शब्दांचं सामर्थ्य श्रेष्ठच!

By Admin | Updated: May 30, 2015 14:07 IST2015-05-30T14:07:46+5:302015-05-30T14:07:46+5:30

जो लिहितो, रचना करतो त्याला सांगीतिक भाषेत ‘नायक’ म्हणतात आणि जो प्रस्तुत करतो तो असतो ‘गायक’! शास्त्रीय गायकीच मुळात ‘ख्याल’ म्हणजे विचारांपासून सुरू होते. शब्दसुद्धा विचारच देत असतात.

The power of words is great! | शब्दांचं सामर्थ्य श्रेष्ठच!

शब्दांचं सामर्थ्य श्रेष्ठच!

 नव्या पिढीतील प्रतिभावंत गायिका मंजुषा पाटील यांच्याशी संवादाची मैफल

 
शास्त्रीय संगीताच्या खोल डोहात 
सुरांच्या सानिध्यात असलेल्या
अभिजात गायकाचे शब्दांशी 
नाते कसे असते?
एरवी सगळ्या अनुभूतींसाठी 
आसुसलेल्या तरुण पिढीची पावले
शास्त्रीय मैफिलींकडे अभावाने वळतात, असे का असावे?
 
= नव्या पिढीतील एक प्रतिभावंत शास्त्रीय गायिका म्हणून गानरसिक मोठय़ा कौतुकाने आणि आदराने आपल्याकडे पाहतात. एक कलावंत म्हणून शास्त्रीय गायक आणि रसिक यांच्या आजच्या नात्याबद्दल आपल्याला काय वाटते?
- ज्याचे गाण्यावर निरतिशय प्रेम आहे; तो शास्त्रीय संगीताच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतो.  त्याची तृष्णा भागविणारे गाणो त्याला जिथे ऐकायला मिळते आणि जो कलावंत ते ऐकवतो त्याला रसिकांचे भरभरून प्रेम मिळते, हे एक सार्वकालीक सत्य! आजही त्यात बदला झालेला मला दिसत नाही. कलावंत तर आपल्या कलेकडे, तिच्या सादरीकरणाकडे एक सेवा म्हणून पाहत असतो. ही संगीत क्षेत्रची खरं तर परंपराच! संगीत आजही गुरू-शिष्य परंपरेने पुढे जाते आहे. आज ती बहुधा एकमेव कला असावी; ज्यात हे नाते तितक्याच पवित्र भावनेने टिकून आहे. त्यामुळे नव्या पिढीतलातरुण  कलावंत गुरूंच्या आ™ोशिवाय मंचावर गाण्यासाठी बसत नाही. एक खरे की रसिकांचे प्रेम मिळत असले, तरी त्यांची संख्या मात्र कमी होताना दिसते. शास्त्रीय संगीत हे शाश्वत आहे. त्यात चैतन्यतत्त्व आहे. त्यामुळे ते अजिबात क्षीण होणार नाही. रसिकाला ब्रrातत्त्व दाखविण्याचे सामथ्र्य शास्त्रीय संगीतातच आहे. हे नव्या पिढीर्पयत पोहोचणो आत्यंतिक गरजेचे आहे. इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टींत आवजरून रस घेणारी नवी पिढी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीकडे तितक्याशा उत्साहाने वळताना दिसत नाही. हे सारे कठीण, न समजणारे आहे असे काहीसे त्यांच्या मनात असते. हा दुरावा घालवण्यासाठी  गायक-रसिक यांचे नाते पिढीगणिक फुलण्यासाठी प्रयत्न होणो मला गरजेचे वाटते.  त्यासाठी शास्त्रीय संगीत, त्यातील खोलवर असणा:या जाणिवा, त्याचा विस्तार सोपेपणाने नव्या पिढीच्या ओंजळीत द्यायला हवा.
=  ही सारी प्रक्रिया सोपी व्हावी, म्हणून प्रयत्नांच्या काही दिशा आपल्याला दिसतात का? 
