रोबो!
By Admin | Updated: July 11, 2015 18:39 IST2015-07-11T18:39:07+5:302015-07-11T18:39:07+5:30
जर्मनीमधील फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणा-या कंपनीत एका रोबोने कामगाराला उचललं आणि थेट एका लोखंडी प्लेटवर जोरात आदळलं. त्यात त्याचा जीव गेला. या घटनेने जगभरात एका नव्या ‘संघर्षा’ची चर्चा सुरू झाली आहे, त्यानिमित्त!

रोबो!
> ‘पर्यायी मानवा’च्या निमित्तानं नवा ‘वर्गसंघर्ष’?
- पवन देशपांडे
भारतात संगणकाचं युग येण्याआधी एक ‘वर्गसंघर्ष’ उभा राहिला होता.
‘माणसांची कामं आता संगणक करणार असेल तर मग माणसांनी काय करायचं? गोरगरिबांनी काय उपाशी मरायचं?.’ - एक मोठाच वाद त्यावेळी उभा राहिला होता.
रोबोच्या निमित्तानं (आणि रोबोनं नुकत्याच घेतलेल्या एका जिवानंतर) असा एक वाद आणि अनेक प्रश्नचिन्ह आता उभे राहू पाहताहेत.
घरकाम करायला रोबो.
रस्ते साफ करायला रोबोट.
घरातली वीज गेली, दुरुस्ती करायला रोबो.
इकडचे उचल, तिकडे ठेव अशा कामांनाही रोबो.
डॉक्टर उपलब्ध नाही, तुम्हाला तपासण्यासाठी, ऑपरेशनसाठी रोबो.
प्रवासाला जायचंय, बॅग उचलायला रोबो.
एखादी वस्तू-गाडी तयार करायचीय, आग विझवायचीय, देशाच्या सीमेवर पहारा द्यायचाय, परग्रहावर जायचंय. तरीही रोबोच.
ही दुनियाच आता रोबोवर चालणार का?
सा:या जगात नवनव्या प्रकारचे रोबो तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. ‘स्वत:च’ विचार करणारा आणि भावना समजणारा रोबो बनवून त्याला मानवाच्या जागी उभा करण्याचा कारनामाही संशोधक लवकरच करून दाखवतील. जेवढी मानवांची संख्या तेवढीच रोबोटची, अशी स्थितीही निर्माण होईल. त्यासाठीची धडपडही जगभरातील शास्त्रज्ञांत सुरू आहे.
आपला जीव धोक्यात न घालता रोबोला घातक कामं करायला लावायची, जी डोक्याची कामं नाहीत, अशी कामहीं रोबोच्या हातून करून घ्यायची. असा एक नवा ट्रेंड जगभरात रुळू पाहतो आहे.
पण हे रोबोट्स किती सुरक्षित? माणसांची अनेक कामं ते हलकी करताहेत, पण माणसाची ‘आज्ञा’ पाळताना माणसांचाच जीव ते घेऊ लागले तर? या चर्चेला खतपाणी मिळालं तेही एका निमित्तानं.
जर्मनीमधील फोक्सव्ॉगन या वाहननिर्मिती करणा:या कंपनीत एका रोबोनं कर्मचा:याचा जीव घेतल्याची घटना नुकतीच घडली आणि जगभरात पुन्हा एकदा ‘रोबो विरुद्ध मानव’ अशी चर्चा सुरू झाली.
वाहनाचे विविध भाग गोळा करून ते एका यंत्रत भरण्याची जबाबदारी रोबोवर होती. त्यात काही बिघाड झाला म्हणून हा कामगार रोबो दुरुस्त करण्यास गेला़ रोबो सुरू झाल्याबरोबर त्याने कामगाराला उचललं आणि थेट एका लोखंडी प्लेटवर जोरात आदळलं. त्यात त्याचा जीव गेला.
यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित झाला.
या घटनेत चूक कोणाची? याच विषयावर इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्राध्यापक डॉ. ब्ले व्हिटबे यांनी ‘लोकमत’ला सांगितलं, ‘या किंवा अशा कोणत्याही घटनेत सध्या तरी आपण रोबोला जबाबदार ठरवू शकत नाही. कारण तेवढे पुढारलेले तंत्रज्ञानच अजून निर्माण झालेले नाही.’
ज्या रोबोनं कामगाराचा जीव घेतला त्याचं काम एकच होतं, विविध भाग गोळा करून ते यंत्रत भरायचे. रोबोची दुरुस्ती केल्यावर काम सुरू केलं तेव्हा त्यानं कामगाराला वस्तूचे विविध भाग म्हणूनच उचललं आणि जोरात आपटलं. तशीच त्याची कामाची पद्धत होती. त्याचं प्रोग्रामिंगच तसं होतं.
