शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

रिव्हर राफ्टिंग....

By admin | Updated: January 9, 2016 14:04 IST

नद्यांचा उपयोग साहसी क्रीडा प्रकारांसाठी होऊ शकतो याकडे आपले लक्ष वेधले गेले ते 1977 साली एडमंड हिलरी आणि कॅप्टन एम. एस. कोहली यांनी काढलेल्या ‘ओशन टू स्काय’ या मोहिमेमुळे.

डर के आगे.. ‘मजा’ भी है...
 
- मकरंद जोशी
 
 
‘ओशन टू स्काय’
नद्यांचा उपयोग साहसी क्रीडा प्रकारांसाठी होऊ शकतो याकडे आपले लक्ष वेधले गेले ते 1977 साली एडमंड हिलरी आणि कॅप्टन एम. एस. कोहली यांनी काढलेल्या ‘ओशन टू स्काय’ या मोहिमेमुळे. या मोहिमेत बंगालच्या उपसागराकडून हिमालयातील नंदप्रयागपर्यंत जेट बोटीने प्रवास करण्यात आला, तेव्हा भारतातील नद्यांमध्ये वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटता येईल हे पहिल्यांदा लक्षात आलं. त्यानंतर 1984 मध्ये ‘उत्तर गंगा राफ्टिंग एक्सपिडीशन’ घेण्यात आलं. यात अलकनंदा, भागीरथी आणि गंगा मिळून 3क्क् कि.मी. अंतराचं राफ्टिंग करण्यात आलं. त्यानंतर हळूहळू रिव्हर राफ्टिंग या साहसी क्रीडा प्रकाराने भारतातल्या नद्यांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. 
 