-  पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करते, की ‘अवघड अवघड’ असे म्हणून शास्त्रीय संगीताबद्दल एक मोठा बागुलबुवा उभा केला गेला आहे. शाळेत कोणताही पाठ जर लक्ष न देता नुसताच ऐकायचा म्हटला तर कळणारच नाही. परीक्षा देताच येणार नाही. परिणामी पुढच्या वर्गात जाण्याचे दरवाजे बंद होतील. मी जरी आज गायिका म्हणून ख्यातकीर्त असले, तरी आजही मी पं. उल्हास कशाळकर आणि डॉ. विकास कशाळकर यांच्याकडे शिकायला जाते. म्हणजे मीदेखील एक विद्यार्थी बनूनच पुढचे नवे शिकून घेण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रवास सारेच करतात. असा थोडासा प्रयत्न जर रसिकांनी म्हणजे नव्या पिढीने केला, तर त्यांना शास्त्रीय संगीत अवघड वाटणार नाही. उलटपक्षी ते याचा जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेऊ शकतील. कोणताही कलावंत हा उत्तमच देत असतो. त्या उत्तमातून मिळणारा आनंद रसिकाने अनुभवावा लागतो. त्याची त्यापुढे जाऊन अनुभूती घ्यावी लागते. तेव्हा समज वाढत जाते. 
जो शास्त्रीय संगीत ऐकतो, त्याचा चाहता होतो. त्याच्या सर्वच जाणिवा फार प्रगल्भ होत जातात. प्रत्येक गोष्टीत निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी एक प्रकारची ‘सोच’ त्याच्या ठिकाणी येत जाते. जीवन जगताना जर अशी ‘सोच’ घेऊन तुम्ही पुढे जाऊन पाहात असाल तर यश मिळवणो फार कठीण नाही. शास्त्रीय संगीताच्या श्रवणामुळे ऐकणा:याच्या जगण्याच्या कक्षाही रुंदावतात. हे बलस्थान ओळखून नव्या पिढीने या गायकीकडे वळायला हवे.  आजच्या तरुणाचे जगणो आत्यंतिक ताण-तणावाने भरलेले आहे. त्यातून सुटका करून घ्यायची असेल, कामातली ऊर्जा वाढवायची असेल आणि करीत असलेले काम अधिक जोमाने, गतीने पुढे न्यायचे असेल तर शास्त्रीय संगीतासारखा प्रेरणादायी स्त्रोत दुसरा नाही; असे मला वाटते. हे जे माङो वाटणो आहे ते नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी मी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. त्यातील माझा पहिला प्रयत्न म्हणजे ‘संगीताचार्य द. वि. काणोबुवा संगीत प्रतिष्ठानची स्थापना. या प्रतिष्ठानमार्फत मी ‘गुरुकुल’ चालवते. या गुरुकुलाचा उद्देशच मुळात उदयोन्मुख, गुणी आणि गरजू विद्याथ्र्याना चांगले शिक्षण देऊन व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आहे. अनेकानेक संगीतोपयोगी उपक्रम या गुरुकुलाच्या माध्यमातून आम्ही करतो. माङयाबरोबर काणोबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माङो वडीलधारे मार्गदर्शक गोविंदराव बेडेकर हेदेखील संगीत प्रचार-प्रसाराचे कार्य करतात. संगीतविषयक ग्रंथालय, दुर्मीळ, अतिदुर्मीळ ध्वनिमुद्रिका यांचे संग्रहालय यासाठी आता आम्ही प्रयत्नरत आहोत. विद्याथ्र्याना शिष्यवृत्त्या देण्याचे कामही गुरुकुलतर्फे  होते. हे सारे झाले संगीत शिकणा:यांसाठी. गाणो ऐकणा:यांसाठीदेखील आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो, त्यातील अनेक प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळाला. एखादा विषय घेऊन झालेल्या कार्यक्रमांची मागणीही वाढतेय. समजेला सुलभ आणि तरीही शास्त्रीय पायावरला हा संगीतानंद. अशा कार्यक्रमांना वाढती रसिक संख्या दिसू लागलीय. 
= एखादा विषय घेऊन त्यावर बेतलेली मैफल करणो ही नेमकी काय संकल्पना आहे? 
