पाणीबाणी - चार पिढ्यांनी पहिल्यांदा पाहिलं पाण्याचं ग्रहण
By Admin | Updated: April 16, 2016 18:51 IST2016-04-16T16:21:08+5:302016-04-16T18:51:27+5:30
घर नळाच्या पाण्यावरून बोअरवर, काहीच दिवसांत टॅँकरवर आलं. फ्लश, शॉवर, सडा बंद झाला. एका बादलीत दोघांच्या अंघोळी, वॉशिंग मशीन, कामवाली बाई गेली, मोठे ग्लास गेले, पेले आले. ‘खराब’ पाणीही वापरातलं झालं.

पाणीबाणी - चार पिढ्यांनी पहिल्यांदा पाहिलं पाण्याचं ग्रहण
>- दत्ता थोरे
बार्शी रोडवरच्या प्रा. सुधीर तोडकरांचे 12 माणसांचे तीनमजली टुमदार घर. आई चंद्रकलाबाई, वडील ज्योतिराम, आईची आई राहीबाई, महेश आणि उमेश हे दोन विवाहित भाऊ, मामाचा इंजिनिअरिंगला असलेला मुलगा वैभव, स्वत:ची दोन व लहान भाऊ महेशची दोन अशी चार मुले. एकूणच आजी-आई-स्वत: आणि मुलांची पुढची पिढी अशा चार पिढय़ांच्या अनुभवानी भरलेलं घर. आजी राहीबाई म्हणतात, चार पिढय़ात अशी पाणीटंचाई पाहिली नाही.
2011 र्पयत हे घर नळाच्या पाण्यावर होते. तेव्हार्पयत दररोज तीन ते चार तास नळाला पाणी यायचे. एवढय़ा वेळात भांडी भरून घरावरच्या टाकीत पाणी भरले की घरच्या सर्वाना पुरून उरे. पण 2क्11 पासून नळाच्या पाण्याला ग्रहण लागले. महापालिकेने नळाच्या पाण्याचे दिवस लांबवले. दररोज येणारे पाणी पाच वर्षात सुरुवातीला सहा दिवस, नंतर आठ दिवस आणि पुढे पंधरा दिवसावर गेले. नळाचे पाणी जसे पंधरा दिवसावर गेले तशी या कुटुंबाला पाण्याची अडचण भासू लागली. यावर मात करण्यासाठी तोडकर कुटुंबाने 2क्11 साली आपल्या घरी बोअर घेतला. चांगले दोन इंच पाणी लागले. अखंड बोअर चाले. पाणी पाहून कुटुंबात सर्वाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यावरच घरच्या वरच्या मजल्याचे बांधकाम झटक्यात झाले. आता नळाचे पाणी गेले तरी चालेल असं वाटून मन भरून आलं तसं नळाच्या पाण्याचेही येण्याचे दिवस लांबतच चालले होते. 15 दिवसावरून 2क् दिवस आणि पुढे तर महिन्यातून एकदाच पाणी येऊ लागले.
मागच्या फेब्रुवारीला एकदाचे लातूरच्या सर्वच नळांचे पाणी बंद झाले आणि मग तोडकरांच्या घरचा नळही आटला. नळाच्या पाण्याच्या ‘जाण्याची लागण’ जणू बोअरलाही होत होती. कारण जानेवारीपासून तो आचके देत होता. फेब्रुवारीत तो अवघे सात ते आठ मिनिटेच चालू लागला. एवढय़ा वेळेत पाणी मिळणार तरी केवढे? मोजून चार बादल्या. बोअरद्वारे घरच्या कुटुंबाला तोंड धुण्यापुरतेही पाणी मिळेना. या पाणीबाणीत सापडलेल्या या घराने मार्च महिन्यात आठवडय़ाला एक हजार रुपये देऊन सहा हजार लिटर पाण्याचा टँकर मागविणो सुरू केले आणि तोडकरांचे घर एखाद्या गाव आणि शहरासारखे शंभर टक्के ‘टँकर भरोसे’ झाले.
