शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:30 IST

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं.

ठळक मुद्देतिला समजायला लागलं तेव्हापासून ते आजपर्यंत सायमा फक्त आपल्या मनातलं गोठलेलं कागदावर उतरवत आली आहे.स्वत:चे, स्वत:पुरते का होईना पण शाश्वत सत्य आपल्या कवितेतून ती उलगडत आली आहे.हळुवार आणि अलगदपणे लिहिणारी सायमा तिच्या कवितांतून सामाजिक भानही जपते आहे.

>> संकेत म्हात्रे

मी नावं लिहिली आपल्या दोघांचीज्याची अक्षरं अगदी घट्ट निरंतरएकमेकांच्या मिठीत असतातहा महासागर स्वच्छ करतो आपल्या नावातल्या कोपऱ्यांनाहीआणि हळूच कुर्वाळतो आपल्या शब्दांतल्या मखमालात विसावणाऱ्या असीम अरण्यांनालाटा नतमस्तक होतात, शब्दांना धरतात आपल्या माथ्यांवर, पुन्हा परततातलाटा पुन्हा वर येतात, पुन्हा नाव गिरवतात आपलं इतिहासातल्या हरवलेल्या खजिन्यांवर.आपण चकाकतो पाण्यावर तरंगणाऱ्याचांदण्यांखाली ज्या आजन्म वाट पाहतात,त्या लैलाची जिने आपल्या मजनूचंपहिलंवहिलं नाव परत करावं...

आता आपण जरा वीसेक वर्षे पाठी जाऊ या. कोलकाता येथे एका १५ वर्षांच्या मुलीला प्रचंड राग आला. ( याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण त्याने तसा फारसा फरक पडत नाही). ती आदळआपट करू लागली, उशीला रागाने मारू लागली. मग, त्या मुलीने कुठेतरी पेपरात वाचलं की, लिहिण्याने मनातला राग कागदावर उतरवता येतो आणि संपवताही येतो. म्हणून ती लिहू लागली. वाट्टेल ते, वाट्टेल तसं. आपण जे काही लिहिलंय, ते या मुलीनं एका वर्तमानपत्रात आपल्या पद्धतीने पाठवलं आणि पुढच्या आठवड्यात तिनं खरडलेलं काहीतरी कविता या नावाखाली छापून आलं. ती होती, हैदराबादमधल्या सायमा आफ्रिन नावाच्या कवयित्रीची कवितेतली सुरुवात.

ती कोलकात्यात राहत असली, तरीही तिचा जन्म गाया या छोट्याशा शहरातला आहे. हे तेच शहर जिथे गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झालं. कदाचित, या परिसराचा- जुन्या पिंपळाच्या झाडाचा, गावातल्या वडिलोपार्जित घराचा, पालखीतून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचा, घरातल्या रंगीत काचांवर पडणाऱ्या उजेडाचा, त्यातून उधळणाऱ्या कैक रंगांचा, लहान-थोरल्यांच्या कथांचा आणि कुठेतरी बंद डोळ्यांमागच्या सचैल शांतीचा या कवयित्रीवर प्रभाव असलेला जाणवतो. कारण, एका वर्तमानपत्रात काम करणारी सायमा, दुसरीकडे इतकं हळुवार आणि अलगद पण अस्वस्थ करणारं लिहिते,

ही कदाचित गायामधल्या त्या बुद्धाची महती असावी.

पुढे कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. सायमाचे आईबाबा बऱ्याचदा उर्दू आणि फारसी दोह्यांमधून एकमेकांशी संवाद साधत, पण कदाचित यामुळेच सायमावर कवितेचा आणि भाषेचा फार मोठा प्रभाव पडत राहिला. ही कवयित्री शब्दांच्या अधिक जवळ जाऊ लागली. गाया, कोलकाता, कामासाठी हैदराबाद आणि मग कवितेच्या शिष्यवृत्तींमुळे सायमा जग हिंडू लागली किंवा आपल्यात वैश्विक कवितेची मुळात जाणीव असल्यामुळे जगातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांतून तिला निमंत्रणं मिळू लागली. पण, खरी गंमत मला तिच्या कवितेच्या आशयाबाबत वाटते. सूक्ष्मतेचा धागा सायमा अगदी सहज पकडते आणि त्याच्या विळख्यात वाचकाला गुरफटून टाकते. कदाचित, यालाच काव्यानुभूती म्हणत असावेत.

