तो भावी राजा आणि ती त्याची होणारी राणी! पदरात दोन गोडुली मुलं. वर्तन अत्यंत प्रतिष्ठित आणि मर्यादशील. राजघराण्याचा रुबाब असला, तरी त्याची आढय़ता नाही. बदलत्या वास्तवाची जाणीव आहे आणि त्यानुसार बदलाची तयारीही! ...
गचडीने गिजगिजलेल्या सेऊलमधल्या कलकलाटाला कंटाळून सोंगडोमध्ये स्थायिक झालेली जोडपी विकेण्ड आला, की सेऊलला पळतात! का? - तर सोंगडोमध्ये बाकी सगळं आहे, पण ‘जान नाही’ असं त्यांना वाटतं. सोंगडोमध्ये समुद्राचं पाणी फिरवून केलेल्या कृत्रीम नदीकाठच्या शुद ...
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे फकिरासारखं नि:संग जगणो नाही. सर्वसंगपरित्यागही नाही. असे नि:संग जगणो शक्यही नाही.म्हणूनच जोशुआ बेकर सांगतो, शंभरहून कमी गोष्टींसोबत जगा. रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, आहे त्याच गोष्टींचा नवा उपयोग शोधून काढला तर हे ...
काही महिन्यांपूर्वी माङया रिकाम्या शाळेच्या इमारतीला मी सांगून आलो की आपला संबंध आता संपला! एकदा जुन्या उग्र अत्तराची बाटली शांतपणो बेसिनमध्ये रिकामी केली. एकदा जवळच्या मैत्रिणीचा मेसेज वाचला. तो निरोप मी शांत श्वास घेऊन पचवला. अनेकदा आपल्याला लक् ...
मला परमेश्वर भेटला तो स्वरातून. अजाणत्या वयापासून माङया कानावर बालगंधर्वाचे लडिवाळ सूर पडले आणि त्याचे सहीसही अनुकरण करण्याचा एक वेडाच ध्यास मला लागला! जन्मानंतर बाळाला जी बाळगुटी दिली जाते, त्यात घोटीव स्वरांचे वळसेही उगाळून मला मिळाले. बहुधा हीच ...
हलधर नाग. केवळ तिसरी शिकलेले. शंभरावर काव्यसंग्रह आणि 20 महाकाव्ये त्यांनी लिहिली आहेत. संबलपुरी-कोशली भाषेला नवसंजीवनी देणा:या नाग यांचे लिखाण ग्रामीण जीवनाचा अस्सल बाज आहे. लोकजीवनात मिसळून गेलेल्या या लोककवीला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौर ...
वाफेची इंजिन्स मागे पडली आणि झुक झुक करत धावणा:या रेल्वेगाडय़ाही आपोआप बंद झाल्या. मात्र या गाडय़ांची आठवण करून देणा:या काही रेल्वे अजूनही आपल्याकडे आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनला जात असाल तर तिथल्या रेलगाडीचा अनुभव मुलाबाळांसह घ्यायलाच हवा. ...
हातातला कॅमेरा मला कुठं कुठं घेऊन गेला. देशाच्या दुर्गम, अपरिचित टोकांवरच्या सुदूर गावखेडय़ात, जिथल्या पायवाटाही नागरी पाऊलांनी मळलेल्या नाहीत अशा लांबवरच्या वाडय़ावस्त्यांवर जायची संधी या फोटोग्राफीमुळेच मिळाली. ...
कॉमेण्ट्रीशिवाय क्रिकेट? - कल्पना तरी कुणी करेल का? नुस्ती मॅच पाहून आणि क्रिकेटमधल्या तांत्रिक गोष्टींचं वर्णन ऐकून खेळातल्या टोकाच्या जोषाची आणि प्रसंगी अत्यानंदाची उत्कट पातळी कशी गाठली जाणार? ...