शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:42 AM

बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या अंध:कारातून प्रकाशाच्या दिशेने पडणाºया पावलांचा थक्क करणारा प्रवासही या सावलीत अनुभवास येत आहे.

-अविनाश कोळी -मळलेले, काळवंडलेले, फाटलेले कपडे... जटांचा डोईवरचा वाढत जाणारा भार...जनावरांप्रमाणे उकीरड्यावर होणारा उदरनिर्वाह...अडगळ, फुटपाथ किंवा गलिच्छ भागातील आसरा अशा गोष्टींमुळे समाजातील प्रतिष्ठित लोक बेवारस लोकांना, मनोरुग्णांना किळसवाणे ठरवितात. एकीकडे हा दृश्य गलिच्छपणा आणि दुसरीकडे विचारांनी, अन्यायकारक कृत्यांनी जपलेला पांढरपेशा समाजातील गलिच्छपणा दिसून येतो. समाजासाठी यातील कोणता गलिच्छपणा घातक असतो, हे सांगायची कोणाला गरज नाही. तरीही दृश्य स्वरूपात गलिच्छ वाटणाºया अशा बेवारस लोकांना मरणाच्या दाढेत ढकलून आपला समाज आपल्याच विश्वात रमत असतो; पण समाजातील काही घटक आजही अशा बेवारस मनोरुग्णांच्या पदरी आलेले झिडकारलेपण पाहून अस्वस्थ होतात.सांगलीच्या इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर व त्यांच्या पथकाने सांगलीतील अशा लोकांना इन्साफ देण्याचा लढा उभारला. केवळ प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करणाऱ्यांच्या गर्दीत त्यांची कृतिशील पावले अधिक प्रभावी ठरली.मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून फिरणाºया मनोरुग्णांना त्यांचे घर मिळवून देण्यापासून त्यांची सुश्रूषा करणे, त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या संघटनेने केल्या. प्रसंगी कुटुंबातील व्यक्तींचे दागिने गहाण ठेवून त्यांनी या बेवारस लोकांना जपण्याचे काम केले. पदरमोड करीत कर्जाच्या खाईत लोटल्यानंतरही त्यांच्या विचारांची बैठक कधी डळमळीत झाली नाही. बेघरांसाठी एक जागा, एखादी इमारत मिळावी म्हणून कित्येक वर्षे धडपडणाºया या फाऊंडेशनला अखेर विद्यमान महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांनी साथ दिली. आपटा पोलीस चौकीजवळील बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळेत ‘सावली’ हे केंद्र सुरू केले. बघता-बघता फाऊंडेशनने शहरांमध्ये फिरून २७ लोकांना याठिकाणी आसरा दिला. यातील सातजणांना त्यांचे घरही शोधून दिले.शाळेतील खोल्यांमध्ये स्वच्छता करून प्रत्येकासाठी कॉट, गादी, बसण्यासाठी खुर्च्या, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा बºयाच सुविधा येथे उपलब्ध केल्या आहेत. जटा काढून, दाढी करून, अंघोळ घालून स्वच्छ कपड्यानिशी त्यांना नव्या विश्वात आणण्याचे काम फाऊंडेशनचे कार्यकर्ते करीत असतात. माया गडदे, रफिक मुजावर, अभिजित साळुंखे, राहुल चौगुले, बसवराज होसमणी, वंदना काळे, आदी कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहेत. लहान मुलांप्रमाणे अनेकांची सेवा करावी लागते. केवळ दररोज सायंकाळी हे मनोरुग्ण याठिकाणी पासिंग बॉल, क्रिकेट असे खेळही खेळत असतात. दररोज चहा, नाष्टा, जेवण यांसह रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवाही पुरविल्या जातात. नग्न मनोरुग्णांना आता स्वत: कपडे घालण्याचा आनंद वाटतो. इतका बदल या केंद्राने त्यांच्या जीवनात घडविला. सध्या महापालिका येथील सर्व खर्च करीत असली तरी, समाजातील माणुसकी जपणाºया लोकांच्या मदतीचे हातही या केंद्राला हवे आहेत. बेवारस म्हणून फिरणाºयांना एक मोठे कुटुंब यातून गवसले. अनिश्चिततेच्या दरीत कोसळणाºया या माणसांना सच्चा माणसांचे हात लाभले आणि ‘सावली’च्या माध्यमातून पोळलेल्या या जिवांना शीतल सावली गवसली.(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)