शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सज्ज; पण काळजी घ्या - राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:05 IST

कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

- राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

* कोरोना व्हायरसच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे?- परिस्थिती नियंत्रणात आहे, संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांकडूनही सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे थांबवले नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. जगातील काही देशांत अचानक रुग्णांची संख्या वाढली. इतक्या रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले. आपल्याकडे तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  * कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी सरकारने काय काय केले?- आमच्यासमोर चित्र स्पष्ट होत होते. जनतेत जागरुकता निर्माण करणे गरजेचे होते. ‘इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन’ या सूत्रावर भर देणे आवश्यक होते. आमच्याकडे 2019-20 चे बजेट अखर्चित होते. ते आमच्या मदतीला आले. त्यामुळे राज्यभर होर्डिंग्ज लावले गेले, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकार्‍यांच्या सतत बैठका सुरू होत्या. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या खरेदी करण्याचे आदेश दिले. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले गेले. जिल्ह्या-जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार केले गेले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचे पुढे काय करायचे, संशयित असेल तर त्याचा फॉलोअप कसा करायचा याची यंत्रणा कामाला लावली गेली. * पण आपल्याकडे एवढे रुग्ण अचानक कुठून वाढले?- ज्या सात देशांची यादी आपल्याला केंद्राने दिली होती, त्या ठिकाणांहून येणारे पेशंट तपासले जात होते. मात्र दुबईहून अचानक 40 लोकांचा एक ग्रुप आला. आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 50च्या आसपास आहे, त्यातील 20 रुग्ण एकट्या दुबईतून आलेले होते. त्यांच्यामुळे बाधित झालेले 5 ते 8 रुग्ण निघाले. * कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आपण जाऊ अशी भीती कशामुळे वाटते?- मी स्वत:, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ जनतेला हात जोडून विनंती करत आहोत की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये; पण लोकांनी ऐकले नाही तर नाईलाजाने सगळे बंद करावे लागेल. या काळात हा आजार तिसर्‍या टप्प्यात गेला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. * रुग्ण तपसणीसाठी लॅबचा तुटवडा आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येईल?- या लॅब भारत सरकारच्या नियमानुसार उभ्या करायच्या असतात. आम्ही आणखी आठ लॅब सुरू करत आहोत. मात्र त्यासोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली आहे. तीदेखील लवकरच कार्यान्वित होतील.(शब्दांकन : अतुल कुलकर्णी)