शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

फुफ्फुस पेटते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:10 IST

आपल्या ‘अविकसितपणा’ची खंत बोचणार्‍या सगळ्या देशांना विकासाची घाई झाली आहे. जेर बोल्सोनारो हे गृहस्थ याच घाईत ब्राझिलमध्ये थेट सत्तेवरच आले. अँमेझॉनला आग लागली ते उत्तमच, असे त्यांचे मत ! ते म्हणतात, ‘एवढय़ा मोठय़ा जंगलाची काही गरजच नाही.  याच्या एकचतुर्थांश भागानेही  ब्राझिलची प्राणवायूची गरज भागेल  आणि आम्ही काय जगाला  शुद्ध हवा पुरवण्याचा ठेका घेतलाय का?’ 

ठळक मुद्देअँमेझॉनच्या जंगलाला लावलेली आग, हा शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरणार आहे. म्हणून या आगीने अस्वस्थ होणार्‍या माणसांनी केवळ भावनिक न होता मानवजात म्हणून कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

- अँड. गिरीश राऊत

अँमेझॉन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी व अलीकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक, सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्नाची सर्वाधिक रुंदी 120 किलोमीटर आहे. यामुळे पलीकडचा तीर दिसत नसणार्‍या अँमेझॉनला ‘समुद्रनदी’ म्हणतात. पेरू, कोलंबिया व मुख्यत्वे ब्राझिल देशातून वाहणार्‍या या नदीचे पाणलोट क्षेत्न व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अद्भुत क्षेत्न आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्नफळाच्या जवळ जवळ पाच पट आहे. पाण्यात सूर मारून बुडी घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे ऑस्प्रेसारखे पक्षी आपणास माहीत आहेत. पण अँमेझॉनच्या काही क्षेत्नातील नेहमी बुडालेल्या जंगलात पाण्यातून वर हवेत आठ दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणार्‍या मत्स्यजाती आहेत. पिरान्हा मासा, 40 फुटांपेक्षा जास्त लांब अँनाकोंडा सर्प यांसह कोट्यवधी वैशिष्ट्यपूर्ण जीवजातींची धारणा करणार्‍या या अँमेझॉनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रतिघन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडील, अँण्डीज पर्वतराजींत उगम पावणार्‍या या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळणे घेत पूर्वेकडे वाहतो व नदीमुखातून जवळ जवळ 200 किलोमीटरपर्यंत अटलांटिक महासागरात आत शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्व दाखवतो.आता लागलेल्या किंवा लावल्या गेलेल्या सुमारे 77 हजार आगींमुळे धगधगणारे अँमेझॉनचे जंगल चर्चेत आहे. संवेदनशील माणसांच्या चिंतेचा विषय बनले आहे. हे जंगल काही दशके, बांधकाम व वस्तूंसाठी लाकूड हवे म्हणून तोडले जात होते; पण अलीकडे मुख्यत्वे ब्राझिल देशात विकासाचा उन्माद आल्याने नगदी पिकांसाठी, रस्त्यांसाठी, खनिजांसाठी व तेल उत्खननात जंगलाचा अडथळा नको म्हणून प्रचंड वेगाने तोड सुरू झाली. येथील जंगलापासून अभिन्न अशा आदीम जमातींसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न असल्याने त्या जमाती प्राणपणाने जंगल वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण आधुनिक जग- ज्यात वाचकांचादेखील समावेश आहे ते - त्यांना मागास ठरवते.लक्षात येते की, गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून जंगल तोडू पाहणार्‍यांची संख्या वाढत गेली. त्यांचा युक्तिवाद असा की, ‘आम्हाला जगायचे आहे. आम्हाला जंगल तोडू द्या. आम्हाला झाडांचे प्रचंड घेराचे बुंधे हवेत’. पैसे कमावण्याचा सोपा मार्ग. अँमेझॉनने करोडो वर्षे जगवले. पण आता त्यांना सरळ मिळणारे अन्न नाही तर, बाजारात धान्य विकण्यासाठी, म्हणजे शहरांसाठी नगदी पिके घेण्यासाठी, अडथळा ठरणारे जंगल तोडून साफ केलेली  स्वच्छ जमीन हवी आहे. जंगलामुळे परवानगी मिळत नसल्याने तेल उत्खनन उद्योगाला तर हा बदलणारा देखावा हवाच. विविध खनिजांसाठी खाण खणणार्‍यांनाही जेवढे जंगल व जंगलाशी नाळ जोडलेली माणसे कमी तेवढा विरोध कमी.