दूरचा रस्ता

By Admin | Updated: July 5, 2015 15:35 IST2015-07-05T15:35:24+5:302015-07-05T15:35:24+5:30

अमेरिकेने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली म्हणून आपली फेसबुक भिंत सप्तरंगात रंगवताना याची जाणीव हवी, की भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

Remote road | दूरचा रस्ता

दूरचा रस्ता

>- ओंकार करंबेळकर
 
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशभरात सर्व राज्यांमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यानंतर एलजीबीटी समुदायाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जगभरात फेसबुक प्रोफाईल धडाधड सप्तरंगी करण्यास सुरुवात झाली. भारतातही उत्साहाने हे फोटो सप्तरंगी केले गेले. 
- यासंदर्भात भारतातली गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आणि अजूनही पाठिंबा-विरोधाच्या, स्वीकार-नकार-चेष्टा आणि टिंगलीच्या घोळातून सुटू न शकलेले सामाजिक वास्तव पाहता, आपल्याकडे हा टप्पा गाठणो अजूनतरी पुष्कळ दूर, दुस्तरच दिसते.
अमेरिकेत गेल्या आठवडय़ात हे घडले त्यामागे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षाचा इतिहास आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोणतेही न्यायालय केवळ त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला वाटले म्हणून या प्रकारचे निर्णय देत नाही आणि तसे देऊही शकत नाही. गेल्या चाळीस वर्षामध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या सामाजिक मंथनाचा आणि लैंगिकतेकडे पाहण्यासंबंधीच्या मूल्यांमध्ये कालोचित बदल व्हावेत म्हणून झालेल्या प्रयत्नांचा हा संघटित विजय आहे. तेथील नागरिकांनी समलैंगिक नात्यासारखे म्हटले तर व्यक्तिगत स्तरावरचे नवे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक मंथनाबरोबर राजकीय आधारही घेतला. सत्तरच्या दशकामध्ये गे-लेस्बियन  प्रश्नावर विचार सुरू झाला. याच चळवळीमध्ये एका व्यक्तीचे नाव आदराने घेतले जाते  : हार्वे मिल्क.
193क् साली न्यू यॉर्कमध्ये एका लिथुआनियन ज्यू कुटुंबात जन्मलेल्या मिल्कचे सुरुवातीचे सामाजिक-आर्थिक आयुष्य चारचौघांप्रमाणोच होते. शिक्षण संपल्यावर त्याने अमेरिकन नौदलातर्फे कोरियन युद्धात सहभागही घेतला.  पण त्याला स्वत:बद्दल एका नव्या गोष्टीची जाणीव वयाच्या सोळाव्या वर्षीच झाली होती. आपण समलैंगिक आहोत आणि आपल्याला मुले आवडतात हे त्याला समजले होते आणि वैयक्तिक आयुष्यात त्याची काही मुलांशी नातीही तयार झाली होती. पण सार्वजनिक आयुष्यात त्याने याचा कधीही उच्चर केला नाही. 197क् च्या दरम्यान त्याने सॅनफॅ्रन्सिस्कोला राहण्याचा निर्णय घेतला. दुस:या महायुद्धानंतर सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये समलैंगिक व्यक्ती स्थायिक होण्यास सुरुवात झाली होती.  मिल्कलाही सॅनफ्रॅन्सिस्कोआवडले व त्याने तेथील कॅस्ट्रो रस्त्यावर कॅमेरा स्टुडिओ सुरू केला. शहरातील वाढत्या समलैंगिकांच्या संख्येकडे राजकीय नेत्यांचेही लक्ष होतेच. 
