शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

नो दसविदानिया, प्लीज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 06:05 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या अलेक्झी नवाल्नी यांनी १७ जानेवारी रोजी रशियात पाऊल ठेवताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण रशिया पेटून उठला आहे...

ठळक मुद्देपुढे काय होईल, याचा तूर्तास तरी नेम नाही... परंतु पुतिन यांच्याविरोधात जनमानस पेटून उठले आहे, हे नक्की.

- विनय उपासनी

“छताला दोर लावून स्वत:ला फाशी घेण्याचा माझा विचार नाही. किंवा एखाद्या टोकदार चमच्याने स्वत:च्या हाताच्या नसा वा गळा कापण्याचाही विचार माझ्या मनात येत नाही. ते दररोज माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. माझ्या वजनाचा अंदाज ते घेत आहेत. त्यामुळे मला अचानक हृदयविकाराचा झटकाही येऊ शकत नाही. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सध्या मी अत्यंत स्थिर आहे...”-_ अलेक्झी नवाल्नी यांनी २२ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर लिहिलेली ही पोस्ट आहे. त्यात एक अनामिक भीती दडली आहे.

एकेकाळी महासत्ता असलेल्या सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर लुळापांगळा झालेल्या रशियाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे स्वप्न जनतेला दाखविणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांची कारकिर्द प्रत्यक्षात रक्ताळलेली आहे. आपल्या विरोधात उठणारा आवाज निर्दयपणे दाबून टाकणे हेच त्यांच्या निरंकुश सत्तेचे यशसूत्र! आता अलेक्झी नवाल्नी नावाचे वादळ त्यांच्याविरोधात घोंघावत आहे. या वादळाला शांत करण्याची त्यांची योजना गेल्या वर्षी फसली. परंतु आता सावज स्वत:हून जाळ्यात आले आहे. त्याचे काय करायचे, याचा अत्यंत थंड डोक्याने विचार सध्या क्रेमलिनमध्ये सुरू असेल.

तत्पूर्वी... पुतिन यांनी आपल्या विरोधकांना कसे संपवले किंवा संपविण्याचा प्रयत्न केला याची वानगीदाखल उदाहरणे! सर्गेई स्क्रिपल आणि त्याची मुलगी युलिया. ‘ग्रु’ या लष्करी गुप्तचर संस्थेचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या सर्गेईला पुतिन यांची धोरणे पटली नाहीत. त्याने थेट त्यांच्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मग, स्क्रिपलला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. एमआय५ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेच्या पुढाकारने स्क्रिपलचे हस्तांतरण करण्यात आले. सर्गेईला संपविण्याची खुमखुमी कायम होतीच. ४ मे २०१८ रोजी सर्गेई आणि त्याला भेटायला आलेली युलिया यांच्यावर ब्रिटनमधील सॅलिसबरी येथील एका बगिच्यात विषप्रयोग करण्यात आला. थोडक्यात वाचले दोघेही. त्यांच्यावर नोव्हिचोक विषाचा प्रयोग करण्यात आला होता.

मिखाईल खोदोर्कोव्हस्की हे एकेकाळी पुतिन यांचे कट्टर समर्थक. रशियाचे भावी नेते. तेलसम्राट. अगणित संपत्तीचे मालक. मात्र, त्यांची संपत्ती डोळ्यात खुपू लागल्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारागृहात डांबण्यात आले. पाश्चात्त्य मानवाधिकार संघटनांनी मध्यस्थी करून खोदोर्कोव्हस्की यांना रशियातून बाहेर काढले. आज ते लंडन येथून पुतिन यांच्याविरोधात जनमत तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

बोरिस नेेमत्सोव्ह हेही पुतिन यांचे विरोधक. लोकांचा पाठिंबा असणारे. नेमत्सोव्ह यांना २७ फेब्रुवारी २०१५ रोजी क्रेमलिनच्या बाहेर नदीच्या पुलावर गोळ्या घालून संपविण्यात आले.

पुतिन यांचा केजीबीमधील माजी सहकारी अलेक्झांडर लिटविनिन्को. पत्रकार परिषद वगैरे घेऊन त्याने पुतिन राजवटीचे वाभाडे काढले. त्याला अटक करण्यात आली. पुढे तो लंडनला पळून गेला. पोलोनियम-२१० नावाचा विषारी पदार्थ त्याला चहातून चाटविण्यात आला. २३ नोव्हेंबर २००६ रोजी रुग्णशय्येवर तडफडून मेला तो.

ॲना पोलित्कोव्हस्काया या धडाडीच्या महिला पत्रकाराने पुतिन राजवटीला जेरीस आणले होते. २००४ मध्ये तिच्यावरही विषप्रयोग करण्यात आला. मात्र, त्यातून ती वाचली. पुढे दोन वर्षांनी ॲनाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

ही यादी अजूनही वाढवता येईल. कारण नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामच्या पोस्टवर जे लिहिलंय. त्यानुसार अनेकांच्या हत्या या आत्महत्या वाटाव्यात अशा पद्धतीने घडवून आणण्यात आल्या आहेत.

अलेक्झी नवाल्नी यांच्यावर गेल्या २० ऑगस्ट रोजी टोम्स्क ते मॉस्को या विमान प्रवासादरम्यान विषप्रयोग करण्यात आला. त्यांच्यावर व्यवस्थित पाळत ठेवण्यात आली. महिना - सहा महिने नव्हेतर, चांगली दोन - तीन वर्षे. दौऱ्यावेळी नवाल्नी यांचे निवासाचे ठिकाण, तेथे त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्ती, चहापानाची वेळ, जेवणाची वेळ, जेवणातील पदार्थ या सगळ्या सगळ्याची इत्थंभूत माहिती रशियाची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफएसबीकडे तयार असायची. नवाल्नी यांच्यावर नोव्हिचोकचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले. टोम्स्क येथे एका हॉटेलात नवाल्नी यांचा मुक्काम होता. या हॉटेलातील लाँड्रीवाल्याची भूमिका एका एफएसबी एजंटवर सोपविण्यात आली. नवाल्नी यांच्या अंतर्वस्त्रावर नोव्हिचोकची पावडर फासायची, एवढीच जबाबदारी! त्याने ती चोख पार पाडली. परिणामी, नवाल्नी यांना विमानातच अस्वस्थ वाटू लागले. पुढील इतिहास सर्वज्ञात आहे.

नवाल्नी यांनी स्वत: एका एफएसबी एजंटलाच बोलते केल्यानंतर ही माहिती उजेडात आली. एफएसबीचा एक वरिष्ठ अधिकारी बोलत असून नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाच्या कटाचे दस्तऐवज बनवायचे आहेत, अशी बतावणी करत नवाल्नी यांनी या एजंटला बोलते केले. सुरुवातीला त्याने नकारच दिला फोनवरून बोलायला. परंतु फसलेल्या कटाचे गांभीर्य विचारात घेऊन अखेरीस त्याने सर्व माहिती फोनवरून नवाल्नी यांना दिली. यूट्युबवर ती ध्वनिफीत अवघ्या काही तासांत जगभरात व्हायरल होऊन रशियाची व्हायची ती बदनामी झाली.

एवढे सारे होऊनही नवाल्नी प्रचंड जोखीम पत्करून पुन्हा मायदेशी परतले आहेत. देशात बदल घडवायचा असेल तर हे धाडस गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे. १७ जानेवारी रोजी मॉस्कोत परतताच विमानतळावरच नवाल्नींना अटक करण्यात आली. त्यानंतरच्या चार दिवसांनी नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवर वरील पोस्ट लिहिली आहे.

पुढे काय होईल, याचा तूर्तास तरी नेम नाही... परंतु पुतिन यांच्याविरोधात जनमानस पेटून उठले आहे, हे नक्की. या पार्श्वभूमीवर इतर पुतिन विरोधकांप्रमाणे नवाल्नी यांच्यावरही मायदेशाला दस विदानिया (इंग्रजीत - गुडबाय) म्हणण्याची पुन्हा वेळ येऊ नये इतकेच!

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

vinay.upasani@lokmat.com