शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोण हा विकास दुबे..? - कानपूरमधला एक रक्तरंजित अध्याय आता संपलाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:06 AM

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधला एक लहानसा गुंड. बघता बघता मोठा होतो. आपलं साम्राज्य पसरतो. राजकारण्यांच्या गळ्यातला ताईत बनतो. चक्क राज्यमंत्र्यालाच थेट पोलीस ठाण्यात उडवतो. डीएसपीसहित आठ पोलिसांचा खात्मा करतो. नाटकीय पद्धतीनं त्याला अटक होते. पोलीस चकमकीत त्याचा एन्काउंटर होतो. का? कसं घडलं हे? यातलं खरं काय, खोटं काय? या सगळ्याच घटनाक्रमानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कधी मिळतील त्यांची उत्तरं? मिळतील?.

ठळक मुद्देविकास दुबे संपलाय. त्याची टोळीही पोलिसांनी जवळपास संपवलीय. कानपूरमधला एक रक्तरंजित अध्यायही आता संपलाय. पण दहशत? ती संपेल?.

- विकास मिश्र 

साधारण 1990चा सुमार.उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेलं बिकरू हे एक छोटंसं गाव. तिथलाच विकास दुबे हा एक कोवळा तरुण. हळूहळू गुन्हेगारी जगतात त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं.सर्वसाधारण गुंडांची सुरुवात जशी होते, तशीच याचीही झाली. सुरुवातीला छोट्या-मोठय़ा चोर्‍या, लूटमार. त्यानंतर त्यानं स्वत:चीच एक टोळी तयार केली. काही दिवसांनी ही टोळी दरोडेही टाकू लागली.राजकारणी अशा गुंडांच्या शोधात असतातच. साहजिकच थोड्याच दिवसांत स्थानिक राजकारण्यांच्या तो डोळ्यांत भरला.यावेळेपर्यंत उत्तर प्रदेशच्या राजकारणातही एव्हाना गुंड-बदमाशांची ऊठबस सुरू झाली होती. विकास दुबेही त्याला अपवाद नव्हता. अनेक राजकारण्यांना तो हवाहवासा वाटू लागला.गुन्ह्यांच्या आरोपाखाली तो तुरुंगात तर जात होता; पण राजकारण्यांच्या वरदहस्तानं थोड्याच दिवसांत पुन्हा तुरुंगातून सुटूनही येत होता. छोटीमोठी गुंडगिरी करणारा हा तरुण पुढे चक्क डीएसपीसहित आठ पोलिसांचाच खातमा करेल, याची त्यावेळी कोणाला कल्पना होती?याच काळात विकास दुबेच्या महत्त्वाकांक्षाही पल्लवित होत होत्या. 1995-96च्या सुमारास त्याला वाटायला लागलं, आपणही राजकारणात नशीब अजमावून पाहावं. त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाशी संधान साधणं गरजेचं होतं. त्यानं बसपाचा हात धरला आणि स्थानिक पातळीवर काही निवडणुकाही तो जिंकला.विकास दुबेचं प्रस्थ वाढत होतं, तशीच त्याची गुंडगिरीही. वर्ष 2000.एका महाविद्यालयाचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडे यांची हत्या झाली. मुख्य आरोपी अर्थातच विकास दुबे होता आणि या प्रकरणी त्याला जेलची हवाही खावी लागली. पण कारागृहातूनही तो आपलं साम्राज्य चालवत होता. तुरुंगात असतानाच रामबाबू यादव या व्यक्तीची हत्या झाली. ही हत्याही त्यानंच घडवून आणल्याचं सर्रास बोललं जातं.