मिल्कने 1973 च्या सुमारास शहरातील समलैंगिकांच्या प्रश्नावरती लक्ष द्यायला सुरुवात केली. समलैंगिकांना होणारा त्रस, गे-बार्सवर पडणारे छापे, त्यातून गे विरुद्ध पोलीस असा होणारा संघर्ष नेहमीचाच झाला होता. याच पाश्र्वभूमीवर मिल्कने राजकारणात प्रवेश करायचे ठरवले आणि कॅस्ट्रो डिस्ट्रिक्ट विभागातून सुपरवायझर पदासाठी अर्ज केला. मिल्कला पहिल्याच प्रयत्नामध्ये 16,9क्क् मते आणि 32 उमेदवारांमध्ये त्याला दहावे स्थान मिळाले. पराभव मान्य करून मिल्कने पुन्हा समलैंगिकांच्या समस्यांकडे लक्ष वळविले. त्याने आणि इतर गे उद्योजकांनी मिळून युरेका व्हॅली र्मचट्स असोसिएशन नावाने संघटना स्थापन केली. मिल्क त्याचा अध्यक्ष झाला. समलैंगिकांनी समलैंगिकांच्या दुकानातून खरेदी करावी असे तो आग्रहाने सांगत असे. 
 1975 मध्ये निवडणुकीत आणखी एकदा अपयश आल्यानंतर अखेर 1977 मध्ये त्याला सुपरवायझरपद मिळविण्यात यश मिळाले. 9 जानेवारीपासून त्याचा सुपरवायझर म्हणून सिटी कौन्सिलमधील कार्यकाळ सुरू झाला. अल्प अशा त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने समलैंगिकांच्या विरोधातील भेदभावाला विरोध करणारे विधेयक मंजूर करून घेतले. 1978 मध्येच सॅनफ्रॅन्सिस्कोला समलैंगिकांचा प्रचंड मोठा प्राईड मार्च आयोजित करण्यात आला. साडेतीन लाखार्पयत लोक यामध्ये सहभागी झाले होते. याच समुदायासमोर मिल्कने ‘होप स्पीच’ या नावाने ओळखले जाणारे त्याचे प्रसिद्ध भाषण दिले. आपण सगळे जुनाट कल्पना, असत्य आणि विकृत कुरुपतेविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. कोषामध्ये लपून राहिलो तर आपल्याला कधीच अधिकार मिळणार नाहीत, असे तो सांगत असे. 
मात्र पाठिंबा मिळू लागलेला असताना हार्वे मिल्कचा हा प्रवास अचानक थांबला. मिल्क आणि शहराचे महापौर मोस्कोन यांची मानसिक संतुलन ढळलेल्या डॅन व्हाइट या माजी सुपरवायझरने अगदी जवळून गोळ्या झाडून हत्त्या केली. या घटनेने संपूर्ण शहराला धक्का बसला. 2क्क्9 साली त्याच्या जीवनावर आधारित मिल्क हा सुप्रसिद्ध चित्रपट जगभरात सर्वत्र गाजला. अमेरिकेच्या राजकारणात सुरू झालेल्या नव्या मतप्रवाहाचे मिल्कच्या हत्त्येमुळे नुकसान झाले. मात्र त्याच्यामुळे एक नवा खुला विचार सर्व अमेरिकेच्या समोर आला, हे निश्चित. 
- मिल्क हे एक उदाहरण झाले. अशा अनेकांनी मंदगतीने का असेना, पण अमेरिकन जनभावना बदलण्यास मदत केली. त्यातून राजकीय दबावगट उभे राहावेत यासाठी धडपड केली. अशा अनेक टप्प्यांवरून अमेरिकेने प्रवास केला आहे. जगभरातल्या इतर देशांचाही प्रवास फार वेगळा नाही. मे महिन्यामध्ये आर्यलडने सरळ मतदान घेऊन समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता दिली. मतदारांपैकी 62 टक्के मतदान अशा विवाहास मान्यता देण्याच्या बाजूने करण्यात आले. 2क्13 साली फ्रान्स, ब्राझील, न्यूझीलंड, इंग्लंड (व वेल्स) यांनी त्यास पाठिंबा दिला. 2क्क्1 मध्ये नेदरलँडस आणि 2क्क्6 मध्ये दक्षिण आफ्रिकेने समलिंगी विवाहाच्या मागे उभे राहण्याचे घोषित केले. 
 
