शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

टोरांटोतलं स्वागत!

By admin | Updated: September 19, 2015 14:36 IST

ओढायच्या दोन मोठय़ा बॅगा आणि हातातली आणखी एक बॅग. टोरांटो अंडरग्राउण्ड स्टेशनवर माझी कसरत चालली होती. ‘कीव’ येऊन ‘तिनं’ एक बॅग घेतली. लोकं भुवया उंचावून पाहात होते. मी फिल्म फेस्टिव्हलसाठी इथं आल्याचं सांगितल्यावर तिनं स्वत:चीही ओळख करून दिली. ‘मागच्या फेस्टिव्हलचं ओपनिंग ज्या फिल्मनं झालं, त्याची मी मुख्य नायिका’!

- अशोक राणे
 
टोरांटोमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक, समीक्षक अशोक राणे हे देखील तेथे उपस्थित आहेत. तिथल्या विलक्षण ‘दृश्यांची’ 
ही चित्रमालिका.
 
टोरांटो विमानतळावरून शहरात जायला तीन पर्याय. पहिला पर्याय टॅक्सी. तिला पडतात साठ डॉलर्स. दुसरा एक्स्प्रेस ट्रेनचा, तिला पडतात सत्तावीस डॉलर. तिसरा पर्याय खूपच स्वस्त. तो बसचा. तीन डॉलर्स फक्त. मी अर्थातच तिसरा निवडला. किती तरी पैसे वाचणार! बसचा पर्याय सुचविणा:या विमानतळावरच्या कर्मचा:याने एकच बस थेटर्पयत जाणार नाही हे मात्र सांगितलं नाही. मी बसमध्ये बसलो. चार-सहा बस स्टॉप पुढे आल्यानंतर कुणाला तरी आपल्या उतरायच्या ठिकाणाविषयी सांगून ठेवावं म्हणून शेजारी पाहिलं, कानाला हेडफोन लावून हातातल्या मोबाइलमध्ये माझी शेजारीण, एक नाजुकशी षोडशवर्णीय कन्या हरवली होती. मी मोर्चा दुसरीकडे वळवला. पलीकडच्याला नीट काही सांगता येईना तसं माझ्या सखी शेजारणीनं म्हटलं.
‘‘मी तिकडेच जाते आहे. मी सांगेन.’’
गोडशी हसली. आश्वासक वाटलं आणि निवांतही. काही वेळातच तिने हं, आता उतरायचं असं म्हटलं. सभोवतालचा परिसर पाहून ‘इथे कुठे?’ असं मनात आलं; पण ते मनातच ठेवलं, उतरलो. दोन ओढायच्या आणि एक हॅण्डबॅग होती. माझी कसरत चालली होती. तिनं स्वत:हूनच एक बॅग घेतली. ते अंडरग्राउण्ड स्टेशन होतं. तिथून ट्रेनने चांगली आठेक स्टेशन. मग स्ट्रीट कार म्हणजे ट्राम. रांग होती. ती पोर रांग तुडवत एका टेचात पुढे चालत राहिली. लोक भुवया उंचावून पहात होते. मी आयुष्यभराचा अपराधी भाव अंगाखांद्यावर वागवत तिच्यामागून. मग ट्राम.
‘‘बिझनेस ट्रिपसाठी आला आहात का?’’
प्रथमच तिने माझी चौकशी केली.
‘‘नाही. टोरांटो फिल्म फेस्टिव्हलसाठी आलोय.’’
‘‘तीन वर्षापूर्वी फेस्टिव्हल ज्या कॅनेडियन फिल्मने ओपन झालं त्याची मी नायिका. अॅन मॅगनॉल्ड. नाईस टू मीट यू.’’
मी क्षणभर अवाक्.
‘‘पुढच्या स्टॉपवर मी उतरेन. त्याच्या पुढे तुम्ही उतरा. उजवीकडे वळलात की दोन मिनिटांवर तुमचं हॉटेल.’’ तिचा स्टॉप आला. बाय म्हणत आणि शुभेच्छा देत ती उतरली. तशीच गोडशी हसली.
.तर असं झालं माझं स्वागत चाळिसाव्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात..!
हा स्वागत समारंभ इथेच नाही संपला.
महोत्सवाच्या पत्रकार कक्षात येऊन कार्ड वगैरे घेऊन पहिला सिनेमा पहायला शेजारच्या थिएटरात शिरतोय तर तिथे आपली राधिका आपटे उभी. तिच्याशी बोललो आणि आत शिरलो. सिनेमाचं नाव होतं..
‘ही नेम्ड मी मलाला’.
