दुर्गसंवर्धन ही श्रींची इच्छा!
By Admin | Updated: September 12, 2015 18:17 IST2015-09-12T18:17:27+5:302015-09-12T18:17:27+5:30
गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हटले की सर्वसाधारण समजूत अशी की, ‘धडक मोहीम’ काढून तिथला कचरा उचलायचा, पडलेले बांधकाम दुरुस्त करायचे, तटबंदीच्या पडलेल्या भिंती नव्याने उभारायच्या. पण भावनेच्या आहारी जाऊन असलं काही करत असाल तर थोडं थांबा. असं काही करण्यामुळे आहे त्या गडकोटांचीही वाट लागू शकते!.

दुर्गसंवर्धन ही श्रींची इच्छा!
- डॉ. सचिन विद्याधर जोशी
महाराष्ट्र शासनाच्या ‘गडकिल्ले संवर्धन समिती’चे सदस्य, पुरातत्व क्षेत्रतील संशोधक
सह्याद्रीमध्ये जेवढी दुर्गांची विविधता आहे तेवढी भारतामधील इतर कोणत्याही पर्वतरांगेत नाही. याचे कारण म्हणजे सह्याद्रीची भौगोलिक रचना. सह्याद्रीतील उंच पर्वतरांगा, पठारी प्रदेश आणि कोकणपट्टी यामुळे गिरिदुर्ग, जलदुर्ग व भुईकोट या प्रकारच्या किल्ल्यांची बांधणी फक्त सह्याद्रीतच झाली. दुर्गामाता हे गिरिदुर्गांचे लक्षण मानले जाते.
दुर्गसंवर्धन हा सध्याचा एक ज्वलंत विषय. महाराष्ट्रात एवढे किल्ले आहेत आणि त्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाकडून होत नाही याबद्दल गड-किल्ल्यांवर काम करणा:या अनेक संस्था आक्रोश करीत आहेत. विरोधी पक्षाकडूनदेखील या विषयावर रान उठवले जात आहे. पण या सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे, त्याची पद्धती काय याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. याउलट संवर्धन करणारे काही हौशी गडप्रेमी स्वत:ला वाटेल त्या पद्धतीने संवर्धन करायला लागले आहेत. कोणत्याही किल्ल्याचे संवर्धन करण्यापूर्वी तो गड, कोट किंवा दुर्ग समजून घ्यावा लागतो याची गरज त्यांना वाटत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
भावनेच्या आहारी जाऊन काही गोष्टी करणो अयोग्य आहे. शास्त्रशुद्ध संवर्धन करायचे असेल तर गडाचा स्थापत्यशास्त्रच्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. दुर्गसंवर्धन करणा:या अनेक संस्था आज पुणो-मुंबईसारख्या ठिकाणी कार्यरत आहेत. हे लोक गडांवर जाऊन तेथे पडलेला कचरा गोळा करून खाली घेऊन येतात. काही मोजक्या संस्था गडावरील पडलेल्या मंदिरांचे बांधकाम स्वखर्चाने करतात. पण हे सर्व करत असताना नकळत त्यांच्या हातून गडावरील पुरातत्वीय स्थळांची नासधूस होते. या सर्व कार्यकत्र्याचा उत्साह अफाट असतो; पण पुरातत्वशास्त्र हा विषय माहीत नसल्याने प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसे संवर्धन करत असतो. पुरातत्व विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे ते अशा उत्साही लोकांना आवर घालू शकत नाहीत.
या संस्थांना व त्यांच्या कार्यकत्र्याना संवर्धनाचे योग्य शिक्षण देण्यासाठी एक सर्टिफिकेट कोर्स पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतो. आणि त्यानंतर ज्यांना अशा प्रकारे संवर्धन करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींना तो अभ्यासक्रम बंधनकारक करून मगच त्यांना संवर्धनाची परवानगी देण्यात यावी. याव्यतिरिक्त योग्यप्रकारे गडसंवर्धन होण्यासाठी पुरातत्व विभागाचा एक व पुरातत्वशास्त्र विषय शिकविणा:या संस्थेचा एक व्यक्ती त्यांच्या सोबत ठेवावा. तरुणांचा आणि त्यांच्या ऊर्जेचा वापर हा गडसंवर्धनासाठी अशा प्रकारे करता येऊ शकतो.
किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी पुरातत्व विषयात काम करणा:या संस्थांना शासकीय पातळीवर परवानगी देण्याविषयी ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. अन्यथा संवर्धन फक्त फायलीतच अडकून राहील. गड, किल्ले, गढी, कोट, तटबंदीयुक्त नगर इत्यादि सर्व दुर्गांचेच प्रकार असले तरी प्रत्येक बांधकामाचे हेतू वेगवेगळे आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकारच्या दुर्गाच्या संवर्धनाची पद्धत पण वेगळी आहे. सरसकट सर्व किल्ल्यांसाठी एकाच प्रकारे काम करता येणार नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गड-किल्ले संवर्धन म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे. त्यासाठी काही प्रमाणात आपली मानसिकता बदलणो गरजेचे आहे. सर्वसाधारणपणो आपली समजूत अशी असते की दुर्गसंवर्धन म्हणजे गड-किल्ल्यांवर जाऊन तेथे जे जे पडलेले बांधकाम आहे ते तेथे जाऊन दुरुस्त करणो, तटबंदीच्या पडलेल्या भिंती पुन्हा नव्याने उभ्या करणो, दरवाजे, सदर, वाडे इत्यादि पुन्हा बांधून काढणो. पण याला दुर्गसंवर्धन म्हणत नाहीत. कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाची पुरातत्वज्ञांनी ठरविलेली एक नियोजित पद्धत आहे.
ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या कोणत्याही किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी तीन मुख्य पाय:यांचा वापर करणो गरजेचे आहे.
1) वास्तूंचे (अत्याधुनिक पद्धतीने) सर्वेक्षण
2) वास्तूंची दुरु स्ती
3) वास्तूंचे जतन व संवर्धन
या पद्धतीने गडकोट, किल्ल्यांचे संरक्षण केले गेले तर ते योग्य पद्धतीने होईल आणि ख:या अर्थाने त्यांचे संरक्षण, संवर्धनदेखील होईल.
गडकोट, किल्ले यांच्याविषयी कितीही आस्था असली, त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावनाही चांगली असली तरीदेखील ही भावना त्याबरहुकूम केलेली कृतीच ब:याचदा या गड-किल्ल्यांच्या हानीस कारणीभूत ठरते. त्यामुळे संरक्षणाच्या मूलभूत गोष्टी माहीत करून घेऊन आणि टप्प्याटप्याने ही कृती केली गेली तर ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक. अशा सा:याच अंगांनी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या गडकोटांना पुन्हा संजीवनी मिळू शकेल. गड-किल्ल्यांचे संवर्धन करणो हे खरंच एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील 5क्क् किल्ल्यांचे संवर्धन करणो हे प्रत्यक्षात कठीण काम आहे. कारण यातील बरेच किल्ले आता नामशेष झालेले आहेत. गडसंवर्धनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती वापरण्याबरोबरच या किल्ल्यांचे महत्त्व जनतेपर्यंत पोचविणो हेदेखील एक प्रकारचे संवर्धन आहे असेच म्हणता येईल. किल्ल्यांचे जतन फक्त जागेवर न होता ते लोकांच्या मनातदेखील झाले पाहिजे, तरच ख:या अर्थाने किल्ल्यांचे संवर्धन होईल.
कसे करायचे सर्वेक्षण?
संवर्धनातील पहिली पायरी ही वास्तूंचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करणो ही आहे. सर्वेक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सहा महत्त्वाच्या पण वेगवेगळ्या पद्धतींनी किल्ल्यांचे सर्वेक्षण करता येऊ शकतो.
पुरातत्वीय सर्वेक्षण
- GIS (जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम)
- GPS (ग्लोबल पोPfशन सिस्टिम) - अक्षांश व रेखांश यांच्याद्वारे ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास.
- Google earth या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास.
टोटल स्टेशन सव्र्हे - वास्तूंचे निश्चित नकाशे बनविण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र.
ड्रॉइंग - किल्ल्यांवरील दरवाजे, वास्तू यांची मोजमापे घेऊन रेखाटन करणो.
या सर्व साधनांचा एकत्रित वापर केला असता योग्य प्रकारे सर्वेक्षण होऊ शकते. या साधनांचा वापर सर्वेक्षणामध्ये का, कशासाठी आणि कसा करायचा या गोष्टीदेखील आत्यंतिक महत्त्वाच्या आहेत.
आजही इंग्रजांचेच नकाशे!
