडं उठते की काय, अशी एक सार्वत्रिक भीती अजूनही मधूनमधून डोके वर काढीत असते. कोण जाणो? असे होईलही कदाचित पुढे मागे.
पण या भीतीपेक्षा जगभरातल्या राज्यकत्र्याच्या मनात नव्वदीच्या दशकात अजून एका वेगळ्या भीतीने घर केले होते. ती भीती होती या माहितीच्या धबधब्याची. आपल्या देशातल्या आम जनतेशी रेडिओ बोलणार, वृत्तपत्रे बोलणार, दूरचित्रवाणी बोलणार आणि आता भरीसभर म्हणून या इंटरनेट नावाच्या माध्यमातून जगभरातली कुठलीही परदेशी माणसे बोलू शकणार. समज-गैरसमज वाढणार. चहूबाजूंनी अशा सुष्ट-दुष्ट, पक्व-अपरिपक्व विचारांच्या माशा आम जनतेच्या कानापाशी सतत घोंघावणार. त्यामुळे आपली प्रजा गोंधळून तर नाही ना जाणार?
राज्यकर्ते सोडा. त्यांना मतलब फक्त सत्तेशी. परंतु समाजातले विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, संगोपनशास्त्रज्ञ- अशी भली भली मंडळीसुद्धा विचारात पडली. त्यांच्या डोळ्यापुढे आपापल्या देशातील समाजाचे मानसिक आरोग्य होते. वैचारिक आरोग्य होते. माणसाच्या मनातला मानण्याचा दीप विझू देऊ नये अशी कळकळ होती.
या त:हेच्या विचारात सर्वात पुढे होता ऑस्ट्रीया हा देश. जर्मनीचा शेजारी आणि जर्मन भाषिक. तेथील शिक्षणतज्ज्ञांनी मग पुढाकार घेतला. मेंदूतज्ज्ञांपासून ते समाजशास्त्रज्ञांर्पयत आणि मानसशास्त्रपासून ते माध्यम शास्त्रज्ञांर्पयत या माध्यमांच्या धबधब्याचे नियंत्रण करता येणो शक्य आहे का? यावर विचारमंथन सुरू झाले. मंथनाचा विषय एकच. प्रसारमाध्यमे तर हवीतच. कारण ती लोकाशाहीची गरज आहे. पण त्याचा अतिरेक कसा थांबवता येईल? हा अतिरेक घराघरांत होताना दिसत होता. माणसे माणसांना दुरावत होती. समाजात हिंसा वाढत होती. शालेय मुले जेमतेम 1क्क् शब्दांचे गद्यपाठसुद्धा वाचायला खळखळ करू लागलेली होती. कारण मुलांमधली एकाग्रता झपाटय़ाने खालावताना दिसू लागलेली होती. भ्रमचित्त मुले हे आपल्या देशाचे उद्याचे नागरिक?
या सर्व मंथनातून जन्म झाला एका नव्या शालेय आणि विद्यापीठीय विषयाचा. त्याचे नाव ‘माध्यम-साक्षरता’- मीडिया पेडागॉजिक. मूल साधारणत: लिहा-वाचायला लागल्यापासून या विषयाची ओळख करून दिली जाते. म्हणजे इयत्ता चौथी ते पाचवीपासून शालेय शिक्षण पूर्ण होईर्पयत हा विषय अनिवार्य आहे. पुढे विद्यापीठातील शिक्षणात ऐच्छिक स्वरूपात हा विषय घ्यायचा अथवा नाही ही तुमची मर्जी.
प्रसारमाध्यमे हे सॉफ्ट पॉवरच्या लढाईतले एक प्रमुख हत्यार आहे आणि त्यामुळे या हत्यारासंबंधी आम जनतेत साक्षरतेची प्रचंड गरज आहे, हे मध्ययुरोपियन इतर देशांनीही नेमके ओळखले. ऑस्ट्रीयात झालेले मूलभूत संशोधन ही सुरुवात होती. शालेय शिक्षणात माध्यम-साक्षरता हा विषय तातडीने समाविष्ट केला गेला.
भारताने सॉफ्ट पॉवर हा युद्धखेळीचा प्रकार आत्मसात करणो ही काळाची गरज आहे. हा या लेखमालेचा सूत्रविचार आहे. तेव्हा या युद्धखेळीसाठी शस्त्रस्त्रंची जमवाजमव तर करावीच लागणार. यातले प्रमुख अस्त्र म्हणजे देशाची स्वायत्त प्रसारमाध्यमे उभी करून ती सबळ करणो. दूरदर्शनने आपले पंख इतर देशांच्या दिशेने पसरवणो आणि त्यायोगे भारत या आपल्या मायभूमीचे सकारात्मक ब्रॅण्ंिडग सतत करत राहणो. इथर्पयतचा विचारप्रवास आपण गेल्या आठवडय़ार्पयत केलेला होता.
त्याच दिशेतले पुढचे पाऊल म्हणजे ‘माध्यम साक्षरता’ नावाचा हा नवा विषय समजावून घेणो आणि आपल्याकडील शिक्षणतज्ज्ञांनी यावर विचार करणो. त्यासाठी हा लेखप्रपंच. या प्रपंचाची आवश्यकता वाटते. कारण भारतीय भाषा बोलणारी बिनसरकारी आणि परदेशी माध्यमे आम जनतेला आज कायम नकारात्मक आवर्तनात भिरकावून देताना स्पष्ट दिसत आहेत. तो हात ङिाडकारून टाकणो भारतासाठी महत्त्वाचे आहे. माध्यमांमधून आपल्यार्पयत पोहोचणारी माहिती चाळून पाखडून कशी घ्यावी? त्यातील हिण-कुसे कशी ओळखावी? याचे पद्धतशीर शिक्षण म्हणजे ‘माध्यम साक्षरता’.
