पाणी पिकवणारी गावे
By Admin | Updated: May 30, 2015 14:45 IST2015-05-30T14:45:33+5:302015-05-30T14:45:33+5:30
शिवणी आणि तामसवाडा. ऐन उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळालेल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळी पट्टय़ातली ही दोन गावे. फरक एवढाच की, आजूबाजूच्या गावात पाण्यासाठी वणवण चालू असताना या दोन गावातली तळी मात्र तुडुंब भरलेली आहेत आणि विहिरींच्या पोटातले मायेचे झरेही आटलेले नाहीत. या गावांच्या वाटय़ाच्या पावसाचा प्रत्येक थेंब त्यांनी आडवला आणि जिरवला. हे सारे कसे घडले? ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी या गावांमध्ये फिरून आणलेली चिंबओल्या दिलाशाची ही कहाणी!

पाणी पिकवणारी गावे
मराठवाडा आणि विदर्भातल्या जीवघेण्या दुष्काळावर मात करण्याची धडपड करणा:या गावक:यांच्या श्रमांची गाथा
गावचे पाणी गावाला
जलस्त्रोताचे पुनरुज्जीवन करून अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा
मसवाडा! सेलू तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले आदिवासी बहुल गाव. या गावातील शेतक:यांची बहुतांश शेती टेकडय़ांच्या पायथ्याशी आहे. प्रत्येक खरीप हंगामात या भागातील शेतकरी शेतीवर मेहनत घेत आणि पावसाळा त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरवत असे. टेकडय़ांच्या पायथ्याशी शेती असल्याने उंचावरून वाहणारे पावसाचे पाणी शेतातील पिके खरडून नेत असे. म्हणजे पावसाळ्यात पिकांचे नुकसान तर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती, हेच नशिबी!
ही वाताहत थांबविण्यासाठी उगम ते संगम या संकल्पनेतून नाला पुनर्भरणाचा उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था शेतक:यांच्या मदतीला धावून आली. शेतक:यांच्या सहकार्य व सहभागाने 2क्11 मध्ये नाला खोलीकरण, गाळविरहितीकरण, रुंदीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नाला खोलीकरणांतर्गत 12 किमीचे काम प्रस्तावित होते. पहिल्या टप्प्यात साडे तीन किमी व नंतर सुमारे आठ किमी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. यासाठी आमदार, खासदार यांच्या स्थानिक विकास निधीचा वापर करण्यात आला. यातून सात सिमेंट साठवण बांध, नऊ मातीबांध, एक दगडी बांध, अस्तित्वातील जुन्या सहा बांधांचे मजबुतीकरण करण्यात आले. शिवाय आठ किमी लांबीचे रस्ते आणि दोन ओलांडणी पूल तयार केले गेले. पूर्वी 3-4 मीटर रूंद असलेला नाला 8 ते 15 मीटर रूंद आणि 2 ते 4 मीटर खोल करण्यात आला. यामुळे जल साठवण क्षमता दहा पटीने वाढली. उगम ते संगम या तत्त्वानुसार तामसावाडा येथील नाल्याचे 35क् मीटर लांबीर्पयतचे 25 भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी आडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅटर्ननुसार बांधलेल्या या प्रकल्पात पाणी संथगतीने वाहणो, प्रत्येक भागात साठविणो शक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होतो व पुनर्भरणही होते. या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत 7क् हजार क्युसेक मीटर पाणीसाठा झाला आहे. सुमारे 5 लाख क्युसेक मीटर पाणी भूगर्भात मुरले. शिवाय सहा गावांतील 45 ते 5क् विहिरींच्या जलसाठय़ात पाच मीटर्पयत वाढ झाली. शिरपूरच्या धर्तीवर राबविलेला तामसवाडा प्रकल्प यशस्वी झाल्याने शेतक:यांचे नुकसान टळले आहे.