काही दिवसांतच विकास दुबे जेलमधून बाहेर आला. आता त्याची हिंमत आणि दहशत आणखीच वाढली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यानं जे काही केलं, त्यानं संपूर्ण उत्तर प्रदेश नखशिखांत हादरला!उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची थेट पोलीस ठाण्यात घुसून त्यानं हत्या केली. सगळे पोलीसही घाबरून तिथून पळून गेले.या हत्येचे एकूण 25 साक्षीदार होते; पण दहशतीपोटी एकही साक्षीदार त्याच्या विरोधात उभा राहिला नाही. सगळेच्या सगळे पलटले आणि विकास दुबे सहीसलामत निदरेष सुटला! गुन्हेगारी आणि गुंडगिरीचा त्याचा आलेख सातत्यानं वाढतच होता. 2004मध्ये त्यानं उद्योगपती दिनेश दुबे यांची हत्या घडवून आणली, 2018मध्ये आपलाच चुलत भाऊ, अनुरागला ठार मारलं.उत्तर प्रदेशातल्या हजारो एकर जमिनीवर आपला कब्जा करताना, किती लोकांना त्यानं आपल्या रस्त्यातून बाजूला केलं, याची तर गिणतीच नाही.पोलीस ठाण्यांत विकास दुबेच्या नावावर 60 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे; पण नोंद नसलेल्या गुन्ह्यांची संख्या कितीतरी पट असावी. इतके गुन्हे असूनही तो एखाद्या राजासारखा राहात होता. कानपूरचे पोलीस जणू काही त्याची गुलामी करीत होते. त्याचे कारनामे आणि गुंडगिरी इतकी वाढली होती की, केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर शेजारच्या बिहारमध्येही त्याच्या गुंडगिरीचे डंके वाजायला लागले होते.आणि त्यानंतर आत्ता नुकतीच घडलेली घटना.जुलै 2020.विकास दुबेनं आपल्या घरात मोठय़ा प्रमाणात शस्रास्रं दडवून ठेवली आहेत, याची माहिती मिळताच डीएसपी देवेंद्र मिर्श यांनी दुबेच्या घरावर अतिशय गोपनीय पद्धतीनं छाप्याची योजना आखली. इतर पोलीस ठाण्यांतूनही पोलिसांची कुमक त्यांनी मागवली. पण चौबेपूर पोलीस ठाण्याचा प्रमुख आणि दुबेचा ‘हस्तक’ विनय तिवारी दुबेला फोन करून या छाप्याची खबर पुरवतो. पोलीस केव्हा, कसे आणि किती संख्येनं येणार आहेत याची माहिती कळवतो. आता विकास दुबे त्याचा सापळा रचतो. खबर मिळाल्यावर तिथून पळून न जाता, उलट पोलिसांचीच वाट पाहतो. ते पोहोचल्याबरोबर त्यांना घेरतो आणि भीषण हल्ला चढवतो.डीएसपी देवेंद्र मिर्श यांच्या डोक्यात गोळी घातली जाते. त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली जाते. त्यांच्यासहित आठ पोलिसांचा जीव जातो. आणखीही काही जखमी पोलीस जीवन-मरणाच्या सीमेवर आहेत.गुन्हेगार कितीही नामचिन असला, तरीही शक्यतो तो कधीच पोलिसांची हत्या करत नाही. पोलिसांनी छापा मारला, रेड टाकली तर तो शक्यतो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रय} करतो. चोहोंबाजूनी त्याला घेरलं, तरच तो प्रत्युत्तर देण्याचा प्रय} करतो. पण विकास दुबेनं तर पोलिसांना मारण्यासाठी स्वत:च सापळा रचला ! का केलं त्यानं असं? पारदर्शक तपासणीनंतरच त्यामागचं तथ्य बाहेर येऊ शकेल; पण पोलिसांच्या आपसांतल्या भांडणाचाच हा परिणाम होता का?या घटनेनं पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरंच ही एक चकमक होती, की डीएसपी देवेंद्र मिर्श यांची हत्या करण्याचं षडयंत्र? कारण या कारवाईत जवळपास पन्नास पोलीस सहभागी झाले होते. त्यांच्याकडे इंसास रायफली, कार्बाईन आणि उच्च दर्जाची पिस्तुलं होती, तरीही एकही गुन्हेगार साधा जखमीही होऊ शकला नाही. पोलिसांच्या शस्रांची लूट झाली. पोलिसांकडे वायरलेस सेटही असेलच, त्यानं चारही बाजूंनी विकास दुबेची कोंडी करता आली असती; पण पोलिसांनाच मारून सगळे गुन्हेगार तिथून सहीसलामत पळून जाण्यात यशस्वी झाले. कसं झालं हे?फरार झालेल्या विकास दुबेला उज्जैनमध्ये पोलिसांनी पकडल्यानंतर पळून जाताना पोलीस चकमकीत तो ठार झाला. निदान तसं सांगितलं जातंय.ज्या पद्धतीनं त्याला अटक झाली होती, त्यावर प्रश्नचिन्हं उमटवली जाताहेत. त्यानंतर त्याला एन्काउंटरमध्ये मारण्यात आलं, त्यावरही अनेक शंका उपस्थित केल्या जाताहेत. प्रश्नांची जंत्री वाढत जातेय. काय खरं, काय खोटं?. काळच कदाचित या प्रश्नांची उत्तरं देईल, कदाचित काळाच्या उदरातच ते गडपही होतील. कारण विकास दुबे संपलाय. त्याची टोळीही पोलिसांनी जवळपास संपवलीय. कानपूरमधला एक रक्तरंजित अध्यायही आता संपलाय. पण दहशत? ती संपेल?..

