शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

फुटबॉलचा शिकार ते टांकसाळ हा प्रवास कसा झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 3:00 AM

एखादा खेळाडू अकल्पितपणे आपल्यातील आदिम शिकार्‍याचं धाडस, सौंदर्य आणि स्वातंत्र्य एखाद्या क्षणी दाखवतो. ..तो क्षण चुकू नये म्हणून मी फुटबॉल पाहतो.

ठळक मुद्देया खेळाने विविधता स्वीकारली खरी; पण तिला एका ‘मशीन’मध्ये घट्ट बसवलं. मॅच जिंकायची तर टीम एखाद्या यंत्नाप्रमाणे हवी या तंत्राग्रहामुळे आपोआपच खेळाडूच्या वैयक्तिक प्रतिभेचा, स्वातंत्र्याचा संकोच झाला. सगळा खेळ शक्तीचा, वेगाचा आणि पैशाचा झाला !जगण्यासाठी शिकलेल्या जीवघेण्या युद्धातले डावपेच मैदानावर शत्रूशी भिडतात, तेव्हा..

सुनील तांबे

सिंहाची शेपटी पकडण्याचा विधी ज्याने पार पाडला आहे तोच पुरुष वयात आलेला असतो. म्हणजे प्रजननाला लायक असतो, अशी समजूत एका आफ्रिकन जमातीत होती. त्यासाठी गावातले अनुभवी आणि तरु ण सिंहाच्या शिकारीसाठी बाहेर पडत. सिंहांचा कळप असतो. त्यातल्या सिंहाला एकटं पाडणं ही पहिली कामगिरी असायची. त्यानंतर त्या सिंहाला घेरायचे आणि भाले त्याच्या अंगात घुसवायचे. वयात आल्याचं सिद्ध करू पहाणारा युवक त्याच वेळी सिंहाची शेपटी तिच्या मुळाकडे पकडून सिंहाला मागे खेचायचा...हा खेळ जिवावरचा होता. कारण भाले लाकडाचे असायचे. त्यांची टोकं खूप आतवर घुसण्यासाठी कमालीची शक्ती हवी. सिंह हे भाले गवताच्या पात्यासारखे मोडून टाकायचा. सिंह पुढे उडी मारण्याची धडपड करायचा. त्यावेळी शेपटाने धरून त्याला मागे खेचायचा. सिंहांची शेपूट बंदुकीच्या नळीसारखी टणक झालेली असते. इतर सहकार्‍यांची शक्ती, त्याने खुपसलेले भाले, त्यांच्या हालचाली, सिंहाच्या शक्तीचा अंदाज इत्यादी अनेक घटक क्षणार्धात जाणून सिंहाची शेपूट धरायची असते. जरा चूक झाली आणि सिंहाच्या पंजाचा फटका बसला तरी कायमचं जायबंदी होण्याची वा ठार होण्याची भीती असायचीच. शक्ती, बुद्धी आणि धैर्य या जोरावर सिंहाची शेपूट धरून त्याला मागे खेचायचा, त्याची गती कमी करायची जेणेकरून सहकारी त्याला ठार करतील.- हा खेळही होता आणि युद्धही !शिकार जगण्यासाठी आवश्यक होती. जगणं आणि खेळणं वेगळं नव्हतं. त्या काळात कोणीही जॉगिंग करायला जात नव्हते, की व्यायामशाळा नव्हत्या. जगण्यासाठीची धडपड, संघर्ष हाच व्यायाम होता, खेळ आणि करमणूकही होती. लोक चित्नं काढायचे ती जगण्याचा भाग म्हणून. गाणी म्हणायचे, नाचायचे जगण्यासाठी. कुणाचं मन रिझवण्यासाठी कुणी नाच-गाणी करत नव्हतं की खेळत नव्हतं. भाषाही जगण्यासाठीच बोलली जायची. उंच उडी मारणं किंवा बाण मारणं, वेगाने धावणं वा पोहणं वा भाला फेकणं, शक्ती एकवटून सिंहाची शेपूट ओढणं किंवा अन्य कुणा प्राण्यावर हल्ला करणं हे गुण प्रत्येकाला अंगी बाणवावे लागत होते.शिकारीसाठी आवश्यक ती कौशल्य अंगी बाणवणं यातूनच खेळांचा जन्म झाला. प्राणी वा पक्षांची मुलंही खेळताना नेमकी हीच कौशल्यं शिकून घेत असतात. पण त्यांच्यातून कोणी खेळाडू तयार होत नाहीत. माणसांमध्ये मात्न खेळ हे जगण्याचं साधन बनलं. पोलो या खेळाचं उदाहरण घ्या. हा खेळ आपल्याकडेही होताच. अफगाणिस्तानातला पोलो म्हणजे  मेंढीचं धड पळवून नेण्यासाठी घोडेस्वारांमधली चढाओढ. घोडदौडीमध्ये प्रविण असलेले तरु णच त्यामध्ये बाजी मारत. मुघलकाळात पोलो हत्तीवरूनही खेळला जायचा. त्याचंच एक रु प म्हणजे हॉकी.क्रि केटचा संबंध विटीदांडूशीही जोडता येईल. फुटबॉलची वाटचालही अशीच झाली असणार. हा खेळ  आजच्या मुक्कामाला विविध मार्गांनी पोचला आहे. त्याची काही मुळं चीन आणि जपानमध्येही आहेत. 