मृत नाल्याचे पुनरुज्जीवन
पावसाचे पाणी एकमेव स्त्रोत असल्याने जलसंधारणाच्या या प्रयोगात मृत नाल्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यामुळे पिण्याकरिता तसेच शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. नाल्याचे उथळ व अरूंद पात्र मोठे करणो, गाळविरहित नाला म्हणजेच वेगाने वाहणा:या पावसाच्या पाण्याचा वेग कमी करणो, पुरापासून संरक्षण करणो, जलसंवर्धन व भूजल स्त्रोताच्या पुनर्भरण प्रक्रियेला वेग देण्याचा तामसवाडा नाला पुनर्भरण प्रकल्पाचा उद्देश आहे. आठ किमी नाला खोलीकरण केल्याने 32 शेतकरी डिङोल पंपाच्या साह्याने तर 4क् ते 45 शेतकरी विहिरीवरील सिंचनाच्या माध्यमातून दुबार व तिबार पीक घेतात. याच नाल्यामध्ये अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे. नाल्याच्या खोलीकरणामुळे सुमारे 8 ते 1क् किमी रस्ता तयार झाला असून शेतक:यांना शेतात जाणोही सुलभ झाले आहे.
‘दुष्काळी’ गावांतही 24 तास पाणी!
‘गावचे पाणी गावाला’ याप्रमाणो तामसवाडा नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणा:या सहा गावांना 24 तास पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरीला 45 फूट पाणी उपलब्ध आहे. याच परिसरतील 1क्क् एकर जमीन पुरापासून मुक्त झाली आहे. शिवाय मे महिन्याच्या मध्यातही जलसाठा असल्याने शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत असल्याचे दिसून येते.
तामसवाडा जंगलातून निघणा:या या नाल्याच्या पहिल्या टप्प्यात 1क् हजार क्युबिक मीटर पाणी साठले. पुढील तीन मीटर्पयत एक लाख क्युबिक मीटर जलसाठा आहे. 12 किमी लांबीच्या बांधकामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह विदर्भ सदन सिंचन कार्यक्रम तसेच पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
खरीप, रब्बी, उन्हाळी, नगदी पिकांच्या क्षेत्रत वाढ
2011-12 व 2012-13 या दोन शेतीच्या वर्षात खरीप क्षेत्रत 20 टक्के, रब्बी क्षेत्रत 40 टक्के, उन्हाळी पिकांत 20 टक्के प्रत्यक्षात वाढ झाली आहे. लाभ क्षेत्रतील सुमारे 27 विहिरींचे पाणी वाढले असून शेतक:यांचे ओलित शक्य झाले आहे. शिवाय थेट नाल्यातून पाणी घेऊन सिंचन करण्याकरिता शेतक:यांनी सुमारे 30मोटर पंप या नाल्यावर बसविले आहेत. यातून सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर, चणा, गहू, भुईमूग, ऊस, भाजीपाला हे उत्पादन वाढले.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
सहभागातील समृद्धी
तामसवाडा येथील नाल्याच्या खोलीकरण, रुंदीकरण व गाळविरहितीकरण कामात शेतक:यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणात अनेक शेतक:यांच्या शेतातील काही ना काही प्रमाणात जमिनी गेल्या; पण कुणीही हरकत घेतली नाही. शेतक:यांनी स्वखुशीने आपल्या जमिनी देत कामाला हातभार लावला, यामुळे या नाल्याचे काम सहज शक्य होऊ शकले असून जलसाठा करता आला.
शेतक:यांच्या मनातले..
नाल्याला लागून जंगल भागात शेती असल्याने पावसाळ्यात पुराचा धोका होता. शिवाय वन्यप्राणी शेतात पिकांची नासाडी करीत होते. आता नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. नाल्याच्या कामामुळे शेती करणो शक्य होणार असल्याचे मत श्रवण रामकृष्ण वाघमारे यांनी व्यक्त केले.
दत्ताेपंत कौरती म्हणतात, नाल्याच्या काठावर शेती असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पिके खरडली जात होती. तो धोका आता टळला आहे. शिवाय शेतातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. शेतार्पयत रस्ताही झाल्याने सर्व प्रकारची पिके घेणो सहज शक्य झाल्याचे समाधान आहे.
