शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

Beauty Contest: विश्वसुंदरीच्या आयोजनामागे दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 1:21 PM

Beauty Contest: तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत.

- डॉ. सुरेश सरवडेकर(माजी सहायक संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग)

तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेक फॅशन डिझायनर यांच्यासोबतच सौंदर्यप्रसाधने बनविण्याऱ्या कंपन्या या स्पर्धेच्या अनुषंगाने बाजारात काय नवीन देता येईल, याबाबत प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेकांना विश्वसुंदरी स्पर्धा भारतात होत असल्याचा अभिमान वाटत आहे. मात्र, महाकाय लोकसंख्या असलेल्या या भारतात स्पर्धा भरविण्यामागे मोठे अर्थकारण असून, सौंदर्यप्रसाधन उत्पादकांना येथील बाजारपेठ काबीज करावीशी वाटली तर त्यात काही नवल नाही.

आपल्या देशात काळा गोरा भेद आजही मानसिकतेत ठासून भरला आहे. नेमकी हीच मानसिकता हेरून सौंदर्यप्रसाधने कंपन्या त्यादृष्टीने उत्पादने बाजारात आणतात. त्याला आपसूकच येथील ग्राहक भुलतो.. बाजारपेठेच्या सिद्धांतानुसार 'सतत विक्री वाढविण्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला' शक्ती देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी विविध माध्यमांतून त्यांना सतत जाहिराती, उपदेश तसेच उपयुक्त माहिती देण्याच्या नावाखाली पण, केवळ खरेदीच्या उद्देशाने त्यांची मानसिकता तयार केली जाते. हा सिद्धांत विशेषतः स्त्रियांना लागू आहे, असे म्हटले जाते. कारण त्या या बाजार व्यवस्थेचा एक भाग आहेत.

सौंदर्य प्रसाधनांचा दर्जा काय?

१ प्रत्येक कॉस्मेटिक उत्पादनामध्ये विविध प्रकारची रसायने असतात आणि म्हणूनच प्रत्येक देशाच्या सरकारने ग्राहकांच्या हिताची काळजी घेणे आणि उत्पादने वापरण्यास सुरक्षित असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. पण, जगभरात तसे होताना कुठेच दिसत नाही.

सौंदर्य प्रसाधनांच्या दर्जाबद्दल नाही. विकसित देशांमध्ये तक्रार प्राप्त होताच त्याप्रमाणे मानकांमध्ये तत्काळ सुधारणा केली जाते. पण विकसनशील व अविकसित देशामध्ये अपुरे मनुष्यबळ व दर्जा तपासण्यासाठी आवश्यक अद्ययावत यंत्र सामुग्रीच्या अभावामुळे ते होत नाही.

३ | आजकाल जे जे नैसर्गिक ते उत्तम या समजुतीच्या नावाखाली वनस्पतीजन्य सौंदर्य प्रसाधनांचा वापर वाढला आहे. पण, त्यासाठी दर्जा तपासण्याची आवश्यक तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नाही. या निष्काळजीपणामुळे कॉस्मेटिकचा नियमित वापर करणाऱ्यांना अगदी अॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत आजारांचा सामना करावा लागत आहे..साडेसहा अब्ज डॉलरची बाजारपेठभारतात विश्वसुंदरीची स्पर्धा आयोजित करून बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठी बाजारपेठ काबीज करायची आहे. भारतातील सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ ६.६७ अब्ज डॉलर आहे आणि २.७ टक्क्यांनी वाढत आहे. विश्वसुंदरी स्पर्धेच्या निमित्ताने त्याचा वेग वाढविण्याचा व्यापायांचा विचार आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या नवनवीन कॉस्मेटिक उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होत आहे.

 महिला केवळ ग्राहक- समाज महिलांना ग्राहक म्हणून परिभाषित करतो आणि व्यापारी मीडियाच्या मदतीने महिलांना निष्क्रिय लैंगिक वस्तू म्हणून समोर ठेवून उत्पादनांची विक्री करतो, महिलांच्या या वैचारिक घसरणीचे लाभार्थी पुरुष नसून कॉर्पोरेट शक्ती संरचना आहेत.-सौंदर्य स्पर्धा ही एक सुशिक्षित गोया मध्यमवर्गीय पुरुषांनी त्यांच्या मनोरंजनासाठी व बाजारासाठी तयार केलेली बकवास विचारसरणी आहे. सुमार दर्जाची सौंदर्य प्रसाधने विकणे आणि कोट्यवधी रुपयांचा फायदा खिशात घालणे, असे शुद्ध व्यापारी गणित आहे.

 

टॅग्स :Miss Worldविश्वसुंदरीMiss Universeमिस युनिव्हर्स