पण या घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रतील रोबोच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षात औद्योगिक क्षेत्रत काम करणा:या रोबोची संख्या प्रचंड वाढली आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या आकडेवारीनुसार दोन वर्षापूर्वी विविध क्षेत्रत काम करणा:या रोबोची संख्या 25 ते 30 लाखाच्या घरात होती. केवळ 2क्13 या सालात उद्योगांसाठी विकल्या गेलेल्या रोबोची संख्या एक लाख 78 हजार एवढी होती. केमिकल, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक उद्योगांमध्ये रोबोची मागणी वाढतेच आहे. त्यामुळे ही संख्या येत्या काही वर्षात 6क् ते 8क् लाखांर्पयत जाईल, असा अंदाज आहे. उद्योगक्षेत्रतील रोबोच्या वाढत्या संख्येमुळे कामगारांमध्ये खदखद आहे. आपला रोजगार जाईल अशी त्यांना भीती आहे. पण सध्या जी कामं रोबोकरवी करून घेतली जात आहेत ती एकतर अवघड किंवा धोकादायक आहेत. ही कामं करताना माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळेच रोबोची संख्या वाढते आहे. पण त्यातून निर्माण होणा:या धोक्यांची शक्यताही बळावते आहे.
ज्या प्रकारे आपणच रोबोची निर्मिती करून त्यांना अवघड कामांना जुंपलं, त्याचप्रकारे रोबोना हाताळताना घ्यावयाची काळजी याचंही उत्तम ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. कारण फिड केलेल्या प्रोग्रामनुसार ज्या कमांड रोबोटला मिळतील त्यानुसारच तो काम करणार. शिवाय रोबोची संख्या वाढल्यामुळे, जगभरातल्या कामगारांना ‘नवा’ प्रतिस्पर्धी निर्माण होतोय, त्या ‘वर्गसंघर्षा’ची चुणूकही दिसायला लागलीय. त्याचं काय?.
याही प्रश्नांची उत्तरं आता शोधावी लागणार आहेत.
- जगभरात रोबोच्या जन्माचं ‘बाळंतपण’
गेल्या काही वर्षात रोबोवर खर्च करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 2क्1क् साली रोबोवर 975 अब्ज रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतरच्या दहा वर्षात सुमारे 4355 अब्ज रुपये खर्च होतील असा अंदाज बोस्टन कन्सल्टींग ग्रुपने तयार केलेल्या अहवालात वर्तविण्यात आला होता. त्याचे कारण होते उत्पादन, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तू निर्मिती क्षेत्रत रोबोचा वापर करण्याची अहमहमिका मोठी वाढली आहे आणि त्यामुळे या क्षेत्रतील कामगारावरील खर्च तब्बल 22 टक्क्यांनी कमी झाला आहे.
- जपानला रोबो हाच पर्याय?
जपानमध्ये दुकाना-दुकानांत आता रोबो काम करताना दिसतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण तेथील काम करू शकतील अशा लोकांची संख्या घटत चालली आहे.
- आता ‘रोबो आर्मी’?
‘रोबोची आर्मी’ तयार करण्याचा विचार अनेक देशांनी सुरू केला आहे. पण असं करणं धोकादायक आहे. आपण काहीतरी तारतम्य ठेवायला हवं आणि अशा गोष्टींपासून दूरच राहायला हवं, असं डॉ. ब्ले व्हिटबे यांचे म्हणणं आहे. रोबोच्या हाती शस्त्रं दिली तर त्यांच्या प्रोग्रामिंगमुळे निष्पाप जिवांचाही बळी जाण्याची शक्यता आहे.
- ‘हिरो’ रोबो
हॉलिवूडमध्ये रोबोचे पात्र असलेले अनेक चित्रपट आले आहेत आणि त्यातले अनेक गाजलेही आहेत. स्टार वॉर चित्रपटांमधील आयर्न मॅन, आर-2, डी-2 आणि सीपी 30, टर्मिनेटरमधील टी-8क्क् आणि रोबोकॉप, डॉक्टर हूमधील सोंटारन, आय चित्रपटातील सोन्नी अशी पात्रं अनेकांच्या लक्षातही आहेत.
- ‘येम्याडोक्या’चा वापर यापूर्वीही.
- 1979 साली अमेरिकेत मिशिगनमधील फोर्डच्या कारखान्यात रोबोच्या हाताचा फटका डोक्याला लागल्याने कामगाराचा मृत्यू झाला होता.
- 1981 साली जपानमध्ये रोबो बसवताना विद्युतपुरवठा कामगाराच्या चुकीने सुरूच राहिला. त्यामुळे रोबोने त्याचे काम सुरू ठेवले आणि इतर वस्तूप्रमाणो त्याने कामगाराला उचलून थेट ग्राइंडिंग मशिनमध्ये टाकले. त्यात कामगाराचा मृत्यू झाला होता.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)