अमेरिकेप्रमाणो इतर देशांनीही या सामाजिक-राजकीय  व्यासपीठाचाच वापर यासाठी केला.  
भारतालाही याच मार्गाने जावे लागेल. समलैंगिकतेसंबंधातली व्यापक जनभावना बदलेल, अनुकूल होईल यासाठी प्रयत्न करणो आणि त्यातून राजकीय निर्णयप्रक्रियेवर दबाव टाकणो हा तो रस्ता होय!
भारतातल्या राजकीय नेत्यांमध्ये समलैंगिकतेबद्दलची जाण दुर्दैवाने अगदीच प्राथमिक स्तरावरची आणि गैरसमज-अज्ञानाने भरलेली आहे. समलैंगिकतेकडे विकृती किंवा पाश्चात्त्य संकल्पना अशा दृष्टीने पाहिले जाणो हे अगदी सरसकट म्हणावे असेच आहे. कित्येक नेत्यांना समलेैंगिकता ही जीवन पद्धती (लाइफस्टाईल) वाटते. कदाचित हे खरेच अज्ञान असू शकेल किंवा त्यामागे राजकारणाच्या सोयीसाठी अज्ञानाचा सोयीस्कर बुरखा पांघरून बसण्याची अपरिहार्यताही असू शकेल.  
- हे बुरखे ओढून काढणो हा भारतीय लढाईतला पहिला आणि मोठा आव्हानात्मक टप्पा आहे.  लैंगिकतेच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी समाजातील सर्व स्तरांमध्ये आणि राजकीय नेत्यांसाठीही विशेष प्रयत्न करावे लागतील. द्रमुकच्या तिरुची शिवा यांनी राज्यसभेत तृतीयपंथीयांच्या हक्कांसदर्भात विधेयक मांडले. असा हळूहळू प्रवास भारतानेही सुरू केला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अधिकाधिक मंथन होऊन हा विषय राजकीय पटलावर येईल अशी आपण अपेक्षा करू. तुर्कस्थानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुर्द, वांशिक अल्पसंख्याक आणि एलजीबीटी एकत्र आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष एदरेगान यांना अपेक्षित जागा मिळविता आल्या नाहीत हा ताजा इतिहास आहेच.
भारतामध्ये समलैंगिक संबंध गुन्हा ठरविणा:या कलम 377 वर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय केवळ न्यायपालिकेने घ्यायचा नसून संसदेने याबाबत निर्णय घ्यायचा आहे असे स्पष्ट केले. त्यामुळे संसदेची जबाबदारी वाढली आहेच म्हणजेच जाणत्या, संवेदनशील नागरिकांची, गटांची जबाबदारी वाढली आहे. केवळ फेसबुकवर सप्तरंगी फोटोंनी हा लढा पुढे सरकणार नाही, त्याबरोबर अधिकाधिक विचारमंथनाची जोड हवी. 
अजूनही समलिंगी संबंध शिवीसारखे वापरणा:या, नाटक-सिनेमात त्याचा गंमत म्हणून वापर करणा:या आपल्या समाजाला अमेरिकेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही.
 
