शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जे भावतं ते साकारतो

By admin | Updated: May 6, 2014 15:53 IST

सुभाष घई! राज कपूरनंतर चित्रपटसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव. मात्र, मध्यंतरी चित्रपटांशिवाय इतरच विषयांमधून घई वादग्रस्त झाले. एक-दोन चित्रपटांच्या अपयशानंतर त्यांनी विश्रांती घेतली होती. आता नव्या दमानं पुन्हा ते मैदानात आले

 - पूजा सामंतसुभाष घई! राज कपूरनंतर चित्रपटसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव. मात्र, मध्यंतरी चित्रपटांशिवाय इतरच विषयांमधून घई वादग्रस्त झाले. एक-दोन चित्रपटांच्या अपयशानंतर त्यांनी विश्रांती घेतली होती. आता नव्या दमानं पुन्हा ते मैदानात आले आहेत. नव्या कलावंतांना संधी देण्यासाठी तत्त्पर असणार्‍या या अनुभवी दिग्दर्शकाशी साधलेला संवाद.सुभाष घई, चंदेरी विश्‍वातलं एक असं नाव, ज्याने स्वप्नं पाहिली, ती रुपेरी पडद्यावर साकार केली. आजतागायत ज्ॉकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री, महिमा चौधरी, इशा शर्वाणी, मनीषा कोईराला, सरोज खान, अनिल कपूर अशा कित्येकांना त्यांनीच नावारूपाला आणलं आणि स्टारडम मिळवून दिलं.. सुभाष घई नावाचा हा जादूगार पुन्हा एकदा मार्गस्थ झाला आहे, त्याच्या पुढील प्रवासाला.. सुभाष घई म्हणजे यशापयशाचे अनेक खेळ लीलया खेळलेला एक आनंदयात्री.. अलीकडच्या काळात घईंनी उभारलेल्या व्हिसलिंग वूड्स या अभिनय संस्थेसंदर्भात जे वादळ निर्माण झालं त्या वादाचाही परार्मश घईंनी या संवादात घेतला.आजवरच्या प्रवासाविषयी सांगाल?- माझा जन्म महाराष्ट्रातला- नागपूरचा. माझे वडील दंतवैद्य होते. माझं पुढील आयुष्य दिल्ली-रोहतकला गेलं. अभिनयाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या हट्टाखातर त्यांनी मला Films & Television Institute, Pune येथे प्रवेश घेण्याची परवानगी दिली. माझा अभ्यासक्रम मी पूर्ण केला, इथेच मला माझी जीवनसाथी-रेहाना भेटली, तिचे नाव मी नंतर प्रेमाने मुक्ता ठेवले आणि जीवनाच्या पुढील वळणावर मुक्ता आर्ट्स याच नावाने माझी चित्रपट संस्था उभारली. १९७0च्या दशकात मी उमंग, गुमराह, आराधना, तकदीर यांसारख्या सिनेमात कामं केली; पण माझ्या लक्षात आलं, अभिनय हा काही आपला प्रांत नाही.. १९७६मध्ये मी दिग्दर्शित केलेल्या कालिचरण आणि १९८0मध्ये झळकलेल्या कर्ज चित्रपटाला लक्षणीय यश मिळालं, त्याने माझा हुरूप वाढला. मी १९८२मध्ये मुक्ता आर्ट्सची स्थापना केली.. पुढे मुक्ता आर्ट्सतर्फे आलेले आमचे बहुतेक सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या गाजले. हिरो, मेरी जंग, विधाता, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस, ताल अशी मालिका अखंड-अव्याहत सुरू राहिली.. प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले.अलीकडे काही वर्षांत सिनेमांची अखंड निर्मिती-दिग्दर्शन यात खंड पडलेला दिसतो, त्याचे कारण काय? चार दशकांच्या प्रवासानंतर टीका आणि प्रशंसा या दोन्हीकडे आपण कसे पाहता?- माझ्या १८ प्रमुख चित्रपटांपैकी १४ चित्रपट प्रचंड यशस्वी झाले, यातच मला माझ्या कामाची पावती मिळाली. किस्ना आणि युवराज चित्रपट पडले, त्या दरम्यान समीक्षकांचा ‘घई खतम हो चुके हैं,’ असा प्रचार सुरू झाला; पण त्यात नवं काही नव्हतं. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर प्रेक्षक-समीक्षक यांच्या एकूणच मानसिकतेची कल्पना येते, अंगवळणी पडत जाते.. कारण डोक्यावर घेऊन नाचणे आणि पुन्हा आपटणे हे चक्र अलम दुनियेत सुरू आहे, त्यामुळे Z It’s all part of life... असेच मी मानत आलो. स्तुतीने हुरळून जात नाही आणि टीकेने नैराश्य येऊ देत नाही. अनेक उगवत्या कलावंतांना तुम्ही वेळोवेळी घडवलेत, त्यांना ब्रेक दिलात; पण पुढे स्टारडमच्या पायर्‍या चढल्यानंतर त्यांना तुमचा सोयीस्कर विसर पडला.. अशा स्टार्सबद्दल काय वाटतं?- जीवनात सुख-दु:खं, ऊन-पावसासारखी येत असतात, हे निसर्गचक्र आपल्याला आवडो अथवा न आवडो.. त्याचा स्वीकार करतोच ना आपण? मानवी प्रवृत्ती अशाच नाहीत का? कुणीही कसे वागले, तरी सगळ्याच कलाकारांशी माझे आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत! माझ्या हिरो चित्रपटातून उदयास आलेल्या ज्ॉकी श्रॉफचा मुलगा टायगर अलीकडेच हिरोपंती चित्रपटाद्वारे लाँच झाला, तेव्हा मी तिथे प्रमुख पाहुणा होतो. अनिल-जॅकी मुक्ता आर्ट्सचे घरचे सदस्य आहेत, आता त्यांची मुलं हिरो बनलीत, यापेक्षा मोठा आनंद कोणता?