शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

Rethinking the Regional

By admin | Updated: August 8, 2015 14:57 IST

जवाहरलाल दर्डा कला अकादमीचे ‘श्लोक’ हे व्यासपीठ आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रलय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स येथे ‘रिथिंकिंग द रिजनल’ या चित्र-शिल्पप्रदर्शनाचे गेल्या शुक्रवारी उद्घाटन झाले. दि. 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणा:या प्रदर्शनाच्या निमित्ताने..

- शीतल दर्डा
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या आधुनिक कलेचा भारतीय इतिहास गावखेडय़ांतून आलेल्या कलावंतांनी संपन्न केला. खेडय़ापाडय़ांतून उच्चशिक्षणासाठी महानगरांकडे गेलेले, तिथेच स्थिरावलेले कलावंत जागतिक कीर्तीचे धनी झाले. त्यांच्या चित्रंत त्यांच्या प्रादेशिक भूतकाळाचे धागे सदैव गुंफलेले राहिले. काही उमेदीच्या पावलांना महानगरांच्या वाटा गवसल्या नाहीत, काहींना त्या गवसूनही परवडल्या नाहीत. काही अवलियांनी महानगरांकडे फिरकणोही नाकारले. या अशा हरवल्या, सापडल्या नव्या-जुन्या वाटांचा माग काढण्याचा हा एक समृद्ध प्रयत्न आहे!
 
 
समृद्धीच्या गर्वाने माना उंचावून उभी असलेली, गावकुसातल्या प्रत्येकाला आपल्या दिशेने खेचून घेणा:या चुंबकासारखी उन्मत्त शहरे.. आणि सगळ्याच शर्यतीत मागे पडलेली, धूळभरली, उदास, एकेकटी खेडी.. हे एकेकाळच्या भारताचे चित्र होते, हे खरे.
पण तो झाला इतिहास!
जागतिकीकरणाच्या आव्हानाला पुरून उरलेल्या आणि अधिक सशक्त झालेल्या समकालीन भारताची वीण वेगळी घडते आहे. अवाजवी भाराने जडावलेल्या शहरांच्या व्यवस्था घायकुतीला येत असताना, जगाच्या स्पर्धेत टक्कर घेत उभे राहण्याचे रांगडे सामथ्र्य घेऊन गावकुसातली माणसे धडाडीने पुढे येत आहेत. या माणसांना त्यांच्या ‘खेडय़ा’चा संकोच नाही, उलट खेडय़ापाडय़ांतल्या असुविधांचे अडथळे ओलांडणो भाग पडल्याने तासले गेलेले त्यांचे  ‘हुनर’ हेच त्यांचे खरे सामथ्र्य आहे.. आणि शहरातल्या एकरंगी गर्दीत उठून दिसणारे त्यांचे वेगळेपणही!
काहीच उपलब्ध नसण्याच्या ‘संकटा’चे  ‘संधी’त रूपांतर करून ग्रामीण भागातून भरारी घेणा:या पहिल्या पिढीच्या उद्योजकांच्या  ‘स्टार्ट-अप’ कहाण्या घ्या, किंवा गावच्या मातीतून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन धडकलेले खणखणत्या क्षमतेचे खेळाडू; एकेकाळी ‘स्मॉल टाऊन’ म्हणून इंग्रजीतून हिणवल्या गेलेल्या प्रादेशिक भारताची ही नवी समृद्ध ओळखच जागतिकीकरणाच्या लाटेला तोंड देतानाचे आपल्या देशाचे सामथ्र्य बनली आहे.
जे व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रत, खेळाच्या मैदानात, मनोरंजनाच्या पडद्यावर आणि शेतीच्या प्रयोगशील जमिनीत, तेच कलेच्या क्षेत्रतही तितकेच खरे आहे.
कलेची साधना, त्यातील तंत्र-विकास आणि कलावंत म्हणून बहरण्याला पोषक असलेली महानगरीय पाश्र्वभूमी न लाभलेले अगणित कलावंत चित्र-शिल्पकलेचे अवकाश समृद्ध करून गेले आहेत. महानगरीय गजबजाटापासून दूर प्रादेशिक मातीत रुजलेल्या, कधी जगण्याभोवतीच्या हतबल गुंतागुंतीने भोवंडलेल्या, तर कधी स्पर्धेपासून मुक्त अशा ताणरहित अनुभवांनी बहरलेल्या त्यांच्या कलाजाणिवा हे अशा ‘प्रादेशिक’ कलावंतांचा वेगळेपणा अधोरेखित करणारे सामथ्र्य ठरलेले आहे.
केवळ भौगोलिक संदर्भात ‘प्रादेशिक’ ठरवले गेलेले हे कलाविश्व महानगरीय जाणिवांच्या समस्तरावर ठळकपणो उमटवण्याचा एक प्रयत्न म्हणजेच  ‘रिथिंकिंग द रिजनल’.
- जे जे म्हणून प्रादेशिक, त्याच्या मूल्यमापनाची नवी दृष्टी, नवा विचार!
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सच्या सहयोगाने ‘श्लोक’ या कलाचळवळीचे 
 
