शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मुलांचा लढा आणि धडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

हवामानबदल रोखा, पृथ्वी वाचवा. हे जागतिक नेत्यांना ठणकावून सांगण्यासाठी  परवा 7 खंडांच्या 163 देशांतील 5000 ठिकाणी  50 लाखांहून अधिक मुलं रस्त्यावर उतरली.  जागतिक बंद घडवून आणताना सार्‍यांनाच त्यांनी घाम फोडला.  त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात  16 वर्षांची ग्रेटा जागतिक नेत्यांना जाब विचारत होती, भावी पिढय़ांची स्वप्नं चुरगाळण्याची तुमची हिंमतच कशी झाली? तुम्ही काय करणार आहात, याचा सोक्षमोक्ष आत्ता, इथेच आणि ताबडतोब लावा.

ठळक मुद्देजगातील मुलांमुळेच पर्यावरण कृतिवादाचे (अँक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे.

- अतुल देऊळगावकर 

संपूर्ण जगातील मुले, ‘हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण’ ही कवी ‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची कविकल्पना साक्षात उतरवण्याची किमया करीत आहेत. ‘आमच्या विश्वाच्या अंगणाला तुम्ही बिघडवलेले आहे. ते तत्काळ सुधारा’ हे ठणकावून सांगण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी 7 खंडांतील, 163 देशांत, 5000 ठिकाणी सुमारे 50 लाखांहून अधिक मुलांनी जागतिक बंद करून दाखवला. विलक्षण, अद्भुत, अभूतपूर्व अशा कुठल्याही विशेषणात न सामावणारी ही जागतिक निदर्शने अतिशय शांततेत पार पडल्यामुळे संपूर्ण जग थक्क झाले आहे.न्यू यॉर्कच्या मॅनहटन (आर्थिक, सांस्कृतिक, माध्यम व मनोरंजन या क्षेत्नांची जागतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या) भागात 4 लाख लोकांचे वादळ उठले होते. हातात कर्णा घेऊन 16 वर्षांची ग्रेटा बोलू लागली आणि क्षणार्धात शांतता पसरली. ‘आपल्या घराला आग लागलेली असून, ही आणीबाणी आहे. ही परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी आम्ही शक्य तेवढी पराकाष्ठा करू. काहीजणांच्या नफ्यासाठी आमचे भविष्यच हिरावून घेतले जात असताना आम्ही अभ्यास करून उपयोग तरी काय आहे? ही परिस्थिती जगभर जवळपास सारखीच आहे. सत्तेमधील लोकांचे गोडगोड शब्द सगळीकडे सारखेच आहेत. पोकळ आश्वासने व निष्क्रियता सारखीच आहे. हीच नामांकित मंडळी आम्हा मुलांसोबत सेल्फी घेण्यास धडपडत असतात. हेही सगळीकडे तसेच आहे. येत्या सोमवारी 23 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या हवामानाच्या कृतीसाठी शिखर परिषदेस जगातील सर्व नेते एकत्न जमणार आहेत. तेव्हा संपूर्ण जगाचे अब्जावधी डोळे तुमच्याकडे असतील.’ ग्रेटा थुनबर्ग ! तिने मांसाहार वज्र्य करून शाकाहार स्वीकारला, मोटारीऐवजी बस निवडू लागली. विमानाऐवजी जहाजाने खडतर प्रवास केला. जिथे  कडाक्याच्या थंडीत उष्णतेसाठी शेगडी नाही वा गरम करून खाण्याची सोय नाही, इतकंच काय शौचालयाऐवजी बादली वापरावी लागते, अशा सार्‍या हालापेष्टा तिनं सहन केल्या. ती मानधन घेत नाही, पुस्तकाच्या स्वामित्वधनाची देणगी देते. हे साधेपणाचे प्रदर्शन की इतरांनी स्वत:ला अपराधी समजावे यासाठी? हा सारा खटाटोप तिची विचारपूर्वक जीवनशैली व्यक्त करतो. संपूर्ण जगाच्या नजरा कायम तिच्याकडे असतात, याचे भान या चिमुरडीला आहे. मत तयार करणे, मत बदलणे हेच महत्त्वाचे आहे, याची तिला जाण आहे. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही कृती किरकोळ नसते. त्यातून एक तरंग उमटला तर त्यातून अनेक तरंग पसरत जायला वेळ लागत नाही. हेच ती तिच्या कृतींमधून सांगत आहे. आज एक शाळकरी बालिका तिच्या कर्तृत्वाने आज संपूर्ण जगातील जनतेची प्रतिनिधी झाली आहे. जगाला वाटणारी हवामानाची भीती व पर्यावरणीय धास्ती ती व्यक्त करीत आहे. जगातील प्रसारमाध्यमे तिच्या उद्धरणासाठी आसुसलेले असतात. एखाद्या राष्ट्रप्रमुखालासुद्धा मिळत नसेल एवढा मान तिच्या वक्तव्याला आलेला आहे. ग्रेटा बोलत होती. लक्षावधी लोक कानात जीव ओतून ऐकत होते. ती म्हणाली, ‘तुम्ही मुलांचे ऐकत आहात, तुम्ही विज्ञानाच्या पाठीशी उभे आहात हे दाखवून, खरे नेतृत्व करण्याची एक संधी या नेत्यांना आहे. (हे ऐकताच ‘ग्रेटा ! ग्रेटा !’  घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो). आमच्या भविष्यासाठी आम्हालाच झगडावे लागण्याची वेळ यावी, हे काही बरे नाही. आम्ही केवळ आमचे सुरक्षित भविष्य मागत आहोत. हे खरोखरीच अति मागणे आहे काय?’  त्याच वेळी लंडन शहरास दोन लाख मुलांनी हवामानकांड थांबविण्यासाठी दुमदुमून टाकले होते. ब्रिटनमधील ट्रेड युनियन काँग्रेसने (कामगार संघटनांची परिषद) पाठिंबा देण्याचे ठरवल्यामुळे बस व रेल्वे, सफाई कामगार व इतर सर्व कामगार संपात सहभागी झाले. शिक्षक तसेच महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापक संघटना संपात सहभागी झाल्या. ऑस्ट्रेलिया, र्जमनी, स्वीडन, ब्राझील, पाकिस्तान, युगांडा, पेरू, टर्की, दक्षिण आफ्रिका या सर्व देशांत लाखो मुलांनी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पर्यावरण या मागण्यांसाठी निदर्शने केली. भारतात लोहारा, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुंबई व दिल्लीत हजारो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. या अभूतपूर्व आंदोलनात वैज्ञानिकांच्या संघटना, अर्थतज्ज्ञ, सामाजिक व पर्यावरण क्षेत्नात कार्य करणार्‍या संघटना, चित्नकार, वास्तुशिल्पी, अभिनेते, संगीताचे बॅण्ड्स असे समाजातील सर्व स्तर मुलांच्या सोबत होते. खांद्यावरील बाळापासून काठी घेतलेल्या वृद्धांपर्यंत, बेटांपासून बर्फाळ प्रदेशांपर्यंत, नावेपासून सायकलपर्यंत मिळेल ते वाहन घेऊन जगाच्या कानाकोपर्‍यातील लोक यात सामील झाले होते. नाच, वादन, गाणी, चित्न, व्यंगचित्न, रांगोळी, फलक यांचे विविध आविष्कार दिसत होते. समस्त जगाला उत्साहाचे उधाण आल्याचे रमणीय दृश्य होते. हा प्रतिसाद पाहून मुलांनी, येथून पुढे दर तीन महिन्यांनी हवामानासाठी जागतिक बंद घडविण्याची घोषणा केली आहे.मुलांचा ‘भविष्यासाठी शुक्र वार’ निर्धार ऐकून र्जमनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड या देशांमधील वैज्ञानिकांनी  भविष्यासाठी वैज्ञानिक गट स्थापन केला. मुलांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी काढलेल्या पत्नकावर 46,000 विद्वानांनी सह्या केल्या होत्या. जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या अम्नेस्टी इंटरनॅशनल, एस्टिंक्शन रिबेलियन , 350.1ॅ, हहऋ,  ग्रीन पीस,  आक्स्फॅम