तालिबान्यांच्या गोळ्या अंगावर ङोलत अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आलेल्या बेडर मलालाची धाडसी आणि प्रेरणादायक कहाणी. डॉक्युफिचर प्रकारातली मलालाची कहाणी मलालाच्याच तोंडून. सोबत काही भूतकाळातील दृश्ये अॅनिमेशनच्या मदतीने घेतलेली. 
दीड-दोनशे वर्षापूर्वीचा काळ. ब्रिटिशांनी अफगाणिस्तानावर केलेला निर्घृण हल्ला. निर्घृण तितकाच. अचानक लोक सैरावैरा पळत सुटले. एका तरुण मुलीने हे पाहिलं. ती डोंगरमाथ्यावर धावत गेली आणि तिथून तिने आपल्या देशबांधवांना आवाहन केलं.
‘‘हजारो वर्षाचं गुलामीचं जीणं जगण्यापेक्षा एक दिवसाचं वाघाचं जीणं जगा.’’
क्षणात वातावरण बदललं आणि ढुंगणाला पाय लावून पळत सुटलेला जमाव जागी थांबला आणि त्याने शत्रूवर प्रतिहल्ला चढवला. त्यांच्यात ही वीरश्री चेतवणा:या त्या मुलीचं नावं होत.. मलाला ! 
अंगच्या अद्भुत अशा बेडरपणासह मलालाने पुकारलेला हा लढा, तिची तीक्ष्ण बुद्धी, चमकदार तितकेच विलक्षण विचार, तिच्यातला नैसर्गिक मिस्कीलपणा आणि याच्या मुळाशी असलेली तिच्यातली मानवीयता याचं सखोल दर्शन हा डॉक्युफिचर घडवतो. धर्माध लोक धर्माच्या नावाखाली किती खालच्या पातळीवर जातात आणि तरीही मलालासारखी एक एवढीशी पोर त्यांना बधत नाही हा सारा आशय अतिशय प्रभावीपणो ही ‘नेम्ड मी मलाला’ मधून येतो. आधुनिक विचारसरणीच्या वातावरणात वाढलेल्या तिच्या वडिलांचा तिला खूपच आधार आहे. ज्या काळात मुस्लीम मुलींना शाळेत पाठवणं केवळ कल्पनातीत होतं त्या काळात जिला तिच्या वडिलांनी शाळेत दाखल केलं. त्या आईचीही तिला साथ आहे.
‘पॅरिसियन’ आणि ‘द व्हाइट नाइट्स’ या दोन चित्रपटांनी मात्र पार अस्वस्थ करणारा अनुभव दिला.
‘पॅरिसियन’मध्ये स्थलांतरितांचा विषय होता. गरीब देशातील अनेकजण युरोपियन देशात घुसण्याचा आणि मग तिथेच जम बसविण्याचा प्रय} सतत करत असतात. जगण्याची लढाई जेव्हा निकरावरच येते तेव्हा माणसं ही अशा टोकाला जातात. कुठल्याही थराला जातात. नको तेवढी अगतिक होत जातात.. सारं कसं अपरिहार्यच होऊन जातं.
बैरुतच्या सततच्या युद्धजन्य परिस्थितीला आणि कमालीच्या अनिश्चिततेला कंटाळून पॅरिसला मावशीच्या आश्रयाला आलेल्या लीनाला काकाच्या आगळिकीला त्रसून घर सोडावं लागतं आणि तिची फरफट सुरू होते. तिला भावनिक आधार देता देता तिच्या असहाय्यतेचा फायदा घेणार माणूस तिला पहिल्या पावलावरच भेटतो. मग दुसरा. मग तिसरा. तिला आधार घ्यावाच लागतो. कारण तिला कायमस्वरूपी रेसिडेंट कार्ड मिळवायचं असतं. दरम्यान ती कुठे कुठे रहात असते. प्रसंगी लबाडय़ाही करते. चो:या करते. या दरम्यान तिचं अनाधिकृतरीत्या लहानमोठय़ा नोक:या करणं चालू आहे. कॉलेज सुरू आहे. कुणी नीट मार्गदर्शन करायला नसल्यामुळे तिने अर्थशास्त्र हा विषय घेतला आहे. परंतु ती बराच वेळ ‘कण्टेम्पररी लिटरेचर’ आणि हिस्टरी ऑफ आर्ट’च्या लेक्चरला जाऊन बसते. तिथे छान रमते. कारण या दोन्ही विषयांचे प्राध्यापक! ती ज्या अवस्थेतून जाते आहे त्यातून या दोनच्या जागा तिला आधार देतात. दिलासा देतात. तिच्यासाठी ही लेक्चर्स म्हणजे ओअॅसिसच जणू. ‘हिस्टरी ऑफ आर्ट’च्या प्राध्यापिकेच्या मदतीने तिला निष्णात वकील गाठणं शक्य होतं आणि एकदाचं तिला कायमस्वरूपी रेसिडेंट कार्ड मिळतं. तिथेच सिनेमा संपतो. एकदाची ती ‘पॅरिसियन’ होते.
