आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच, घरटी एक तरी नाटकवाला असायचाच. केबल टीव्हीनं नाटकांचे हे दिवस संपवले. आजकाल पुण्यात प्रत्येक घरात किमान एक तरी मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच ...
सुटी म्हटली की कुठल्यातरी बीचवर नाही तर हिल स्टेशनवर जायचे आणि धमाल करायची हा प्रत्येकाच्या मनातला ठरलेला बेत असतो. मग त्यासाठी बीचऐवजी हिल स्टेशनला सेफ म्हणून प्राधान्य दिले जाते. मग त्यातही माथेरानलाच अग्रक्रम मिळतो ...
‘ओघिनओ’ नावाचे अतिशय प्रखर कडकडीत ऊन फक्त राजस्थानातच पडते. याच काळात ‘बालटी’ या नावाने ओळखल्या जाणा:या वाळवंटात गरम झालेल्या वाळूमातीची वादळे -‘लूं’अंगाची लाही लाही करत असतात ...
बस, लोकलमधून ओसंडून वाहणारे, एका पायावर उभे राहत, लोंबकळत प्रवास करणारे प्रवासी एकीकडे, तर चारचाकी गाडय़ांतून किचाट गर्दी आणि प्रदूषणाला तोंड देत एकेकटेच फिरणारे प्रवासी दुसरीकडे. मोठय़ा शहरांत तर हे नेहमीचंच दृश्य. काही हजार लोक राहणा:या मुंबईमधील एक ...
मुंबईच्या कांदिवलीतील ‘व्हिस्परिंग पाम्स’ हे एक विशाल कॉम्प्लेक्स. काही हजार लोक या सोसायटीत राहतात. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, कार्यालयात जाण्यायेण्यासाठी इथल्या लोकांचे होणारे अतोनात हाल संतोष शेट्टी या युवकाच्या लक्षात आले आणि त्यानं लढवली एक अनोखी ...
व्हॉट्सअॅप आहे तरी काय? मला जगाशी नको तितके जोडू पाहणारे एक नवे आयुध? ई-मेल, फेसबुक, वायबर, मेसेंजर, फेसटाइम, स्काईप यांनी इंच इंच लढवत माझ्या खासगी आयुष्याचे चांगभले केले त्या यादीत ही आणखी एका नव्या आक्रमणाची भर, की नव्या युगाचे व अफाट वेगाचे प्रत ...
समझोता एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडविणारे आणि मालेगावात बळी घेणारे अतिरेकी हिंदुत्ववादी असल्यामुळे सुटत असतील, तर आपली तपास आणि न्याय यंत्रणाही धर्माधतेच्या बाजूने जाणारी, धर्मनिरपेक्षतेची संवैधानिक शपथ विसरणारी आहे. ...
‘अल्टिमेट मिनिमलिस्ट’ म्हणून गांधीजींचे नाव आजही मोठय़ा आदराने घेतले जाते. आपल्या बुद्ध-गांधी तत्त्वज्ञानाचा नव्या मिनिमलिझमशी मेळ सांधणारा एक तरुण भारतीय ब्लॉगर हार्दिक नागर. तो सांगतो, जाणीवपूर्वक आयुष्य जगायचे असेल तर मल्टीटास्किंग सोडून द्या आणि ए ...