जसे टँकरचे पाणी आले तसा घरावर आघात झाला तो आरोग्याचा. टँकरचे पाणी प्याल्याने एका महिन्यात घरातील मुलाबाळासह बाराच्या बारा सदस्यांनी दवाखान्याच्या वा:या केल्या. सा:यांना एकच त्रस. पोटाचा. दोघांना तर गॅस्ट्रोने घेरले होते. बारा जणांत 25 ते 3क् हजार रुपये दवाखान्यात खचरूनच सारे आजारपणातून उठले. औषधाबरोबर शहाणपण आलं आणि त्याचबरोबर ‘वॉटर फ्युरिफायर आरओ’देखील! विकतचे पाणी आल्यावर छोटय़ा-छोटय़ा गोष्टीतही बचत सुरू झाली. सर्वप्रथम टॉयलेटचा फ्लश आणि बाथरूम शॉवरचे कॉक बंद करण्याचा निर्णय झाला. मोठय़ांनी एका बादलीत एकाने, तर छोटय़ांनी एका बादलीत दोघांनी अंघोळ सुरू केली. तांब्याभर पाण्यात ब्रश, जेवणानंतर प्यायला म्हणून घेतलेल्या पाण्याने हात न धुण्याच्या सवयी सर्वानी प्रयत्नपूर्वक लावून घेतल्या. खरी काटकसर केली ती महिलांनी. सकाळी उठून अंगणभर सडा टाकून रांगोळी काढायची प्रथा बंद झाली. अंगण स्वच्छ झाडायचे आणि जिथे रांगोळी काढायची तिथेच तांब्याभर पाणी शिंपडून रांगोळी काढण्यात येऊ लागली. आत्ता अलीकडे तर अर्धा तांब्याच तेही ‘वॉटर प्युरिफायर आर.ओ.’ मधून आलेले वेस्टेज पाणी!
मीनाक्षी तोडकर म्हणाल्या, ‘वॉशिंग मशीनला कपडे धुताना सहापट पाणी जास्त लागते, हे कळल्यावर आम्ही महिलांनी घरात मीटिंग घेऊन मशीन गॅलरीत अडगळीत ठेवून दिले. सास:यांचे कपडे धुवायला बाई लावायचा सल्लाही आम्ही टाळलाच. आम्हीच हे काम करतो.’ चंद्रकला तोडकर म्हणाल्या, ‘पूर्वी पाहुणो आले की फुलपात्र झाकून तांब्यातून पाणी द्यायचे. फॅशन म्हणून ग्लास आले. पण आता पाणीटंचाईमुळे मोठय़ा ग्लासपेक्षा आकर्षक छोटय़ा ग्लासना आम्ही पसंती दिली. पाहुण्यांनी मागितले तर पुन्हा देऊ, पण ग्लासातले अर्धे पाणीही वाया जाता कामा नये, हीच त्यामागची भावना.’
वारकरी सांप्रदायाच्या या घरात आई धार्मिक वृत्तीच्या. गल्लीतील भजनी मंडळ आणि सांप्रदायिक कार्यकत्र्याच्या घरी नेहमी बैठका होत. 15-2क् माणसे सहज येत. जवळपास दर गुरुवारी हा कार्यक्रम असे. केवळ पाणीटंचाईमुळे ही सांप्रदायिक बैठक महिन्यातून एकदाच घ्यायचे ठरले. आता भजनी मंडळ जवळच्या गजानन मंदिरात बसते. दरवर्षी शे-दीडशे लोकांना घरी बोलावून केली जाणारी तुकाराम बीज यंदा घरातल्या घरात अगदी साधेपणाने केली. त्या दिवशी पत्रवळ्या आणल्या होत्या. ताटं धुवायला पाणी जास्त वाया जाते, पत्रवळ्या पाणी न वापरताही नष्ट होतात हे त्या दिवशी लक्षात आले. त्यानंतर आठ दिवस घरच्या सर्वाचे दररोजचे जेवणही पत्रवळीवरच झाले. धुण्याचे आणि वॉटर प्युरिफायरचे वेस्टेज पाणी वापरून आठ- दहा दिवसातून एकदा फरशा पुसल्या जातात. त्यातूनच उरलेले पाणी कुंडीतल्या झाडांना. घरातल्या गाडय़ा धुवून तर किमान पाच महिने तरी झाले.
- उमेश तोडकर सांगतात.
------
पाण्याचीही उसनवारी
लातूर शहरातील क्वाईलनगरची झोपडपट्टी.
6क्-7क् झोपडय़ांच्या या वस्तीत विनोद सरवदे यांचीही एक झोपडी. अवघ्या आठ फूट उंचीवर 2क्-25 पत्र्यांचे छत आणि दारही नसलेल्या तीन खोल्या. बाहेरच्या भिंतीवर थोडे जोरात हलवले तर तुटेल असे एकच दार. 75 वर्षाचे दादाराव, 7क् वर्षाच्या गेंदाबाई या वृद्ध आई-वडिलांबरोबर विनोद आणि सुवर्णा हे नवरा-बायको राहतात. त्यांना आदित्य, धीरज आणि प्रियंका अशी नऊ ते 13 वयोगटातील तीन मुले.
