शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

उईगर मुस्लिमांचे चिनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:29 IST

चीनच्या पश्चिमकडील शिंनजिआंग प्रांतातील मुस्लिम उइगर लोकांचे जबरदस्तीने चीनीकरण करीत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मोठी शिबिरे तयार केली असून, त्या नाझी आणि सोविएत छळ छावण्यांच्या कटू आठवणींनी ताजा करीत आहेत. या छावण्यात जवळपास २० लाख लोकांना चीन सरकारने डांबून ठेवल्याचा आरोप परदेशी माध्यमांनी लावला आहे.

असिफ कुरणे

चीनच्या पश्चिमकडील शिंनजिआंग प्रांतातील मुस्लिम उइगर लोकांचे जबरदस्तीने चीनीकरण करीत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मोठी शिबिरे तयार केली असून, त्या नाझी आणि सोविएत छळ छावण्यांच्या कटू आठवणींनी ताजा करीत आहेत. या छावण्यात जवळपास २० लाख लोकांना चीन सरकारने डांबून ठेवल्याचा आरोप परदेशी माध्यमांनी लावला आहे. काही वर्षांपासून सुरू असलेल्या या दडपशाहीविरोधात आंतरराष्ट्रीय माध्यमात सध्या चर्चेचा जोर वाढला आहे. या छावण्यावर संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क परिषदेने तीव्र टीका केली आहे. चीनने हे सर्व आरोप राजकीय द्वेषातून केले जात असल्याचे सांगत फेटाळले आहेत.चीनच्या शिंनजिआंग हा प्रांताच्या सीमा कझाकिस्तान, किरगिझीस्थान, अफगाणिस्तान, भारत , पाकिस्तान या देशाशी संलग्न असून, येथे १ कोटीपेक्षा जास्त उईगर मुस्लिम राहतात. तुर्कीकवंशाशी संबंधित असणाऱ्या या समाजातील लोक उझबेक भाषा बोलतात. त्याचबरोबर या भागात इतरही काही अल्पसंख्याक समाज वास्तव्यास आहेत. यात सुन्नी उईगरांची संख्या जास्त आहे. १९४९ पूर्वी हा प्रांत तुर्कस्तानचा भाग होता; पण चीनच्या सरकारने नंतर या प्रांतावर ताबा मिळविला. १९९० मध्ये सोविएत रशियाच्या विघटनानंतर येथील जनतेने स्वातंत्र्यासाठी लढा दिला; पण चीन सरकारच्या कठोर भूमिकेमुळे लढा चिरडून टाकण्यात आला. येथे मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक स्रोतांचे साठे आहेत. ते पाहत चीन सरकारने येथे बहुसंख्य हान समुदायाची लोकसंख्या वाढविली असून, लष्करही तैनात केले.

हान लोकांना उच्च पदावर बसवून उईगर लोकांना दुय्यम दर्जा देत त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न चीन सरकार करीत असल्याचा उईगर संघटनांचा आरोप आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर देशातील इस्लामचे चिनीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. यासाठी त्यांनी एक कायदा मंजूर केला असून, त्याच्या मदतीने येत्या पाच वर्षांत इस्लामला चिनी रंगरूप दिले जाईल. कम्युनिस्ट पक्षाच्या सिद्धांतानुसार चालेल, असा इस्लाम चीनला हवा आहे. शिनजिंयाग प्रांताची राजधानी उरुमची येथे २००८ मध्ये झालेल्या हिंसाचारात २०० लोक ठार झाले होते. त्यात बहुसंख्य हान यांची संख्या जास्त होती, तर २०१३ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात २७ उईगर आंदोलक ठार झाले होते. वाढत्या हिंसाचारानंतर चीन सरकारने मुस्लिम नागरिकांवर विविध बंधने आणणे सुरू केले. दाढी वाढविण्यावर बंदी, सार्वजनिक स्थळी, बाजार, प्रवासात महिलांना बुरखा वापरणे, रमजानमध्ये रोजा करण्यास बंदी, आदी धार्मिक गोष्टींवर अंकुश आणत विविध बंधने आणली. त्याचप्रमाणे जिनपिंग यांच्या आदेशानंतर प्रांतातील अनेक धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. खाणे-पिणे, सांस्कृतिक गोष्टींवर प्रतिबंध लादण्यात आले आहेत.