 
माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणा:या एडमंड हिलरींना एकदा प्रश्न विचारला गेला होता की, ‘तुम्ही पर्वतारोहण का करता?’ त्यावर त्यांचं उत्तर अगदी साधं होतं, ‘पर्वत त्यासाठीच तर आहेत’. निसर्गातील पर्वत, कडे, नद्या, तलाव हे केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर थेट अनुभवण्यासाठीच आहेत, अशा विचाराच्या लोकांमुळे फोफावलेला पर्यटनाचा थरारक प्रकार म्हणजे अॅडव्हेंचर टुरिझम. 
बसमधून किंवा गाडीतून दिसणारा निसर्ग फक्त पाहण्याऐवजी त्याचा आनंद साहसी क्रीडा प्रकारातून घ्यायला पाहिजे, असं मानणा:या धाडसी पर्यटकांना मग कधी सह्याद्रीतले गड-कोट साद घालतात, तर कधी हिमालयाची शिखरे पुकारतात. आता हे माउंटेनिअरिंग, रॉक क्लायंबिंग म्हणजे फारच धाडसी लोकांचं काम असं वाटणा:या आणि मनातून काहीतरी वेगळा अनुभव घ्यायला उत्सुक असलेल्या पर्यटकांसाठी जे अनेक पर्याय आहेत त्यातला एक म्हणजे रिव्हर राफ्टिंग.
नदी म्हटल्यावर अनेकदा ‘संथ वाहते कृष्णामाई’ असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण काही नद्या विशेषत: हिमालयात उगम पावणा:या नद्या डोंगराळ भागातून वाट काढताना अशा उसांडत, फोफावत, उसळत वाहतात की त्यांचा तो पांढराशुभ्र, फेसाळता प्रवाह जणू तुम्हाला आमंत्रित करत असतो. अशा उसळत्या, फेसाळत्या प्रवाहामध्ये लाटांवर स्वार होऊन नदीच्या वेगवान प्रवाहात जलसफर करण्याची कल्पना जितकी रोमांचक आहे, त्याहूनही तो अनुभव रोमांचक असतो. आपला भारत देश नद्यांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेमधल्या गंगा-यमुना, दक्षिणोतल्या कावेरी-गोदावरी, पूर्वेची ब्रrापुत्र आणि मध्य भारतातील नर्मदा यांना आपल्या संस्कृतीत, लोकजीवनात, अर्थकारणात महत्त्वाचे स्थान आहे. 
उत्तर भारतामधील गंगा, सतलज, बियास, तर पूर्व भारतातील तिस्ता, लडाखमधील सिंधू, झंस्कार या नद्यांमध्ये पर्यटकांसाठी रिव्हर राफ्टिंगचे आयोजन करणा:या व्यावसायिक कंपन्या निर्माण झाल्या. आरंभीच्या काळात रिव्हर राफ्टिंग फक्त उत्तर भारतातल्या नद्यांमध्येच शक्य आहे असा समज होता; पण व्यवसाय म्हणून राफ्टिंग रुजू लागल्यावर दक्षिण भारतातही यासाठीच्या जागा शोधण्यात आल्या. त्यामुळे कर्नाटकातील दांडेलीच्या काली नदीत आणि महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीमध्ये राफ्टिंगसाठी अनुकूल प्रवाह सापडले आणि या ठिकाणीही राफ्टिंग सुरू झाले. नॅशनल जिओग्राफिकने दिलेल्या जगातील दहा सर्वोत्तम राफ्टिंग ठिकाणांमध्ये नेपाळ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, टर्की, ङिाम्बाब्वे या देशांतील जागांचा समावेश आहे.
काय लागतं राफ्टिंगसाठी? - तर नदीचा वेगाने वाहणारा, उसळता प्रवाह. या प्रवाहाला जितका जास्त वेग, त्यात जितके जास्त खडक आणि तो जितका वळणदार तितकी राफ्टिंगची मजा वाढत जाते. अशा प्रवाहावर स्वार होण्यासाठी जे राफ्ट वापरले जातात ते सिंथेटिक रबरापासून किंवा विनायल फॅब्रिकपासून तयार केलेले असतात आणि त्यात हवा भरून ते फुगवावे लागतात. साधारणत: 11 ते 2क्  फुटांपर्यंत हे राफ्ट लांब असतात आणि 6 ते 8 फूट रुंद. राफ्टिंगच्या परिभाषेत नदीच्या ज्या प्रवाहात राफ्टिंग केले जाते त्याला रॅपिड्स म्हणतात. हा प्रवाह किती वेगवान आहे, त्यात किती खडक आहेत, प्रवाहाला किती जोर आहे यावर त्या त्या रॅपिडची श्रेणी ठरते. 1 पासून ते 5 पर्यंतच्या श्रेणी मानल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील कुंडलिका नदीतल्या रॅपिड्सची श्रेणी 3 आणि 4 मानली जाते. गंगेच्या किंवा तिस्ता नदीच्या प्रवाहात आपण राफ्टिंग करतो तेव्हा त्या नदीला नैसर्गिकपणो आलेला जोर, वेग असतो. कुंडलिका नदीवर दोन जलविद्युत प्रकल्प आहेत, भिरा आणि रावळजे. या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमधून ठरावीक काळाने पाणी नदीच्या प्रवाहात सोडले जाते, त्यावेळी मोठा भोंगा वाजवून काठावरच्या लोकांना इशारा दिला जातो. काठावरच्या लोकांसाठी असलेला हा सावधगिरीचा इशारा राफ्टिंगसाठी आलेल्या मंडळींसाठी ‘बी रेडी’चा असतो. कारण त्यानंतर येणा:या पाण्याच्या लोंढय़ावर तर राफ्टिंगची मजा अनुभवता येणार असते. या लोंढय़ाचा वेग आवेग किती असेल यावर तुमच्या राफ्टिंगचा थरार अवलंबून असतो. जेव्हा नदीच्या ओसंडून वाहणा:या खळाळत्या प्रवाहात तुमचा राफ्ट लोटला जातो आणि त्या प्रवाहाबरोबर वाहू लागतो तेव्हा ‘ड्रेनलाइन रश’ म्हणजे काय याचा साक्षात अनुभव मिळतो. भोवतीचे वेगाने वाहणारे पाणी, त्यावर डचमळणारा राफ्ट, अंगावर बसणारे पाण्याचे हबके, कानावर पडणा:या इन्स्ट्रक्टरच्या सूचना, त्यानुसार वल्ही मारताना होणारी त्रेधातिरपिट या सगळ्यामध्ये आपण नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करतोय आणि एक आयुष्यभराची आठवण जमा करतोय ही भावना मनाला सुखावत असते. 
आता रिव्हर राफ्टिंग म्हणजे अनुभवायलाच पाहिजे असा थरार वगैरे ठीक आहे हो; पण हा खेळ कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. योग्य ती काळजी घेतली तर हा खरोखरच सुरक्षित खेळ आहे. बहुतेक राफ्टिंग पॉइंट्सवर लाइफ जॅकेट्स, हेल्मेट्स ही संरक्षक साधने दिली जातात आणि कृपया ती अवश्य वापरावीत, त्यात हयगय करू नये, तसेच राफ्टिंग करण्याआधी इन्स्ट्रक्टर ज्या सूचना देतात त्यांचे पालन करावे. ज्यांना पोहता येत नाही अशा व्यक्तीही रिव्हर राफ्टिंग करू शकतात, मात्र त्यांनी ग्रेड 3 च्या पुढच्या रॅपिड्समध्ये जाऊ नये. राफ्टिंग करताना बरोबरच्या मित्रंबरोबर चेष्टा- मस्करी करण्यापेक्षा आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ खेळण्यापेक्षा इन्स्ट्रक्टरच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. प्रवाहात मोठा खडक असेल तर हाताने किंवा तुमच्या वल्ह्याने तो टाळण्याचा प्रयत्न करू नका, त्यात तुम्हालाच इजा होईल. त्यापेक्षा त्यावरून राफ्टला उसळी मारू द्या, फारतर राफ्ट फाटेल, पण ते जास्त स्वस्त असेल. समजा तुम्ही राफ्टमधून बाहेर फेकला गेलात तर घाबरू नका, तुमचं लाइफ जॅकेट तुम्हाला नक्की बुडू देणार नाही. अर्थात या सूचना केवळ खबरदारी म्हणून.
 तेव्हा मंडळी शिमला-मनाली टूरमध्ये किंवा सिक्कीम-दाजिर्लिंगला गेल्यावर रिव्हर राफ्टिंगचा थरार जरूर अनुभवा. इतक्या लांब जायचे नसेल तर महाराष्ट्रात कोलाडला कुंडलिका नदी आहेच. मग डर के आगे. फन है हे विसरू नका आणि अॅडव्हेंचर टुरिझमचा आनंद घ्या.  
makarandvj@gmail.com