शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

शेतीतील अंधश्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 10:45 IST

शेताच्या तब्येतीला आणि पिकांच्या वाढीला पोषक ठरणारी कृती म्हणजे योग्य शेतीतंत्र. पण डोळे झाकून सरसकट सगळीकडे तेच तंत्र वापरलं तर गडबड होणारच. एकच तंत्र सगळ्यांना कसं चालणार? परदेशांत पॉलिहाउसची कल्पना आली, लगेच आपल्याकडेही त्याचं ‘पीक’ आलं. ठिबक सिंचनामुळे पाणी वाचतंय म्हटल्यावर अनेकांनी तत्काळ त्याचं अनुकरण सुरू केलं. शेतात खत टाकलं की पीक चांगलं येतं, म्हणून वारेमाप खत टाकणं सुरू झालं. नको तिथे नको ती पिकं काढायचा अट्टाहास बट्ट्याबोळ करणारा ठरू शकतो. पण त्यामागचं शास्त्र कोण समजून घेणार?

- मनोहर खके 

शेतीमध्ये आधुनिक बी-बियाणे वापरली, रासायनिक खतांचे डोस दिले, कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकांच्या फवारण्या वेळच्या वेळी केल्या, झालंच तर तणनाशकांचा वापर पिकाच्या मध्ये मध्ये केला, नांगरणीला आणि कापणीला यंत्र वापरली की आपलं शेत तंत्रज्ञान विकसित झालं असं म्हणायला पाहिजे का नको? का आपण आपल्या शेतातल्या पिकांच्या पानाकडं, फुलोऱ्याकडं, पाण्या-ओलाव्याकडं, अळी, किड्यांकडं बघून तशी तजवीज केली तर विकसित तंत्रज्ञान वापरलं असं म्हणायचं? तसं बघितलं तर आपल्या शेताच्या तब्येतीला मानवेल आणि पिकांच्या भरघोस वाढीला पोषक ठरेल असं काही करायला जाणं म्हणजे योग्य शेतीतंत्र वापरणं आहे.शेतकºयाला शेतीचं तंत्र पारंपरिक शहाणपणातून आणि आपल्या अनुभवामधून मिळत असतं. पण शेतीमध्ये घुसलेल्या नवनव्या अंधश्रद्धांमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.पूर्वीच्या काळी एक म्हण होती - ‘शेतीला सर्वात चांगलं खत कोणतं?’ या प्रश्नाचं उत्तर- सर्वात चांगलं खत म्हणजे ‘शेतकºयाच्या पायाची धूळ ! जो शेतकरी जातीनं शेताच्या आत जाईल, तो निगराणी करेल. पिकाला काय हवं काय नको ते त्याला समजेल आणि त्याची तजवीज करायचा प्रयत्न शेतकरी करेल.शेतीचं विज्ञान असतं. ते शेतकºयांना कळलं की शेताच्या समस्यांवरचे उपाय शेतकरी स्वत:च करू शकेल. पूर्वी वाडवडिलांकडून, शेजाºया-पाजाºयांकडून काही अडीअडचणीचे सल्ले मिळत. आता आपल्याकडे शेतकी महाविद्यालयातून बी. एस्सी, एम.एस्सी झालेले पदवीधर मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. त्यांना शेतीचं विज्ञान शिकवलेलं असतं; पण त्यातले बरेचजण शेतीपेक्षा सरकारी नोकरी किंवा कंपनीत नोकरी मिळेल का बघतात. या शेती पदवीधरांकडे शेतीतलं विज्ञान आहे. त्यांनी शेताचे डॉक्टर व्हायला पाहिजे. शेतकºयांना विद्या दिली पाहिजे; पण बºयाचदा ते शेतकºयाला विज्ञान द्यायच्याऐवजी तंत्रज्ञान विकतात. शेतकºयाला परावलंबी व्हायला भाग पाडतात.शेतीविज्ञानात काय असतं? शेतीला काय हवं? जमीन हवी, पाणी हवं, वारा हवा, उजेड हवा. गरज पडेल तशी मशागत हवी. जमीन- पाणी- प्रकाश- बियाणे यांची गुणवत्ता काय अन् त्यांचं एकमेकांशी नातं काय हे समजायला हवं. पिका -पिकांतसुद्धा नातं असतं, पिकाशी किडीचं, पाखराचं, बुरशीचं, शेवाळ्याचं, तणाचं जैविक नातं असतं. त्या नात्यांतून आपल्याला हवं असलेल्या उत्पादनाकडे कल कसा होईल हे माणूस बघेल, समजून घेईल आणि आपली कृती करेल. ते तंत्र त्या त्या घडीला त्या त्या क्षेत्राला वेगवेगळं असू शकतं. आपण सरसकट सगळीकडे तेच तंत्र डोळे झाकून वापरणं याला शेतीतली अंधश्रद्धा म्हणता येईल.पॉलिहाउस बांधणे हा त्यातला एक प्रकार आहे. आपल्याकडे ज्या पिकाची शेती करतात त्यातली जवळजवळ सगळीच पिके १८ ते ३५ अंश सेल्सिअस तपमानात वाढतात. सर्वसाधारणपणे हे तपमान आपल्याकडे असतं. युरोप, अमेरिकी प्रदेशात यापेक्षा कमी तपमानाचा कालावधी बराच असतो. मग तिथे पिकाला ऊब मिळावी म्हणून पॉलिहाउसची कल्पना आली. त्याचं तंत्र विकसित झालं. झालं- आपल्यातल्या काही जणांना त्याची ओढ वाटली. मग एकरी २५ लाख रुपये खर्चून पॉलिहाउस बांधायला लागले. एकाचं पाहून दहांनी केलं. शंभरात एखाद दुसºयाला फायदा झाला. तेवढे सोडून बाकी सगळे घाट्यात. वनस्पतीला वाढीसाठी प्रकाशाची गरज असते- हा शेतीविज्ञानातला सिद्धांत. तो डावलून पॉलिहाउसचा अंधार केला की कोणतं पीक वाढणार? प्रकाश संश्लेषण करता येणं हा वनस्पतीचा गुण. त्याला वाव मिळाला तर त्या अन्न तयार करू शकतील. स्वत:साठी आणि इतरांसाठीही त्याचा उपयोग होईल? अंधार करून काय होणार?