शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वंदे मातरम् अन् बुद्ध वंदनेचे स्वरयात्री

By विजय बाविस्कर | Published: April 16, 2023 2:24 PM

नंदयात्री मास्टर कृष्णराव’ ही स्मरणिका अलीकडेच संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीपूर्तीनिमित्त ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली.

- विजय बाविस्कर समूह संपादकनंदयात्री मास्टर कृष्णराव’ ही स्मरणिका अलीकडेच संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीपूर्तीनिमित्त ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. ही स्मरणिका म्हणजे जणू प्रतिभासंपन्न मास्तरांबद्दलच्या रम्य स्मृतींच्या अथांग अर्णवातील ‘अमृतकलश’च! या स्मरणिकेत संगीत क्षेत्रातील बुजुर्ग कलावंत, नवीन पिढीतील तरुण कलावंत तसेच आप्तस्वकीयांचे लेख, मुलाखती, काव्य व हृद्य आठवणी समाविष्ट केलेल्या आहेत. डॉ. श्रीरंग संगोराम, ग.दि. माडगूळकर, गोपाळराव मेहेंदळे, मास्तरांचे पुत्र राजाभाऊ फुलंब्रीकर व कन्या संगीतकार वीणा चिटको यांचे यात पुनर्प्रकाशित केलेले लेख आहेत. ह्या स्मरणिकेमधून वाचकांना मास्तरांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व व अफाट सांगीतिक कार्यकर्तृत्व यांचे मनोहारी दर्शन घडते. एक विद्वान संगीततज्ज्ञ म्हणून मास्तर कृष्णराव प्रसिद्ध आहेतच; याशिवाय त्यांनी केलेल्या रागांच्या, बंदिशींच्या दर्जेदार नवनिर्मितीबद्दल माहिती मिळते. गाण्यास चाल लावताना ते त्वरित तिथल्या तिथे स्वरांची सुंदर गुंफण करून विविध चालींचे पर्याय दिग्दर्शकासमोर निवडीकरता ठेवत अशा त्यांच्या निसर्गदत्त प्रतिभाशक्तीची माहिती यातून मिळते. दोन भिन्न रागांचे मिश्रण करून त्यांनी तिलक केदार, मंगल तोडी, देवी कल्याण, शिवकल्याण, बिल्वबिभास, जौनकली असे जोडराग निर्माण केले. पूर्वी पारंपरिक बंदिशींवरून संगीतकार नाट्यगीत किंवा चित्रपट गीत तयार करत; परंतु मास्तरांनी मात्र स्वतःच्याच नाट्य/चित्रपट गीतांच्या चालींवरून दर्जेदार बंदिशी बांधल्या. या स्मरणिकेमध्ये पु. ल. देशपांडे यांचे ध्वनिमुद्रित केलेले जाहीर भाषण लेखी स्वरूपात समाविष्ट केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘नवताम् उपैति’ हे प्रतिभेचे लक्षण आहे आणि हे मास्तरांच्या गाण्यांमध्ये सतत अनुभवास येते. याचं कारण प्रतिभेचे जे अलौकिक देणं आहे ते मास्तरांना मिळालं आहे. शाळकरी ते माळकरी या सर्वांना पचनी पडेल, आवडेल; पण तरीही सोपे करताना त्यातला अभिजातपणा, शास्त्रीय मांडणी हरवणार नाही याची जाण आपल्या रचनांमध्ये ठेवणारे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर होते.

‘बहुआयामी कलावंत’ मास्तरांनी शास्त्रीय गायक, संगीतकार, गायक नट व गुरू अशा भूमिकांमधून गुरुवर्य भास्करबुवा बखले यांची सांगीतिक परंपरा समर्थपणे पुढे चालवली. मास्तरांच्या अखंड भारतभर तीन हजारांपेक्षा अधिक मैफिली ठिकठिकाणी झाल्या. रंगसंगीत नायक असलेल्या मास्तरांची संगीत मैफल हमखास रंगणारी असायची, म्हणून त्यांना ‘मैफिलीचे बादशाह’ म्हटले जाई. त्यांनी असंख्य शास्त्रीय व उपशास्त्रीय पदे भैरवी रागात स्वरबद्ध केल्याने त्यांना ‘भैरवी के बादशहा’ असेदेखील प्रेमादराने म्हटले जात असे. दिलदार, प्रेमळ, कट्टर देशभक्त, आध्यात्मिक, धार्मिक, आनंदी, मिश्कील, बोलके, निर्व्यसनी, कर्तव्यदक्ष, प्रतिभाशाली असे बहुगुणी कलावंत संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीपूर्ती समारंभामध्ये बिल्वबिभास प्रकाशनातर्फे ही स्मरणिका प्रसिद्ध करून स्मरणिकेच्या संपादक व प्रकाशक असलेल्या प्रिया फुलंब्रीकर यांनी आपले आजोबा मास्तर कृष्णराव यांना हृद्य स्मरणांजली वाहिली आहे. संदर्भ साहित्य म्हणून अभ्यासकांना महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व रसिकांसाठी संग्राह्य असणाऱ्या या दर्जेदार स्मरणिकेमुळे मराठी भाषेतील संगीतविषयक साहित्य विश्वात मौलिक भर पडली आहे.