प्रचलित शिक्षण वाढले तसे या आधुनिक म्हणवणार्‍या शिक्षित जनतेच्या आकांक्षा वाढल्या. तसे पृथ्वीवरील सृजनाचा समृद्ध आविष्कार असलेल्या या विषुववृत्तावरील सदाहरित पर्जन्यवनात जीवनाविरुद्ध जाणारा वैचारिक प्रवाह जोर धरू लागला. जेर बोल्सोनारो हा या प्रवाहाचा प्रवक्ता, ब्राझिलमध्ये सत्तेवरच आला. ते म्हणतच होते की, ‘एवढय़ा मोठय़ा जंगलाची काही गरज नाही. याच्या एकचतुर्थांश भागानेही ब्राझिलची प्राणवायूची गरज भागेल आणि  आम्ही काय जगाला शुद्ध हवा पुरवण्याचा ठेका घेतलाय का?’ त्यांच्या मते, ‘अँमेझॉन जंगलाचे रक्षण हा ब्राझिलच्या आर्थिक विकासातील अडथळा आहे.’ आता ते हे प्रत्यक्षात उतरवताहेत. त्यांच्या मते जनतेच्या विकासाच्या आकांक्षा ते पूर्ण करताहेत. - जगणे म्हणजे काय?जीवनशैली म्हणजे जगणे नाही. जगणे कोट्यवधी वर्षे चालू आहे. जीवन हवे की जीवनशैली? जीवनशैली जीवनाला नष्ट करत आहे, हे यानिमित्ताने तातडीने स्पष्ट व्हायला हवे. वातावरण बदल व त्यामुळे झालेल्या तापमानवाढीमुळे मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. हे माहीत असलेली जागृत संवेदनशील माणसे व निसर्गात विपरीत घडत आहे हे समजणारी सामान्य माणसेही अस्वस्थ आहेत. मात्न विकास की पर्यावरण, अशा चर्चा विकासाच्या बाजूने पक्षपात करून रंगवणारी वृत्तपत्ने आहेत. ती बुद्धिभेद करत राहतात. अँमेझॉनच्या जंगलाला लावलेली आग, हा शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरणार आहे. म्हणून या आगीने अस्वस्थ होणार्‍या माणसांनी केवळ भावनिक न होता मानवजात म्हणून कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्वयंचलित यंत्न आल्यावर 250 वर्षांत युरोप व अमेरिकेने स्वत:च्या देशातील तसेच इतरत्नचे जंगल नष्ट केले. ती प्रगती ठरली. तो विकास ठरला. ते विकसित ठरले. त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, र्जमनी, इटाली, स्पेनप्रमाणे सरळ शस्राने किंवा अमेरिकेप्रमाणे व्यापाराने जग ताब्यात घेतले. एक भौतिक विकासाचा विचार रुजवला गेला. दुसर्‍या महायुद्धानंतर देश स्वतंत्न झाले. मग गुलामांमध्ये शर्यत सुरू झाली जेत्यांप्रमाणे विकसित होण्याची. अतिपूर्व मध्यपूर्व व मग चीन, भारत, आफ्रिका, लॅटीन अमेरिकेतील देश त्यात उतरले. ज्यांना अविकसित ठरवले गेले त्यांना विकसितांची जीवनशैली खुणावू लागली. आपल्याला अविकसित म्हटले जाते हे औद्योगिकरणासाठी निर्माण केलेले शिक्षण घेतल्याने त्यांना बोचू लागले. मग त्यांचाच प्रतिनिधी, ‘अँमेझॉनचे जंगल तुमच्या विकासासाठी नष्ट करीन’, असे आश्वासन देऊनच अध्यक्ष बनला. हे असेच सर्व देशांत घडले.आता या क्षणी आफ्रिकेतही काँगो नदीच्या खोर्‍यातील जंगल जळत आहे. गॅबॉन देश ते अंगोला  देशाच्या पट्टय़ातील कॅमेरून व इतर देशांतील 33 लाख चौरस किलोमीटर क्षेत्नातील वर्षावने जळत आहेत. येथेही सर्मथकांकडून तज्ज्ञ नेमून युक्तिवाद केला जातो की, मोठय़ा बुंध्याची झाडे तोडल्यानंतर उरलेला पालापाचोळा व काडकाटक्या सुक्या काळात जाळावी लागतात. अरे हो, पण मोठय़ा बुंध्याची उत्तुंग झाडे का तोडता? - याचे उत्तर आहे पैशासाठी. अर्थव्यवस्थेसाठी ! आपल्या देशांतही हेच घडत आहे.आजच्या पिढीला अँमेझॉन ऑनलाइन मार्केटिंग  कंपनीचे वेड लावले जात आहे. त्याऐवजी त्यांना अँमेझॉन नदी व जंगलाचे आपल्या अस्तित्वासाठी असलेले महत्त्व समजण्याची गरज आहे. अँमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचे प्रथम क्र मांकाचे व काँगो नदीच्या खोर्‍यातील जंगलाला पृथ्वीचे दुसर्‍या क्र मांकाचे फुफ्फुस म्हणतात. पण आता वातावरणात असलेलाच कार्बन पृथ्वी तापवून आपणास नष्ट करू शकतो !  त्यासाठी प्रत्येक झाड आणि प्रत्येक जंगल वाचणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कोणीच जगणार नाही..advgirishvraut@gmail.com(लेखक ‘भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळी’चे निमंत्रक आहेत.)