दुसरी गोष्ट ड्रीपची. ड्रीप पाणी वाचवतंय अशा समजुतीतून ड्रीप, स्प्रिंकलर बसवले जातात. सरकारही त्याला अर्थसाहाय्य देते. सबसिडीपोटी शेतकरी खर्च करून शेतात नळ्या बसवून घेतात; पण नंतर त्या नळ्या काढून कुठेतरी टाकतात, कारण अपेक्षित उत्पादन येत नाही, ड्रीपवाल्यांनी केलेले दावे प्रत्यक्षात येताना दिसत नाहीत. पिकाला मुळात पाणी लागतं. हे विज्ञान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पावसाळ्यात पाणी जमिनीच्या वरच्या भागात असतं. मुळं तिथं वाढतात. पाऊस काळ संपला की पाण्याची पातळी खाली जायला लागते. तसतशी मुळे खाली वाढायला लागतात. मुळांचं प्रमुख काम काय आहे? -तर झाडाला आधार देणं. दुय्यम काम जमिनीतून पाणी शोषून घेणं हे आहे.ठिबक सिंचनात पाणी कुठे टाकलं जातं? - थेंब थेंब जमिनीच्या वरच्या भागात. मुळं पाण्याकडे जातात मग ती कुठे जाणार? तर जिथे थेंब थेंब पाणी पडतं तिथं जाणार. म्हणजे खाली जाणार नाहीत. म्हणजे वनस्पतीला आधार देण्याचं त्यांचं मुख्य काम ते बिनसलं. मग पीक उभं राहील का? मग ड्रीपवाले म्हणतात ‘बांबू लावा, शिड्या लावा.’समजा, त्या लावल्या पीक उभं धरून ठेवलं, पण मुळ्या वरतीच राहिल्या. जमिनीच्या आतल्या भागातली खनिजं मग कशी मिळणार? खनिजं मिळाली नाहीत की झाडाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होणार. कीड वाढणार. मग तंत्रवाले सांगणार खते टाका, फवारणी करा. आधी ड्रीपसाठी खर्च करा, मग आधारासाठी, मग किडी, रोगाला तोंड देण्यासाठी! शेतकरी आणखी खर्चाच्या सापळ्यात अडकणार! रासायनिक खतं, रासायनिक कीडनाशकं, तणनाशकं वाढतच जाणार.रासायनिक खतं, कीटकनाशकं वगैरे वापरून शेती करणं ही एक अंधश्रद्धा आहे, असं म्हणणं हीदेखील एक अंधश्रद्धाच आहे. रासायनिक शेती चुकीची नाही. ती आपल्या परिस्थितीला उचित आहे का, याचा शोध शेतकºयांनी डोळसपणे घ्यायला पाहिजे.खतं म्हणजे काय? - याबद्दल तर फारच अंधश्रद्धा आहेत. खत म्हणजे वनस्पतीचं भोजन. पूर्ण आहार. एखाद्या घरी तुम्हाला भोजनाला बोलावले आणि नुसताच भात खाऊ घातला तर भोजन झालं का? तसेच वनस्पतीचं आहे. वनस्पतीला नुसतंच नत्र दिलं, नुसतंच सुरद दिलं, पलाश दिलं तर भोजन नाही झालं. रासायनिक खताच्या जोडीनं शेण खत, कम्पोस्ट खत द्यायलाच पाहिजे. जमिनीत सूक्ष्मजीवही असले पाहिजेत. ते खरं खत तयार करतात.सूर्याचे ऊन पिकावर पडू द्या जमिनीवर नको. जमीन आच्छादून टाकायची. उन्हाच्या तापापासून वाचवायची. काडी, कचरा, तुराट्या, फराट्या, वाळलेली पानं, उपटलेली तणं मिळेल ते वापरायचं. त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत करणाºया गांडूळ, गिंडूळ, किड्या-माकोड्यांनाही सावली मिळेल. पानाला ऊन हवे, मुळाला सावली हवी.जमीन सुपीक असलीे तरी ती उत्पादक असेलच असे नाही. जमिनीला कोणती पिके मानवतात याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तेथे दुर्लक्ष झाल्यामुळे नको ती पिके नको त्या क्षेत्रात काढण्याचा अट्टाहास केला जातो. कोकणातली पिके वेगळी. घाटावरची वेगळी आणि देशावरची वेगळी. विदर्भ- मराठवाडा- खान्देश- पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यातली जमीन काळी, कसदार तर कोकणातील लाल, रेताड; मात्र कोकणातला निसर्ग तरीही सदासर्वकाळ हिरवागार का? त्याचं कारण दमट हवा. हवेत बाष्प असणे फार महत्त्वाचे असते. वनस्पती वाढतात त्या मुख्यत: कर्बवायू आणि पाण्याची वाफ यांच्या आधारे. त्यांच्यापासून वनस्पतीच्या वजनाचा जवळ जवळ ९९.५ टक्के भाग बनतो. उरलेल्या अर्धा टक्का भागात नत्र, स्फूरद, पालाश, सिलिकॉन, लोह, कॅल्शिअम अशी पंधरा- सोळा पोषक मूलद्रव्ये असतात. त्यापैकी बरीचशी अल्प प्रमाणात हवेतही असतात. दमटपणा- ओलाव्यामुळे ती वनस्पतीच्या पानावरून वनस्पतीत जाऊ शकतात. वनस्पतीत त्याचे रुपांतर सेंद्रीय द्रव्यात होत जाते. हे लक्षात घेता -एअर इरिगेशन किंवा ओलावा सिंचन ही पद्धत अमलात आणता येईल. तिचा वापर करून ४८ अंश सेल्सिअस तपमान असलेल्या मेळघाटातही काजू उत्पादन करता येऊ शकते. तसे प्रयोग स्वत: लेखकानेही यशस्वी केलेले आहेत.

