शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

दंगल

By admin | Published: December 31, 2016 1:03 PM

हरयाणातल्या बलाली गावातल्या घरी अंगणातल्या खाटेवर हुक्का पितापिता महावीरसिंग फोगट ‘लोकमत’ला सांगत होते, ‘मेरा बस इतणाही कहणा था, की लडकी अगर प्रधानमंत्री बण सकती है, डाक्टर बण सकती है, तो कुश्ती क्यूं नही लड सकती?’

- सचिन जवळकोटे

मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून त्यांना गर्भातच खुडून टाकण्यात माहीर लोकांचा बेरहम दणकट प्रदेश.. हरियाणा. तिथल्या एका कोपऱ्यातल्या गावातला मल्ल चारचार पोरी जन्माला घालतो, वरून भावाच्या दोन दत्तक घेतो, या सहा जणींना थेट कुस्तीच्या आखाड्यात उतरवून घुमत्या नौजवान पोरांबरोबर त्यांची ‘दंगल’ लावतो आणि ‘गोल्ड मेडल आणलंत तरच तुमची खैर, रिकाम्या हाताने घरी परताल, तर काठीने फोडून काढीन’ असा दम भरून पोरींना घाम गाळायला लावतो, हे सगळं भैताडच.महावीरसिंग फोगट त्या मल्लाचं नाव.आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या गीता फोगट आणि बबिताकुमारी या त्याच्या पोरी. सुरुवात कशी झाली, हे आठवताना गीता सांगते,‘एक दिन बडी सुबह पापाने हमे जगाया और पुछा, कितनी दूरीतक दौड सकते हो? चलो, दौड लगाते है..’ - दिवसही धड फुटला नव्हता.दहा वर्षांची गीता आणि आठ वर्षांची बबिता. दोघी पोरी डोळे चोळत, आपापसात खुसखुसत बापाच्या मागे शेतात निघाल्या... आणि इशारा झाल्यावर जीव खाऊन पळत सुटल्या. ...आपल्या पळत्या पावलांखालच्या वाटेला अंत नसणार आहे, हे कळण्याचं वय नव्हतं त्यांचं.‘बहोत मजा आया... फिर रोज हम दौड लगाने लगे’ - गीता सांगते.महावीर ताऊंची नजर पक्की होती. त्यांनी पोरींचं पाणी जोखलं आणि आठव्या दिवशी घराशेजारच्या शेतात नवा आखाडा खणायला घेतला. माती उपसली. वर एक पत्र्याचं छप्पर टाकलं.दंगल सुरू झाली...गीता आणि बबिता रोज नेमाने आखाड्यात घुमू लागल्या. आजा-पणजाने बापाला शिकवलेले कुस्तीतले पेच अंगात मुरवू लागल्या.कुस्ती करायची म्हणजे अडचणी दोन. बायकांचे कपडे आणि केस.बापाने पोरींसाठी गुडघ्यापर्यंत येतील आणि अंगालगत बसतील अशा घट्ट चड्ड्या शिवून घेतल्या आणि दोघींचे केस पार मानेच्या वर कापून घेतले.अशा अवतारात पोरी पळायला जात. चारचौघांदेखत दोरीच्या उड्या मारत.गावात कुजबुज होतीच. बघता बघता रान पेटलं. महावीरसिंगांना विरोध वाढू लागला. कधी समोरासमोर, कधी आडून प्रश्न विचारले जाऊ लागले.‘शरम नही आत्ती तुझे? लडकीसे दंगल लडवायेगा? उन्हे लंगोट पहनायेगा? बेशरम है क्या?’- पण ना पोरी मागे हटल्या, ना त्यांचा बाप!

(लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)