‘अनवॉण्टेड’!
By Admin | Updated: May 30, 2015 14:38 IST2015-05-30T14:38:04+5:302015-05-30T14:38:04+5:30
निवृत्तीनंतर वॉशिंग्टनमधून फ्लोरिडात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली. एके दिवशी सकाळी पाहिलं, दोन टीव्हींपैकी एक, म्युङिाक सिस्टीम, स्पीकर्स, कॅसेट रेकॉर्डर. अशा अनेक गोष्टी मुलाने गाडीत भरल्या होत्या. आश्चर्यानं मी त्याला विचारलं, तर तो म्हणाला, 'Dad, you don't need these things any more! सामानानं भरलेली गाडी घेऊन पाच मिनिटांतच तो निघूनही गेला.

‘अनवॉण्टेड’!
>
मोह ठेवा बाजूला, निकडीचं तेवढं बाळगा. - अमेरिकेतलं ‘डाऊनसायङिांग’!
- दिलीप वि. चित्रे
रोजच्याप्रमाणो सकाळीच मी आणि शोभा चालायला बाहेर पडलो. म्हटलं, आज नेहमीच्या रस्त्यानं न जाता जरा उलटय़ा बाजूनं जाऊ या. तर रॉबर्टच्या घरापुढं भली मोठी ट्रक ड्राइव्हवेमध्ये उभी; आणि मार्थाच्या सूचनांबरहुकूम माणसं त्यांच्या घरातलं सामान आणून आणून, नीट ट्रकमध्ये भरताहेत. बरं, ट्रकसुद्धा कसली, तर एका चॅरिटी ऑर्गनायङोशनच्या चर्चची. म्हटलं, काय हे सोडून कुठे चालले बिलले की काय!
''Hey Bobbie, what's going on? मी ओरडून विचारलं, तर त्यानं खांदे उडवून मार्थाकडे हात दाखवला.
मी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, ‘डोण्ट वरी, धिस इज ओन्ली डाउन सायङिांग!’
‘डझ दॅट मीन यू आर मूव्हिंग इन अ स्मॉलर हाऊस?’
‘नॉट यट !’’ ती उत्तरली.
मला वाटलं मग हा खटाटोप कशासाटी? राहिलं घरात सामान तर बिघडलं कुठं? बरं, गराज सेल काढून सामान विकतायत, तर तसंही नाही. चक्क चॅरिटी? एवढं मोठं घर आहे, ते रिकामं नाही का वाटणार?
मी तसं मार्थाला बोलून दाखवलं. ती हसली. म्हणाली, ‘‘दीज आर ऑल अनवॉण्टेड थिंग्ज ऑफ नो यूज !’’
बापरे! अनवॉण्टेड थिंग्ज? इतक्या चांगल्या दिसणा:या वस्तू ‘अनवॉण्टेड’ असतात का?
मला बडोद्याच्या वाडय़ातलं आमचं जुनं दोन खोल्यांचं घर दिसायला लागलं. दहा बाय दहाच्या ‘मोठय़ा’ हॉलमधल्या भिंतीवर साईबाबा, दत्तगुरू, एकवीरा यांची सभा भरलेली. एकदा मी त्या तसबिरी काढून टाकून, भिंतीला छान प्लॅस्टर करून, रंगवून तिथे सुंदर पेण्टिंग्ज वगैरे काही तरी लावण्याची कल्पना आईला सांगितली, तरी ती केवढी तणतणली, म्हणाली, ‘होùù, जुनं झालंय नं सगळं! द्या टाकून. आम्हाला सुद्धा.’ मग दोन दिवस माङयाशी बोललीच नाही.
एक हार फक्त एका तसबिरीला घालून, अर्धा-पाव पेढय़ांच्या नैवेद्यावर दर गुरुवारी सगळ्या तसबिरींची आरती हे ठरलेलं असायचं. त्याच दोन खोल्यांच्या घरात मौंजी-लग्नकार्य, गणपती उत्सव, सततचे पाहुणो-सगळं काही आनंदात पार पडायचं. कधी कसली टंचाई वाटलीच नाही. शेजारच्यांच्या घरात जास्तीच्या पाहुण्यांना झोपायला नाही पाठवलं, तर त्यांना राग येईल याची भीती वाटायची. आणि इथं म्हणे, ''DOWN SIZING¬ !
वाटलं, मुळात ही DOWN SIZING¬ ची कल्पना डोक्यात येतेच कशी? असू द्या ना चार जास्तीच्या गोष्टी घरात राहिल्या तर ! आहे नं मोठी जागा, मग बिघडलं कुठे त्या घरात राहिल्या तर !
पुन्हा बडोदा, पुन्हां ते जुनं दोन खोल्यांच घर! खोलीच्या एका कोपल्यात वडिलांनी टांगून ठेवलेलं ‘‘तारकेट’! केवढी महत्त्वाची वस्तू. महत्त्वाची पत्रं, कुंकुम-पत्रिका-त्यावर आहेर किती दिला हे लिहून-अडकवून ठेवलेल्या. ठेवा, ठेवा! पण इथं कशाला? पण हे मी विचारायचं नाही, कारण त्याचं उत्तर एकच. ‘स्वत: शिकून मोठे झालेत ना, आता आम्हाला शिकवा!’ मग मी गप्पच.