ऑलिम्पिक्सचं बोधवाक्य आहे - हायर, स्ट्राँगर आणि फास्टर. त्यामध्ये क्र ीडा प्रकारांमधील सौंदर्य सामावलेलं आहे. कारण त्यामध्ये देह, मन आणि बुद्धीची एकाग्रता आहे. ऑलिम्पिक्समध्ये समाविष्ट होणारे सर्व क्र ीडा प्रकार शिकारीशी संबंधित आहेत. युद्धकौशल्य शिकारीशीच संबंधित आहे.प्रगती करायची तर उत्पादन करावं लागतं. उत्पादनवाढीसाठी विविध सेवांची गरज असते. त्यासाठी तंत्नज्ञान विकसित करावं लागतं. श्रमविभागणी अटळ ठरते. शेतकरी, सुतार, लोहार, कारागीर, सैनिक, सेनापती, राजा, प्रधान, धर्मगुरु, गायक, वादक, नर्तक, नाटककार, कथाकार, गीतकार आणि खेळाडू तयार होतात. मात्न सर्व कलांचा उगम आदिम जगण्यात आहे...आता पाहाल तर उत्पादक श्रम करणार्‍या व्यक्तीपेक्षा क्र ीडापटूंचं विशेषतर्‍ फुटबॉलपटूंचं उत्पन्न कित्येक पटींनी अधिक आहे.फुटबॉलचं आजचं आधुनिक रूप साकार झालं इंग्लंडमध्ये. तिथे फुटबॉल असोसिएशनही स्थापन झाली होती. परंतु तरीही फुटबॉल मूठभर देशांमध्येच खेळला जात होता. फिफाची स्थापना झाली 1904 साली. ऑलिम्पिक्समध्ये फुटबॉलचा समावेश झाला 1908 साली. मात्न तेव्हा केवळ काही हौशी संघ स्पर्धेत उतरले होते. कारण फुटबॉल लब्ध प्रतिष्ठितांचा खेळ होता. टेनिस वा क्रिकेटप्रमाणे. फारच कमी देशांत फुटबॉलची मैदानं होती, स्टेडियम्स दूरची गोष्ट.1924 आणि 1928च्या ऑलिम्पिक्समध्ये उरुग्वेने फुटबॉल स्पर्धेत विजय मिळवला. सर्व युरोपियन राष्ट्रांना मागे टाकून. उरुग्वेच्या स्वातंत्र्याला शंभर र्वष पूर्ण झाली 1930 साली. त्यानिमित्ताने फिफाने उरुग्वेमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा घ्यावी, असा बूट तिथल्या राजकारण्यांनी काढला आणि फिफालाही तो मानवला. कारण सर्व संघाचा प्रवासखर्च आणि निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी उरुग्वेच्या सरकारने घेतली होती. त्यामुळे दक्षिण अमेरिकेत फुटबॉलचं लोण पसरलं.केवळ एक बॉल मिळाला की हा खेळ खेळता येतो. अन्य साधनसामग्री अत्यावश्यक नसते. त्यामुळे फुटबॉल झपाटय़ाने बहुजनांचा खेळ बनला. उरुग्वेने दोनदा विश्वचषक जिंकला, तर ब्राझीलने पाच वेळा, अर्जेटिनाने दोन वेळा. जर्मनीने तीन वेळा तर स्पेन, इंग्लंड, इटली, फ्रान्स यांनी प्रत्येकी एकदा. युरोपियन राष्ट्रांना फुटबॉलवर वर्चस्व मिळवण्यासाठी दक्षिण अमेरिकन देशांशी स्पर्धा करावी लागते.