- यात एखादा विषय ठरवला जातो. उदा. राम, कृष्ण, विठ्ठल किंवा नाटय़संगीत. समजा ‘राम’ हा विषय घेतला की, मग राम वर्णनाची बंदिश घ्यायची. तिथपासून प्रवास सुरू झाला की, तो रामाच्या भैरवीर्पयत न्यायचा. रामाशिवाय दुसरे कोणतेही भजन अथवा अभंग त्यात येत नाही. या प्रवासात ठुमरी येते, होरी येते, चैती येते; शिवाय अभंग आणि भजनांमध्ये वेगवेगळे राग असतात; या शिवाय निवेदक असतो की जो राम हा विषय उलगडून दाखवतो. त्यामुळे एकाच विषयातले वैविध्य रसिकांना समजते. त्याच्याकडे तो आकृष्ट होतो. ‘राम’ या विषयावरील माङया मैफलीचे नाव ‘राम रतन धन पायो’ हे आहे. त्याप्रमाणोच ‘कृष्णरंग’ नावाच्या कार्यक्रमालाही रसिकांनी दाद दिली.  कथकच्या आविष्कारातूृन गाणं प्रस्तुत करण्याचाही प्रयत्न मी केला आहे. ‘कृष्णरंगमध्ये अगदी शंकराचार्याच्या स्तोत्रंचाही अंतर्भाव केला होता. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच बंदिशीने होते. मग पुढे जात जात शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतातील एक-एक चिजा रसिकांना ऐकविण्याचा, त्याला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यामुळे शास्त्रीय संगीतामधली वैविध्यता आणि त्याचबरोबर त्यातले लालित्य दोन्हीही रसिकाला उमजत जाते. नाटय़गीतांची जी मैफल मी करते, त्यात अगदी ‘पंचतुंड नररुंड..’ या नांदीपासून ते भैरवीर्पयत मोठा पट आहे. खरी मूळची नाटय़गीते ऐकलेली पाहिलेली पिढी आज फारशी राहिली नाही. संगीत नाटके तर आता रंगभूमीवर येतच नाही. म्हणजे आत्ताच्या मुलांचा नाटय़संगीताशी तसा थेट संबंध नाही; तरीही लोक उत्सुक असतात अशा मैफलींचे आयोजन करण्यासाठी. 
= विषय घेऊन एखादा कार्यक्रम करायचा झाला की तिथे शब्द-सूर यांची मैत्री आली. एका शास्त्रीय गायकाचे शब्दांबरोबरचे नाते कसे असते? 
- जो लिहितो, रचना करतो त्याला सांगीतिक भाषेत ‘नायक’ म्हणतात आणि जो प्रस्तुत करतो तो असतो ‘गायक’ यावरूनच रचनाकाराचे आणि रचनांचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. 
शास्त्रीय गायकीच मुळात ‘ख्याल’पासून म्हणजे विचारापासून सुरू होते. शब्द हेसुद्धा विचारच देत असतात. शब्दांच्या मागे भाव असतो. गायकीतून विचार आणि भाव यांचे मिश्र प्रगटीकरण होत असते. त्यामुळे शब्द, त्यांचे उच्चर, त्यांची फेक ही महत्त्वाचीच आहे. शास्त्रीय संगीताने त्यांना वज्र्य मानलेले नाही, मानूही नये. शब्दांचे सामथ्र्य मान्यच केले पाहिजे. संगीताच्या इतिहासात अशाही घटना घडल्याची नोंद आहे की जेव्हा गायक, नायक अडचणीत येत असे तेव्हा त्यांनी आपली सर्वोच्च, रसिकप्रिय बंदिश गहाण ठेवून आपली नड भागवली आहे. ऋण फिटले की पुन्हा ती बंदिश तो गात असे. यातल्या कथा, दंतकथा सोडून दिल्या दिला, तरी तात्पर्य शब्द आणि सूर यांच्या घट्ट मैत्रीला अधोरेखित करणारेच आहे. एखाद्या विषयाभोवती गुंफलेला कार्यक्रम म्हणजे एकाच मैफिलीतल्या दोन मैफिलींची मौज!  एक असते शास्त्रीय संगीताची आणि दुसरी असते शब्दांची! वेगवेगळ्या रागांवर आधारित असणारा ‘रागमाला’नावाचा कार्यक्रम मी आणि शौनक अभिषेकींनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यात रागाचे सामथ्र्य उलगडून दाखवण्यासाठी बंदिशीमधले शब्द आणि त्या शब्दांमागील भाव मुखर करण्यासाठी स्वर धावून येत असत. त्यामुळे रसिकांनाही एक वेगळे तत्त्व अनुभवायला मिळाले. 
 
मुलाखत : स्वानंद बेदरकर

Web Title: The power of words is great!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.