इंग्रजांनी भारतातील सर्व भूभागाचे म्हणजे नद्या, डोंगर, रस्ते, धरणो, घाटवाटा यांचे सर्वेक्षण करून स्थाननिश्चिती करून ठेवली आहे. हे काम त्यांनी ‘सव्र्हे ऑफ इंडिया’च्या माध्यमातून 192क् ते 1925 या कालखंडात प्रसिद्ध केले होते. या नकाशांमध्ये एक कमी आहे ती म्हणजे गड-किल्ल्यांचे विस्तृत नकाशे इंग्रजांनी तयार केले नाहीत. त्यांनी फक्त महत्त्वाच्या किल्ल्यांची स्थाने या नकाशामध्ये दाखवली आहेत. जवळजवळ 9क् वर्षानंतर आजही या नकाशांचा वापर संशोधन क्षेत्रत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये केला जातो. धरणो किंवा रस्ते बांधण्यासाठी आजदेखील याच ‘सव्र्हे ऑफ इंडिया’च्या नकाशांचा वापर केला जातो. आपण आपल्या गड- किल्ल्यांचे अशा प्रकारचे नकाशे बनवून ठेवू शकलो तर ते किल्ले कसे होते हे आपण यापुढे हजारो वर्षे पाहू शकतो.
सुशोभिकरण कसे?
गडाच्या सुशोभिकरणासाठी कोणती झाडे लावावीत याचे मार्गदर्शन वनविभागातील अधिका:यांकडून घ्यावे. आपल्याला वाटतील ती झाडे आणून गडावर लावू
नयेत. झाडे लावण्याचे ठिकाण हे वास्तूपासून दूर असावे. गडावरील ऐतिहासिक स्थळापर्यंत
पोचण्यासाठी मार्ग असावेत. गडाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही अशा ठिकाणी शौचालय बांधावे. गडावर ठिकठिकाणी गडाच्या इतिहासाची तसेच गडावरील वास्तूंची माहिती देणारे फलक असावेत. गडाचा एक मोठा नकाशा दृश्य ठिकाणी लावावा
जेणोकरून पर्यटकांना गडावर फिरताना त्रस
होणार नाही.
आधुनिक तंत्राचा वापर
दुर्गसंवर्धन सुरू करीत असताना आपण ज्या किल्ल्यावर काम करण्याचे ठरवले आहे त्या किल्ल्याची सर्वप्रथम ऐतिहासिक माहिती गोळा केली पाहिजे. त्या माहितीच्या आधारे किल्ल्यावरील पुरातन वास्तू, स्थळे यांचा शोध घ्यायला हवा. त्या किल्ल्यावर कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत याची लेखी नोंद ठेवली पाहिजे.
अशा वास्तूंची स्थाननिश्चिती जी.पी.एस. या आधुनिक उपकरणाच्या साहाय्याने केली जावी. त्या वास्तू कोणत्या स्थितीत आहेत, त्यांची किती पडझड झालेली आहे याची पूर्ण माहिती लिखित व छायाचित्र स्वरूपात ठेवणो गरजेचे आहे. अशा प्रकारची माहिती संकलित करीत असताना जी.पी.एस. या यंत्रणोचा वापर करावा. जी.पी.एस.चा वापर करून किल्ल्याच्या पूर्ण तटबंदीवरून फेरा मारावा. यामुळे किल्ल्याचा निश्चित नकाशा आपल्याला मिळू शकतो. हा नकाशा संगणकावर हस्तांतरित करता येतो. संगणकावर इतर सॉफ्टवेअर्स वापरून किल्ल्यांचा पक्का नकाशा बनविता येऊ शकतो.
किल्ल्यांवरील ज्या वास्तू प्रत्यक्ष सर्वेक्षणामध्ये दिसून येत नाहीत त्या वास्तूंचा उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रंच्या माध्यमातून शोध घेता येतो. www.googleearth.com या संकेतस्थळावर उपग्रहाद्वारे घेतलेलेली छायाचित्रे मोफत उपलब्ध होऊ शकतात. उत्तम प्रतीची छायाचित्रे हवी असतील तरGoogle earth हे संगणकीय माध्यम विकत घेता येते. काही प्रसंगी उपग्रहाद्वारे माहिती देणा:या या उपकरणाच्या साहाय्याने नवनवीन किल्ल्यांचा आणि ऐतिहासिक वास्तूंचा शोध सर्वसामान्य लोकांनी घेतलेला आहे. किल्ल्यांवरील सर्व वास्तूंची स्थाननिश्चीती जीपीएस व उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रतून (www.googleearth.com) झाल्यावर त्या वास्तूंची मोजमापे सुरू करावीत. मोजमापे घेण्यासाठी टोटल स्टेशन (Total Station) या सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणा:या अत्याधुनिक यंत्रचा वापर केला तर गडातील विविध अचूक मोजमापे मिळू शकतात. आजपर्यंत महाराष्ट्रातील फक्त दहा किल्ल्यांचे टोटल स्टेशनच्या माध्यमातून सर्वेक्षण झालेले आहे. किल्ल्यांचे अशा पद्धतीने सर्वेक्षण झाले तर तेथील वास्तूंचे मूळ स्वरूप काय होते, त्यांची मोजमापे काय होती याबाबतची माहिती संकलित होऊ शकते आणि याच माहितीचा उपयोग करून किल्ल्यांचे जतन करता येते. यानंतर आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनच्या मदतीने गडावरील दरवाजे, तोफा व बंदुकांचा मारा करण्याच्या जागा, वाडय़ाची जोती, धार्मिक स्थळे यांची मोजमापे घेऊन रेखाटने करून घ्यावीत. पडलेल्या वास्तूंचे संवर्धन करताना याचा उपयोग होऊ शकतो.
वास्तूंची दुरुस्ती
गडांवरील पडलेल्या वास्तूंच्या दुरुस्तीबाबत संवर्धनाचे काही नियम केंद्रीय पुरातत्व विभागाने करून ठेवलेले आहेत. या नियमानुसारच किल्ल्यांवरील वास्तूंचे संवर्धन केले गेले पाहिजे. प्रचलित शास्त्रीय पद्धत सोडून भावनिक दृष्टिकोनातून जर दुरुस्ती करायला गेलो तर त्या वास्तूंचे विद्रुपीकरण होईल, तसेच कदाचित वास्तू जपल्या जाण्यापेक्षा त्या जास्त मोडकळीस येतील. त्यामुळे संवर्धन करणा:या संस्थांनी टप्प्याटप्प्याने संवर्धन करायला हवे. आज अनेक संस्था नकाशे व रेखाटन करण्याचे सोडून एकदम तटबंदीच्या भिंती, गडावरील वास्तू उभ्या करण्याचा अट्टहास धरतात. वास्तूंची दुरुस्ती करण्यापूर्वी त्या वास्तूचा अभ्यास करायला हवा. ती वास्तू किती मोठी आहे, तळखडे आहेत का, भिंती किती पडलेल्या आहेत याचे सर्वेक्षण करावे. दुरुस्तीची गरज खरंच कोठे आहे हे पाहावे. तटबंदीची दुरु स्ती असेल तर प्रथम पाणी जाण्यासाठी केलेल्या वाटा मोकळ्या कराव्यात. कारण वास्तूजवळ पाणी साचून राहिले तर ती वास्तू पडण्याचा संभव असतो. कोणत्याही वास्तूची दुरुस्ती करताना नव्याने किंवा वाढीव बांधकाम करू नये. त्या वास्तूला आधार देण्याइतकेच बांधकाम करावे. गडावर पोचण्याच्या वाटा सर्वात शेवटी कराव्यात. सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गवत काढणो. हे काम सातत्याने अनेक वर्षे करावे लागणार आहे. महाराजांच्या काळातदेखील किल्ल्यांवर असेच गवत वाढत होते. पण ते वेळोवेळी काढत असल्याचे उल्लेख कागदपत्रत मिळतात. पूर्वी गडावर वस्ती आणि राबता असल्याने गडाची आपोआपच स्वच्छता वरचेवर केली जात असे. पण आता गडावर कोणीच राहत नाही त्यामुळे गड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जरी संवर्धन करणा:या संस्थांनी घेतली तरी खूप मोठं काम होईल.