गाईच्या शेणाचे फायदेगाईच्या शेणात काही पॅथोजन आढळत नाहीत हे खरे आहे; मात्र कोणतेही शेण खत तयार करण्यासाठी वापरता येते. डुक्कर, गाढव, म्हशी, रेडे अगदी माणसाच्या विष्टेचेसुद्धा उत्तम खत होते. कम्पोस्ट खत करताना कम्पोस्टिंग मशीनची गरज नाही. मशीनमुळे कम्पोस्टिंग होत नाही. कम्पोस्ट म्हणजे पूर्ण कुजलेला माल. त्यात किडे होत असतील तर त्यात किड्यांचे अंश शिल्लक राहिले आहे असे समजावे. कम्पोस्ट खत करताना पाला-पाचोळा, शेतातला कचरा बारीक करून वापरणे आवश्यक असते.

वृक्षारोपण आणि खड्डेवृक्षलागवड करण्यासाठी सामान्यपणे तीन फूट लांबी-रुंदी आणि खोली असलेला खड्डा खणायला सांगतात. खड्डा करून वृक्षारोपण केल्यावर खड्डा भरताना त्यात माती भुसभुशीत राहते. मग वाढत असताना त्यांची मुळे त्याच भागात वाढत राहतात. झाड मोठे होते; पण मुळांचे आधार देण्याचे काम नीट होत नाही आणि लावलेली झाडे वारा वादळाला टिकत नाहीत. वृक्षलागवड करताना जमिनीचा पोत लक्षात घेऊन खड्डा करावा. भुसभुशीत जमिनीत खड्डा करायचीही गरज नाही.

(लेखक ज्येष्ठ शेती संशोधक आहेत.)शब्दांकन- विनय र. र.मराठी विज्ञान परिषद, पुणे आणि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स, पुणे यांच्या वतीने पुण्यात मनोहर खके यांचे नुकतेच व्याख्यान झाले.त्या भाषणाचा हा संपादित सारांश.)