या नामांकित संघटनांमुळे त्यांचे हजारो सभासद सोबतीला आले होते. एरवी जगातील सगळ्या कंपन्या  ‘बिझिनेस अँज युजवल’ असाच व्यवहार करीत असतात. ब्रिटन व आस्ट्रेलियातील काही कंपन्यांनी ‘नॉट बिझिनेस अँज युजवल’ असे आशयगर्भ नामकरण करून आघाडी स्थापन केली. पर्यावरण संकटाचे गांभीर्य लक्षात आलेल्या या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना संपात सामील होण्यास प्रोत्साहन दिले. जगात प्रदूषण करणार्‍या कोळसा व तेल कंपन्यांचे उत्पादन भरघोस व्हावे, याकरिता तंत्नज्ञान पुरविण्यासाठी मायक्र ोसॉफ्ट,  गूगल, अँमेझॉन या कंपन्यांचे करार झाले आहेत. यावरून या कंपन्यांमधील कर्मचारी त्यांच्या व्यवस्थापनाच्या  विरोधात उभ्या राहिल्या. परिणामी अँमेझॉनचे मुख्याधिकारी जेफ बेझोस यांनी जागतिक बंदच्या एक दिवस आधी हवामान रक्षणासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले. त्यांनी वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी 10 कोटी डॉलर देणगीची घोषणा केली. तरीही अँमेझॉनचे 1500 कर्मचारी, गूगल व ट्विटरचे कर्मचारी मुलांच्या साथीसाठी बंदमध्ये सहभागी झाले होते.दुसरीकडे नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण व वारंवारिता यामुळे विमा कंपन्यांनीसुद्धा तेल कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा वेग वाढवला. त्यातच लंडनच्या स्टॉक एक्सचेंजने पुनर्वर्गीकरण करताना तेल कंपन्यांना अस्वच्छ व नूतनीकरण न करणारी ऊर्जा (नॉन रिन्यूएबल) ठरविले. याचा परिणाम होऊन त्यांच्या समभागाच्या किमती घसरल्या. इंग्लंड, कॅनडा व फ्रान्स या देशांच्या संसदेने हवामानाची आणीबाणी जाहीर केली. जगातील र्शीमंत राष्ट्रांनी आर्थिक प्रगती व व्यापार वाढविण्यासाठी स्थापलेल्या ‘द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँण्ड डेव्हलपमेंट (ओइसीडी)’ संघटनेचे महासचिव होजे एंजेल गुरिया यांनी, क्षणिक, तातडीचा वा लघु दृष्टीचा विचार करण्यातून भयंकर चुका होत आहेत. वायू, कोळसा व तेलाच्या किमती वाढवा, त्यावरील अनुदान बंद करणे आवश्यक आहे, असे सांगून टाकले. त्यामुळे अजस्र व सर्वशक्तिमान तेल उद्योगांना ग्रेटा व मुले धोकादायक वाटू लागली आहेत.23 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या एक दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना गुट्रेस यांनी परखड शब्दांत सांगून टाकले, ‘वेळ निघून जात आहे. येथे 2050पर्यंत कर्ब उत्सर्जन शून्य करण्याचा कृती आराखडा असणार्‍या नेत्यांनाच बोलण्याची संधी दिली जाणार आहे. हवामानबदल ही आपण हरत चाललेली स्पर्धा आहे; परंतु आपण ती जिंकूही शकतो.’ या अधिवेशनात केवळ एकच अ-राजकीय व्यक्ती संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करीत होती. आणि ती होती अर्थातच ग्रेटा ! नेत्यांना पाहून रु द्रावतार धारण करीत ती गरजली, ‘मी इथे असणेच चुकीचे आहे. समुद्रापलीकडे मी माझ्या शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरुणांना आशा दाखवता? तुम्हाला हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्नं हिरावून घेतली आहेत.’  