दिग्दर्शन असो की अभिनय, बाईंचं सगळंच काम नेटकं, शिस्तशीर आणि त्यावर पुरेपूर मेहनत घेतलेली. त्यांची कमाल ही की, आपल्याला न आवडलेल्या नाटकांतही तितकंच उत्तम काम करण्याची त्यांची क्षमता! ...
चेंबूरच्या टिळकनगरातील ‘डायमंड क्रिकेट क्लब’ची ही सारी पोरं. राजेंद्र निकाळजे त्यांचा म्होरक्या. सिनेमाची तिकिटं ब्लॅक करता करता पोलिसांशी त्यानं पंगा घेतला आणि बघता बघता तो अंडरवर्ल्डचा ‘डॉन’ झाला. ...
शे-पाचशे गरोदर स्त्रियांची हॉस्टेल्स. स्त्री-पुरुष बीज आणि गर्भाशयांभोवती तयार झालेली बाजारपेठ. रिक्षावाल्यांपासून सरोगसी एजण्टर्पयत हातात हात गुंफून सतत धावणा:या साखळ्या आणि ‘येथे मुले तयार करून मिळतील’ असे फलक मिरवणारे गुजरातमधले कोमट शहर : आणंद! ...
प्रवासाच्या कित्येक दिवस आधीपासूनच सार्थवाहाची लगीनघाई सुरू होई. सर्वात कठीण प्रवास वाळवंटातला! तिथे विषारी वनस्पती, चावरे प्राणी असत. मृगजळांचा भूलभुलय्या भरकटत नेई. अख्खा माणूस गिळणारी फसवी दलदल असे. प्रवासात पुरेसा पाण्याचा साठा तो बरोबर घेई. ...
इथे सर्व काही उपलब्ध आहे. तुम्हाला ऐनवेळी मनुष्यबळ हवंय, माणसं सेवेला तत्पर आहेत. आर्थिक कुवत नाही, तुमचा प्रापंचिक खर्च परस्पर भागवला जाईल. आरोग्याचा प्रश्न आहे, विविध तपासण्या फुकट केल्या जातील. अगदीच इमर्जन्सी आहे, गळ्यातलं लॉकेट दाबा, दोन मिनिट ...