एक काळ असा होता की, दक्षिण अमेरिकन फुटबॉलची शैली वेगळी होती. ड्रिबलिंग, शॉर्ट पासेस आणि गोल मारताना अद्भुत धाडस व सौंदर्य ही दक्षिण अमेरिकन फुटबॉलची शैली होती. या देशांमध्ये हजारो मुलं गल्ली, कोपर्‍यात फुटबॉल खेळत. त्यावेळी या देशांचा प्रगत औद्योगिक देशांमध्ये समावेश होत नव्हता. अमेरिकेच्या म्हणजे युरोपच्याही आर्थिक, राजकीय वर्चस्वाला झुगारण्याचा आनंद फुटबॉलमधील प्रावीण्य सिद्ध करून मिळवण्यासाठी दक्षिण अमेरिकेतले लोक प्रयत्नांची शिकस्त करत. त्यांच्यासाठी फुटबॉल हा राष्ट्रधर्म आणि सौंदर्य होतं. म्हणून तर पेले, मॅरेडोना असे अद्वितीय खेळाडू या राष्ट्रांनी दिले. दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉलचं आणखी एक वैशिष्टय़ं म्हणजे त्यांच्या संघात काळे, गोरे, तांबडे, मिश्र वर्णीय असे विविध वर्णाचे खेळाडू असायचे.युरोपातले बहुतेक खेळ उमरावांचे होते. कारण सरंजामशाहीत केवळ उमरावांनाच खेळण्याची चैन शक्य होती. फ्रान्समधील क्र ांतीची ठिणगी टेनिस कोर्टावर झालेल्या सभेत पडली. हे टेनिस कोर्ट इनडोअर होतं. औद्योगिक क्र ांतीनंतरही युरोपमधील खेळांवर या उमरावांचा वा त्यानंतर मध्यमवर्गीयांचा प्रभाव होता. आयडल क्लास या चित्नपटात चार्ली चॅप्लिनने गोल्फच्या वर्गीय चारित्र्यावर भेदक विनोद केला आहे. युरोपियन राष्ट्रवादाची इमारतच   ‘एक्स्लुजिव्हिटी’वर आधारलेली होती. जर्मन वंशाचा जर्मन भाषा बोलणारा तो जर्मन. तीच गत फ्रेंच, ब्रिटिश, स्पेन, पोर्तुगाल, इटली इत्यादींची होती. हिटलर तर रशियाला आशियायी देश मानत असे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या फुटबॉल संघातही पडत असे. दक्षिण अमेरिकेतला राष्ट्रवाद   ‘इन्क्लुजिव्ह’ म्हणजे सर्वसमावेशक होता.पण युरोपियन राष्ट्रांचे म्हणजे औद्योगिकदृष्टय़ा प्रगत राष्ट्रांचेही काही गुण होते. औद्योगिक क्र ांतीमुळे उत्पादन, वितरण आणि उपभोग यांची केंद्रीय व्यवस्था बनली. त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्या उत्पादनांच्या खपासाठी वसाहती कामाला आल्या. वसाहतीतली उत्पादनंही - कॉफी, चहा, कोको इत्यादी जागतिक करण्यात युरोपियन राष्ट्रांनी मुसंडी मारली कारण पैसा. उत्पादन वाढवायचं तर त्या प्रक्रियेचा सुटा वा अलग अभ्यास करायचा. द्राक्षाच्या चवीला कोणते घटक किती प्रमाणात जबाबदार असतात, त्यानुसार बदल केले तर विविध चवींची द्राक्षं मिळू शकतात, द्राक्षांमधील साखरेचं प्रमाण निश्चित करता येतं, त्यामुळे द्राक्षांची बाजारपेठ मोठी होते. त्यासाठी जमीन, हवामान, मूळं, खोडं यांचा अभ्यास तुकडय़ा तुकडय़ाने करायचा. या वैज्ञानिक विचारपद्धतीचा अवलंब त्यांनी खेळातील वर्चस्व वाढवण्यासाठीही केला. पण त्यासाठी भांडवल गुंतवणूक कोण करणार हा प्रश्न त्यांनी फुटबॉल लीग स्थापन करून सोडवला.