शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परीक्ष

By admin | Updated: June 13, 2015 13:37 IST

एकदोन झूम, वाईड अशा चारपाच चांगल्या लेन्सेस, स्वतंत्र फ्लॅश, ट्रायपॉड, आठ जीबीची दोनेक मेमरी कार्ड असलेला प्रोफेशनल स्टिल फोटोग्राफीसाठी निकॉन डी 7100 वगैरे कॅमेरा आता चांगल्या बॅगांसहीत टकाटक पॅकिंगमध्ये साठसत्तर हजारार्पयत पडतो.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
एकदोन झूम, वाईड अशा चारपाच चांगल्या लेन्सेस, स्वतंत्र फ्लॅश, ट्रायपॉड, आठ जीबीची दोनेक मेमरी कार्ड असलेला प्रोफेशनल स्टिल फोटोग्राफीसाठी निकॉन डी 7100 वगैरे कॅमेरा आता चांगल्या बॅगांसहीत टकाटक पॅकिंगमध्ये साठसत्तर हजारार्पयत पडतो.
आर्ट स्कूलमध्ये शेवटच्या वर्षात विशेष अभ्यास म्हणून दोन विषयांची विशेष परीक्षा द्यायला लागायची. दिलेल्या विषयांपैकी कोणतेही दोन विषय निवडून, वर्षभर त्यांचा विशेष अभ्यास करून वार्षिक परीक्षा द्यायची.
इल्स्ट्रेशनबद्दल दुमत नव्हतं, कारण आवडीचा विषय. (आजतागायत ही आवड बदलली तर नाहीच, पण पुढेपुढे आवडीचं रूपांतर प्रेमात आणि पुढेपुढे तर आसक्तीत झालं!)
राहिला प्रश्न दुस:या विषयाचा. निवडीसाठी दिलेल्या आणखी काही विषयांपैकी त्यातल्या त्यात टायपोग्राफी आणि फोटोग्राफी हे विषय बरे वाटत होते.
टायपोग्राफी फार आवडत होती; पण इतरांनी करून झाल्यावर! स्वत: करणं म्हणजे फारसा झगझग. टायपोग्राफी आणि कॅफिग्राफी ह्यांच्याशी दोन्ही गोष्टीत फरक आहे. कॅलिग्राफी मुक्तपणो तरी करता येत होती. गुंडाळगुंडाळी करून वेळ मारून नेता येते. असे. ‘कॅलिग्राफिक एक्सप्रेशन’च्या नावाखाली फराटे खपून जात.
टायपोग्राफीचं तसं नव्हतं. खरोखर अभ्यास करावा लागत असेर, रोमन, गोथिक, विथ-विदाऊट सेरीफ, फार क्लिष्ट प्रकार होते. लेटरिंग फ्री न करता कागदावर पट्टी, टी स्क्वेअर, सेंटर स्क्वेअरनं आखून, रोटरिंग नावाच्या अत्यंत मृत आणि एका ठराविक जाडीची रेघ उमटवणा:या पेननं रेघा आणि चौकटय़ा आणि आऊटलाईन आखून घेऊन त्यात आतमध्ये ब्रशनं काळी शाई भरून टायपातलं एक एक अक्षर काढावं लागायचं. हा सगळा उपदव्याप करता करता मला तरी वैताग यायचा.
टायपाचं सौंदर्य समजून घेण्यासाठी भले ती सगळी झगझग करणं आवश्यक असेलही, पण मेला त्या आधीची तीन वर्ष मी ते शिकून थकलो होतो, आणि मला त्या टोरमेहनतीचा कंटाळा आला होता.
स्पेशल सबजेक्ट म्हणून त्या विषयाचा विचार मी बाजूला सारला आणि वळलो: फोटोग्राफीकडे!
फोटोग्राफीसाठी कॅमेरा अत्यावश्यक जरी असला तरी तो प्रत्येकाचा स्वत:चा असावा, असं काही बंधन नव्हतं. सुरूवातीला कुणाचातरी तात्पुरता वापरायचा, वर्षभरात पैसे साठवून सेकंड टर्मनंतर तरी नक्की विकत घ्यायचा आणि मुंबईला परिक्षेला मोठय़ा ऐटीत खांद्यावर टाकून न्यायचा, असं ठरलं.
फोटोग्राफी शिकवायला जोशी सर! स्टाफमध्ये नव्हते, पण व्हिजिटींग लेक्चरर म्हणून येत असत.
भला माणूस, मृदू स्वभावाच्या जोशी सरांचं फोटोग्राफीवर फार प्रेम. वर्गात शिकवायला सुरूवात करताना पहिलं वाक्य असायचं, ‘‘मुलांनो, आपण कितीही बावळट दिसलो तरी पण  चालेल, पण कॅमे:याचा पट्टा आधी गळ्यात घालायचा!’’
