..‘संदर्भ’ चुकलेच आहेत!
By Admin | Updated: May 30, 2015 14:54 IST2015-05-30T14:54:07+5:302015-05-30T14:54:07+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ प्रदान करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेऊन त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रतील काही मुद्यांबाबत विरोध प्रकट करणारे एक जाहीर पत्र जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले. (मंथन दि. 17 मे) अविनाश धर्माधिकारी यांनी या पत्रचा केलेला प्रतिवाद मंथनमध्ये दि. 24 मे रोजी प्रसिध्द झाला. धर्माधिकारी यांनी मांडलेल्या मुद्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका..

..‘संदर्भ’ चुकलेच आहेत!
>शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ प्रदान करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेऊन त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रतील काही मुद्यांबाबत विरोध प्रकट करणारे एक जाहीर पत्र जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले. (मंथन दि. 17 मे) अविनाश धर्माधिकारी यांनी या पत्रचा केलेला प्रतिवाद मंथनमध्ये दि. 24 मे रोजी प्रसिध्द झाला.
धर्माधिकारी यांनी मांडलेल्या मुद्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका..
श्री. अविनाश धर्माधिकारी
यांस
स.न.वि.वि.
मी श्री. ब. मो. पुरंदरे यांना लिहिलेल्या पत्रची दखल घेत आपण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण करणारे जे लिखाण त्यांनी केले आहे, त्याचे समर्थन करीत मला पत्रने उत्तर दिलेत त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार!
यापूर्वीची अनुल्लेखाने मारायची प्रथा तरी आता कमीत-कमी मोडकळीस निघाली याचे समाधान वाटते. आम्ही दखल घेण्याइतपत आहोत हा विचार आपल्या मनात आला हेदेखील आमच्यासाठी थोडे-थोडके नाही. खरेतर चूक आमचीच आहे. आम्ही साठ वर्षे गाढ निद्रावस्थेत होतो आणि आम्हांला खडबडून जाग आली ती जेम्स लेनच्या पुस्तकामधील मजकुराने. पण, आता मात्र एकदा जागे झालेलो आम्ही झोपूच शकत नाही. या संपूर्ण नाटय़ाची सुरुवात श्री. ब. मो. पुरंदरे यांनी केली.
आपल्या पत्रमध्ये आपण असे सांगितले आहे की, इयत्ता चौथीमध्ये असताना आपण जे शिवचरित्र वाचले तेच इतिहासाच्या पुस्तकात आले आहे आणि हे आता मी नाही तर काल हे पत्र लिहीत असताना भालचंद्र नेमाडेंचे दूरचित्रवाणीवर जे संभाषण ऐकले त्यात ते म्हणाले की, ‘पाठय़पुस्तकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा दिलेला इतिहासच खोटा आहे’. कारण हा इतिहास ब. मो. पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती या कांदबरीमधून आला आहे आणि हीच कादंबरी लोकांनी इतिहास म्हणून स्वीकारली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदर चारित्र्याचे व इतिहासाचे विडंबन झाले.
आपण म्हणता की, आपण अलिप्त आणि वस्तुनिष्ठ अभ्यासक आहात. ज्ञानोबा-तुकोबा आणि समर्थ रामदासांच्या मशागतीतून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पीक आले. आपण जर वस्तुनिष्ठ अभ्यासक आहात, तर मग रामदासांच्या मशागतीतून शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पीक आले याचा वस्तुनिष्ठ पुरावा काय? त्र्यं. शं. शेजवलकरांसारखे वस्तुनिष्ठ अभ्यासक म्हणतात, ‘रामदासी पंथाने काही ऐतिहासिक राजकीय कार्य महाराष्ट्रात घडवून आणले हा प्रवाद युरोपच्या इतिहासाच्या वडाची साल हिंदूराष्ट्राच्या पिंपळाला चिकटविण्याचे काम हे इंग्रजी शिक्षित कल्पकांच्या मेंदूची विकृती आहे. खोटय़ा जात्याभिमाने आत्मतुष्टी निर्माण करण्याचा तो एक खोडसाळ प्रयत्न आहे.’ (शिवछत्रपती संकल्पित शिवचरित्रची प्रस्तावना, आराखडा व साधने त्र्यं. शं. शेजवलकर, आवृत्ती 1ली, 1964 पृष्ठ क्र. 43) पुढे शेजवलकर म्हणतात. ‘ब्राrाणांनी इतिहासाचा जो नवा डोला उभारीला त्या मुळातच बिलकूल आधार नव्हता हे त्यांनी झाकून ठेवीले आणि महाराष्ट्रातील सर्व वा्मयीन जगत त्यांच्या सत्तेखाली असल्याने तसे करणो शक्य झाले. पुढे केळुस्करांसारखे स्वत: बखरी वाचून पाहू लागले तेव्हा त्यांस आढळले की, एकाही ऐतिहासिक बखरीत शिवाजी महाराजांनी रामदासांच्या झोळीत राज्य टाकल्याची कथा नाही’. मग वस्तुनिष्ठ अभ्यासक म्हणवणारे आपल्यासारखे ज्ञानी रामदासांनीे मशागत केली असे कोणत्या आधारे म्हणतात?