वास्तूंची दुरुस्ती
गडांवरील पडलेल्या वास्तूंच्या दुरुस्तीबाबत संवर्धनाचे काही नियम केंद्रीय पुरातत्व विभागाने करून ठेवलेले आहेत. या नियमानुसारच किल्ल्यांवरील वास्तूंचे संवर्धन केले गेले पाहिजे. प्रचलित शास्त्रीय पद्धत सोडून भावनिक दृष्टिकोनातून जर दुरुस्ती करायला गेलो तर त्या वास्तूंचे विद्रुपीकरण होईल, तसेच कदाचित वास्तू जपल्या जाण्यापेक्षा त्या जास्त मोडकळीस येतील. त्यामुळे संवर्धन करणा:या संस्थांनी टप्प्याटप्प्याने संवर्धन करायला हवे. आज अनेक संस्था नकाशे व रेखाटन करण्याचे सोडून एकदम तटबंदीच्या भिंती, गडावरील वास्तू उभ्या करण्याचा अट्टहास धरतात. वास्तूंची दुरुस्ती करण्यापूर्वी त्या वास्तूचा अभ्यास करायला हवा. ती वास्तू किती मोठी आहे, तळखडे आहेत का, भिंती किती पडलेल्या आहेत याचे सर्वेक्षण करावे. दुरुस्तीची गरज खरंच कोठे आहे हे पाहावे. तटबंदीची दुरु स्ती असेल तर प्रथम पाणी जाण्यासाठी केलेल्या वाटा मोकळ्या कराव्यात. कारण वास्तूजवळ पाणी साचून राहिले तर ती वास्तू पडण्याचा संभव असतो. कोणत्याही वास्तूची दुरुस्ती करताना नव्याने किंवा वाढीव बांधकाम करू नये. त्या वास्तूला आधार देण्याइतकेच बांधकाम करावे. गडावर पोचण्याच्या वाटा सर्वात शेवटी कराव्यात. सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गवत काढणो. हे काम सातत्याने अनेक वर्षे करावे लागणार आहे. महाराजांच्या काळातदेखील किल्ल्यांवर असेच गवत वाढत होते. पण ते वेळोवेळी काढत असल्याचे उल्लेख कागदपत्रत मिळतात. पूर्वी गडावर वस्ती आणि राबता असल्याने गडाची आपोआपच स्वच्छता वरचेवर केली जात असे. पण आता गडावर कोणीच राहत नाही त्यामुळे गड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जरी संवर्धन करणा:या संस्थांनी घेतली तरी खूप मोठं काम होईल.
वास्तूंचे जतन
गडाची दुरुस्ती आणि संवर्धन पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी गडावरील वास्तूंचे जतन आणि सुशोभिकरण हा भाग येतो. कोणत्याही गड-किल्ल्यांवरील महत्त्वाची आणि मोठी वास्तू म्हणजे तटबंदी. तटबंदीतून पाणी गडाबाहेर जाण्यासाठी ठिकठिकाणी जागा असाव्यात. म्हणजे तटबंदीच्या पायामध्ये ओल साचत नाही. किल्ल्यांच्या दरवाज्याची दुरुस्ती झाल्यावर तेथेदेखील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशी सोय करायला पाहिजे. गडावरील धार्मिक वास्तूंची डागडुजी करावी. पण ते करत असताना ते बांधकाम गडाच्या वातावरणाला शोभेल असावे. त्यामध्ये भडक रंग वापरू नयेत. मूळ बांधकामासारखं करण्याचा प्रयत्न असावा. गडावरील शिलालेखाचे जतन करण्यासाठी प्रथम त्याचे वाचन करून घेऊन ते प्रसिद्ध करावे. त्यानंतर कागदाच्या लगद्याचा वापर करून त्याचे ठसे घ्यावेत. शिलालेखावर पावसाचे पाणी पडणार नाही अशी व्यवस्था करावी. ज्या रसायनांची शिलालेखाच्या दगडाशी प्रक्रिया होणार नाहीत अशीच रसायने वापरावीत, जेणोकरून वातावरण बदलाचा थेट परिणाम शिलालेखावर होणार नाही. शिलालेख भिंतीवर असेल तर त्याच्या बाजूने एक काचेची चौकट बसवावी व हवा खेळती राहण्यासाठी काही छिद्रं ठेवावीत. गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करताना तो गाळ कुठेही टाकू नये. एका ठिकाणी गोळा करून ठेवावा आणि त्याची नोंदही ठेवावी. गडावरील स्वच्छता करीत असताना सापडलेल्या वस्तू एकत्र ठेवून पायथ्याच्या गावात छोटे संग्रहालय उभे करण्याचा प्रयत्न करावा. फक्त गडावरीलच नाही, तर गडाच्या घे:यातील गावांमध्ये जे विरगळ, सतीशीळा यादेखील त्या संग्रहालयात ठेवता येतील.