(हे जोरी सर नुकतेच गेले)
स्वत:चा कॅमेरा असणारे वर्गात जेमतेम दोघंतिघचं. बाकीचे सगळे उधारी उसनवारीवाले. माङया सख्या मित्रचा सख्खा भाऊ आमच्या कॉलेजात प्रोफेसर होतो, तेव्हा आम्हा दोघांची मदार त्यांच्या कॅमे:यावर! तात्पुरता तरी प्रश्न सुटला होता. कॉलेजमध्ये मुलांसाठी कॅमेरे नव्हते का? होते. ‘होते’ म्हणण्यापेक्षा, ‘होता’ म्हणणं जास्त बरोबर ठरेल. कारण कॅमेरा होता एकच! होय. पाचपन्नासाच्या संख्येत असलेल्या सगळ्या विद्यार्थीगणांसाठी संपूर्ण कॉलेजमध्ये एकच कॅमेरा होता.
तो देखील कपाटात, कुलुपात बंदिस्त! कपाटाची चावी असायची आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट असलेल्या सरांकडे. आठवडय़ात पंधरा दिवसातनं हे सर अचानकच वर्गात यायचे, काही शिक्षक विद्याथ्र्यामध्ये फार अनपॉप्युलर असतात, त्यातले हे महामहोपाध्याय होते. मोठय़ा पोटावरून तरंगणारा पांढरा आऊटशर्ट, अतिशय जाड भिंगाच्या चष्म्यातून बाहेर येणारे मोठे डोळे, आणि डोईवरच्या टकलामुळे अधिकच मोठं भासणारं आधीच मोठं असलेलं कपाळ, लांब, पुढे किंचित वर उचलला गेलेला नाकाचा शेंडा असलेलं तरतरीत नाक. चष्मा, डोळे, नाक, डोकं आणि कपाळ ह्यांवर पडलेल्या हायलाईटसह अत्यंत त्रसिक मुद्रा लाभलेल्या ह्या सरांच्या एंट्रीलाच वर्गात कफ्यरू लागल्यासारखं वातावरण होत असे. कपाटाच्या चाव्यांचा जुडगा तजर्नीनं फिरवत फिरवत सर एन्ट्री टाकत आणि वर्गात ठेवलेल्या त्यांच्या त्या लाडक्या कपाटापाशी डुलतडुलत जात. जाता जाता आपल्या वटारल्यासारख्या डोळ्यांनी वर्गाकडे एक नजर टाकत.
फोटोग्राफी घेतलेल्यांना कपाटापाशी बोलावून कपाटापासून तीन फुट अंतरावर उभं राहायला सांगून सर स्वत: जणू काही एखादा खजिना उघडावा, तसं त्या कपाटाचं कुलूप उघडत.
कारण, कपाटात असायचा कॅमेरा!
आम्ही इकडे डोळ्यात प्राण आणून कपाटातला कॅमेरा बघण्यासाठी कोंडाळं करून उभे. सरांचं ते कपाट म्हणजे खरोखर अगम्य वस्तूंचा खजिनाच होता. सर्वाच्या ऑफिशियल आणि खासगी वस्तूंचं म्युङिायमच म्हणा नं! निरनिराळ्या फायलींपासूनच सरांचे बाह्य आणि अंतर्वस्त्रचे बोळे, रोमन शिल्पाकृतीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिकृती, कोल्हापुरी चपलांचे जोड, कॅनव्हासचे बूट अशा विसंवादी असंख्य वस्तूंमधून ठळक दिसायचा तो त्यातल्या त्यात स्पेशल जागी काळजीपूर्वक ठेवलेला तो कॅ मे रा!!
सर म्हणायचे,
‘‘हा कॅमेरा. नीट बघून घ्या.’’
कॅमेरा हाताळायच्या दृष्टीनं आमची चुळबुळ सुरू. कधी एकदा हात लावतोय कॅमे:याला आणि जोशी सरांची ती पट्टा गळ्यात घालण्याची सूचना अंमलात आणतोय, असं होऊन जायचं अगदी!
‘‘नो, नो!’’
‘‘मागे व्हा, मागे व्हा!’’
सगळा लोंढा एक पाऊल मागे सरकला, की सरांच्या चेह:यावर किंचितसं हसू उमटायचं. कुठल्यातरी छोटय़ाशा अपघातात सरांच्या उजव्या हाताच्या एका बोटाला काहीशी दुखापत झालेली होती, त्यामुळे त्यांचं ते बोट किंचित वाकडं झालेलं होतं. मुलांना गप्प करण्याचा इशारा ते त्याच बोटानं करत. तसा इशारा करून सर म्हणत, ‘‘इटस् प्रीशियस. लांबूनच बघा सध्या तरी. नंतर मिळणारच आहे हॅण्डल करायला आणि तोर्पयत तुमचे तुमचे येतीलच स्वत:चे. पेरेंट्स्ना सांगा कॅमेरा घेऊन द्यायला. ‘‘कॅमेरा इज ए मस्ट थिंग!’’
-‘इज’मधल्या ‘ज’चा उच्चार झाला की कपाटरूपी संग्रहालयाचे दरवाजे पुढच्या अमर्यादित कालावधीर्पयत बंद होत.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)