आम्हीही लहान असताना इतिहास जातीयवादी होता असे वाचले नव्हते. पण जेव्हा वस्तुनिष्ठ इतिहासकार केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, त्र्यं. श. शेजवलकर, कॉ. शरद पाटील वाचले तेव्हा समजले की, आपल्याकडचा इतिहास साचेबद्ध पद्धतीने लिहिला आहे. शिवरायांवर वार करणा:याचा उल्लेख ‘कृष्णाजी’ आणि शिवरायांचा प्राण वाचविणा:याचा उल्लेख ‘जिवा’ हा जातीयवाद नाही का? रामदास-दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नसताना त्यांचे श्रेय शिवरायांच्या जडण-घडणीला देणो हा जातीयवाद नाही का? (दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नसल्याचा शासकीय समितीचा निर्णय 15 डिसेंबर 2क्क्8).
(राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे, आवृत्ती पंधरावी पृष्ठ क्रमांक 126) आपण म्हणता की मला कुठे बाबासाहेबांनी स्त्रियांचा अपमान, अवहेलना केल्याचे आढळत नाही. ‘त्यांचे (दादोजी), आईसाहेबांचे (जिजाऊ) आणि शिवबाचे गोत्र एकच होते’ असे लिहिणो ही जिजाऊंची बदनामी नाही का? पंतांना सह्याद्रीची उपमा देणो आणि गोत्र सह्याद्री असे सांगणो या पाठीमागचा उद्देश काय? आपल्याला ही बदनामी वाटत नाही का?
ब. मो. पुरंदरे यांनी ‘लाल महाल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव अखेरच्या घटका मोजत असतात असे चित्र पुरंदरे यांनी रंगविलेले आहे. ‘पंत बोलत होते, अडखळत होते, थांबत होते, थबकत होते. तरीही बोलत होते. ‘वडिलांनी असा धीर सोडू नये’. गहिवर आवरीत राजे म्हणाले. (लाल महाल - ब. मो. पुरंदरे, आवृत्ती सहावी मे, 2क्क्5 पृष्ठ क्र. 5क्) ललित साहित्याचा वापर करून शिवरायांच्या मुखात दादोजींना वडील म्हणून संबोधण्याचा पुरंदरेंचा उद्देश काय? ब. मो. पुरंदरे यांनी इतिहास आणि ललित साहित्याचा फायदा घेत प्रेरणास्थानांची बदनामी केलेली आहे. जिजाऊंचा वारसा स्त्रीसत्ताक समतेचा आहे. तो बदनाम करून शिवरायांना पुरुषसत्ताक प्रतीक म्हणून पुढे आणणो हा पुरंदरेंचा डाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आणि नंतरदेखील भारतामध्ये अनेक धर्माचे अनेक राजे होऊन गेले. केवळ हिंदू धर्माचा विचार केला तर यादवांपासून विजयनगर्पयत अनेक प्रस्थापित घराण्यांनी राज्य केले. असे असताना आजही जगभरामध्ये चर्चा होते ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जगभरातले हे पहिले असे राज्य होते ज्याची ओळख रयतेचे राज्य म्हणून झाली. महाराजांनी समकालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन रयतेच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला, त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळवून दिला. यापूर्वी असे पाऊल टाकण्याचे धाडस इथल्या कुठल्याही राजघराण्याकडे नव्हते. आपल्या सैन्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्थान देऊन त्यांना एकत्र घेऊन राज्य चालविणारा या भूमीवरला हा पहिला ‘रयतेचा राजा’ होता आणि त्याने निर्माण केलेले राज्य हे ‘रयतेचे राज्य’ होते. शिवाजी राजे हे सर्वाचेच होते असे आपले म्हणणो अगदी बरोबर आहे. असे असताना श्री. ब. मो. पुरंदरेंनी ‘जाणता राजा’ असो, ‘लाल महाल’ असो की ‘राजा शिवछत्रपती’ असो या माध्यमातून महाराज कसे साचेबद्ध होते हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षाचा पगडा झुगारून माङयासारखा मागासवर्गीय घरामध्ये जन्मलेला एक सामान्य शिवभक्त या इर्षेने पेटून उठला की याच्यापुढे महाराष्ट्राला, जगाला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळायलाच हवा.
