माझ्या खाद्यसंस्कृतीचा शोध.

By admin | Published: August 22, 2015 06:31 PM2015-08-22T18:31:41+5:302015-08-22T18:31:41+5:30

जगतांना अनेक लहानमोठे प्रसंग आणि घटनांना सामोरं जावं लागतं, सगळ्याच घटनांची नोंद मेंदूत होत नाही; पण काही अगदी किरकोळ प्रसंग कधीच विसरले जात नाहीत. आपण सगळेच नकळतपणो अनेक वैचारिक बिजं घेत असतो आणि त्यांचा समुच्चय एका विशिष्ट पातळीवर जाऊन त्यास धुमारे फुटतात.

Search for my food culture. | माझ्या खाद्यसंस्कृतीचा शोध.

माझ्या खाद्यसंस्कृतीचा शोध.

Next
- शाहू पाटोळे
 
 
जगतांना अनेक लहानमोठे प्रसंग आणि घटनांना सामोरं जावं लागतं, सगळ्याच घटनांची नोंद मेंदूत होत नाही; पण काही अगदी किरकोळ प्रसंग कधीच विसरले जात नाहीत. आपण सगळेच नकळतपणो अनेक वैचारिक बिजं घेत असतो आणि त्यांचा समुच्चय एका विशिष्ट पातळीवर जाऊन त्यास धुमारे फुटतात. 
त्याचं कारण असं आहे की, आता घराघरात आयते मसाले शिरलेत. काळ्या मसाल्याचा उटारेटा बायकांकडून होत नाही अन् कंदु:यांची संख्या घटलीय. 
म्हणजे येत्या काही वर्षात ज्या ज्या गावामध्ये दूरचित्रवाणी संच वाहिन्यांसह पोहोचलेत तिथली मूळ खाद्यसंस्कृती लोप पावत जाणार आहे. आपल्या देशातील अनेक जातीसमूहांच्या खाद्यसंस्कृती या त्या त्या प्रदेशातील तथाकथित अभिजनांच्या अदृश्य धाकाने दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्याची जाणीव व्हावी म्हणून मी पुस्तक लिहीलं. त्याचं नाव  ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’.
माङया या पुस्तकामागचा  ‘फ्लॅशबॅक’ असा :-
चौथीत होतो. 1969 साली परंडय़ाला वडील नोकरीस होते. घरापासून जिल्हा परिषदेची शाळा लांब होती. 
आम्ही दोघे शेजारी मित्र आणि वाटेत मळा लागायचा तिथून माळी यायचा, तिघांचाही डबा वगैरे नसायचा. शाळेतून परतायला दुपारचा एक वाजायचा. 
एकदा माळीची आई आम्हाला जेवा म्हणाली. त्या म्हणाल्या, ‘‘त्या वासरांसमोरचं पाळं घे आणि हाळावर धुवून आण.’’ 
मला त्या दोघांपासून लांब बसवलं होतं. त्यांनी माङया पाळ्यात वरुन ताक  ओतलं. मिठाचे चार खडे फेकले, भाकरी हातावर ङोलायला सांगितली आणि कुस्कूर खा म्हणाल्या. त्यांच्या सुचनेनुसार जेवणानंतर पाळं हाळावर धुतलं अन् गोठय़ाच्या भिंतीवर उन लागेल असं पालथं घातलं. 
नंतर मी आणि माझी ब्राह्मण वर्गमत्रीण दोघे घरी पोहोचलो आणि नित्याप्रमाणो तिच्या घरात सर्वत्र हुंदडलो.
वडलांची उस्मानाबादला बदली झाली आणि एक वेगळं जग पहिल्यांदा समोर येत गेलं. 
आईने मला पाचवीपासूनच बोर्डिगला टाकल्याने नेमकं पहिल्या महिन्यापासूनच मी ‘बी.सी.’ आहे हे समजलं. तिथे सगळ्या जातींची मुलं एकाच पंक्तीला असत. पण कधी कधी आमचे सुपरिटेंडेट आम्हाला ‘एम.आर.’, ‘सी.आर.’ ‘एम.जी.’ अशा बीसीतील जातींची वर्गवारी सांगायचे.  कधी कधी काही सर वर्गात हुशारी दाखविल्यावर किंवा खोडय़ा काढल्यावरही ,‘सरकारचे जावई’ किंवा ‘बीसीगिरी करू नको’ असे झापायचे. पण त्याचा अर्थबोध होत नव्हता. 