‘वंदे मातरम्’साठी सांगीतिक लढाn मास्तर कृष्णराव यांच्या जीवनातील एक तेजस्वी पर्व म्हणजे त्यांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत व निर्भीडपणे दिलेला सांगीतिक लढा! मास्तरांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी सांगीतिक संघर्ष केला, त्याबद्दल मिलिंद सबनीस यांनी त्याविषयी संशोधन करून लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की १९३५च्या सुमारास मास्तरांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ला चाल दिली आणि त्या गीताचे प्रभात फिल्म कंपनीच्या स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण केले. पुढे त्यांनी मिश्र झिंझोटी या रागात सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष समूहाला सांघिकरीत्या सहजपणे म्हणता येईल अशा पद्धतीने त्या गीताची स्वररचना केली. n झिंझोटी या रागाला मास्तर ‘राष्ट्रीय राग’ असे म्हणत. पुढे त्यांनी या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली. ही रचना लोकप्रिय झाली. मास्तरांनी १९४७ ते १९५० या काळात दिल्लीला संसदेत घटना समितीच्या सदस्यांसमोर वंदे मातरम् हे देशाचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून प्रात्यक्षिके दिली. शेवटी अंतिम निर्णय घटना समितीचा असेल असं म्हणणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान पं.नेहरूंनी मतदान आपल्या विरोधी असेल याचा अंदाज आल्याने याविषयी मतदान आणि चर्चा होऊच दिली नाही. अखेर जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत आणि वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत घोषित करून राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी सरकारतर्फे तसे एकतर्फी जाहीर केले. n आज मास्तरांच्या या तेजस्वी सांगीतिक लढ्याला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. वंदे मातरम् या गीताची एकूण सुमारे ८० संगीत रचनांमधील २३० पेक्षा अधिक ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत. हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. त्यातील मास्तरांची झिंझोटी रागातील रचना विशेष लक्षात राहणारी आहे, हे मात्र नक्की! पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘वंदे मातरम्’साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून त्यांनाच ‘वंदे मास्तरम्’ म्हणावेसे वाटते.’  

‘बुद्ध वंदनेचे संगीत कार्य’ : मास्तरांनी वंदे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी संसदेत घटना समिती सदस्यांसमोर केलेले अथक प्रयत्न पाहून १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मास्तरांना बुद्धवंदना संगीतबद्ध करण्याची विनंती केली. ती विनंती मास्तरांनी विनम्रपणे स्वीकारली. बुद्धवंदना संगीतबद्ध करण्याचा हा भारतातील सर्वांत पहिला प्रयोग होता. त्यासाठी मास्तरांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला व बुद्धवंदनेतील मंत्रांचा अर्थ आधी समजून घेतला. त्यावेळी वीणा चिटको या त्यांच्या कन्या त्यांच्या बरोबर होत्या. त्यांनी या बुद्धवंदनेच्या कोरसमध्ये गायनदेखील केले. श्रीमती चिटको यांच्या ‘आंबेडकर येती घरा’ या दैनिक ‘लोकमत’मधून स्मरणिकेत पुनर्प्रकाशित केलेल्या लेखामधून ह्या महान कार्याची वाचकांना माहिती मिळते. १९५६ साली मास्तरांनी स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध केलेल्या या बुद्धवंदनेची डॉ.बाबासाहेबांनी ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला नागपूरमधील दीक्षाभूमी येथे संपन्न झालेल्या धर्मांतरण सोहळ्यात वाजवली.

टॅग्स :musicसंगीत