‘दृश्य’ संस्कृती!
By Admin | Updated: April 25, 2015 14:35 IST2015-04-25T14:35:00+5:302015-04-25T14:35:00+5:30
दृश्य म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं ते कि दिसण्यातून जे आकलन होतं ते? - दृश्य केवळ प्रतिमा किंवा त्याच्या अर्थापुरतं मर्यादित राहत नाही. ते आपल्या आकलनातही बरीच भर घालतं!

‘दृश्य’ संस्कृती!
नितीन कुलकर्णी
'दृश्य संस्कृती’ असं वाचताना थोडं बुचकळ्यात पडल्यासारखं होतं. आपल्याला ‘संस्कृती’ या शब्दाविषयी विशेष आस्था असते, म्हणूनच सांस्कृतिक वातावरणातील दृश्यांसदर्भात काही असेल असं आपल्याला वाटतं. संस्कृती म्हणजे आपली तत्कालीन जीवन पद्धती, धर्म, संस्कार व एकंदर चालीरीतींचे एक सूत्र म्हणून आपल्याला माहीत असते. आपल्या ‘मराठी’ भाषेशी निगडित चालीरीती, वेशभूषा, देवधर्म, संगीत, नाटक आणि सिनेमा इत्यादी गोष्टी आपल्याला परंपरेची आठवण करून देत असतात. ‘आठवण’ असे मुद्दाम म्हटले, कारण एके काळी संस्कृतीचे द्योतक असलेल्या गोष्टी आणि आजची आपली रोजची जीवनशैली यात खूप तफावत आहे.
संस्कृती ज्या काळातील असेल, तिथे ती एक जीवनपध्दती असते. जी वर्तमानकाळाशी साहचार्याने राहणारी, जिचे मूलभूत स्वरूप ‘परिवर्तनीय’ असते, त्यामुळे यातला परंपरेचा अट्टहास क्षीण ठरत जातो.
आज आपल्या जीवनाची एकसंधता त्याच्या विभाजित अस्तित्वातच शोधता येते, त्याचमुळे संस्कृतीतली दृश्य असे न राहता दृश्याला आलेल्या असाधारण महत्त्वामुळे या दृश्यांचीच संस्कृती बनते.
- रोजच्या जीवनातील काही दृश्यांचीच मदत घेऊ आणि असे करत असताना एक प्रश्न विचारात घेऊ ‘आपण रोज किती दृश्ये बघतो आणि किती वेगवेगळय़ा प्रकारे त्यांचा वापर करतो?’. ‘‘आपण काल सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किती दृश्ये बघितली आणि कळत-नकळतपणो या दृश्यांचा आपल्यावर कसा परिणाम झाला?’’ - आपल्या एक लक्षात येईल की, यातील बहुसंख्य दृश्ये मानवनिर्मित आहेत आणि यांचा उद्देश बघणा:याच्या मनावर विशिष्ट परिणाम साधणो असा आहे. उदाहरणार्थ आपण झोपत असलेल्या पलंगावरच्या चादरीची नक्षी अथवा टूथपेस्टची रंगीबेरंगी टय़ूब व त्यावरील नवल अक्षरे. या व्यतिरिक्त अशी बरीचशी दृश्ये आपण बघत असतो, जी नकळतपणो आपल्यावर परिणाम करत असतात.
दृश्य म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते, एवढा साधा अर्थ दृश्य संस्कृतीच्या संदर्भात उपयोगी पडेल अस वाटत नाही. जे डोळ्यांना दिसतं ते असं म्हणण्यापेक्षा ‘‘दिसण्यातून आपल्याला जगाविषयी व आपल्या स्वत:विषयी जे आकलन होतं ते म्हणजे दृश्य’’ असं म्हणावं लागेल. म्हणजे दृश्य केवळ डोळ्यात उमटणा:या प्रतिमा व त्याच्या अर्थापुरतं मर्यादित न राहता पुढे जातं आणि मानवी आकलनात एक समांतर प्रक्रिया बनतं. सायकल बघून ‘‘ती पहा सायकल’’ असं व्यवहारात म्हणताना हा उद्गार केवळ त्या वस्तूच्या झालेल्या ओळखीला दर्शवित असतो, परंतु त्या सायकलच्या विशिष्ट संदर्भाकडे बघितले असता ते सायकलचे दृश्य सायकल पलीकडे जाऊन तिचा उपयोगकर्ता व त्याची आर्थिक सामाजिक स्थिती व सांस्कृतिक जडणघडण या विषयी काहीतरी सांगू लागते; हे सांगितलेलं पाहणं व समजून घेणं आपलं काम आहे.
