शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नाते गुरू- शिष्याचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:34 IST

शिक्षक पूर्वी गुरुजी, नंतर मास्तर आणि आता सर किंवा टीचर म्हणून समाजात ओळखला जातो. गु = गुण, रु = रुजविण्याची, जी = जिद्द ‘गुण रुजविण्याची जिद्द’ म्हणजे गुरुजी. मास्तर या शब्दातही असाच अर्थ दडलाय. मा म्हणजे माँ म्हणजेच आईच्या स्तरावर जाऊन समजून घेणारी व्यक्ती. आजकाल ‘सर’ शब्दाने शिक्षक ओळखला जातो. शिक्षक समाजाचे भवितव्य घडवीत असला तरी त्याचे भवितव्य कसे असते, हे समजून घेण्याची उत्सुकता आपणास असेल म्हणूनच हा लेखन प्रपंच.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले जयंती विशेष!

राहुल भडांगे/लोकमत न्यूज नेटवर्कशिक्षक पूर्वी गुरुजी, नंतर मास्तर आणि आता सर किंवा टीचर म्हणून समाजात ओळखला जातो.गु = गुण, रु = रुजविण्याची, जी = जिद्द‘गुण रुजविण्याची जिद्द’ म्हणजे गुरुजी. मास्तर या शब्दातही असाच अर्थ दडलाय. मा म्हणजे माँ म्हणजेच आईच्या स्तरावर जाऊन समजून घेणारी व्यक्ती. आजकाल ‘सर’ शब्दाने शिक्षक ओळखला जातो. शिक्षक समाजाचे भवितव्य घडवीत असला तरी त्याचे भवितव्य कसे असते, हे समजून घेण्याची उत्सुकता आपणास असेल म्हणूनच हा लेखन प्रपंच.शिक्षक म्हणून समाजात खूप मानसन्मान मिळतो. पूर्वी एवढा मान सन्मान आज नसला तरी आजच्या युगात इतरांना मिळणाऱ्या मान सन्मानापेक्षा शिक्षकाला मिळणारा मान सन्मान मोठा व जास्त आहे याचे खूप समाधान आम्हा शिक्षकांना आहे. शिक्षक नोकरीला लागल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत समाजात सर्वांच्या आदरास पात्र ठरतो. शिक्षण म्हणजे भविष्य आणि ते घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची असते. अनेक शिक्षक त्या जबाबदारीनुरूप कामही करतात. मुलांना शिकते करतात. त्यांच्या अडचणी सोडवितात. त्यांना शिकण्यात पदोपदी मदत करतात. शिक्षक मुलांचे मित्र आणि मार्गदर्शक असतात. पालकांएवढीच ते मुलांची काळजी घेत असतात. किंबहुना शाळेतील ते मुलांचे पालकच असतात. मुलांनाही शिक्षकांवर खूप विश्वास असतो. एखादी चुकीची गोष्ट शाळेत सांगितली किंवा शिकविली आणि घरी येऊन पालकांनी कितीही विश्वासाने ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षकांनी सांगितलेलेच बरोबर असते एवढा विश्वास मुले शिक्षकांवर ठेवत असतात.शाळा या आधुनिक गुरुकुलात शिक्षक नावाचे गुरु आपल्या शिष्यांचे भवितव्य घडविण्याचे अत्यंत पवित्र कार्य करीत असतात. आजची मुले उद्याचे भवितव्य आहे. म्हणून मुले घडविणे म्हणजे देश घडविणे होय. देश घडविण्याचे, देश पुढे नेण्याचे महान आणि अद्वितीय कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षकास आजच्या समाजातील पगारी समाजसेवक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही मूठभर शिक्षक वरील वर्णनास पात्र नसतीलही. पण बहुतांश शिक्षक देश घडविण्याचे आपले काम अतिशय इमानेइतबारे करीत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी