2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकसाठी चीननं तीस विमानं, चार हजार रॉकेट लाँचर्स आणि सात हजार विमानविरोधी बंदुकांचा ताफा सज्ज ठेवला होता. - पावसानं ऐनवेळी विचका होऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी! आता जगभर प्रयोग होताहेत ते कृत्रिम पावसाचे! सध्या मराठवाडा आणि व ...
बुडत्याला अस्मितेचा आधार लागतो. मात्र असा आधार घेणारे एकदा का बुडण्याची भीती नाहीशी झाली, की ती अस्मिता टाकून देतात किंवा बुडण्याची खात्री झाली तर पटकन त्या गोतावळ्यातून सुटण्यासाठीही लोक अस्मिता टाकून देतात. ...
नद्यांजवळ राहणा:या खेडय़ापाडय़ातल्या माणसांच्या ‘श्रुत’ ज्ञानाच्या आधारे शिकत गेलेल्या पागलबाबांकडे पाण्याची एक फार मस्त परिभाषा होती. ते म्हणाले, पाण्याकडे मी तीन टप्प्यात पाहतो, चलता जल, फलता जल और जलता जल! चलता जल म्हणजे वाहतं पाणी. त्या पाण्याचा उत ...
एकीकडे एकेका माणसाकडे कपडय़ांचा महामूर पूर, तर दुसरीकडे थंडीच्या कडाक्यातून ऊब मिळेल एवढी चिंधीही अंगावर मिळणं मुश्कील! - समाजातल्या या विसंगतीचा त्रस होऊन एका तरुणाने एक साधी कल्पना उचलली- ज्यांच्याकडे जुने, जास्तीचे कपडे आहेत, त्यांनी ते ज्यांच्याकड ...
अमेरिकेत लोकांचा (गैर)समज आहे. हातात जपमाळ घेऊन हरी-हरी करत बसायची वेळ आली की लोक चालले फ्लोरिडाला!. तिथे हवा चांगली, थंडी नाही, राहणी साधी-स्वस्त आणि परवडणारी. धावपळ नाही, संथ दिनक्रम. थंडीच्या दिवसात वॉशिंग्टनसारख्या ठिकाणी बर्फाचे ढिगारे उपसायला ...
हिंदीमध्ये ना देशभक्तीपर चित्रपटांची कमी आहे ना गाण्यांची. पण क्वचितच ही गाणी ऐकायला मिळतात. अशी बरीच गाणी आपण कर्मकांडाचा भाग बनवून टाकली आहेत. काही गाणी मात्र देशभक्तीची भावना अतिशय उत्कटतेने व्यक्त करतात. ...
विचारसरणीत फरक पडला, तो आम्ही दोघांनी निवडलेल्या करिअरच्या भिन्न शाखांमुळे. दोन्ही शाखांचे उद्देश भिन्न होते. त्याबद्दल थोडंसं नव्हे, तर बरंच काही सांगण्यासारखं आहे. तत्पूर्वी, हे लेख लिहीत असताना वातावरणात पोर्न फिल्मबद्दल चर्चा आहे. ...
कादंबरीचं स्ट्रक्चर कसं असावं? अनेक पर्याय तपासले आणि डॅन ब्राऊनचा पर्याय निवडला. कादंबरीतली पहिली घटना आणि शेवटच्या घटनेतलं अंतर कमीत कमी करायचं. मग साडेतीनशे वर्षातला घटनाक्रम दोन-तीन दिवसांत बसवायची कसरत सुरू केली. महिनाभरच्या खटपटीनंतर कथानक 72 त ...
मानसिक आरोग्याविषयी देशाच्या कानाकोप:यात काय परिस्थिती आहे, त्यासाठी काय करावं लागेल याचा अभ्यास त्याला करायचा होता. पण केवळ संख्यांचे आकडे जमवून निष्कर्ष काढणंही मान्य नव्हतं. प्रश्न खरंच समजून घ्यायचा असेल, लोकांशी ‘कनेक्ट’ व्हायचं असेल तर सायकलशि ...