आपल्यासारख्या अत्यंत हुशार सनदी अधिका:यावर जर श्री. ब. मो. पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील खोटय़ा शिवचरित्रचा एवढा परिणाम होऊ शकतो तर पिढय़ान्-पिढय़ा अज्ञानाच्या चक्कीत पिसल्या गेलेल्या येथील दिन-दुबळ्या, शोषित, उपेक्षित समाजावर त्याचा किती परिणाम होऊ शकतो हे मी वेगळे सांगायला नको.
ज्या यशवंतराव चव्हाणांचा आपण उल्लेख केलेला आहे त्या यशवंतराव चव्हाणांनी एका भाषणामध्ये स्पष्ट सांगितले होते की, श्री. ब. मो. पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र म्हणजे आर.एस.एस.चा प्रचार आहे. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुत्ववादांच्या सोयीचे असे लिखाण करून पुढे त्याचीच री ओढत महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली झाल्या, घडवून आणल्या, या पलीकडे दुसरे दुर्भाग्य ते कोणते?
त्यामुळे आपल्या पत्रत आपण जी भावना व्यक्त केली आहे ती केवळ श्री. ब. मो. पुरंदरे यांच्या पुस्तकावर प्रेम करणा:या एका विशिष्ट घटकाचे वकील म्हणून केली आहे, असे मला वाटते. संपूर्ण महाराष्ट्रातला शिवप्रेमी फक्त एवढीच मागणी करतो आहे की, श्री. ब. मो. पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकामधील चुकलेले संदर्भ बदलून शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास जगासमोर आणावा, यामध्ये जात-पात उभीच कुठे राहते? श्री. ब. मो. पुरंदरेंच्या चुकीच्या लिखाणाला केलेला विरोध हा आपण ब्राrाणांना केलेला विरोध आहे असे का समजता?
एखाद्या जातीचा आधार घेत जाती-पातींमध्ये भांडणो लावणो असा आमचा दृष्टिकोन कधीच नव्हता व नसेल. आजही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊनच आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे या महाराष्ट्रामधील सामाजिक स्वास्थ्य जपावे ही तर आम्ही आमची जबाबदारीच समजतो. पण आता काय चूक आणि काय बरोबर हे समजण्याइतके वाचन-लेखन आम्हीही करायला लागलो आहोत, हे जर आपण लक्षात घेतले तर फार बरे होईल असे मला वाटते.
कुंतीच्या नंतर कुठल्याच मातेच्या पोटी संतती जन्माला आली नाही का? ती कर्तृत्ववान नव्हती का? त्यांचा इतिहास जगाला माहीत नव्हता का? असे असताना जिजामातेच्या मुखी फक्त कुंतीचे नाव टाकायचे आणि ज्या संदर्भाचा उल्लेख इतिहासाच्या समकालीन साधनांपासून ते आजर्पयतच्या कुठल्याही पुस्तकामध्ये सापडत नाही. असा उल्लेख एखाद्या पुस्तकातून घेऊन आपण लिहीत असलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रत टाकण्याचे कारण ते काय? त्यामुळे आमच्या मनामध्ये दूषित असे काहीच नाही. पण, श्री. ब. मो. पुरंदरे यांनी केलेले आईसाहेब व महाराजांबाबतचे लिखाण फारच दूषित आहे. इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो तर इतिहासातून धडा घेऊन वर्तमानावर मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी असतो. पुरंदरेंनी मावळ्यांना इतिहासात रमविले, हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण केली, शिवरायांची बदनामी केली.
श्री. ब. मो. पुरंदरे यांनी संशय निर्माण होईल अशा रीतीने केलेल्या लिखाणाबद्दल आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर गांभीर्याने चर्चा झालीच पाहिजे. संपूर्ण जगात झालेल्या क्रांतीचा विचार केला तर त्या प्रत्येक क्रांतीचा उगम हा वाद-प्रतिवादातूनच झाला असल्याचे दिसून येते. श्री. ब. मो. पुरंदरे यांनी लिहिलेल्या संवादांना, प्रसंगाना काही दाखले असतील तर ते त्यांनी जरूर द्यावेत, तसे केल्यास आम्ही नक्कीच माघार घेऊ. पण, जर असे दाखले त्यांच्याकडे नसतील, तर मात्र उदार अंत:करणाने त्यांनी ते कबूल करावे.
ज्या पद्धतीने आपण श्री. नरहर कुरुंदकर यांचे नाव घेत ते श्री. ब. मो. पुरंदरे यांच्याबद्दल काय बोलले हे लिहिलेत त्याच पद्धतीने श्री. शेजवलकर,
श्री. सेतुमाधवराव पगडी, स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हे ब. मो. पुरंदरे यांच्याबद्दल काय म्हणाले हेदेखील महाराष्ट्राला सांगितले असते तर माङयासारख्या महाराष्ट्रातील अनेक अज्ञान्यांच्या ज्ञानात भर पडली असतील.
कळावे,
शिवप्रेमी जितेंद्र आव्हाड