समता की सत्ता?
By Admin | Updated: January 31, 2016 10:11 IST2016-01-31T10:11:41+5:302016-01-31T10:11:41+5:30
शनिशिंगणापूरच्या चौथ-यावरील प्रवेशाच्या वादाने आता राज्य आणि राजकारणही तापले आहे. ‘महिलांना प्रवेश हवाच’ इथपासून तर ‘सर्वाना समान न्याय’ आणि काहीच न बोलता चुप्पी साधण्यार्पयत दिसणारा विरोधाभास साधासरळ नाही. ही सारी मंडळी आपापल्या भूमिकांबाबत प्रामाणिक आहेत का? देवळांमध्ये आपल्याला समता हवी आहे की सत्ता? शनिशिंगणापूर वादाने हा नवाच प्रश्न उपस्थित केला आहे.

समता की सत्ता?
देवळांतल्या लढाईचा खरा चेहरा
सुधीर लंके
बाईला शनिदेवाचा चौथरा चढू द्यायचा नाही, म्हणून बायकाच शनिभोवती सुरक्षेचे कडे करून उभ्या आहेत, असे चित्र परवा शनिशिंगणापुरात पाहायला मिळाले. ‘माझी आई, आजी, पणजी यापैकी कोणीही शनिचा चौथरा चढल्या नाहीत, मग मी का चढू? त्यातून काय मिळणार?’ असे सत्तरी ओलांडलेल्या परिघाबाई शिंगणापुरात विचारत होत्या.
देवस्थानांतील वाद हा केवळ स्त्री-पुरुष समता व स्पृश्य-अस्पृश्यतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. गावांना आपल्या प्रथा-परंपरा जपण्याची गरज का भासते आहे, या प्रश्नाचे उत्तर या सर्वाच्या मुळाशी दिसू लागले आहे. कोणत्याही धार्मिकस्थळी फिरल्यानंतर ते जाणवते. शनिशिंगणापूर हे त्यातले ताजे उदाहरण!
‘घरांना दारे नसलेले गाव’ अशी शिंगणापूरची जुनी ओळख आहे. दरवाजा नसताना येथील लोक कसे राहतात? याबाबत अनेकांना कुतूहल वाटते. बरेचजण या कारणासाठीच हे गाव पाहायला येतात. या परंपरेने गावाचे महत्त्व व उत्पन्नही वाढविले आहे. घरांना दरवाजे नाहीत म्हणजे शिंगणापुरातील घरे सताड उघडी आहेत, असे आजचे चित्र नाही. पारंपरिक दरवाजा नाही, पण त्याऐवजी शिंगणापुरात आता स्लाईडिंगचा पर्यायी दरवाजा आला आहे. ग्रामस्थ घरांना कडी-कुलूप लावत नाहीत, म्हणजे ‘लॉक सिस्टीम’ नाही. त्याला पर्याय म्हणून बहुतेक ग्रामस्थ व अगदी गावातील बॅँकाही दरवाजांना नट-बोल्ट लावून आपली सुरक्षा जपतात. चोरी होत नाही, असा समज असणा:या या गावात आता पोलीस स्टेशनही आले आहे. लॉज, हॉटेल्स आली आहेत. त्यामुळे शिंगणापूरकरांनी बदल स्वीकारलेलाच नाही, असेही नव्हे. परंपरा व बदल या दोघांना घेऊन हे गाव पुढे जात आहे.
शिंगणापुरातील स्त्री-पुरुष समतेसाठी यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, एन. डी. पाटील यांनी 2क्क्2 साली आंदोलन केले होते. घटनेने स्त्री-पुरुषांना समान हक्क दिलेला असल्यामुळे शनिदरबारीही ही समता नांदावी, अशी या सर्वाची मागणी होती. त्यासाठी त्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. तेव्हाही या मागणीला मोठा विरोध झाला; मात्र या आंदोलनाची दखल घेत शनी देवस्थानला चौथ:याचे काही नियम कालांतराने बदलावे लागले.