विनोद बिगारीकाम करतात. गेल्या वर्षभरापासून बांधकामे बंद असल्याने आधीच त्यांच्या रोजगारावर गदा आलेली. त्यात घरी पाण्याचा वनवास. कितीही काम केले तरी महिन्याकाठी सात आठ हजार रुपये मिळतात. त्यातले तीन हजार तरी पाण्यावर खर्च करावे लागतात. गेल्या चार-पाच महिन्यांपासून हाच सिलसिला चालू आहे. काम नाही मिळाले तर सर्वाधिक फटका बसतो तोही पाण्याला. धान्य कसेही मिळविता येते, पण पाणी? गेल्या दोन महिन्यांपासून लातूर महापालिकेच्या नळांना पाणी नाही. महापालिकेचा टँकर आठ-दहा दिवसांतून एकदा गल्लीत येतो. फक्त 2क्क् लिटर पाणी देतो. एवढय़ा पाण्यात होते काय?
विनोद सरवदे सांगतात, आठवडा-आठवडा लेकरांना अंघोळी घातल्या जात नाहीत. गेल्या महिन्यापासून आम्हा मोठय़ा माणसांचेही आठवडय़ातले चार दिवस अंघोळीविना जातात. लेकरांबरोबर आम्हालाबी ओल्या फडक्यानं पुसून घेताव. बाय-माणसानं आठ-आठ दिवस डोक्याला पाणी नाही लावायचं म्हटल्यावर डोक्याचं काय होतं सांगा बरं?
पाणी साठविण्यासाठी त्यांनी दीड-दीड हजाराचे दोन बॅरेल विकत घेतलेत. ज्या दिवशी पाण्याने बॅरेल भरेल तो दिवस सोन्याचा. त्यांच्या पत्नी सुवर्णा म्हणाल्या, भाज्या धुतलेले पाणी भांडी धुवायला वापरतो. कापडं धुतलेले पाणी घरासमोरच्या झाडाला. उन्हाळ्यात घरावरचे पत्रे तापू नयेत म्हणून झाड देवावाणी वाटतं. त्याच्या सावलीनं किमान एक खोली तरी थंड राहते. झोपडीच्या तीन खोल्यात जमिनीवर ओबडधोबड फरशा बसवून घेतल्यात. पण अंगण आणि भिंती मातीचेच. गेल्या सहा महिन्यापासून भिंतीला पोतारा माहीत नाही आणि अंगणाला शेणाचा सडा. पाच-सहा भिंती पोतारून घ्यायच्या तर एक बॅरेल तरी पाणी लागतं. बॅरल जाऊ द्या, तांब्याभर पाणीसुद्धा टाकायची सोय नाही. म्हणून अंगणातल्या तुळशीच्या वृंदावनातली तुळस जळून गेल्यावर दुसरी लावली नाही. या दिवसात तिलासुद्धा एक कळशी पाणी दररोज लागतं. कुठून घालायचं? अध्र्या बादलीत कपडे घालायचे आणि अध्र्या बादलीत पिळून घ्यायचे. रोजच्या कपडय़ाला चरवीभर पाणी बास्स.
काम नाही, त्यामुळे पैसा नाही. अशात घरी गॅस कधी येतो कधी नाही. त्यामुळे अंगणात एक चूल मांडलेली. तिच्यावर स्वयंपाक केला तर भांडी काळीकुट्ट होतात. धुवायला पाणी जास्त लागतं. पाण्याची नासाडी नको म्हणून काहीही करून गॅस आणतोच. गॅसवरचा खर्च परवडतो पण पाण्यावरचा नाही. पाणी वाचावे म्हणून घरातली मोठी माणसेही लेकरांना आपल्याच ताटात सोबत घेऊन जेवतात.
महापालिकेचा टँकर नाही आला आणि विकत घ्यायला पैसेही नसले तर मात्र मोठीच अडचण. शेजा:या-पाजा:यांकडून दोन-चार घागरी उसने पाणी आणावे लागते. मोठा टँकर परवडत नाही. घेतलाच तर पाणी साठवायचे कुठे? 5क्क् लिटरचे छोटे टँकर शहरात कमी फिरतात. त्यालाही अडीचशे रुपये मोजावे लागतात.
पैसे, दूध उसने मागून आणता येते, पण पाणीही उधारउसनवारीवर मागून आणायची वेळ यंदा कुटुंबावर पाणीटंचाईने आणली आहे. झोपडपट्टीत घर असले तरी आपल्या वृद्ध आईवडिलांना आणि महिलांना बाहेर शौचास जायला नको म्हणून त्यांनी अनुदानावर शौचालयाचे बांधकाम केले. परंतु पाण्याअभावी वरचे छत बांधायचे राहिले ते राहिलेच. शिवाय त्याचा वापरही करता आला नाही.