मग फुटबॉलचे खासगी संघ स्थापन झाले. खेळाडू विकत आणि भाडय़ाने देता-घेता येऊ लागले. फुटबॉलपटू हा करमणुकीच्या एका महाकाय यंत्नातला एक घटक बनला. प्रायोजक, आयोजक यांच्या हाती खेळाची सूत्नं गेली. युरोपमधील व्यावसायिक संघांचा कारभार एखाद्या बहुराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणे चालवला जाऊ लागला.आता भर होता मॅच जिंकण्यावर.त्यासाठी काय हवं?- तर टीम एखाद्या यंत्नाप्रमाणे हवी. या तंत्राग्रहामुळे आपोआपच खेळाडूच्या वैयक्तिक प्रतिभेचा, स्वातंत्र्याचा संकोच झाला. आजच्या जर्मन टीममध्येही आफ्रिकन खेळाडू आहेत, फ्रान्सची अर्धी टीम आफ्रिकन वंशीयांची आहे. म्हणजे विविधता त्यांनी स्वीकारली; पण तिला एका मशीनमध्ये फिट्ट केलं. युरोपियन खेळाची वैशिष्टय़ म्हणजे लाँग पासेस, क्र ॉसेस आणि शक्तीचा खेळ. प्रतिस्पर्धी संघाला ड्रिबलिंगला फारसा वाव ठेवायचाच नाही. ही वैशिष्टय़ आता जागतिक बनली आहेत. त्यांनी सर्व खेळ शक्तीचा, वेगाचा आणि पैशाचा करून टाकला आहे.फुटबॉलचं मार्केटिंग आणि त्यातून पैशाची निर्मिती एवढंच सध्या ‘फिफा’ करते. फुटबॉलच्या प्रेक्षकांची संख्या वाढवणं हेच फिफाचं एकमेव उद्दिष्ट आहे. त्यासाठी आदिदास, नायके यांसारख्या जागतिक कंपन्यांशी साटंलोटं करणं, टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क विकणं हा मुख्य कारभार आहे. म्हणजेच फुटबॉलचा प्रसार हे निव्वळ उप-उत्पादन आहे.विश्वचषक स्पर्धेत केवळ 16 देश भाग घेत असत. आता ही संख्या 32वर पोहचली आहे. फुटबॉलच्या या व्यावसायिक रूपासाठीच्या प्रेक्षकांचा प्रसार आता युरोपबाहेर करायचा म्हणून अमेरिका (उत्तर अमेरिका), आफ्रिका आणि आता रशियात स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. 2022ला विश्वचषक स्पर्धा कतार म्हणजे अरबस्थानात भरवण्यासाठी फिफामध्ये लॉबिंग सुरू आहे.  जागतिक भांडवलशाहीच्या घोडय़ावर फिफा स्वार झाली आहे. त्याशिवाय राष्ट्रवाद, राष्ट्रांमधील अंतर्गत संघर्ष म्हणजे यादवी यांचेही पडसाद फुटबॉलमध्ये आहेत.तो खेळ आता निव्वळ शक्ती आणि वेगाचा बनला आहे. त्यातलं सौंदर्य आणि कौशल्य लोप पावलं आहे. - तरीही एखादा खेळाडू अकल्पितपणे आपल्यातील आदिम शिकार्‍याचं धाडस, सौंदर्य आणि स्वातंत्र्य एखाद्या क्षणी दाखवतो. .. तो क्षण चुकू नये म्हणून मी फुटबॉल पाहतो.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)suniltambe07@gmail