कोर्टात तिच्या शेजारी बसलेली मध्यमवयीन बाई जेव्हा उदासपणो तिला सांगते की, मला जर कायमस्वरूपी रेसिडेंट कार्ड नाकारण्यात आलं तर मी कुठे जाणार मला काहीच कळत नाही, तेव्हा या प्रश्नातलं गांभीर्य चांगलचं अधोरेखित होतं. लीनाचं चाललेलं शिक्षण, मुलींचं हॉस्टेल, त्यांचं स्वैर, मुक्त जगणं, स्थलांतरितांचा प्रश्न हाताळणारी शासकीय यंत्रणा, त्यांच्या दोन्ही बाजूने आपापल्या राजकीय भूमिका घेऊन उभे असलेले आक्रमक राजकीय गट असा भलामोठा पट या कथेला आहे आणि तो अत्यंत प्रत्ययकारकपणो समोर येतो याचं एक कारण चित्रपटाची दिग्दर्शिका दॅनियल आब्रिड याच वास्तवातून ‘पॅरिसियन’ झाली आहे. तिनं सारं स्वत: अनुभवलं आहे.
‘‘आम्हा युरोपियन लोकांना, विशेषत: स्वीस लोकांना कायम अपराधी भावनेने पछाडलेलं आहे आणि त्यातूनच आम्ही आफ्रिका, आशियातील गोरगरिबांसाठी चॅरिटी करत फिरत असतो.’’ स्वीत्ङरलडमधल्या लोकांना महोत्सवात भेटलेल्या एका स्वीस बाईने बोलण्याच्या ओघात मला हे सांगितलं होतं. तिच्या या विधानाची मला काल पुन्हा एकदा आठवण झाली फ्रान्सची निर्मिती असलेला ‘द व्हाइट्स नाइट्स’ पाहताना. 
अठराविसे दारिद्रय़ात खितपत पडलेल्या आणि आता सिव्हिल वॉरने कमालीचं भीषण जगणा:या आफ्रिकन लोकांच्या मदतीला एक फ्रेंच एनजीओ येते. त्यांना फक्त पाच वर्षाखालील आणि अनाथ झालेल्या मुलांनाच मदत करायची आहे. स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी फ्रेंच बोलणा:या एका तरुण मुलीची इंटरपिटर म्हणून ते नेमणूक करतात. तिच्या मदतीने एनजीओचा म्होरक्या स्थानिकांना सांगतो की, ते तीनशे मुलांना आपल्या कॅम्पमध्ये घेणार आहेत आणि अठरा वर्षार्पयत त्यांचं पालनपोषण आणि शिक्षण करणार आहेत. परंतु त्यांचे हेतू वेगळेच असतात. फ्रान्समधील निपुत्रिक जोडप्यांना दत्तक घेण्यासाठी त्यांना मुलं पुरवायची असतात. ती मुलं पाच वर्षाखालील असावीत, म्हणजे ती नव्या कुटुंबात सहजपणो मिसळून जातात आणि अनाथ असली की नंतर त्यांच्यावर हक्क सांगण्यासाठी कुणी येत नाही. आपला हेतू साध्य करण्यासाठी माणुसकीचा उमाळा दाखविणारी ही माणसं कुठल्या थराला जातात याचं अतिशय अस्वस्थ करणारं दर्शन घडतं. एका महिन्यातच ही तीनशे मुलं गोळा करून इथून सटकायचं असा बेत असलेली ही एनजीओ शंभर मुलं हाताशी लागताच परतण्याचा निर्णय घेते. म्होरक्या आता प्रथमच त्या इंटरपिटर मुलीला खरं काय ते सांगतो. ती रातोरात कॅम्प सोडते आणि सैन्याला बोलावून यांचा बेत हाणून पाडते. एनजीओवाल्यांची रवानगी तुरुंगात होते.
काहीशी थ्रिलर पद्धतीची मांडणी असलेल्या या चित्रपटातून जगभर चालणा:या लहान मुलांच्या अपहरणाचा प्रश्न भेदकपणो समोर येतो. एका ‘उदात्त’ हेतूने एकत्र आलेल्या या एनजीओमधल्या लोकांमध्येही मनुष्य स्वभावाचे नाना प्रकार पहायला मिळतात. एखाद्या माफिया टोळीत ज्याप्रकारे शहप्रतिशह खेळले जातात तसाच काहीसा प्रकार त्यांच्यातही पहायला मिळतो. पडद्यावरचा चित्रपट संपतो, मात्र तो चालूच राहतो. या तीनही चित्रपटांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. कारण ते सर्वव्यापी अशा राजकीय-सामाजिक-आर्थिक आशयाला भिडतात. बरंच काही दाखवून जातात. प्रश्न निर्माण करतात.
 
ashma1895@gmail.com