शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

बुद्धिस्ट टेम्पल स्टे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:05 IST

आजवर मी अनेक देशांत फिरलेय; पण दक्षिण कोरियाला जायचा योग अगदी अचानक आला.  बौद्ध भिक्षू आणि तिथल्या मठांतला  अनुभव अतिशय वेगळा होता. पण एक गोष्ट अजूनही आठवते, भारतीय म्हटल्यावर तिथल्या लोकांच्या  डोळ्यांत दिसणारा आदरभाव.  हे माझ्यासाठी फारच नवीन होतं.

ठळक मुद्देहा एकच देश असा होता, की जिथे जेव्हा जेव्हा मी सांगितले की मी भारतीय आहे तेव्हा तेव्हा कोरियन लोकांच्या डोळ्यात एक वेगळाच आदरभाव दिसला.

- अनघा दातार 

मी कधी कोरियाला जाईन असं वाटलं नव्हतं. पण दोन वर्षांपूर्वी साउथ कोरियाला एका मैत्रिणीच्या लग्नाला जायचा योग आला. अगदी जायच्या दिवसापर्यंत अमेरिका आणि नॉर्थ कोरियाचे काहीतरी चालूच होते त्यामुळे जायला मिळेल की नाही, अशी भीती होती; पण फायनली मी आणि माझे फ्रेण्ड्स सेऊलला पोहचलो.लग्नानंतर माझ्या कोरियन मैत्रिणीने आणि तिच्या नवर्‍याने सगळ्यांसाठी एक मस्त वेगळा प्लॅन केला होता. आम्ही सगळेङ्खह’्नील्लॅ2ंच्या टेम्पलमध्ये एक रात्न ‘मॉँक स्कूल एक्सपिरिअन्स’ घ्यायला गेलो. हा एक खूपच आगळा वेगळा अनुभव होता.आम्ही सर्वजण साधारण दुपारी 3 वाजता बुद्धिस्ट टेम्पल/मोनेस्टरीमध्ये पोहचलो.गेल्यावर सर्वांना थोडी माहिती दिली. मुले आणि  मुलींना वेगवेगळ्या खोल्यात नेले. तिकडे आमच्यासाठी जी लेडी मॉँक होती तिने सर्वांना तिथे घालवायचा एक ड्रेस दिला आणि तो कसा घालायचा हेपण शिकवलं. त्यानंतर आम्ही सर्वजण एका हॉलमध्ये जमलो. तिथे मठाच्या मुख्य गुरुंनी आम्हाला रूपरेषा सांगितली. साधारण एक दिवस आम्ही काय करणार आहोत, आर्शमाची माहिती, तिथले नियम सांगितले आणि  आमचे स्वागत केले. ते सगळे कोरियन भाषेत बोलत होते. माझ्या मैत्रिणीच्या नवर्‍याने आम्हाला ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून सांगितले.त्यानंतर एक पुरुष आणि एक स्री असे दोन सहायक गुरु आम्हाला शिकवायला, मदत करायला आले. त्यातील पुरुष गुरु  भारतातून आले होते त्यामुळे त्यांच्याशी मी थोडे हिंदीत बोलून घेतले. त्यांनी प्रथम आम्हाला नमस्कार कसा घालायचा ते दाखवले. हे जरा मेहनतीचे काम होते. तीन टप्प्यातला हा नमस्कार. साधारण साष्टांग नमस्कारासारखा हा प्रकार. हे असे पुढे बर्‍याच वेळा आम्हाला करायचे होते. भरपूर व्यायाम होता आणि असा नमस्कार घालताना एक मंत्न म्हणायचा  होता. बुद्धम शरणं गच्छामिचे कोरियन भाषांतर. सर्वांबरोबर हे सर्व असे छान एका लयीत म्हणताना खरंच खूप शांत वाटत होतं.त्यानंतर आम्हला सर्वांना रात्नीच्या जेवणासाठी नेले. तिकडे रात्नीचे जेवण संध्याकाळी 5.30 लाच असते. हे जरा कठीण होते. पण नियम म्हणजे नियम. आम्ही सर्व एका हॉलमध्ये गेलो. सर्वांना कामे वाटून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी पाट, पाणी, जेवण हॉलमध्ये आणून ठेवले. मग सगळ्यांना आमच्या गुरुंनी कसे जेवायचे याचे नियम सांगितले. प्रथम कुठल्या साइडच्या बाउलमधून अन्न घ्यायचे, सगळे जेवण कसे संपवायचे, पण तरीही एक दाणाही उरता कामा  नये. अशी सगळी नियमावली सांगून झाल्यावर आम्ही न बोलता जेवायला सुरुवात केली. जेवताना न बोलण्याचा नियम होता.