युरोपियन देशांमध्ये माध्यम साक्षरता कशी शिकवली जाते?
- प्रत्यक्ष अनुभवलेले एक उदाहरण.
गोष्ट तीन-चार वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी जर्मनीत एक सनसनाटी घटना घडलेली होती. एका मध्यमवयीन जर्मन स्त्रीच्या घराच्या बाल्कनीत 1क्-12 फुलांच्या कुंडय़ा होत्या. त्या कुंडय़ांमध्ये अचानक पोलिसांना तब्बल नऊ नवजात अर्भकांचे मृतदेह मिळाले. एकच खळबळ उडाली. त्या बाईंना चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. बाई व्यसनी, तिचा मित्रही व्यसनी. बाई सतत प्रेग्नंट राही. कारण ती कडवी कॅथलीक. गर्भपात आणि कुटुंबनियोजन म्हणजे पाप हे मानणारी. पोरं वाढवायची तर व्यसने करणो जमणार नाही हे तिला पक्के ठाऊक. म्हणून त्यावर तिने हा असा भीषण उपाय योजलेला होता.
जर्मनीतल्या शाळा ‘माध्यम-साक्षरता’ हा विषय असा नेहमी ताज्या घटनांना मध्यवर्ती ठेवून शिकवतात. विषय शिक्षिकेने आपल्या दहावीच्या वर्गासाठी ही सनसनाटी निवडली. तिने या विषयावर प्रसारमाध्यमांतून ओतला जाणारा माहितीचा सर्व धबधबा गोळा केला. पहिली आली वृत्तपत्रे. जर्मनीतल्या सर्वाधिक खपाच्या यादीतल्या सहा वृत्तपत्रंची कात्रणो जमा केली. मग आली दूरचित्रवाणी. शासकीय आणि बिनशासकीय चॅनल्सवरील बातम्यांच्या क्लिप्स एकत्रित केल्या. तसेच रेडिओच्या बाबतीत केले. मग मोर्चा इंटरनेटकडे वळवला. तेथे युरोपियन, अमेरिकन संकेतस्थळांवर या विषयावर आलेली माहिती कॉपी-पेस्ट करून जमा केली. मग 2-3 विद्याथ्र्याचा एक-असे चार पाच गट बनवले. प्रत्येक गटाला वेगवेगळे वर्कशीट्स दिले. प्रत्येक गटाला एक एक माध्यम नेमून दिले. त्यावर ‘निरीक्षणो नोंदवा’ अशा पद्धतीचे प्रश्न होते. प्रत्येक गटाने आपापली निरीक्षणो नोंदवायला सुरुवात केली आणि मग त्याचे वर्गात सादरीकरण केले. या सादरीकरणाद्वारे मुलांना प्रिंट माध्यमे (वृत्तपत्रे), श्रव्य माध्यमे (रेडिओ), दृक्श्रव्य माध्यमे (दूरचित्रवाणी) आणि इंटरनेट हे माध्यम यातल्या गुणात्मक फरकाची आपोआप जाणीव झाली. चित्र, फोटो आणि भाषावापर याच्या मिश्रणाचा मानवी मनावर होणारा परिणाम हा वर्गात चर्चेचा विषय झाला.
मग आली पाळी मथळ्यांची. रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे आणि इंटरनेट यांनी वापरलेले वेगवेगळे मथळे आणि त्यातील भाषावापर हा विषय चर्चेच्या दुस:या फेरीत होता. मुले पाठोपाठ सादरीकरणो करीत होती. घडलेली घटना एकच. पण त्यावर प्रकाश टाकण्याची वेगवेगळी पद्धत, युक्त्या, प्रयुक्त्या, प्रत्यक्ष सत्य, त्यावर चर्चने सुचविलेले उपाय, राजकारण्यांनी सुचवलेले उपाय, विचारवंतांनी सुचवलेले उपाय यातल्या खोल द:या मुलांनी नेमक्या ओळखल्या.
मग या शिक्षिकेने यापैकी प्रत्येक माध्यमांमध्ये कोणाकोणाची किती समभागांची आर्थिक गुंतवणूक आहे? त्याचे तक्ते मुलांना वाटले. घटनेसंबंधी इंटरनेटवर लिखाण केलेल्या व्यक्तींचे बायोडाटाही त्यात होते. शिवाय त्यांना मिळालेल्या माउसक्लिक्सची संख्या, जाहिरातींची संख्या, खपाचे आकडे, वृत्तपत्रची किंमत अशा अधिकृत माहितींची कात्रणोही वाटली. मुलांनी माध्यमांमधले रंगीत-भंगीत सादरीकरण आणि त्यांची आर्थिक गणिते यांच्यात बरोबर सांगड घालून दाखवली. त्यातला कार्यकारणभाव लक्षात घेतला. थोडक्यात पसाभर माहितीतली हिण-कुसे कशी पाखडायची? त्यापायी वाहून कसे जायचे नाही? हा माहितीप्रपात फक्त लांबून बघायचा. त्यातले नेमके प्रकाशकण कसे उचलायचे? हे ते शिक्षण. त्याचे नाव माध्यम साक्षरता. जर्मनीतला रशियन चॅनल काहीही बोलो, चीनचा चॅनल काहीही सांगो. त्याची भाषा जर्मन असली तरी ‘अपना कौन’ ‘पराया कौन’ हे भान मग आयुष्यभर पुरते.
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिटय़ूट मार्क्स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉर्पोरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)