शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मी मुंबईत गेले तेव्हा... १२ मुलींसोबत एकत्र राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 05:55 IST

मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं. 

- मृणाल दुसानीस, अभिनेत्रीनाशिकसारख्या अतिशय शांत, रम्य आणि देखण्या शहरात वाढले. कुठूनही कुठेही आम्ही जास्तीत जास्त १५ मिनिटांत पोहोचतो. मी इथल्या जिनियस नामक नाट्यसंस्थेची सक्रिय सदस्य होते. नाटकातील कामांसोबतच मी पत्रकारितेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमही करत होते आणि त्यावेळच्या स्टार माझा वाहिनीवर उमेदवारीही सुरू होती. अशातच हृषिकेश जोशी एकदा एका शिबिराच्या निमित्ताने भेटले आणि त्यांनी आम्हा सर्व शिबिरार्थींची एका मालिकेच्या ऑडिशनसाठी शिफारस केली. दुर्दैवाने ती मालिका प्रत्यक्षात झालीच नाही, पण मला मात्र त्या अनुभवातून ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही पहिली मालिका मिळाली. मालिका दैनंदिन असल्याने मुंबईतच थांबणं भाग होतं म्हणून मगं मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं. 

मला मुंबईची फारशी माहिती नव्हती. आई-बाबांना सोडून दुसऱ्या शहरात आजपर्यंत कधीच राहिले नव्हते. सुखी, सुरक्षित अशा नाशिकच्या वातावरणातून मी एकदम मुंबईसारख्या म्हटलं तर व्यावसायिक शहरात आपलं नशीब आजमावायला  आले होते. ओळखीतून मालाडला एका गुजराती आजींकडे  पेईंग गेस्ट म्हणून राहायची सोय झाली. तिथे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या १२ मुली राहत होतो. सुरुवातीच्या काळात या संख्यांची मला बऱ्यापैकी मदत झाली. मी मुंबईतच नंतर ८ जागा बदलल्या. त्यात गोरेगावच्या सप्रे चाळीत खूप चांगले शेजारी मिळाले होते. सप्रे काका, आठल्ये काकू, भावे काकू मला कधी ‘होम सिक’ होऊच द्यायच्या नाहीत. त्यांच्यामुळे नाशकात माझे आई-बाबा देखील निश्चिंत असायचे.

सुरुवातीला मुंबईतले पत्ते आणि लोकलची स्टेशन्स यांची सांगड घालायला जड जायचं. नंतर मात्र काहीतरी थ्रिलिंग केल्याचा अनुभव येत होता. एकदा मात्र अंधेरीहून मी विरार लोकलमध्ये चढले आणि त्या बायकांनी मला बोरिवलीला उतरूच दिलं नाही. मला दहिसरला उतरून मागे यायला लागलं होतं. मुंबई शहर हे मनाला हुरूप देणारं शहर आहे. मी तर हीच माझी कर्मभूमी मानते. माझं माहेर नाशिक आणि सासर पुणे असलं तरी माझं घर हे मुंबईच आहे आणि मुंबईच राहणार ! - शब्दांकन : तुषार श्रोत्री

टॅग्स :Mrunal Dusanisमृणाल दुसानीसTelevisionटेलिव्हिजन