जेवण झाल्यावर सगळेजण संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी मोठय़ा मंदिरात जमलो. त्याआधी एका मोठय़ा घंटेजवळ जाऊन घंटानाद केला. मंदिरात बुद्धाची एक मोठी मूर्ती आहे. तिथे मुख्य गुरुंनी प्रार्थनेला सुरुवात केली. प्रत्येक मंत्नासोबत एक पूर्ण नमस्कार. 3 टप्पे आणि एक साष्टांग नमस्कार. त्यानंतर सगळेजण ध्यानाला बसले. आम्हीपण थोडावेळ ध्यान करून आमच्या हॉलकडे परतलो.तो शांत, पर्वतांनी वेढलेला आणि स्वच्छ परिसर बघून खूप मस्त वाटत होतं. हॉलमध्ये परतल्यावर परत सगळेजण समोरासमोर तोंड करून दोन रांगेत उभे राहिलो. आता रात्नीची शेवटची अँक्टिव्हिटी करायची होती. 108 मण्यांची जपाची माळ बनवायची होती; पण नुसती नाही, तर प्रत्येक मणी ओवून झाल्यावर एक साष्टांग नमस्कार. आणि तो करताना नेहमीप्रमाणे बुद्धम शरणं गच्छामिचा मंत्न कोरियनमध्ये म्हणायचा.मी मनात जेवढेवेळा नमस्कार करता येईल तेवढा करू, असा विचार केला होता; पण 108 वेळा  सगळ्यांबरोबर कधी पूर्ण केला कळलंच नाही. ग्रुपमध्ये एकादी अवघड, कंटाळवाणी गोष्टसुद्धा किती मजेत पूर्ण होते ते कळलं. ती जपाची माळ मी अजूनही जपून ठेवली आहे. आता मात्न सगळेजण दमलो होतो. परत उद्या पहाटे 4 वाजता तयार राहायचं होतं. त्यामुळे मग सगळेजण अंघोळ करून 9 वाजता झोपलोसुद्धा. दुसर्‍या दिवशी पहाटे बरोबर 4 वाजता सगळेजण आवरून तयार होतो. आम्हा सर्वांना परत कालच्या मोठय़ा मंदिरात प्रार्थनेसाठी नेले. संध्याकाळप्रमाणेच प्रार्थना, नमस्कार, मंत्न सगळे करून सकाळी 6 वाजता नास्ता करायला गेलो. इथे मात्न काही वाढपी होते; पण अर्थातच खाऊन झाल्यावर आपली ताटली आपणच नीट विसळून जागेवर ठेवायची होती. आता शेवटची आणि जरा अवघड परीक्षा द्यायची होती. आम्ही सगळेजण जंगलात गेलो. साधारण एक किलोमीटरचा ओबडधोबड, छोटे खडे असलेला रस्ता तीन टप्पे आणि साष्टांग नमस्कार करत, तोंडानी मंत्न म्हणत पार करायचा होता. कारण देहाला क्लेश दिल्याशिवाय मोक्षाचा मार्ग मिळत नाही अशी बुद्धिस्ट शिकवण आहे. अर्थात आम्ही सगळेच ‘मॉँक स्कूल एक्सपीरिअन्स घ्यायला गेलो होतो, त्यामुळे हे सारे करणे भागच होते. अर्थातच आम्हाला कसलीही जबरदस्ती नव्हती. ज्यांना पूर्ण नमस्कार करणे शक्य नव्हते त्यांनी अर्धा नमस्कार केला तरी चालणार होते. अर्धा म्हणजे 3 टप्पे आणि फक्त कंबरेत वाकून नमस्कार करणे. मी प्रथम  थोडावेळ पूर्ण नमस्कार केला, मग मात्न अर्धाच ! (सुखी देहाला यापेक्षा जास्त कष्ट मी देऊ शकत नव्हते !) मला मोक्षाची घाई नव्हती.यानंतर मग बराच वेळ फोटोसेशन करून सगळेजण 2-3 मॉँकबरोबर चहा आणि कॉफी घेत थोडावेळ गप्पा, चर्चा करत बसलो. त्यानंतर मग सगळेजण आवरून 9 किलोमीटरचा फेरफटका मारून पुढच्या मठात जायला निघालो. प्रत्येक ट्रिपमध्ये काहीतरी वेगळे करायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या ट्रिपमध्ये ही इच्छा मस्तच पूर्ण झाली. त्यातलं सगळंच जरी पटलं नसलं तरी एक वेगळा अनुभव म्हणून खूपच मस्त वाटलं. मी आजपर्यंत अनेक देशात फिरले; पण कोरियाच्या भटकंतीत, एक गोष्ट मात्न मला जाणवली की हा एकच देश असा होता, की जिथे जेव्हा जेव्हा मी सांगितले की मी भारतीय आहे तेव्हा तेव्हा कोरियन लोकांच्या डोळ्यात एक वेगळाच आदरभाव दिसला. जो मला आजपर्यंंत कुठेच अनुभवायला मिळाला नव्हता. कदाचित बुद्धाच्या भूमीतून आले म्हणून तो आदर असावा. पण प्रत्येक वेळा कोरियन माणसाच्या डोळ्यातील ती चमक आणि  आदरभाव बघून मनापासून खूप छान वाटले. 

anagha.datar@gmail.com

Woljeongsaच्या टेम्पल स्टेबद्दल अधिक माहिती - ँhttps://eng.templestay.com/pagetemplestay.asp