शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच
3
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
4
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
5
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
6
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

थ्री मराठी इडियट्स

By admin | Published: December 31, 2016 12:14 PM

सेव्हन कोर्स फ्रेंच डिनर वगैरे शब्द ऐकून कौतुक वाटतं, पण आपलं पारंपरिक पंगतीतलं मराठी जेवण या ‘कोर्स मील’पेक्षा काही वेगळं आहे का?

- परदेश

- गौतम पंगू, आशय जावडेकर, नीलज रुकडीकर

ख्रिसमसच्या सुटीतली गोष्ट. आम्ही सगळ्या मराठी मित्रांनी गेट टुगेदर करायचं ठरवलं. पहिला प्रश्न आला : खायला काय करायचं? एका मित्रानं पॉटलकची थीम सुचवली: प्रत्येकानं महाराष्ट्रातल्या आपल्या गावाची खासियत असणारा एक पदार्थ करून आणायचा. सगळे एकत्र जमलो. जेवायला सुरु वात करणार इतक्यात आमची एक मैत्रीण म्हणाली, ‘थांबा, आधी मला या सगळ्या पदार्थांचा फोटो फेसबुकवर टाकू द्या. सगळ्यांना कळायला नको का आपण किती मजा करतोय ते?’ आम्ही हसलो. पण तिचं बरोबर होतं! अन्न हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्याच महत्त्वाच्या क्षणांशी घट्ट निगडित असतं. खास करून आमच्यासारख्या परदेशस्थ मराठी लोकांच्या आयुष्यातलं आपल्या मराठी खाद्यपदार्थांचं महत्त्व अजूनच जास्त असतं. परदेशात थोडी पाळंमुळं रुजायला लागली की आम्ही जिथं असतो तिथं आपलं सोशल सर्कल तयार करण्याचे प्रयत्न करतो, आणि अस्सल मराठी पदार्थ करणे आणि एकत्र येऊन खाणे हा या प्रयत्नांचा एक अविभाज्य घटक असतो! पण दुर्दैवानं आमचे प्रयत्न आमच्या घरापुरते किंवा मराठी मित्रपरिवारापुरतेच मर्यादित राहतात. आम्ही जेव्हा बाहेर एखाद्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, तेव्हा मात्र अतिशय ठोकळेबाज आणि बहुतांशी सामान्य दर्जाचं जेवणच समोर येतं. एक तर मी राहतो त्या अमेरिकेतली बरीचशी इंडियन रेस्टॉरंट्स फक्त नॉर्थ किंवा साऊथ इंडियन पदार्थच मेन्यूमध्ये ठेवतात. त्यांच्या चवी पण ठरलेल्याच. नुसता भरपूर मसाला वापरला की झालं यांचं ‘स्पायसी इंडियन फूड’. मग तो पनीर टिक्का असो नाहीतर पनीर माखनी असो, कुणाला फरक पडतो? आम्हाला तर एक रेस्टॉरंट असं माहीत आहे जिथं फक्त दोन ग्रेव्हीज आहेत : पनीर आणि मिक्स्ड व्हेजी. पण गंमत म्हणजे आम्हाला जरी असं वाटलं तरी आमचे अमेरिकन मित्र अशा ठिकाणी जाऊन आनंदानं जेवतात. आमच्या एका (भारतीय) मित्राची (अमेरिकन) मॅनेजर त्याला सांगत होती, ‘मला आणि माझ्या नवऱ्याला इंडियन फूड खूप आवडतं. मी दर शुक्र वारी इंडियन टेक-आउट घेऊन जाते.’ ती टेक-आउटमध्ये काय कॉम्बिनेशन नेते तर इडली आणि चिकन करी! ती माझ्या मित्राला म्हणत होती, ‘तुझी मज्जा आहे! तू दररोज घरी तंदुरी चिकन, बिर्याणी वगैरे खात असशील ना!’ - आता तो त्या अमेरिकेन मॅनेजर विदुषीला काय समजावणार की भारतीय जेवणात किती विविधता आहे आणि परदेशात मिळणाऱ्या भारतीय जेवणामागची विचारसरणी किती संकुचित आहे ते! पण काहीवेळा वाटतं की स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनीच हे असे उसासे टाकण्यापेक्षा आपल्या खाण्याबद्दलचं ज्ञान आपणच या परभूमीतल्या अमराठी आणि अभारतीय लोकांना द्यायला नको का? गूगलवर ‘टर्किश बकलावा’ असे सर्च केले तर लाखो रेसिपीज सापडतील. पण तशा मोदकाच्या किती सापडतील? आता मला सांगा, छान तजेलदार दिसणारा, तुपानं माखलेला उकडीचा मोदक ही डेलिकसी नाहीये का? करायला तितकीच अवघड आणि चवीला तितकीच सुंदर!! पण बाहेरच्या लोकांना हे माहितीच नाही आहे, हा दोष आपला नाही तर कुणाचा?निव्वळ चवच नव्हे तर आपल्या भारतीय पदार्थांमध्ये पोषणाचाही विचार केलेला असतो. हळद, नारळ, धणे वगैरेंचे फायदे पाश्चात्त्य लोकांना अलीकडे अलीकडे कळले, पण आपण वर्षानुवर्षं हे पदार्थ स्वयंपाकात वापरतो. याशिवाय आपल्या खाण्यामध्ये एका विशिष्ट शिस्तीनं आणि क्र मानं खाणं यालाही महत्त्व आहे. सेव्हन कोर्स फ्रेंच डिनर वगैरे शब्द ऐकून कौतुक वाटतं, पण आपलं पारंपरिक पंगतीतलं जेवण कोर्स मीलपेक्षा काही वेगळं आहे का? पण हे ज्याला माहितीच नाही अशा माणसाला हातात रिकामी प्लेट देऊन इंडियन बफे खायला सांगितलं तर तो तरी काय करणार? तो इडलीवर चिकन करी घालूनच खाणार! नायगारा फॉल्सजवळच्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये तर चक्क वजनावर जेवण विकताना आम्ही पाहिलं होतं. म्हणजे एका बॉक्समध्ये हवे ते पदार्थ भरा आणि एक पौंडला पाच डॉलर या हिशेबानं पैसे मोजा. - आपल्याच खाद्यपरंपरेची केवढी ही उपेक्षा!फार कष्ट करून चवीढवीने केलेल्या व निगुतीने रांधलेल्या खाद्यपदार्थांना इंग्रजीत ‘कुझिन’ असा खासा शब्द आहे. त्याचे शब्दश: भाषांतर कठीण असले, तरी आपण आपली आजी-पणजी वापरत असे त्या शब्दाची आठवण काढून त्याला मराठीत ‘जिन्नस’ म्हणू! या आपल्या मराठी जिन्नसांना म्हणजे खास खाद्यपदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि ओळख प्राप्त करून द्यायची असेल तर सगळ्यात आधी आपण या जिन्नसांचं, त्यामागच्या समृद्ध वारशाचं ज्ञान मिळवलं पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे. ‘वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज’ हे जरी खरं असलं, तरी ग्लोबलायझेशनच्या मागे लागून आपल्या खाद्यपरंपरेची खरी अस्तित्वखूण गमावता कामा नये. ‘द मोस्ट पर्सनल इज आॅल्सो द मोस्ट युनिव्हर्सल’ हा मंत्र इथंही लागू होतो. आपण आपल्या मुळांशी जितकं प्रामाणिक राहू तितकं आपण मराठी खाद्यपरंपरेला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यात अधिकाधिक यशस्वी होऊ. आपले खास मराठी खाद्यपदार्थ हे अन्य बऱ्याच अन्नसंस्कृतींच्या तुलनेत काहीसे साधेसुधे किंवा रांगडे आहेत. पण तेच त्यांचं शक्तिस्थानही आहे. आपले पदार्थ अतिमसालेदार किंवा अतिगोड नसतात, पण रेसिपीत वापरल्या गेलेल्या सर्व घटकांच्या चवी त्यांच्यात भिनलेल्या असतात.