तू, तू होण्याआधी, होतास पाणी, हवा,जंगल, फूल आणि एक सरोवरएका परित्यक्त घरातला ज्याचे खांदे हवेच्या झुळुकेने इतक्या वेळा घासलेकी शेवटी त्यात निर्माण झाला एक छिद्र.आत : हलका उजेड. त्यानंतर, फक्त अंधार.शेवटी अंधारामुळेच तुला कळतेउजेडाची चव जसे कळते रक्तएका सिंहाला जो पाठलाग करतो त्या रक्ताचा,काळोखात, स्वत: काळोखासारखा होईपर्यंत.उजेडाची भूक पसरते जंगलाच्या भूमीवर,गडद हिरव्या नेचांवर,त्यांची पानं ज्वलनांच्या रेखाकृतींसारखी,ज्वालांमध्येच मिसळलेली.काल, हे तलाव पसरलं या अशुपालाच्या रस्त्यांवरजे चालले होते सूर्याकडे.त्या आभाळाने चव घेतली त्या तळ्याचीआणि बाहेर थुंकलं अंधाराला, म्हणजे तुला.

सायमाची कविता ही काळानुसार बदलत गेली आणि त्यात निरनिराळे विषय, आशयघनता आणि अनुभव झळकू लागले. एकीकडे आपल्याला सामाजिक भान येतंय याची चाहूल लागते आणि दुसरीकडे आपला स्वतंत्र आवाज आहे हे सुद्धा जाणवायला लागतं. म्हणजे सुरुवातीला सायमा किट्स किंवा शेलेसारखं लिहू पाहायची. पण पुढेपुढे तिला एक वेगळा सखोल आवाज सापडला आणि तो सुद्धा फार विलक्षण होता. पुढे ती निरनिराळ्या भाषांत कविता वाचू लागली, अभ्यासू लागली, त्यामुळे विविध भाषांत एकच गोष्ट किती वैविध्यपूर्ण मांडली जाते, हे सुद्धा तिला कळू लागलं. कदाचित, कवितेच्या या नव्या वळणावर तिला पाब्लोसारख्याही एका कवीने मोहून टाकलं असावं...

नेरुदाची गाणी भरतातआपल्या गुडघ्यात शंखातल्या लाटामृत्युमुखी पडतात जेव्हा चिरडल्या जातातहोरपळलेल्या ट्रेनमधून उतरणाऱ्या बुटांखाली

सायमाची कविता लिहिण्याची प्रक्रिया फार सुरेख आणि नैसर्गिकतेकडे झुकणारी आहे. ती कधीही कविता ठरवून लिहीत नाही. याउलट, तिचं मंथन चालूच असतं. ती कवितेला तिच्या अंतर्मनात झिरपू देते आणि मग कागदावर उतरवते. कविता लिहीत नसली, तरीही सायमाचा कवितेचा अभ्यास निरंतर चालू असतो. सामाजिकतेचं भान ती फार स्पष्टपणे मांडते. काश्मीर हा विषय तिच्या कवितेत डोकावतो, तसंच जसं नेरुदा, तिचे बाबा किंवा कविता, शब्द पुन:पुन्हा तिच्या ओळींमध्ये आढळतात. काश्मीरमधल्या मुलासाठी सायमा असं लिहिते -

रे मुला बघ एक छोटी कागदाची होडी हलतेयतांबड्या पाण्यावरजिथे कत्तल झाली आहे बालगीतांचीजिथे तुझ्या आईने एकेकाळी ठेवला होतातुझ्या स्वप्नांचा एक अश्रूआणि एक काजवा, तिच्या चेहऱ्यावरचारे मुला मला सांगया जगाला कधी कळू शकेल कामर्त्य गर्भात श्वास घेणं किती कठीण असतं ते!

इतकं नाजूक आणि आतलं लिहिणारी सायमा इतकं जीवघेणंही लिहू शकते, यावर विश्वास बसत नाही. पण, माझ्या मते, ज्यांच्या शब्दांना वेदनेचं मूळ कळलं असतं, त्या नेमक्या अर्थाशी आणि अनुभवाशी पोहोचू शकतात. हीच कवितेची किमया!

(संकलन : स्नेहा पावसकर)

टॅग्स :literatureसाहित्य