भावनोत्कटतेने तिचा आवाज कंप पावू लागला. ‘मानवजातच लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व सर्वकाळ होणार्‍या आर्थिक विकासाच्या परिकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही पोक्त व पक्व नाही आहात. तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुमची ही फसवणूक आम्ही आता सहन करणार नाही.’ उद्विग्न ग्रेटा बोलतच होती, ‘पुढील सर्व पिढय़ांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे.’ या अधिवेशनात फ्रान्स, र्जमनी, न्यूझीलंड यांनी कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी निधी वाढवल्याची घोषणा केली. अँमेझॉनच्या सदाहरित अरण्याच्या वणव्याची उपेक्षा करणारे ब्राझीलचे व कोळशाला प्राधान्य देणार्‍या ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. तर डोनाल्ड ट्रम्प हे केवळ एक चक्कर टाकून गेले. त्यांना पाहताच संतापलेल्या ग्रेटाची छबी अनेक छायाचित्नकारांनी टिपली. या दृकर्शाव्य चित्नणाचा  लाखो लोकांनी प्रसार केला. अमेरिकेसारखे बलाढय़ राष्ट्रच पर्यावरण समस्येला जुमानत नसल्यामुळे या अधिवेशनातूनही जनतेच्या हाती काही लागले नाही.2018च्या ऑगस्टपासून जगातील मुलांची समज वाढली असून, ते पर्यावरणाबाबत संवेदनशीलता प्रकट करू लागले आहेत. जगातील ग्रंथ विक्र ीचे मापन व विश्लेषण करणार्‍या ‘निएल्सन बुक रिसर्च’ संस्थेने   ‘मागील 12 महिन्यांत बालकांच्या पुस्तक मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली’, असे सांगितले. ‘निएल्सन बुक रिसर्च’च्या विश्लेषक राशेल केलर, हा ‘ग्रेटा थुनबर्ग परिणाम’ आहे. तिच्यामुळे मुलांमध्ये बदल घडत आहेत. मुले अंतर्मुख होऊन या पुस्तकांतून प्रेरणा घेत आहेत,’ असं म्हणतात.थोडक्यात, ‘पैशासाठीच आयुष्य’ हेच ध्येय असणार्‍या काळात पैसा सोडून निसर्ग वाचविणार्‍या व्यक्ती व संस्थांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील एक वर्षात स्वत:ची जीवनशैली आणि सभोवताल या दोन्हींत बदल करण्यासाठी सज्ज होणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वैयक्तिक पातळीवर कर्ब पदचिन्ह कमी करणे व सभोवतालच्या संस्थांना त्यासाठी भाग पाडणे ही महत्त्वाची कृती सर्वत्न दिसत आहे. या आठवड्यात युरोप, अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात हवामान बदल व  पर्यावरण रक्षण या विषयांना प्राधान्य देणार्‍या मतदारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळले आहे.जगातील मुलांमुळेच पर्यावरण कृतिवादाचे (अँक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे. जगावरील कार्बनच्या काळ्याकुट्ट ढगांना मुलांच्या कृतिवादामुळे चंदेरी किनार आली आहे. त्यांचा लढा संपूर्ण जग ताब्यात असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांशी आहे. प्रदूषकांच्या विरोधात सुरू असलेल्या ऐतिहासिक लढय़ात प्रदूषकशाहीचा वरवंटा वाढत गेल्यास सिव्हिलायझेशनच्या तसेच जीवसृष्टीच्या अंताकडे वाटचाल असेल आणि जनतेचा विजय झाला तरच उष:काल होणार आहे. संपूर्ण जगातील दिशा उजावयाच्या असतील तर या प्रयत्नांचे गतिवर्धन आवश्यक आहे. छोटेच त्यांच्या वयापेक्षा मोठे होऊन चोख भूमिका बजावत आहेत. प्रश्न आहे तो मोठय़ांचा! atul.deulgaonkar@gmail.com(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)