दृश्य 1 - पहिले सायकलचे दृश्य सायकलच्या ओळखीबरोबर बाकीचे बरेच संकेत दर्शवते; जसे ग्रामीण, कामकरी, राकट, श्रमिक, निसर्ग आणि मशीन अथवा पडीक वगैरे. दुसरी सायकल शहाळे विक्रेत्याचे सूचन करते, कामामधील विश्रंती वगैरे तसेच हे दृश्य महाराष्ट्रातले नसावे असेही सूचित करते. अजून एक नोंद करण्याजोगी गोष्ट म्हणजे या दोन्ही ठिकाणी सायकलच्या ब्रॅण्डची ओळख कठीण आहे.
वास्तवाचे दृश्य म्हणजे ‘फोटो’ (छायाचित्र) असे समीकरण आपल्या मनात घट्ट बसले आहे. छायाचित्र हे देखील एक माध्यम आहे आणि प्रत्येक माध्यमाच्या बलस्थानाबरोबरच मर्यादाही असतात. वास्तव आणि सत्य यामध्ये संबंध असला तरी दोन्ही एक नक्कीच नव्हे, वास्तवाच्या इंद्रियजन्य नोंदीनुसार आपण सत्यासत्यता तपासत असतो अथवा दाखवत असतो.
छायाचित्र काढणो आणि त्यांचा डिजिटल संग्रह करू शकणो या तंत्रज्ञानाचा हा परिणाम आहे. जेव्हा असे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते तेव्हादेखील अशा प्रकारच्या अर्थाचे दृश्यारोपण होत होते, आणि असे करणो छायाचित्रच्या ‘कलेत’ उच्च दर्जाचे मानले जाते. युसूफ कार्ष या 2क् व्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश व्यक्तिचित्र छायाचित्रकाराने काढलेली विस्टन चर्चिल या जगप्रसिद्ध राष्ट्रप्रमुखाची दोन छायाचित्रे पाहिल्यावर हे अधोरेखित होईल.
दृश्य 2- युसूफ कार्ष या 2क्व्या शतकातील प्रसिद्ध ब्रिटिश व्यक्तिछायाचित्रकाराने विन्स्टन चर्चिल यांची टिपलेली दोन छायाचित्रे, यातील कुठले आपल्याला भावले? करारी स्वभाव दर्शवणारे पहिले की मृदू स्वभाव दर्शवणारे दुसरे?
हे व्यक्तिचित्र सगळ्यात जास्त वेळा मुद्रित झाले होते असे म्हणतात. जेव्हा कॅनेडियन सरकारने कार्ष यांना आमंत्रित केल,े तेव्हाच त्यांना समजले होते की अतिशय कमी वेळेत परिणामकारक छायाचित्र काढावे लागणार आहे. कार्ष यांनी आधीच चर्चिल यांच्यावर अभ्यास केला होता ज्यात त्यांच्या स्वभावविशेषांचा समावेश होता.
जेव्हा चर्चिल कॅमेरासमोरील खुर्चीत विराजमान झाले तेव्हाच त्यांनी बजावले ‘‘तुमच्याकडे फक्त दोन मिनिटे आहेत’’. ते जरा नाराजच होते कारण छायाचित्र काढण्याबद्दल त्यांना आधी कल्पना दिलेली नव्हती. खुर्चीवर बसल्यावर त्यांनी खोडसाळपणो आपला सिगार (सिगारसाठी ते जगप्रसिध्द आहेत) शिलगावला. कार्ष यांनी त्यांना सिगार तोंडातून काढण्याविषयी सांगितले, पण चर्चिल यांनी नकार दिला. हा काबिल छायाचित्रकार प्रकाशाची तीव्रता तपासण्याच्या निमित्ताने त्यांच्याजवळ गेला आणि नकळतपणो त्यांचा ओठातला सिगार काढता झाला आणि चुपचाप आपल्या कॅमे:याकडे परत आला. परत येताना रिमोटच्या साह्याने फोटो काढून झालाही, उठून उभे राहिलेले चर्चिल तक्रारीच्या सुरात होते, चेह:यावर राग स्पष्ट दिसत होता. तेव्हा कार्ष म्हणाले, ‘‘मला माफ करा सर’’, चर्चिल हसत-हसत म्हणाले, ‘‘तुम्ही अजून एक घेऊ शकता’’.