थेंबा-थेंबाचा हिशेब
पण एकेक रुपयाचा हिशेब ठेवतो, मग पाण्याचा हिशेब का नाही? हा हिशेब ठेवला नाही, तर भविष्यात थेंबभरही पाणी मिळणार नाही, हे जालना जिल्ह्यातील छोटय़ाशा शिवणी गावाला कळले. त्यामुळे बारा महिने टंचाईला सामोरे जाणा:या या गावात आज भर उन्हाळ्यातदेखील टंचाईचे नाव नाही. गावकरी पावसाच्या प्रत्येक थेंबाची नोंद घेतात. तो जमिनीत मुरवतात. तो वापरायचा किती हेदेखील ठरवितात.
साधारण साडेसातशे ते हजारच्या घरात लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसायचे. वर्षाचे 12 महिने गावाच्या डोक्यावर घागर दिसायची. खरपुडीतील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून 1997 साली कापसाचे ‘रेणुका’ हे वाण गावात आले. 15 ते 16 शेतक:यांनी ते आपल्या शेतात घेतले. एकरी पाच क्विंटलर्पयत मिळणारा उतारा दुप्पट झाला. मिळालेल्या यशातून शेतक:यांचा विश्वास बळावला.
आषाढी आणि कार्तिकेला कुठलाही वारकरी पंढरीची वारी चुकवत नाही. जालना जिल्ह्यातील शेतकरी याच भक्तिभावाने दर महिन्याच्या पाच तारखेला होणारी खरपुडीचीही वारी सोडत नाहीत. प्रत्येक वेळी वेगळा विषय. त्या त्या क्षेत्रतला तज्ज्ञ मार्गदर्शन करतो. शिवाय वेगवेगळे प्रयोग राबविणारे शेतकरी स्वत: त्याची माहिती देतात. 213 आठवडय़ांपासून न चुकता खरपुडीत ही कृषी विचारांची देवाणघेवाण होत आहे. गावातील प्रयोगशील शेतकरी उद्धव खेडेकर हेदेखील खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राचे वारकरी. 2000 साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत खेडेकर यांच्यासह गावातील तरुण एकवटले. या एकीच्या बळातून गावाने ग्रामस्वच्छता अभियानात 2क्क्1 साली तालुक्यात आणि 2क्क्2 साली जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आणि पाणीटंचाईवर कायमची मात करण्याचा प्रवास सुरू झाला.
‘वॉटर’ या संस्थेचा 100 दिवसांचा पाणलोट प्रकल्प गावक:यांना समजला. संस्थेकडून गावाला 15 लाख रुपये मिळाले. कामाचा पूर्ण आराखडा करण्यात 25 दिवस गेले. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अवघे 75 दिवस उरले. 16 टक्के काम श्रमदानातून व्हायलाच हवे, हा संस्थेचा नियम. गावक:यांनी प्रत्यक्षात 32 टक्के काम केले. साडेपाच ते सहा लाखांचे काम स्वत: गावक:यांनीच केले. 2003-04 साली असे तब्बल 20 लाखांचे काम झाले.
786 हेक्टरचे शिवार. साधारण 55क् ते 650 मिलीमीटर पाऊस येथे होतो. पहिल्याच पावसाळ्यात 2003ला गावक:यांनी यातील 55 टक्के पाणी अडविले. पुढच्या वर्षी 600 मिलीमीटर पाऊस झाला. सलग दोन वर्षे पडणारा प्रत्येक थेंब जागीच जिरविला.