सुट्टीत गावी आल्यावर मात्र आम्ही ‘मांगवाडय़ात’ राहतो हे कळलं. म्हणजे ती जातनिहाय घरांची वस्ती होती. मध्ये रस्ता सोडून महारवाडा इत्यादी. अर्थात प्रत्येक जातींच्या वेगवेगळ्या वस्त्या असलेले मानवी समूह तिथे ‘गुण्यागोविंदाने’ राहत होते. शिवाय आड सुद्धा जातीनिहाय होते. स्मशानसुद्धा. 
मराठा किंवा तत्सम कुणाचं गावजेवण असेल, देवकार्याचं जेवण असेल तर जातनिहाय पंगती बसत. पंगत एकच असेल तर पंगतीच्या शेवटी बी.सी.आणि पंगती अनेक उठणार असतील तर शेवटची पंगत बीसींची. आमचा मान असलेल्या पंक्तीला मात्र आम्ही ‘चांगभलं’ म्हटल्याशिवाय पंगत सुरु होत नसे. 
वेशीला कुंकू लावलं की त्यादिवशी चुली पेटत नसत. सहावीला असतांना शनिवारी गावी आलो तर दुरडीत चतकोर तुकडा नाही. आजी म्हणाली आज पंगत आहे. मी रडून गोंधळ घातला आणि आईने चूल पेटवून भाकरी थापल्या. त्यानंतर मी कुठल्याच पंक्तीला गेलो नाही. 
खाटीक आल्यावर किंवा गावातलं कुणाचं जनावर मेलं की होणा:या त्या लगबगी, भांडणं, मटण शिजतांना घराघरातून पसरणारे ते वास, रानभाज्या, सुगीतली वेगवेगळी कालवणं. सणासुदीला येणारी वाढणं, शिळ्यापाक्यांची रेलचेल. शिळ्याला खाण्यायोग्य ठेवण्याच्या धडपडी. कमी धान्य, अन्न असताना त्यातही खाण्यायोग्य कसं करता येईल यासाठी मायमाऊल्यांची चाललेली धडपड. 
सगळ्याच जातीसमूहाचं अन्न काही फरक सोडले तर एकसारखंच. शिवारातून येणारं धान्य सगळ्याच जातीच्या लोकांनी पिकवलेलं; पण तेच स्वयंपाक घरांमधून गेलं की पवित्र-अपवित्र. शिवाशिव. 
सगळ्याच जाती धर्माचे लोक विहीरी खोदण्यसाठी घाम गाळीत. गोंब घेत. पाणी लागल्यावर आनंद व्यक्त करीत. पण तेच ‘पाणी उजविलं’ की ते आमच्यासाठी अप्राप्य व्हायचं. गावानं काही फुकाचे मान दिलेले. अशा प्रकारच्या एका वेगळ्या शाळाबाह्य शाळेत मी नकळतपणो खूप काही शिकत होतो.
वर्ष 1979. बारावीत नापास झालो. उस्मानाबादेत तेव्हा मौजमजेसाठी सटरफटर कामं करु लागलो. वडलांना भाकरी घालण्यासाठी आजी खोली करून राहायची. 
शेजारी बहुतेक खेडय़ातून शहरात आलेल्या सधन मुस्लिमांची वस्ती. त्यांच्या कोंबडय़ा मेल्या किंवा मांजरीने जखमी केल्या तर त्या आमच्या घरात यायच्या. एकदा मी सटकलो आणि सरळ भांडणं केली. आजी मला म्हणाली,’ आपल्या पायरीनं रहावं.’
वर्ष 2क्क्1. राजपत्रित अधिकारी होऊन बरीच वर्ष झाली होती. ब्राह्मणाचं एकही घर नसलेल्या माङया गावी आलो होतो. आमच्या लेकुळकीच्या घरी मला अगदी कौतुकाने आणि आग्रहाने चहाला बोलावलं. 1974-75 नंतर पहिल्यांदाच स्वत:च्या गावातील एका ‘सवर्णघरी’ चहाला गेलो. बसलो. गप्पा सुरु होत्या. 
आता मी मोठय़ा पदावर काम करतोय याचं यजमान आणि यजमानणीला अत्यंत कौतुक होतं. ते जाणवत होतं. त्यांच्या कौतुकात अगदी मनमोकळा आपलेपणा होता. 
टवके उडालेल्या कपबशीत चहा आला. प्यालो. आईने सहजच फक्त माझी कपबशी उचलली आणि विसळून बाहेरच्या देवळीत पालथी घालून ठेवली.
लहानपणापासूनच ‘अपारंपारिक’ असं वाचनाचं व्यसन लागलेलं.  त्या वाचनातून आम्ही कुठेच दिसत नव्हतो. दलित आत्मकथनांनी वाचकांना तेव्हा खूप ‘क्रेझी ’ आणि ‘एक्साईट’ केलं होतं.  आज आपल्याकडे उच्चवर्णिय जाती आम्ही कसे मागास आहोत हे दाखविण्याचा कसोशीने प्रय} करताहेत. अगदी सुरुवातीची, बलुतंच्या नंतरची आत्मकथनं मला त्याच अभिनिवेशासारखी वाटत. 
