'ट्रॅश पीपल'
By Admin | Updated: November 5, 2016 16:11 IST2016-11-05T16:11:38+5:302016-11-05T16:11:38+5:30
शेजारच्या देशातून कचरा आयात करणाऱ्या जर्मनीची रहस्यं शोधताना

'ट्रॅश पीपल'
>राजू नायक
अख्खं जग दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याच्या डोंगरांचं काय करावं, या न सुटणाऱ्या प्रश्नाने हतबल आहे. - पण जर्मनीची कहाणी मात्र वेगळीच! या देशाने आपल्याकडल्या कचऱ्याचं प्रमाण इतकं कमी केलं, की त्यासाठी निर्मिलेले ‘कचरा व्यवस्थापन प्रकल्प’ चालवण्यासाठी या देशाला आता शेजारच्या देशांकडून कचरा आयात करावा लागतो आहे. - भारतासारख्या देशांसाठी पथदर्शक ठरू शकणाऱ्या या प्रयत्नांची कहाणी..
बर्लिनच्या चौकात ‘मांडलेली’ हा शुल्ट नावाच्या जर्मन चित्र-शिल्पकाराची जगभर गाजलेली ही ‘कलाकृती’- ‘ट्रॅश पीपल’! कचरा म्हणजे काहीतरी घाण, ओंगळ या परिचित जनभावनेमध्ये बदल व्हावा आणि नागरिकांनी कचऱ्याकडे ‘स्वच्छ नजरे’ने बघावे यासाठी जर्मनीत दीर्घकाळ प्रयत्न चालू आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्यांवर उत्तमोत्तम चित्रे रेखाटण्यापासून ‘ट्रॅश पिपल’ सारख्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित करण्यापर्यंतचे अनोखे प्रयोग या देशामध्ये सातत्याने होत असतात.