शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पुणेरी कट्टा - नावातच सर्व काही आहे.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 06:00 IST

पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात.

पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात.-अंकुश काकडे-

पुण्यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता म्हणजे लक्ष्मी रस्ता या मार्गावर काय नाही हे सांगता येणं कठीण आहे. सोन्या- चांदीची दुकानं, कपड्यांची, साड्यांची, औषधांची दुकानं, मोठमोठ्या बँका, एवढच काय, तर या रस्त्यावर लक्ष्मीचा वावर. आणि काहीअंशी ते खरंदेखील आहे, दसरा-दिवाळी  सणाला तेथील विद्युत झगमगाट पाहून खरोखर त्या रस्त्यावर लक्ष्मीचा वावर असतो, म्हणून लक्ष्मी रस्ता हे नाव दिलं असावं असा अनेकांचा समज आहे. अहो माझादेखील ५० वर्षे तोच समज होता, पण आता माहिती मिळते ती अशी की दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे लक्ष्मीबाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले गेले आणि म्हणून त्या रस्त्याला लक्ष्मी रस्ता हे नाव पडलं, ही माहिती त्या रस्त्याच्या सुरुवातीस लावावी, हे महापालिकेला अनेक वेळा सांगूनही ते होत नाही. पुण्यात देवादिकांच्या नावानेही रस्ते, चौक ओळखले जातात, सोन्या-मारुती चौक, त्या परिसरात आजूबाजूला सर्व सराफांची दुकानं, साहजिकच त्या चौकाचं नाव पडलं सोन्या-मारुती चौक.ह्ण अर्थात तेथील मारुती मात्र संगमरवराचा आहे. आता हेच बघा पूर्वी अंत्ययात्रा या पायी येत असत. वाटेत अनेक ठिकाणी थोडंथोडं थांबत असत, पूना हॉस्पिटलजवळील मारुती मंदिराजवळही अशा अंत्ययात्रा थांबत, आणि तो बहुतेक शेवटचा थांबा असावा, म्हणून त्या चौकास नाव पडले विसावा मारुती चौक. पण आता तो पूना हॉस्पिटल चौक म्हणून ओळखला जातो. सध्याच्या पूना हॉस्पिटलच्या जागेत पूर्वी स्मशानभूमी होती. देवांची नावं देण्यात तर प्रथम नंबर लागतो तो मारुतीचा. अर्थात हा कोणत्या धमार्चा आहे, या वादात शिरायचं नाही मग उंटाडे मारुती चौक, भिकारदास मारुती चौक, दक्षिणमुखी मारुती चौक, विजय मारुती चौक, भांग्या मारुती चौक, लकेºया मारुती चौक, अहो जाऊ द्या, मारुतीचं रेकॉर्ड कोणताच देव मोडू शकणार नाही. पुण्यातील अनेक रस्ते, पेठा ह्या त्या त्या ठिकाणच्या व्यवसायामुळे ओळखल्या जातात. आता हेच बघा ना,  पुस्तकांची दुकानं त्या चौकाला ओळखतात ह्यअप्पा बळवंत चौक ह्या नावानं. पण नवीन तरुण पिढीला अप्पा बळवंत चौक एवढं मोठं नाव घ्यायला वेळ कुठं आहे? मग काय, त्यांनी त्याचं चक्क नामकरण केलं abc म्हणून. महात्मा गांधींच्या नावाने ओळखला जाणारा कॅम्पमधील रस्ता तरुण पिढी एम.जी. रोड म्हणून संबोधतात, उद्या कालांतराने हा एम. जी. कोण, असे विचारले जाईल. आता ह्यजंगली महाराज रोड काय अवघड आहे कां? पण नाही, जे.एम. रोड नावानेच तो ओळखला जातोय, त्याच चौकात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यावरून त्या चौकाला नाव दिले ह्यराणी लक्ष्मी चौक पण जवळच बालगंधर्व रंगमंदिर त्यामुळे प्रचलित नाव झालं बालगंधर्व चौक, अर्थात दोघांचंही आपल्या क्षेत्रातील कर्तृत्व कुणीच नाकारू शकत नाही. स्त्री असूनही पुरुषाला लाजवेल असे शौर्य झाशीच्या राणीने दाखवले तर, पुरुष असूनही स्त्रीला लाजवेल असा स्त्रीअभिनय बालगंधर्वांनी दाखवला. मी ज्या नवी पेठेत राहतो तेथील अनेक नागरिकांना, की जे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहतात त्यांना मी विचारलं, अहो हभप तनपुरे महाराज चौक कुठे आहे, तर त्याचं उत्तर, आपल्याला नाही माहीत. पहिल्यांदाच नाव ऐकतोय. दररोज २-४ वेळा साहित्य परिषद चौकातून जाणारी मंडळी, पण त्यांना साहित्य परिषद चौकाचे ते नाव आहे, हे आजही माहीत नाही.आता शहरातील पुलांचेदेखील असेच आहे, सध्या संभाजी पूल म्हणून ओळखला जाणारा पूल पूर्वी लाकडाचा होता म्हणून तो लकडी पूल नावाने ओळखला जाई, पुढे तो मोठा झाला, सिमेंटचा झाला अन् त्याचं नाव झालं संभाजी पूल. पण आजही ती सत्तरी ओलांडलेली माणसं जिवंत आहेत ती त्याला लकडी पूलच म्हणतात, सध्या एस.एम.