अटक ते एन्काउंटर !.विकास दुबेच्या अटकपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत अनेक घटनांकडेही आता संशयानं पाहिलं जातंय. विकास दुबेला खरंच उजैनमध्ये अटक करण्यात आली होती, की त्यानं  आत्मसर्मपण केलं होतं? पोलिसांच्या हत्येनंतर संतापलेले पोलीस आता आपला एन्काउंटर करतील, याची त्यालाही भीती होतीच. ज्या गुन्हेगाराच्या मागावर सहा राज्यांतले पोलीस होते, त्यांच्या हाती न पडता, उजैनमधल्या महाकाल मंदिरातल्या एका सिक्युरिटी गार्डनं त्याला कसं काय पकडलं? आणि दुबेला पकडल्यानंतर तो खरंच पळून जाण्याचा प्रय} करत होता की तसा बनाव रचून त्याचा पद्धतशीर एन्काउंटर करण्यात आला?.

राजकीय पक्षांचा ‘लाडका’!गुन्हेगारी जगतातील विकास दुबेच्या विकासाचा आलेख सतत चढताच होता. ती काही आता लपून राहिलेली गोष्ट नव्हती. एकेकाळी तो बसपामध्ये होता; पण प्रत्येक राजकीय पक्षांशी त्याचे संबंध होते. आपल्या परिसरात होणार्‍या सर्व निवडणुकांच्या हार आणि जितची पटकथा तो स्वत:च लिहित होता, इतकी त्याची दहशत होती. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची तो ‘गरज’ बनला होता. स्थानिक पातळीवर ब्लॉक आणि पंचायत स्तरावर त्याचाच कब्जा होता. जिल्हा पंचायत स्तरावर कायम त्याच्याच परिवारातले सदस्य निवडून येत. निवडून येण्याच्या त्याच्या या ‘कौशल्या’मुळेच प्रत्येक राजकीय पक्षाचा तो ‘लाडका’ बनला होता.

डीएसपीच्या पत्रांकडे दुर्लक्ष का?डीएसपी देवेंद्र मिर्श हे उत्तर प्रदेश पोलिसांतले एक जांबाज, धाडसी अधिकारी मानले जात होते. गुन्हेगारांचे ते कर्दनकाळ होते. त्यांच्या याच धाडसी आणि निडर स्वभावामुळे हवालदारपदापासून सुरू केलेली त्यांची कारकीर्द डीएसपी पदापर्यंत पोहोचली होती. याच वर्षी 14 मार्चला त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना पत्र लिहिलं होतं की, विनय तिवारीसहित आणखी काही पोलीस अधिकारी विकास दुबेचे ‘हस्तक’ आहेत. डीएसपी दर्जाच्या अधिकार्‍यानं हे पत्र लिहिलं असूनही वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं, हा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे. पण मिळेल या प्रश्नाचं उत्तर? - कदाचित कधीच नाही!

कहाणी प्रेमविवाहाची!कानपूरमध्ये राहणार्‍या ऋचा निगम यांच्याशी विकास दुबेनं प्रेमविवाह केला होता. ऋचा यांच्या कुटुंबीयांनी या प्रेमविवाहाला विरोध केला, तर त्यानं सगळ्यांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती. या विवाहानंतर ऋचाच्या कुटुंबीयांनी आपलं घर सोडून शहडोल येथे ते राहायला गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर विकास दुबेनं आपल्या सासुरवाडीच्या या घराचाही कब्जा घेतला !vikas.mishra@lokmat.com(लेखक लोकमत समाचारचे संपादक आहेत.)