शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर’वेड्या शैलेशचा ‘नाद’वेडा छंद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:22 IST

गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली.

संतोष कुंडकरयवतमाळ:गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली. वाद्यांचा अभ्यास होऊ लागला. ही वाद्य आपल्याला घरीच बनवता येतील का, या प्रश्नाने पुढे तो अस्वस्थ व्हायचा. त्याचं हे अस्वस्थ होणं त्याला एका आगळ्या छंदाकडे घेऊन गेलं. आज तो घरच्या घरीच अनेक वाद्य तयार करीत आहे. शैैलेश उमेश राखुंडे असं या छंदवेड्या युवकाचं नाव आहे. माणसाला कोणत्याही गोष्टीची आवड असली की, ती गोष्ट पूर्णत्वास येण्यास वेळ लागत नाही. त्याच्याही बाबतीत नेमकं तेच घडलं. १९ वर्षीय या नवतरूणाचा हा छंद आता सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट हे साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शैलेशचे आजोबा दिनकर राखुंडे हे सुतार काम करतात. नातवाची आवड त्यांनी हेरली आणि त्याला विविध वाद्य कसे तयार करायचे, याचे धडे दिले. यातून शैलेश घडत गेला.तो १२ वर्षांचा असताना सर्वात अगोदर त्याने खंजिरी बनविली. त्याचा वाद्य बनविण्याचा एकूणच प्रवास कौतुकास्पद आहे. त्याने आजवर विणा, तानपुरा, सीतार, सोलमंडल, सारंगी, गिटार, बॅन्जो, किंगरी, मेंडोलीन, व्हायोलिन, बासरी, शहनाई, डमरू, तबला, ढोलक, नाल, हार्मोनियम, शैैल स्वर, शैल सारंगी, तारपेटी आदी वाद्ये तयार केली आहेत. वाद्य बनविण्यासाठी लागणारं साहित्य तो नागपूर, पुणे गुजरात, कोलकाता आदी भागातून आणतो. आयटीआयचे प्रशिक्षण घेणारा शैलेश हार्मोनियममध्ये विषारद होण्यासाठी तयारी करीत आहे.तो उत्तम हार्माेनियम वादकदेखील आहे. विविध संघटनांमार्फत अनेकदा पुरस्कार पुरस्कार देऊन त्याच्या या छंदाचा गौरवदेखील करण्यात आला आहे. ‘सूर’वेड्या शैैलेशला हा ‘नाद’ वेडा छंद भविष्यात व्यवसायात रूपांतरीत करायचा आहे. स्वत:चा उद्योग उभारून त्याद्वारे विविध वाद्ये तयार करायची असल्याचे तो म्हणाला.

टॅग्स :musicसंगीत