नजरबंद शिबिरे ‘गुलाग’शिनजियांग प्रांतात चीन सरकारने दहशतवादाविरोधी लढ्याच्या नावाखाली उईगर समाजाला चिनी हान संस्कृतीमध्ये बदलण्यासाठी मोठमोठी शिबिरे तयार केली आहेत. दबानचेंग, तुरपान सारख्या मोठ्या शिबिरासह प्रांतातील गावागावांत १२०० शिबिरे सुरू असल्याचे रॉयटरने म्हटले आहे. यांना चिनी सरकार पुनर्शिक्षण केंद्रे किंवा व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र म्हणते; पण या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा, प्रचार, सरकार, राष्ट्राध्यक्षांच्या समर्थनात एकनिष्ठता शिकविली जाते. तसेच उईगर लोकांना चिनी संस्कृती, भाषा स्वीकारण्यास भाग पाडले जाते. जबरदस्तीने दारू पाजणे, डुकरांचे मांस खाऊ घालणे असे प्रकार केले जात असल्याचा दावा येथून पळून आलेल्या लोकांनी केला आहे. तसेच जबरदस्ती धर्म परिर्वतन करण्यास भाग पाडले जात आहे.

२०१५ मध्ये या शिबिरातून बाहेर आलेल्या अल्बेट तोहती या व्यक्तीने तेथील परिस्थितीचे वर्णन परदेशी माध्यमांसमोर मांडले. विचारधारा बदलण्याच्या नावाखाली उईगर लोकांना जबरदस्तीने मॅडरिन भाषा शिकविली जाते. तसेच कम्युनिस्ट प्रचार गीते, कायदे पाठ करण्यास भाग पाडले जाते. याला विरोध करणाºयांवर अनन्वित अत्याचार केले जात असल्याचे तोहतीने सांगितले. या शिबिरांपर्यंत परदेशी माध्यमांना जाण्यास मनाई आहे. याच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. या भागात येणाºया परदेशी पत्रकारांमागे स्थानिक पोलीस, लष्कराचा सतत पाठलाग केला जातो. या ठिकाणी १० हजारांहून अधिक निमलष्करी दले, पोलीस तैनात आहेत. शिबिराबाहेर प्रत्येक ५०० स्थानिक लोकांमागे एक पोलीस स्थापन करण्यात आले असून, प्रत्येकांच्या हालचालीवर नजर ठेवली जाते. प्रांतातील प्रमुख शहरात ६७ शिबिरांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले असून, त्यासाठी ४६ दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आले आहेत.

चेंग क्वांआगोचीनमध्ये एखाद्या गोष्टीचे चिनीकरण ही नवी गोष्ट नाही. माओ यांच्यापासून अशा प्रकारची दडपशाही चिनी नागरिकांनी अनुभवली आहे. जिनपिंग यांच्या कारकिर्दीपासून तिबेट, शिनजियांगमधील स्थानिक संस्कृतीत चिनी हस्तक्षेप जास्त वाढला आहे. या मुस्कटदाबीमागे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधील सदस्य असलेले चेंग क्वांआगो याचा हात मानला जातो. चीनमधील जातीय विविधता मोडून काढण्यात चेंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तिबेटचे प्रशासकीय प्रमुख असतानादेखील अशाप्रकारे सक्तीचा वापर करीत कायदा सुव्यवस्था ताब्यात ठेवली होती. २०१६ मध्ये चेंग यांची चिनी सरकारने शिनजियांग प्रांतात नेमणूक केली. त्यानंतर येथील दडपशाहीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यांना शोहरत झकीर या स्थानिक उईगर अधिकाºयाचीदेखील मोठी मदत मिळाली. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त चिंताउईगर मुस्लिमांच्या मुस्कटदाबीबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त टीका होत आहे. कोणत्याही देशाने चीनचा निषेध व्यक्त करण्याव्यतिरिक्त पुढे काही केलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार प्रमुख मिशेल ब्राचलेट यांनी शिनजियांग प्रांतात निरीक्षकांना जाऊ देण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीला चीन सरकारने तीव्र नापसंती व्यक्त करीत फेटाळून लावली आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये सध्या मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पाक नागरिकांच्या उईगर पत्नीदेखील अशा शिबिरात कैदेत आहेत. सप्टेंबर २०१८ अखेर पाकिस्तानी नागरिकांशी लग्न केलेल्या ५० उईगर महिला गुलाग कॅम्पमध्ये बंदी आहेत. पाकिस्तानी पती त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, चीन सरकारकडून त्याला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही.

सरकारच्या या दडपशाहीमुळे अनेक चिमुकल्यांना आपल्या आईशिवाय राहावे लागत आहे. चीनने तिबेटमधील बौद्ध धर्मांनंतर, उईगर संस्कृतीचे चिनीकरण आरंभले आहे. सध्या हे शिनजिंयागपर्यंत मर्यादित असले तरी ताओ, कॅथोलिक, प्रोटोस्टेंट धर्मांचेदेखील चीन चिनीकरण करण्याच्या तयारीत आहे. 

(लेखक कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये उपसंपादक आहेत.)