जोशी पूल हा अतिशय रहदारीचा पूल पण पूर्वी तेथे छोटा पूल होता, शिवाय थोडा जरी पाऊस आला, की तो पाण्याखाली जाई, त्या पुलाला कठडे नव्हते म्हणून बोडका पूल या नावाने तो कित्येक वर्षे ओळखला जाई.आता एखाद्या पुणेकराला विचारलं की छत्रपती शिवाजी पूल कुठं आहे, तो म्हणेल नाही बाबा, मला माहीत नाही, पण त्याच पुलावरून दररोज शनिवारवाड्याकडे तो जात असतो, त्याला नवा पूल माहीत आहे, आज १०० वर्षे होऊन तो जुना झालाय पण आजही दिमाखाने नवा पूल म्हणून मिरवतोय ना! प्रेमीयुगलांसाठी रोज सायंकाळी गजबजलेला पूल म्हणजे संभाजी पुलाजवळील बॅ. काकासाहेब गाडगीळ यांचे नाव दिलेला पूल, पण त्याची ओळख मात्र काय तर झिग-झॅग पूल, तेथील सायंकाळचे दृश्य पाहून वर गाडगीळ काय म्हणत असतील  कोण जाणे! इटलीतील व्हेनिस शहराची सिटी आॅफ कॅनॉल म्हणून जगाला ओळख आहे तशी आता पुणे शहराची ओळख खरं म्हणलं तर उ्र३८ डा ु१्रॅिी२ अशीच व्हायला हवी, अहो शहरातून वाहत जाणाºया मुळा-मुठा नदीवर शहरात तब्बल १६ इतके पूल आहेत, देशात कदाचित हा विक्रमच असू शकेल. पुणे महापालिकेत रस्त्यांना, पूल, चौकांना नावे देण्यासाठी एक समिती आहे तिचं नावच ह्यनाव समितीह्ण असे आहे, या समितीचा मी १९८४ ते १९९२ असा तब्बल ७ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे, या काळात अनेक मजेशीर तसेच काही कटु अनुभव मला पाहावयास मिळालेत. साधारणत: ज्या भागाला नाव द्यायचे तेथील विद्यमान नगरसेवकाने त्याची सूचना द्यायची, ज्याचे नाव द्यायचे त्या व्यक्तीची थोडक्यात माहिती, त्यांनी केलेले कार्य असा साधा प्रस्ताव असावा असा संकेत. पण अनेक वेळा ज्या व्यक्तीचं नाव द्यायचं त्याची काहीच माहिती नसते, त्याचे कार्य काय याचा तपास नाही, साधा एक ओळीचा प्रस्ताव अमूक, अमूक रस्त्याला कैै. सोमाजी आबाजी कापसे पथ असे नाव देण्यात यावे, त्यांनी त्या भागात फार मोठ्ठं कार्य केलं आहे. काय कार्य केलं हे सूचकालाही माहीत नाही. काही वेळा ज्या रस्त्याला, चौकाला नाव द्यायचं तो २,३ सभासदांच्या वॉर्डात विभागला गेला, मग काय, त्यावरून एकमत होणं अनेक वेळा कठीण. वाद होऊन अनेक वेळा निर्णय शेवटी सर्वसाधारण सभागृहात. तेथेही वाद होणार नाही, याची शाश्वती नाही, काही प्रकरणे तर तेव्हापासून अनिर्णीत आहेत. एका वॉर्डात तर असा प्रसंग आला, एका सदस्याने प्रस्ताव दिला पूर्वेकडून जाणाºया ह्या रस्त्यास एका नावाचा प्रस्ताव दिला तर त्याच शेजारील सदस्याने दुसरा प्रस्ताव दिला पश्चिमेकडून जाणाºया ह्या रस्त्यास त्याने दुसºयाच नावाचा प्रस्ताव दिला, झाले प्रशासनाची कुचंबणा, रस्ता एकच पण शिफारस दोन नावांची, शिवाय दोघेही सभासद प्रस्ताव मागे घेण्यास तयार नाहीत, शेवटी तोडगा निघाला अर्धा-अर्धा रस्ता दोन्ही नावांना वाटून दिला.आता हेच बघा गिरीश बापट यांच्या पुढाकाराने त्यांनी सेनापती बापट रस्त्याकडून आत जाणाºया रस्त्याला नाव दिले ह्यबाळशास्त्री जांभेकर पथह्ण आणि ते योग्यही होते कारण त्या रस्त्यावर पत्रकारनगरदेखील आहे. ते नाव देऊन जवळपास २५ वर्षे झाली असतील, तर ३-४ वर्षांपूर्वी तेथील तत्कालीन नगरसेवकांनी त्याच रस्त्याला ह्यकैै. विश्वास सरपोतदार पथ असे नाव देण्याचा प्रस्ताव दिला, प्रशासनाचं विरोधी मत असूनही सभागृहात तो एकमताने मंजूर झाला, रस्त्याचं नामकरणही ठरलं, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नामकरण समारंभ, पत्रकार मंडळींच्या हातात पत्रिका मिळताच त्यांनी ह्याला जोरदार विरोध केला, अर्थात त्यांचा विरोध सरपोतदार यांच्या नांवाला नव्हता पण एकाच रस्त्याला दोन नावे कशी, असा प्रश्न निर्माण झाला, सरपोतदारांचेदेखील सिनेसृष्टीतल योगदान मोठे आहे, पण ह्या चुकीच्या निर्णयामुळे सरपोतदार कुटुंबीयदेखील नाराज झाले, दुसरा रस्ता पाहा असे सुचविले पण नावाचा प्रस्ताव दिला होता, ते होते उपमहापौर, त्यामुळे तेही मागे हटेनात, शेवटी पुन्हा तोडगा निघाला अर्धा रस्ता जांभेकर पथ तर अर्धा रस्ता सरपोतदार पथ! अशा वेळी नकळत चुका होत असतात त्यातून सामंजस्याने हे प्रश्न सोडवायचे असतात पण अनेकवेळा ते होत नाही.    (पूर्वार्ध)(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक  कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Puneपुणे