- आता ‘अच्छे दिन’ येणार हे स्वप्न घेऊन गावकरी जगत असताना घडले भलतेच. आधी डिसेंबरपासूनच गावक:यांना पाणीटंचाईचे चटके बसायचे. या पाणलोट प्रकल्पानंतर थोडे उशिरा, जानेवारीत बसू लागले. मग जिरविलेले पाणी गेले कुठे, या प्रश्नाने प्रत्येक गावकरी परेशान झाला. पुन्हा कृषी विज्ञान केंद्राचे दरवाजे ठोठावण्यात आले. भूगर्भतज्ज्ञांना बोलविण्यात आले. गावच्या शिवारात 40 ते 45 मीटर म्हणजे 130 ते 150 फूट खोलीवर मोठय़ा द:या असल्याचे स्पष्ट झाले. तो दिवस होता 25 मे 2004. या द:यामुळे गावक:यांनी जिरविलेला प्रत्येक थेंब पुढे सरकला आणि गावकरी तहानलेलेच राहिले. गावक:यांच्या पाणलोट प्रयत्नांना या द:यांनी खीळ घातली. शास्त्रज्ञांची मदत घेऊन यावरही उतारा शोधला गेला. जियॉलॉजिकल सव्र्हे डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात जीएसडीएने एफसीसी (फ्रॅक्चरिंग सिमेंट सिलींग) हा पहिलाच प्रयोग येथे करण्याचे ठरविले. पाणी अडविण्यासाठी आपण जमिनीवर बंधारा बांधतो. असाच बंधारा जमिनीखालच्या द:यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बांधला जातो. प्रयोग करायचे ठरले. एका दिवसात आराखडा तयार झाला. खर्च येणार होता 1.85 लाख. एवढे पैसे आणायचे कोठून? गावक:यांनी जिल्हा परिषदेच्या अधिका:यांची भेट घेतली. 1क् टक्के निधी लोकसहभागातून आणि उर्वरित जिल्हा परिषदेकडून घेण्याचे ठरले. 29 मे रोजी सिमेंटची पहिली गाडी गावात धडकली. तीन जून रोजी गावक:यांनी बंधा:याच्या कामाला सुरुवात केली. रात्रंदिवस काम केले. अडीच हजार बॅग सिमेंट बोअरच्या माध्यमातून आत जमिनीत सोडून चार दिवसांत हा भूमिगत बंधारा पूर्ण करण्यात आला. 2क्क्5च्या पावसाळ्यात 550 एमएमएस पाऊस झाला. यातील प्रत्येक थेंब गावक:यांनी जिरविला. तेव्हापासून गावाने कधीच पाणीटंचाई अनुभवली नाही. अगदी 2012चा दुष्काळसुद्धा गावक:यांना जाणवला नाही!
या गावात केवळ चार मोटरसायकली होत्या. आज ही संख्या 40 आहे. रस्ते पक्के झाले. केवळ चार घरांत स्वच्छतागृहे होती. ती आता 72 घरांत झाली. एकही ड्रेनेजलाइन नव्हते. आता 800 मीटर लाइन झाली.
गावचा चेहरामोहरा बदलण्यात कृषी विज्ञान केंद्र आणि विजयअण्णा बोराडे यांचा मोठा वाटा. इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्चचा 2012-13च्या राष्ट्रीय पुरस्काराने उद्धव खेडेकर यांना गौरविले. गावाने पाणीटंचाईवर मात केली. शेतीही बहरली. म्हणून या गावाची खरपुडीची वारी बंद झाली नाही. कुठल्याही पाच तारखेला या केंद्रावर जा, खेडेकर दोन-चार गावक:यांसह येथे नक्की भेटतात.
पाण्याचा ताळेबंद
पाणी अडले, जिरले, टिकले आणि मिळाले म्हणून त्याचा वारेमाप वापर नाही.
पाण्याचा प्रत्येक थेंब आणि उपलब्ध जमीन याचे नियोजन गावक:यांनी केले आहे. पिण्याचे, पशुधनाचे आणि पिकासाठी असे पाण्याचे तीन विभाग करण्यात आले.
प्रत्येक शेतक:याची सकाळ त्याच्या मोबाईलवर आलेल्या आकडेवारीवरुन होते. यावरुन उपलब्ध पाणीसाठा समजतो. कुठल्या पिकाला किती पाणी लागते यावरुन गावात कुठले पिक घ्यायचे हे ठरते.
खरीपात सोयाबीन, कापूस आणि तूर तर रबीमध्ये ज्वारी, कांदा हे पिक घेतले जाते.
गजानन दिवाण
(लेखक मराठवाडा आवृत्तीत
उप वृत्तसंपादक आहेत)