शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात मान्यवरांचे सत्कार थांबवा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 07:00 IST

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं!

लग्न समारंभात नाव पुकारले नाही, म्हणून नाव पुकारणाऱ्यास मारहाण झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या, आता मात्र हे अतिच झालं! हल्ली लग्नसमारंभात लग्नात आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव घेऊन स्वागत करण्याची अतिशय चुकीची पद्धत सुरू झाली आहे. पूर्वी हे ग्रामीण भागात होत असे,पण ते लोण आता शहरातही आले आहे.हा प्रकार थांबवलाच पाहिजे...- अंकुश काकडे- 

खरं म्हटलं तर विवाहासारख्या समारंभांना आपण ज्यांना निमंत्रण देतो ते सर्वच जण प्रतिष्ठित असतात. असे असताना काही ठराविक लोकांचीच नावे घेऊन स्वागत केले जाते हे कितपत योग्य आहे? पण याचा कुणी विचारच करीत नाही. शिवाय ज्यांची नावे पुकारली जातात त्यातील किती जण प्रतिष्ठित असतात हादेखील प्रश्न उपस्थित होतो. ‘लग्नात आमची नावे पुकारू नका, आमचे हारतुरे, शाल-फेटे, श्रीफळ देऊन स्वागत करू नका, फक्त वेळेत लग्न लावा,’ असे आवाहन करणारे पत्रक (कै.) मोहन धारिया, विठ्ठल तुपे, बाबासाहेब पुरंदरे, खा. गिरीश बापट, विनायक निम्हण, शशिकांत सुतार, उल्हास पवार, तत्कालीन महापौर कमल व्यवहारे, डॉ. एस.बी. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशिवाय अनेक आमदार, नगरसेवकांनी आवाहन केले होते. यासाठी मीच पुढाकार घेतला होता. पुढे आठवडाभर त्याचा थोडा परिणाम दिसला, पण परत हार-तुरे देणे-स्वीकारणे सुरू झाले, पण त्याला शशिकांत सुतार, उल्हास पवार आणि मी, मात्र आजपर्यंत ठाम राहिलो आहोत. कितीही वेळा नाव पुकारले तरी आम्ही स्टेजवर जात नाही. वेळेत लग्न लागलं तर नशीब, लग्न हे मुहूर्तावर लावलं जावं, याला काही शास्त्रीय-धार्मिक आधार आहे. पण त्याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते. शिवाय या प्रतिष्ठित पाहुण्यांना आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावतो हे विसरून त्यांच्या हस्ते जावईमान देण्याचा कार्यक्रम, काही लग्नात असे डझनभर जावई असतात, एक तर ते वेळेवर येत नाहीत, काही जावई तर वराच्या मिरवणुकीत नाचत असतात, तोपर्यंत तो प्रतिष्ठित पाहुणा स्टेजवरच. ज्यांनी हा विवाह जमवला त्याचा सत्कार, जणू काही त्याने उपकारच केलेत.नवरदेव वेळेत येत नाही, आला तर वधूचा पत्ता नाही, एकतर ती पार्लरमध्ये गेलेली असते, तेथे तिला उशीर होतो, परत उशीर झाल्याचं उत्तर ठरलेलं, ट्रॅफीकमध्ये अडकलो होतो. या लग्नसराईत माझ्याच जवळच्या नातेवाइकाच लग्न होतं, मुहूर्त होता ५ वाजताचा. नवरदेव आला ५.४५ वाजता, पण नवरीला येण्यास २० मिनिटे उशीर झाला आणि विशेष म्हणजे ती २० मिनिटे नवरदेव तसाच घोड्यावर बसून राहिला होता, तेही उन्हात. पाहुण्यांचं नाव पुकारताना कोणती तरी संस्था, तिचा अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, आमदार-खासदार, अधिकारी यांची वारंवार भसाड्या आवाजात नावे घेतली जातात, काही वेळा तर त्यांचे सत्कार होत असताना बिचारे वधू-वर १०-१५ मिनिटे केवळ एकमेकांकडे पाहत असतात, काय करणार बिचारे ! काही दिवसांपूर्वी उरळी येथील लग्नसमारंभात माझं नाव कां पुकारलं नाही, म्हणून त्या नाव पुकारणाऱ्याला बाहेर बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अगदी पोलिसांपर्यंत तक्रार करण्यात आली. दुसरी घटना खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुकारून स्वागत का केले नाही म्हणून तेथील नाव पुकारणाऱ्यास मारहण करण्यात आली. बिच्चारे अमोल कोल्हे आता विचार करत असतील मी यासाठी का खासदार झालोय! आता मात्र हे अति झालं असंच म्हणावे लागेल. लग्नाची हौस सर्वांनाच असते, ते थाटामाटात व्हावे हेही आपण समजू शकतो, पण या थाटामाटात जर हे असे प्रकार घडणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार! आता तरी हे थांबवा असे म्हणण्याची वेळ आलीय. (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्न