पूर्वी शनिच्या चौथ:यावर सर्व पुरुषांना प्रवेश होता. तो प्रवेश 2क्11 पासून बंद करण्यात आला आहे. शनिच्या चौथ:यावर लुंगी नेसून ओल्या वस्त्रनिशी जाण्याची प्रथा होती. देवस्थानच्या बाहेर असलेली दलाल मंडळी पाच-पाच हजारात ही पूजा विकत होते. त्यातून मोठी लूट शनिदरबारी सुरू होती. त्यामुळे देवस्थानने चौथ:यावर पुरुषांनाही प्रवेश बंद केला आहे. आता सकाळी व संध्याकाळी केवळ दोन पुरुषांना आरतीसाठी सोडले जाते. लुंगीही हटवली. शनिसमोर जाण्यासाठी आता लुंगीची गरज उरलेली नाही.
त्यामुळे पुरुषांनाही चौथ:यावर प्रवेश नाही, हे देवस्थानचे म्हणणो खरे आहे. परंतु महिलांना प्रवेश द्यायचा नाही म्हणून पुरुषही नको, अशी मानसिकता यापाठीमागे आहे. श्रवण महिन्यात मात्र दररोज दोन तास चौथरा पुरुषांसाठी खुला असतो. मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा जो प्रस्ताव दिला आहे, त्यात पुरुषांच्या हस्ते होणारी आरतीची प्रथा बंद करण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो.
शिंगणापूर देवस्थानची वार्षिक उलाढाल आज 2क् कोटींच्या घरात पोचली आहे. दररोज सरासरी 4क् हजार व शनिवार, रविवारी एक लाख लोक शनिदर्शनाला येतात. त्यामुळे अशा बलवान देवस्थानची सत्ता हेही या संघर्षाचे मूळ कारण आहे. स्त्री-पुरुष समतेची मोठी चर्चा झाल्याने मोठय़ा खुबीने धर्मादाय आयुक्तांनी दोन महिलांची विश्वस्त मंडळात निवड केली. अनिता शेटे या देवस्थानच्या अध्यक्षही बनल्या. इतिहासात हे पहिल्यांदा घडले. आंदोलनामुळे हा निर्णयही बहुधा जाणीवपूर्वक घेतला गेला. शेटे या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्या, पण चौथरा त्यांनाही वज्र्य आहे. देवस्थानची घटना व परंपरा हे दोन्ही सांभाळण्याची कसरत आता महिलेलाच करावी लागत आहे. ‘शनिदेवाच्या शिळेला बाईचा स्पर्श चालत नाही, पण राज्यात काही देवस्थानांमध्ये देवीचे वस्त्र पुरुष भक्तांनी बदललेले कसे चालते?’ - अशीही एक पोस्ट शनिच्या आंदोलनानंतर आता सोशल मीडियात फिरू लागली आहे. त्यामुळे उद्या याप्रश्नीही राज्यात आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनात भाष्य केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरेतर भाजपा हा हिंदुत्वाचा व परंपरांचा पाठीराखा. अशावेळी फडणवीस यांनी महिलांना चौथ:यावर प्रवेश द्यायला हवा, असे म्हणणो याला विशेष महत्त्व आहे. त्यांनी हे विधान समतेच्या दृष्टिकोनापेक्षा दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव गडाख हे या देवस्थानचे सव्रेसर्वा आहेत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा मतदारसंघही शिंगणापूरला लागूनच आहे. पुरोगामी म्हणविणा:या या नेत्यांनी या प्रश्नाबाबत अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणविणारे नेते गप्प व भाजपा महिलांच्या बाजूने, असे एक विरोधाभासी समीकरण पुढे आले आहे.
भाजपाला देवस्थानांच्या ठिकाणी हा संघर्ष उभा करून तेथील विश्वस्त मंडळे खिळखिळी करायची आहेत, असे यामागचे षडयंत्र असल्याची शंकाही शिंगणापूरकरांना आहे. शंकराचार्यानी साईबाबांविरोधात वक्तव्ये केली होती, तो दाखलाही यासाठी दिला जात आहे.
हिंदू धर्म आहे, तोवर मंदिर राहणार. मंदिरातील मूर्तीला देवपण हवे असेल, तर देवाच्या सर्व लेकरांना तेथे जायला वाव हवा, असे साने गुरुजींनी म्हटले; पण साने गुरुजींच्या मनातील समता ही सर्वाच्याच अंगी असेल, असे कसे म्हणता येईल?
(लेखक ‘लोकमत’च्या नगर आवृत्तीत
संपादकीय प्रमुख आहेत.)
sudhir.lanke@lokmat.com