राष्ट्रीय स्तरावरचे हे पहिले कला-प्रदर्शन!
जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या पंखांखाली सहा वर्षापूर्वी ‘श्लोक’ हे नवे व्यासपीठ जन्माला आले, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोप:यात विखुरलेल्या चित्र-शिल्पकारांना एक हक्काचे ठिकाण मिळावे, अशी अपेक्षा होती.
- महानगरात कलावंतांना उपलब्ध असलेल्या परस्पर-संपर्काच्या सुविधा आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या चित्रकारांच्या शोधात ‘श्लोक’बरोबर माझाही प्रवास सुरू झाला.
पहिले प्रदर्शन झाले मार्च 2क्क्8 मध्ये. औरंगाबादच्या या चित्रप्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता आणि ग्रामीण भागात काम करणा:या तरुण चित्रकारांबरोबर ‘श्लोक’च्या नात्याचा प्रारंभही!
आधुनिक कलाविष्काराचे माहेरघर असलेल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सच्या कलादालनात सजलेले ‘रिथिंकिंग द रिजनल’ हे कलाप्रदर्शन म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कलाविष्काराच्या जुन्या-नव्या श्रीमंतीचा उत्सवच आहे. गेल्या सुमारे शंभर वर्षातली महाराष्ट्राची समृद्ध कलापरंपरा एकाच छताखाली आणणारा हा प्रयोग अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या सहा दशकांमधला आधुनिक कलेचा भारतीय इतिहास गावखेडय़ांतून आलेल्या कलावंतांनीच संपन्न केलेला दिसेल. अनेकांची सुरुवात कोणा कानाकोप:यातल्या छोटय़ा खेडय़ात झाली. तिथले संस्कार घेऊन उच्चशिक्षणासाठी महानगरांकडे वळण्याची संधी मिळालेले आणि उत्तरायुष्यात तिथेच स्थिरावलेले कितीतरी नामवंत कलावंत पुढे जागतिक कीर्तीचे धनी झाले. या ज्येष्ठ नामवंतांच्या चित्रतले त्यांच्या प्रादेशिक भूतकाळाचे धागे सदैव गुंफलेले राहिले. 
काही उत्सुक, उमेदीच्या चित्रकारांच्या पावलांना महानगरांच्या वाटा गवसल्या नाहीत, काहींना त्या गवसूनही परवडल्या नाहीत. 
काही अवलिये असेही होते, ज्यांनी महानगरांकडे फिरकणोही नाकारले.
- या अशा हरवल्या, सापडल्या, नाकारलेल्या वाटांचा माग घेतघेतच ‘रिथिंकिंग द रिजनल’ हे कलाप्रदर्शन आकाराला आले आहे. 
पश्चिम भारताच्या - प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्याच्या - चित्रपरंपरेबरोबरच या भागातले तरुण वर्तमानही या कलाप्रदर्शनात एकवटलेले दिसेल. काही नावे जागतिक स्तरावर गाजलेली. कित्येक गुणवंत काळाच्या उदरात अनामिकपणोच विसावलेले. 
अशा अनामिकांना ‘हात’ देत असल्याची भावना ‘श्लोक’च्या मनाशी नाही. केवळ महानगरांच्या संपर्क-जाळ्यात नाही म्हणून महाराष्ट्राच्या ज्या कलासामथ्र्याकडे आजवर काहीसे दुर्लक्ष झाले, केले गेले; त्या सामूहिक चुकांच्या परिमाजर्नाचाच हा एक छोटा प्रयत्न आहे.
देशाच्या हृदयात धडकणा:या आणि सशक्त धमन्यांमधून सळसळणा:या ‘प्रादेशिक’ सामथ्र्याची शुभ्र कॅनव्हासवरची ही देखणी मांडणी आहे!
 
(लेखिका जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या 
‘श्लोक’ या व्यासपीठाच्या मुख्य प्रवर्तक आहेत.)