शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे काश्मीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:18 IST

विदर्भाच्या या काश्मीरातील गुलाबी थंडीत व्याघ्रदर्शनही हमखासच! विपुल वनसंपदेने नटलेल्या आणि निसर्गाने दहा करांनी केलेल्या मुक्त उधळणीमुळे चिखलदरा ‘वैदर्भीयांसाठीच नव्हेतर विविध प्रांतातील पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. चिखलदऱ्याची समृद्ध वनराई, दाट धुके, बोचरी थंडी न सहज दृष्टीस पडणाऱ्या श्वापदांना मनात साठवून ठेवण्यासाठी सुरू असलेली जंगल सफारी पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी पुरेशी आहे.

ठळक मुद्दे'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना नेहमी खुणावतेकीचकदरीचे रूपांतर चिखलदऱ्यातभीमाने येथे राजा कीचकचा वध करून मृतदेह दरीत फेकून दिला

नरेंद्र जावरे/लोकमत न्यूज नेटवर्कविदर्भाच्या या काश्मीरातील गुलाबी थंडीत व्याघ्रदर्शनही हमखासच! विपुल वनसंपदेने नटलेल्या आणि निसर्गाने दहा करांनी केलेल्या मुक्त उधळणीमुळे चिखलदरा ‘वैदर्भीयांसाठीच नव्हेतर विविध प्रांतातील पर्यटकांसाठी आवडीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. चिखलदऱ्याची समृद्ध वनराई, दाट धुके, बोचरी थंडी न सहज दृष्टीस पडणाऱ्या श्वापदांना मनात साठवून ठेवण्यासाठी सुरू असलेली जंगल सफारी पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी पुरेशी आहे.जिल्ह्यातील सातपुडा पर्वंतरांगेत वसलेले 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदऱ्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकदरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदऱ्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शीतलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.चिखलदरा येथील हजारो फूट खोल दऱ्या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे, असे म्हणतात. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा 'व्याघ्रप्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदऱ्याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरिण तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानगळ सुरू होते. कारण हा जंगल परिसर शुष्क पानगळ अरण्याच्या प्रकारात मोडतो. परंतु, पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्याद्री पर्वताचे रूप प्राप्त होत असते. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर गुलाबी थंडीची चाहूल गत पंधरवड्यापासून लागली. देशभरातील हजारो पर्यटक या बोचऱ्या हुडहुडी भरणाऱ्या थंडीत निसर्गाच्या आल्हाददायी वातावरणाची मौज घेत आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी चिखलदऱ्यात राहण्यासाठी रेस्ट हाऊस आरक्षित केल्याने चिखलदरा पर्यटन हाऊसफुल्ल झाले आहे.कॅप्टन रॉबिन्सनने लावला शोधसमुद्र सपाटीपासून ३,६६४ फूट उंचावर असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाचा शोध सन १८२३ मध्ये हैदराबाद पलटणीच्या कॅप्टन रोबिन्सन याने लावला. इंग्रजांनी विकसित केलेल्या या पर्यटनस्थळावर देश-विदेशातील लाखो पर्यटक वर्षभर हजेरी लावतात. इंग्रजकालीन येथील कॉफीचे मळे अप्पर प्लेटोवर आहेत. चिखलदरा पर्यटनस्थळ उंचावर असल्याने गगनचुंबी उंच पहाड, हिरवा शालू पांघरलेली वनश्री पर्यटकांना मोहित करणारी आहे.तिन्ही ऋतूत पर्यटकांची गर्दीचिखलदरा पर्यटन स्थळावर तिन्ही ऋतूमध्ये हजारो पर्यटक हजेरी लावतात. हिवाळ्यात अंगात हुडहुडी भरविणाऱ्या गुलाबी थंडीत अंगात गरम कपडे आणि शेकोटी पेटवून आल्हाददायक वातावरणाची मौज पर्यटक घेतात.महाभारत आणि ऐतिहासिक स्थळेचिखलदरा पर्यटन स्थळावर महाभारतकालीन भीमकूंड, वैराटचा समावेश आहे. भीमाने कीचकाचा वध केल्यानंतर रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले तो भीमकुंड असल्याची आख्यायिका आहे. विराट राजाची नगरी असलेल्या वैराटचा सूर्यास्त आणि जंगल सफारी, आदिवासींचे कुलदैवत असलेल्या देवीपॉईंटवरील जनादेवी मंदिर पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे आहे. येथेच दर्यापूरपर्यंत वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे उगमस्थान आहे. ऐतिहासिक गाविलगड किल्ला, सादाला प्रतिसाद देणारा पंचबोल पॉईंट, हरिकेन पॉईंट, वन उद्यान, मोझरी पॉईंट्स असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. शेकडो फूट उंचावरून कोसळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यांमधून नागमोडी वळणाचा रस्ता आणि त्यात वसलेली आदिवासींची टुमदार छोटी खेडी हे मेळघाटचे खास आकर्षण आहे.वाघाच्या सहवासात जंगल सफारीचिखलदरा पर्यटन स्थळासोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह आणि वैराट येथे जंगल सफारीची खास व्यवस्था आहे. मेळघाटच्या घनदाट अरण्यात फिरण्यासोबत रानगवे, सांबर, हरिण, अस्वल, वाघ आदी तृणभक्षी व मांसभक्षी वन्यप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होऊ शकते. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या चिखलदऱ्यात क्षणात उन्ह, रिमझिम पाऊस तर क्षणात बोचऱ्या थंडीसह दाट धुके असा जादूई आविष्कार पाहावयास मिळतो. चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा चार वर्षांपूर्वी किमान ५ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद आहे. पहाटे पांढरेशुभ्र दाटधुके विलोभनीय असते.पुरातन गाविलगडराज्यातील पुरातन अशा दहा किल्ल्यांपैकी एक गाविलगड किल्ला आहे. मोगलापूर्वी येथे गवळी आलेत. या गवळ्यांच्या तो गाविलगड किल्ला आहे. मेळघाटातील गवळी राजाने बाराव्या शतकात मातीच्या भिंतीचा हा परकोट उभारला. सन ११८५ ते १३०२ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या यादव वंशीय राजाच्या ताब्यात होता. तशी ऐतिहासिक नोंद आहे. या किल्ल्यात दारूगोळा बनविला जात होता. आजही गाविलगडचे बुरूज, दगडी दरवाजे, राणी महल, मशिदीसह छोट्या-मोठ्या वास्तू बघायला मिळतात.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदराtourismपर्यटन