-------
ताट वाटीऐवजी पत्रावळी द्रोण
लातूर शहरातील गंजगोलाईतील जुने कापड व्यावसायिक असलेले विष्णू खंदाडे. यांचे गंजगोलाईत चार मजली दुकान आहे. दुकान भाडय़ाने देऊन ते आता दुस:या व्यवसायाच्या उभारणीत व्यस्त आहेत. जुना गावभाग असलेल्या लातुरातील गानू हॉस्पिटलशेजारील आठ हजाराच्या भाडेतत्त्वावर त्यांनी एक बंगला राहायला घेतला आहे. त्यांच्या पत्नी जयश्री गृहिणी, मोठी मुलगी ऋतुजा बी. कॉम. फायनलला, तर मुलगा आठवीत. वडील नारायणराव हेच घरात ज्येष्ठ.
महापालिकेच्या नळाचे पाणी बंद झाले आणि अनेक समस्या उभ्या राहिल्या. सुरुवातीला प्रश्न होता पाणी आणायचे कुठून? पाण्याचा टँकर विकत घ्यायचा तर ते पाणी कुठले असते? ते पिण्यायोग्य असेल का? त्याने काही आजार तर होणार नाहीत?. खंदाडे विचारात पडले होते.
सुदैवाने लातूरपासून अवघ्या दीड- दोन किलोमीटर अंतरावर त्यांची वडिलोपाजिर्त दहा एकर शेती आहे. शहरातल्या घरात वापरायला पाणी मिळावे म्हणून त्यांनी तातडीने आपल्या शेतात बोअर मारायचा निर्णय घेतला. त्यांच्या बोअरला साडेपाचशे फुटाला पाणी लागले. बोअर, मोटर आणि पाइपसह एकूण 9क् हजार रुपये खर्च आला. पण ‘पाणी विश्वासाचं’ मिळालं. सात ते आठ हजार लिटर पाण्याचा एक टँकर आठवडय़ातून एकदा शेतातून आणून ते आपल्या घराच्या टाक्या भरून घेतात. ना महापालिका. ना प्रशासन. ना खासगी. अशा पद्धतीने खंदाडे यांनी स्वत:च स्वत:च्या टँकरची सोय करून घेतली. यासाठी टँकरवाल्याला भाडय़ापोटी प्रत्येक खेपेला 4क्क् रुपये दिले. शेतात मारलेल्या बोअरचा उपयोग शेतीसाठी नव्हे तर राहत्या घरात पाण्याची सोय व्हावी यासाठी करावा लागेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. आपल्या पाण्याची आपणच सोय करणारे खंदाडे काही एकटे नाहीत, अशी अनेक घरे लातुरात आहेत.
पाणीबचतीची सा:यांनाच आपोआप सवय झाली. आज चार महिने झाले, त्यांच्या घरात धातूच्या ताटात कुणीही जेवण करीत नाही. घरातील सारी माणसे पत्रवळ्या, द्रोणात जेवतात. घरात पत्रवळ्या आल्या जानेवारीत. तेव्हा महापालिकेचे पाणी 2क् दिवसातून एकदा यायचे. आता टँकरने पाहिजे तेवढे पाणी आले तरी त्यांनी ही सवय मोडली नाही.
त्यांच्या पत्नी जयश्री सांगतात, आमच्या घरात सर्वाधिक पाणी वापरले जायचे ते बाथरूमला. पण आम्ही काटकसरीने वापर सुरू केला. आधी वापरायचो त्यापेक्षा 5क् टक्के पाण्याचा वापर आम्ही कमी केला. मग कपडे धुणो असो, भांडी धुणो असो की साधी फरशी पुसणो, प्रत्येक गोष्टीत कमीत कमी पाणी वापरायला आम्ही प्राधान्य दिले. आधी आम्ही फरशी दररोज पाण्याने पुसत होतो, ती आता आठ दिवसातून एकदाच पुसतो. कामवाली बाई कपडे धुण्यासाठी भरपूर पाणी वापरायची. तिनेही पाण्याचा 6क् टक्के वापर कमी केला.
एका बादलीतच अंघोळीचा शिरस्ता या कुटुंबातील प्रत्येकाने घालून घेतला. काटकसरीचे धडे म्हणून वडील आणि मुलगा एका बादलीत अंघोळ करतात. यामुळे लहान मुलांवरही पाणीबचतीचा संस्कार कोरला गेला. या घराकडे महापालिकेचा टँकर आठ दिवसातून एकदा आलाच तर आपल्या वाटय़ाचे 20 लिटर पाणी हे घर घेत नाही. आमच्याकडे आहे, तुम्ही गरजूंना द्या, असे ते म्हणतात.