शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...तर तेव्हा माझा जीव गेला असता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:44 IST

श्वेता पेंडसे, अभिनेत्री - मुंबईत सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. पटकन काम मिळत नव्हते. अभिनयाचे स्वप्न बघून मायानगरीत पाऊल ठेवले ...

श्वेता पेंडसे, अभिनेत्री -मुंबईत सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. पटकन काम मिळत नव्हते. अभिनयाचे स्वप्न बघून मायानगरीत पाऊल ठेवले पण येथे सुरुवात झाली ती क्लासेसमध्ये शिकवण्या घेण्यापासून. हळू-हळू लेखन आणि मग अभिनयाचे काम मिळत गेले. पण त्या काळात वेळीअवेळी करावा लागणारा प्रवास सुखकर नव्हता. आता कुठे माझ्या स्वप्नांना आकार यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मुंबई हे शहर मला ऊर्जेचा स्रोत वाटते. मी लिहिलेल्या ‘बार्डो’ चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.  या जादुई शहराच्या मी प्रेमात पडले आहे. प्रणाम मुंबई !

नागपुरात लहानपणापासूनच नाटकांत कामे करायला सुरुवात केली होती. ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ हे बालनाट्य आणि प्रभाकर पणशीकरांबरोबर ‘तो मी नव्हेच’ या व्यावसायिक नाटकात कामे केली होती. नंतर राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने २-३ वर्षं मुंबईच्या फेऱ्या झाल्या. २०११ मध्ये मी लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या ‘माझिया मना’ या नाटकाला विविध स्पर्धेत जवळपास २६ बक्षिसे मिळाली व मग पुण्या-मुंबईकडे येण्याच्या दृष्टीने विचारचक्र सुरू झाले. प्रत्यक्षात मुंबई गाठायला २०१३ उजाडले. मुंबईत काहीकाळ मोठ्या भावाच्या मुलुंडच्या घरात वास्तव्य करून लगेच ठाण्याला भाड्याचे घर घेतले. सुरुवातीचा काळ बिकट होता. पटकन कोणी काम देईना. मग रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण झाले असल्याने ठाणे, मुलुंड, दादर अशा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवण्या सुरू केल्या. एक दिवस नागपूरकर मित्र आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, इथे अभिनय करायला भरपूर मंडळी आली आहेत. तू लिहितेस छान. लिखाणाचे काम माग. ते पटकन मिळेल. झालेही तसेच. आदेश बांदेकर यांच्या सोहम् प्रॉडक्शनची ‘लक्ष्य’ ही मालिका तेव्हा सुरू होती. त्याच्या लेखनासाठी मी त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून परत घरी येत असताना मला त्यांच्याकडून फोन आला की तुम्ही पुढच्या भागात काम कराल का? दोनच दिवसांनी शूटिंग होतं. तेव्हापासून अनेक भागात भूमिका केल्या. ‘जयोस्तुते’ आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांच्या शूटिंग करता मला नियमित मुलुंड ते मढ असा पवईमार्गे दुचाकीवरून प्रवास करावा लागायचा. एकदा रात्री घरी येताना दुचाकीवरच डुलकी लागली. कशीबशी थांबून तोंडावर पाणी मारले अन् पुढे निघाले पण झोप अनावर झाली होती. कधी एकदा घरी पोहोचेन असे झाले होते. भांडुपजवळ शेवटी माझा अपघात झाला. हेल्मेटमुळे थोडक्यात बचावले. पण यामुळे माझा प्रवास थांबला नाही. हीच मुंबईची खरी ओळख आहे. त्यामुळेच या शहराच्या मी आकंठ प्रेमात आहे.- शब्दांकन : तुषार श्रोत्री 

टॅग्स :cinemaसिनेमाCelebrityसेलिब्रिटी