स्वप्नांची थट्टा उडवू नये..सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अमेरिकेच्या सर्व घटकराज्यांमध्ये समलैंगिक विवाहांना संमती मिळाली आहे. हा निर्णय देण्यामध्ये अग्रणी असणारे न्यायाधीश अँथनी केनेडी आपल्या निवाडय़ात म्हणतात,
‘‘समलिंगी जोडपी आता लग्न करण्याचा मूलभूत अधिकार वापरू शकतील. यापुढे हे स्वातंत्र्य त्यांना नाकारले जाणार नाही. समलिंगी जोडप्यांना समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या संस्थेबाहेर ठेवणो अपमानकारक आणि अयोग्य आहे. कोणतेही मीलन लग्नापेक्षा उत्कट नाही, कारण लग्न हे प्रेम, निष्ठा, समर्पण, त्याग आणि कुटुंब या परमोच्च आदर्शांचे प्रतीक आहे. लग्नबंधनामुळे स्त्री-पुरुष त्यांच्या लग्नाआधीच्या रूपापेक्षा अधिक उदात्त होतात. समलिंगी पुरुष आणि स्त्रिया लग्नाच्या संकल्पनेचा अनादर करतात, हा गैरसमज आहे. त्यांची याचिका सांगते की ते लग्नसंस्थेचा आदर करतात, या संस्थेमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता शोधतात. त्यांच्या आशेची आपण थट्टा उडवू नये. आपल्या संस्कृतीतल्या सगळ्यात जुन्या संस्थेपासून त्यांना वंचित ठेवून एकाकी आयुष्य जगायला भाग पाडू नये. इतरांप्रमाणोच आम्हालाही कायद्याने प्रतिष्ठा मिळावी अशी समलिंगी समाजाने मागणी केली आहे. घटनेने त्यांना हा हक्क आता बहाल केला आहे.’
 
कोंडी फुटण्याची निदान सुरुवात
 
भारतीय दंडविधान संहितेनुसार अजूनही समलैंगिक संबंध हा गुन्हा असला तरी समाजात समलैंगिक व्यक्तींचे अस्तित्व मान्य केले जात आहे. चित्रपट, नाटकांमधून त्यावर चर्चा होत आहे. मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रंतून त्याबद्दल मुक्तपणो लिहिले जात आहे. नुकतेच एका वर्तमानपत्रमध्ये मुंबईच्या हरीश अय्यर यांच्या आईने आपल्या मुलासाठी वर हवा अशी जाहिरात दिली होती, तर याच महिन्यात ‘द व्हिजीट’ ही लेस्बीयन जाहिरातदेखील चर्चेचा विषय ठरली आणि आश्चर्य म्हणजे भेटीला येत असलेल्या पालकांना आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगूया असे म्हणणा:या या जाहिरातीतल्या तरुणींचे बहुश: स्वागतच झाले, टिंगल अगर अवमान नव्हे!
 
 
 
डॉ.लिओ वराडकर
मे महिन्यामध्ये मतदान घेऊन आर्यलडने समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता दिली.  एका विशेष व्यक्तीचा या सगळ्या मोहिमेबद्दल सन्मान केला जात आहे: आर्यलडचे आरोग्यमंत्री लिओ वराडकर.  डब्लिनमध्ये 1979 मध्ये भारतीय पिता व आयरिश मातेच्या पोटी जन्मलेल्या लिओ यांची राजकीय कारकीर्द  लवकर सुरू झाली. शिक्षणाने व पेशाने लिओ डॉक्टर आहेत. यावर्षी  आपल्या 36 व्या वाढदिवशी लिओ यांनी आपण समलिंगी असल्याचे जाहीर केले. त्यावेळेस ते म्हणाले, मी समलिंगी आहे ही माझी ओळख नाही, मी अर्धा भारतीय आहे हीसुद्धा नाही, मी डॉक्टर राजकारणी किंवा समलिंगी राजकारणीही नाही. या सर्व गोष्टी केवळ माझी ओळख सांगणारे विविध घटक आहेत. डॉ. वराडकर हे समलैंगिकता जाहीर करणारे पहिले कॅबिनेट मंत्री बनले. या महिन्यात झालेल्या मतदानासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मतदानातून लोकांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिल्यावर आनंदी झालेल्या लिओ यांनी, मला समान नागरिक होण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, अशी संयत प्रतिक्रिया दिली.
 

Web Title: Remote road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.