वर उल्लेख केलेला उकडीचा मोदकच घ्या: त्यातला मुख्य घटक फक्त बाहेरची तांदळाच्या उकडीची पारी, पण ती बनवणं हे सोपं काम नाही. जर आपण या रेसिपीजचा, त्यांमध्ये वापरल्या गेलेल्या घटकांचा आदर केला, तर त्या पदार्थाची चव सुंदर होईल आणि खाणाऱ्याच्या समाधानात भर पडेल.एखादा मराठमोळा पदार्थ एखाद्या अमराठी माणसाला खायला देताना त्याचं प्रेझेंटेशनही असं करावं की त्यातून त्या माणसाला हा पदार्थ कसा केला आहे, कसा खायचा, बरोबर काय खायचं हे समजेल. यामुळं ते नुसतंच ‘खाणं’ न राहता एक ‘एज्युकेटेड इटिंग एक्स्पीरियन्स’ बनेल. आपण जे खातो, जसं खातो त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होतो. आणि म्हणूनच वेदांमध्ये जेवणाला यज्ञकर्माची-एका पवित्र कार्याची उपमा दिली आहे. कल्पना करा- परदेशातलं एक रेस्टॉरंट, बाहेर ‘मराठी फाइन डायनिंग’ अशी दिमाखदार पाटी आहे. आतला ‘अँबियन्स’ अतिशय प्रसन्न आणि सात्त्विक आहे. आपले मराठमोळे पदार्थ- उदाहरणार्थ वरणभात, मसालेभात, पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी, मोदक- अगदी देखणं ‘कॉण्टिनेण्टल प्रेझेंटेशन’ लेवून वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपल्या समोर येतायत, आणि जगभरातले अमराठी आणि अभारतीय लोक आपल्या मराठी जेवणाचा आनंदानं आणि समजून उमजून आस्वाद घेतायत. - हे काहीतरी भारी आहे, असं वाटतंय?तर मग आम्ही तिघांनी मिळून घाट घातलेल्या एका मैफलीविषयी तुम्हाला उत्कंठा नक्की वाटेल.आमच्या ‘नॉट जस्ट एंटरटेनमेंट’ या कंपनीच्या शँक्स (रँंल्ल‘ह्ण२) या आगामी चित्रपटात (पडद्यावर का असेना) हे मराठी स्वप्न साकार झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. रँंल्ल‘ह्ण२ ही शशांक जोशी या मराठी शेफची आणि त्याच्या रँंल्ल‘ह्ण२ या अमेरिकेतल्या मराठी फाइन डायनिंग रेस्टॉरंटची कथा (फिक्शनल डॉक्युमेंटरी) आहे. वाफाळत्या गरमागरम मऊसूत पुरणपोळीच्या घडीवर विरघळणारा साजूक तुपाचा गोळा... घडीच्या पोळीशेजारी पसरलेली नाजूक कोंबाच्या मटकीच्या उसळीची नक्षी... आणि पिवळंधम्मक साधं वरण ओघळत्या शुभ्रपांढऱ्या भाताच्या मुदीशेजारी ठेवलेली लिंबाची फोड...एरवी इटालियन आणि फ्रेंच चवीचे नखरे ल्यालेल्या जगभरातल्या खवय्यांना वेड लावणारी आणि मराठी फूड ग्लोबल प्लॅटफॉर्मवर गेलं आहे असं स्वप्न (फिल्ममधून का असेना) पाहणारी ही असली ‘कॉण्टिनेण्टल’ अदाकारी पेश करणाऱ्या या वेड्या शशांकविषयी पुढच्या रविवारी...

 

तिघेही गेली काही वर्षे शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहेत.

गौतम आणि आशय हे दोघे केमिकल इंजिनीअरिंगमधले पीएचडीधारक तर निलज आयटी अभियंता आहे. तिघेही गेली काही वर्षे शिक्नोषण व नोकरी निमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहेत. notjustent@gmail.com