सगळीच तशी नव्हती; पण त्यातला खाद्यजीवनाबद्दलचा भाग खूपच रंजक वाटे आणि 
मी सुखावून जाई. की, चला बुवा आपल्यासारखे खाणारे ब:याच मोठय़ा प्रदेशात पसरलेले आहेत. आणि ते छापून येतंय! पण त्यांच्या रेसिपीज कुणी देत नव्हते. फक्त उल्लेखच तेवढे.
काही अदलित मित्र मला ‘त्या’ पदार्थाबद्दल विचारायचे तेव्हा मी त्याबद्दल सविस्तर सांगायचो. पण दलितांमधली न शिकलेली आणि साक्षरसुद्धा ‘आपण आता ते तसलं खात नाही’ हेच भासविण्याचा प्रयत्न करायचे. काहींनी खरोखरच ‘ते’ खाणं सोडलं होतं आणि ते तसा चारचौघांत डंका वाजवायचे. 
मराठीतल्या काही प्रथितयश नियतकालिकांनी काही शहरांमधली निवडक उपाहारगृहे, खाणावळी यांची कौतुकं सुरू केली. रेसिपीज येऊ लागल्या. त्यात आमचं काहीच नव्हतं. मी 1992 साली तेव्हाच्या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रकडे लेखरूपी रेसिपीज पाठविल्या. त्या छापल्या गेल्या नाहीत.
 दलित साहित्यातली आत्मकथनं विरळ होत गेली. दलित शब्दांचा कोश निघाला. पण आम्ही जे खायचो ते कुठंच येत नव्हतं. आमचं खाद्यजीवन कुठे सापडतं का याचा मी सातत्याने शोध घेत होतो. चित्रवाहिन्यांच्या गजबजाटात तर जवळपास प्रत्येक वाहिनी खाद्यपदार्थाबद्दल वेगळा वेळ देऊ लागल्या. पण अगदी एकाही वाहिनीवरून अपवादानेसुद्धा आमच्या खाद्यजीवनाची साधी दखलसुद्धा घेतली जात नव्हती. माङया मुलांच्या पिढीला तर काहीच देणं-घेणं नव्हतं.
तेव्हा मी ठरवलं की आता या अशा लुप्त होत जाणा:या माङया पूर्वजांच्या खाद्यसंस्कृतीचं ‘डॉक्युमेंटेशन’ करायचं. ही आता पन्नाशीत असलेल्या माङया पिढीची जबाबदारी आहे. कारण यापुढे कॉण्टीनेण्टल खाद्यसंस्कृतीचं आक्रमण अपरिहार्य आहे. त्यासमोर जुनं काहीच टिकणार नाही. निदान पुढच्या पिढीला आपले पूर्वज कसे राहत होते आणि काय खात होते, आपल्या गुणसूत्रंमध्ये काय काय भरलेलं आहे याची उत्सुकता वाटली तर ती शमावी हा उद्देश यामागे आहे.
माङया मित्रच्या आईने वयाच्या आठव्या वर्षी नकळतपणो मला माझी पायरी दाखवून दिली तेव्हा तिचा मला राग आला नव्हता. आणि वाढत्या वयानुसार तर मला या प्रकाराची कीव यायला लागली. पुढे असे बरेच ठाशीव अनुभव येत गेले. त्यावर माङया परीने मी कुणाच्या घरी न खाण्याचं आपसूकच ठरून गेलं. खाद्यजीवनातील उच्च-नीचतेची मुळं सापडतात ती श्रीमद्भागवतावर बेतलेल्या सांप्रदायांमधून आणि त्यांच्या अनुयायांमधून. म्हणून मी या साहित्यात आणि त्यांच्या वा्मयात आमच्या खाद्यसंस्कृतीला कोणतं स्थान दिलेलं आहे, याचाही मागोवा घेतला. त्यातून हेही उलगडलं की, आम्ही जमल्यास श्रवण पाळावा. अशा अनेक सामाजिक विसंगती आहेत. त्याबद्दल सामान्यजनांना काहीच देणंघेणं नसतं. निदान एक प्रश्न पडणारा नागरिक म्हणून तरी मला ‘मी कोण आहे?’ असा प्रश्न पडतो. 
त्या प्रश्नातल्या खाद्यजीवनाच्या भागाचं उत्तर म्हणजे हे पुस्तक ! 
 
(लेखक केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यात राजपत्रित अधिकारी आहेत.)
 
shahupatole@gmail.com

Web Title: Search for my food culture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app