परत जाताना राष्ट्रप्रमुख कार्ष यांचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘तुम्ही गर्जना करत असलेल्या सिंहालादेखील शांत बसवून त्याची छबी टिपू शकता’’. युसूफ कार्ष यांनी काढलेले दुसरे, हसरे छायाचित्र जरा कमीच प्रसिद्धीस पावले हे वेगळे सांगायला नको.
आपल्याकडील गौतम राजाध्यक्ष या व्यक्तिचित्रंसाठी प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रकाराचे उदाहरण घेऊ, सचिन तेंडुलकरच्या छायाचित्रचे.
दृश्य 3- पहिले छायाचित्र गौतम राजाध्यक्ष यांनी टिपलेले, हवेत उसळवलेल्या चेंडूकडे लक्ष केंद्रित केलेले. यात तेंडुलकरच्या चेह:यापेक्षा त्याचे गुणविशेष दर्शवलेले आहेत. मागच्या अंधारामुळे चेंडूवरला प्रकाश चंद्रकोरीसारखा भासतो आणि त्याच्या विविध पराक्र मांची जाणीव करून देतो. दुसरे छायाचित्र फक्त तेंडुलकरच्या अस्तित्वाची ओळख दाखवते. अर्थात दोन्हीही ठिकाणी वरच्या दिशेकडची नजर निश्चयी व निर्णायक भाव दर्शवते.
दृश्य संस्कृतीमध्ये मानवनिर्मित दृश्य येतात, वरच्या मुद्यामधून असे वाटेल की छायाचित्र म्हणजेच दृश्य. परंतु हे अर्धसत्य ठरेल, खरंतर चित्रकला हेच आद्य मानवनिर्मित दृश्य होय. खरेतर चित्रंच मानवी आकलन-समज आणि बाह्य परिस्थती यांचा योग्य मिलाफ असतात, कारण चित्र काढण्याची प्रक्रि या नैसर्गिक असते. जाहिरात कलेत सुद्धा सुरुवातीला हातांनी चित्रे काढली जात.
कॅमे:याच्या उदयानंतर चित्रंचे महत्त्व कमी झाले. दस्तऐवाजांमध्येदेखील आधी होणारा चित्रंचा वापर कमी होऊ लागला. त्यामुळे चित्रकलेचे प्रयोजन बदलले, चित्रतून चित्रकार डोळ्यांना जे दिसते त्यापेक्षा जे मनाला दिसते व जाणवते ते चित्रित करण्याचा प्रयत्न करू लागला, हे झालं युरोपात, 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 2क्व्या शतकाच्या पूर्वार्धात. याला प्रक्रि येला जोड मिळाली ती म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञानात झालेले बदल व वैज्ञानिक प्रगतीमुळे. आणि आज असे दिसते की चित्रकलेत छायाचित्रंबरोबर इतर तंत्रचा जसे चलचित्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमं यांचा सढळ हातांनी वापर होताना दिसतो. कलात्मक मूल्य आज केवळ आशयात शोधता येत नाही, तर तांत्रिक विविधता पाहणो महत्त्वाचे ठरते. एका कलाकृतीत सौंदर्य शोधणो हे आज शक्य नाही त्यासाठी समग्रता शोधावी लागते. संदर्भांमध्ये समग्रता सापडते, हे जरा गोंधळाचे झाले आहे, त्यामुळे सामान्य लोक त्यापासून दूर राहणोच पसंद करतात, साहजिकच सामान्य जीवनात चित्रकला सांस्कृतिक भर घालू शकत नाही. आज आपण वस्तूंबरोबरच दृश्य कन्ङयुम करतो. आणि अभावानेच चित्रकला या प्रवाहाचा भाग बनते.
खरंतर मानवनिर्मित दृश्य परंपरेच्या संदर्भात दृश्यकलेचा विचार करावाच लागतो. समग्र इतिहास आपल्याला सांगतो की, अशी परंपरा व त्याचे संक्रमण करण्याची क्षमता भारतात होती, पण परदेशी आक्रमणांमुळे अशी परंपरा खंडित झाली. आज असे काही विचारप्रवाह, व्यक्ती, संस्था आहेत जे त्या परंपरेचा खंडित प्रवाह जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा प्रयत्नांतून कट्टरतावादी धारणा तयार होण्याव्यतिरिक्त काही होत नाही. ‘दृश्य अभ्यास’ या शास्त्रशुद्ध प्रणालीच्या अनुसरणातून कदाचित आजची भारतीय दृश्यकला अधोरेखित होऊ शकेल, पण जागतिकीकरणाला ‘डोळस’ पणो सामोरे जाऊनच हे शक्य होऊ शकेल. आपल्याला काय वाटते?
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.)