त्याच दहा-बाय दहाच्या हॉलमध्ये माझं कॉलेजचं-आर्किटेक्चरचं शिक्षण झालं. त्याच छोटय़ाशा जागेत मोठा स्टॅण्ड व त्यावर ड्राईंग बोर्ड ठेवून माझी सबमिशनची ्रइॉईंग्ज, बाजूलाच सगळे झोपले असले तरी, रात्रभर जागून व्हायची. कधी कधी, सातवीर्पयत शिकलेली आई आणि नॉन-मॅट्रिक पास झालेले वडील कौतुकानं पहात बसायचे. पण तेव्हा काही कमी आहे असं वाटलंच नाही. कारण, यापेक्षा काही जास्त असू शकतं, याचीही कुठे कल्पना होती?
आणि आज इथे, पाच वर्षापासून अकरा वर्षार्पयतच्या चार नातवांना स्वतंत्र रूम हवीय. शिवाय, वेगळी प्ले-रूम! म्युङिाक रूम, घराबाहेर बास्केटबॉल, सॉकर, मग बरोबर खेळायला आजोबा हवेतच. पण पुन्हा,Ajoba, you are 100 years old, You can not run, हे वर मलाच ऐकवणार!
भरपूर मोकळी जागा, मोठमोठी घरं बांधून ठेवलेली. मुलांना खेळायला मागे-पुढे भरपूर जागा, बाग-बगीचा. तिथल्यासारखी पाहुण्यांची वर्दळ अमेरिकन कुटुंबात नाही. मुळात आर्थिक सुस्थिती, मग असेना का मोठी घरं. पण काळाबरोबर जाणिवा बदलतात हेच खरं, एकदा गोरजवेळ सुरू झाली की, सगळंच नकोसं वाटायला लागतं. हातापायातली शक्ती ओसरत चालली की आपोआपच 'Down Sizingचे विचार सतावायला लागतात. त्यातून पुन्हा, मुलं मोठी होऊन, शिकून सवरून बाहेर पडली, आपापल्या विश्वात-संसारात रमली, घरटय़ातून उडालेल्या पिलाप्रमाणो त्यांचे पंख बळकट झाले की, आई-बाप 'Empty Nesters बनतात.
पण Down Sizing साठी सर्वात महत्त्वाचा- लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे मोह टाळणो. घरात आपण नजर टाकली आणि विचार केला तर लक्षात येतं, की या सगळ्या गोष्टी आपण का जमवल्या? त्यांचा उपयोग काय? यातल्या किती आपण वापरतो? पण त्या टाकायला किंवा दुस:याला देऊन टाकायला मन धजावत नाही. माझा एक मित्र म्हणतो, ‘‘त्या वस्तू कधी आपल्या नव्हत्याच, फक्त काही काळापुरत्या आपल्याला वापरायला मिळाल्या होत्या असं समजायचं आणि देऊन टाकायच्या दुस:याला.’’
मला हे पटलं.
मागे एकदा खूप वर्षानी एका मित्रकडे गेलो, तर त्याच्या घरातलं सामान पाहून हबकूनच गेलो. घरात हालचाल करायलाच जागा नाही. त्या मित्रला आता निवृत्त होऊनही 6-7 र्वष झालेली. पण वस्तूंची नुसती गर्दी. केवढं फर्निचर, केवढी अवाढव्य डायनिंग टेबल्स आणि बेड्स बापरे! आता या वयात हा मोह म्हणायचा की काय म्हणायचं?
मी त्याला भरपूर सुनावलं.
तर तो म्हणतो, ‘हा सगळा बायकोचा उत्साह! मी करू तरी काय?’ म्हटलं,’ करू तरी काय म्हणजे? दुसरी कर!’ मग आम्ही दोघेही हसलो. तो अगदी मनापासून हसल्यासारखा. पण या मित्र-भेटीचा एक फायदा असा झाला की, घरी आल्यावर मी प्रत्येक खोलीत हिंडलो व यातलं काय आपल्याला नक्की हवंय-किंवा नकोय- हा प्रश्न स्वत:ला विचारत सुटलो.
मी आणि शोभा-दोघांमध्ये कधी कधी, अरे हे तर आपल्याला लागणारच! तर कधी हे आता आपल्याला मुळीच नकोच या विचारांवर एक मत व्हायचं, तर कधी नाही. निवृत्तीनंतर वॉशिंग्टनच्या थंड प्रदेशातून फ्लोरिडा राज्यात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली. जॉर्जिया राज्यातून रोहित हा आमचा मोठा मुलगा व प्रिया ही सून मदतीला आले.
सकाळी उठून खाली आलो तोवर दोन टीव्हींपैकी एक, म्युङिाक सिस्टीम, स्पीकर्स व कॅसेट रेकॉर्डर आणि अशा अनेक गोष्टी रोहितनं गाडीत भरल्या होत्या.
आश्चर्यानं मी विचारलं,
"What is going on?"
तर तो म्हणाला, Dad, you don't need these things any more! I am going to give them away to a charity Organisation!"
पाच मिनिटांतच सामानानं भरलेली गाडी घेऊन तो निघूनही गेला, आणि मी बघतच राहिलो. एक मात्र खरं, की त्या सामानामुळं माझं नंतर काहीच अडलं नाही. मग ते घरात होतं तरी कशासाठी कोण जाणो!