चित्रपटाची तुमची व्याख्या कोणती? बॉलिवूडमधील तुम्ही कोणते नवे बदल टिपले आहेत?सुभाष घई - My percepation of Bollywood movies - In my films there should be Brodways, Music- Dance-Operas... Musical- Emotional...नव्या पिढीची व्याख्या मात्र पार बदलली आहे. आताची नवी पिढी जागतिक सिनेमा बघतेय. त्यांचा चित्रपटांविषयीचा दृष्टिकोन फारच वेगळा आहे. नवी पिढी तंत्रज्ञानात तरबेज आहे.. एका क्षणात यूट्यूबवर व्हायरल होणारे क्षणभंगुर जीवन आणि तसेच सिनेमे माझ्या शब्दकोशात नाहीत.. मला जसा सिनेमा भावतो-समजतो तसा मी तो घडवतो. मला असंही वाटतं, की माझ्या ज्येष्ठतेनुसार आता मी चित्रपट बनवावेत.सिक्वेल किंबहुना रि-मेक म्हणजेच, या युगातला चित्रपट मानला जात आहे.. तुम्ही काढलेल्या कर्ज चित्रपटाचाही रि-मेक झाला. काय वाटतं याविषयी?- अगर यही ट्रेंड हैं, तो मैं क्या कहूं? ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती नसेल तेच कदाचित रिमेकला प्राधान्य देत असावेत.. मी जरी संगणक किंवा इंटरनेटच्या युगात वावरलो नसलो, तरी निव्वळ आकाशाकडे पाहून गीत, कथा, दृश्य असा कल्पनाविलास मी दाखवला आहे. मला रि-मेकची गरज पडली नाही आणि पडणार नाही. आमच्या बॉलिवूडमधून मात्र आता प्रेम, सामंजस्य, आदर लोप पावत चालले आहे.. प्रत्येकाकडेच वेळ कमी आहे.. आजचे बहुतेक आघाडीचे हिरो आता स्वत:च निर्माते बनलेत.. म्हटलं तर सुखावह आहे.. नाही तर काही न बोललेले बरे. खुपसे फिल्मी सितारे निवडणुकीच्या मैदानातही उतरलेत.. त्यांनी आपला प्रांत सोडून इथे उठबस करावी का? जनतेला ते न्याय देऊ शकतील का?- राजकीय नेत्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने ही वेळ आली का? अर्थातच या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही.. पण चित्रपट कलाकार राजकारणात आले तर देशाचे आणि आमच्या बॉलिवूडचे कल्याण नक्की होईल. लाल फितीच्या कारभारात मी होरपळून गेलोय.. मुंबई, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुभाष घई - (चेअरमन) आणि त्यांची मुलगी मेघना घई पुरी (प्रेसिडेंट) असलेल्या व्हिसलिंग वुड्स ही अभिनय, तसेच सिनेसृष्टीशी संबंधित तमाम अन्य तांत्रिक बाबींचे शिक्षण देणार्‍या या संस्थेची उभारणी घई यांनी २000मध्ये केली; पण या संदर्भात त्यांना आलेल्या अडचणी त्यांच्याच शब्दांत -माझ्या मुक्ता आर्ट्सतर्फे मी केलेल्या १८ कलाकृतींपैकी १४ चित्रपट गाजलेत. त्यांना प्रचंड व्यावसायिक यश मिळाले. गेल्या ३0-३५ वर्षांच्या कालावधीत अनेक सिनेमे केले आणि एका भावनेने मनात घर केले. सिनेविश्‍वातील पुढील पिढीसाठी मला काहीतरी भरीव योगदान द्यायचे आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म इन्स्टिट्यूट उभारावी, या विचाराने मी झपाटलो होतो. अथक प्रयासानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भेटीला बोलावले आणि असे ठरले, ८५ टक्के आमचे भांडवल आणि १५ टक्के त्यांचे भांडवल, त्यात जमिनीची मालकी त्यांची (शासनाची) राहणार होती, तर त्या जमिनीचे महिन्याकाठी भाडे आम्ही भरणार होतो.. विलासराव या शब्दांत बोलले होते, ‘घईसाब, सॉफ्टवेअर आप बनाओ. एक्सपर्ट सभी आपके होंगे.. हम (शासन) आपको आपके स्टुडिओ के इस्तेमाल के लिये जमीन किराये पर देंगे..’ परंतु, भागीदारीत केलेल्या या व्यवहाराची कागदपत्रेच अधिकृत नव्हती, असे विलासराव देशमुखांची सद्दी संपल्यानंतर समजले, कारण लातूरच्याच काही ग्रामस्थांनी या विरोधात नंतर रान उठवले.. न्यायालयाने आम्हाला दंड ठोठावला. तब्बल ८0 कोटी रुपयांचा.. शिवाय शासनाची जागा परत करावी, असेही सुचवले. जे काही घडले, त्यात आमचा खरं तर काही दोष नव्हता.. असलेले-नसलेले आणि शिल्लक-बचत सारे काही मी संस्थेच्या उभारणीत घालवले.. मी बंगल्यात राहत नाही, सध्या ३ बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतोय.. कुणाच्या खांद्यावरचे ओझे कुणी, किती काळ वाहत राहायच, हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरित आहे..’’ (लेखिका लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये ब्युरो चीफ (मनोरंजन) आहेत.)