६५ वर्षांपूर्वीची घटना. समाजातील एकाने दुसऱ्या जातीत विवाह केला. बस. तेव्हापासून अनेकांना वाळीत टाकलं गेलं. पंचांसमोर त्यांनी नाक घासलं, ‘चुकलो’ म्हणून माफी मागितली, काहींनी लाखो रुपये दंडही भरला.. ...
अतुल (कुलकर्णी) अतिशय हट्टी, आग्रही आणि किंचित रागीटही आहे. राणी (मुकर्जी) नुसती रागीटच नाही, पुरेशी भांडकुदळही आहे. चित्रपट बनवताना ज्यांच्यासोबत मी एकत्र काम केले, त्यातील हे दोघे. ...
आपण जे सांगू पाहतो ते बऱ्याचदा आपल्या कलेतून संपूर्णपणे सांगता येत नाही, लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. काही विषय असे असतात की ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं. ...
गेल्या वर्षी महाराष्ट्रात १८ हजार बालमृत्यू झाल्याचे जाहीर झाले आणि अनेक जण खाडकन जागे झाले. पण आजही अनेक बालमृत्यूंची नोंदच होत नाही. ती संख्या विचारात घेतली तर महाराष्ट्रातील बालमृत्यूंची संख्या होते ७५ हजार! शासनाच्याच समितीने २००४ मध्ये निष्कर्ष ...
युनिसेफच्या महासंचालकांनी एकदा आफ्रिकेच्या दुष्काळी भागाला भेट दिली. तिथल्या एका कुपोषित मुलाला त्यांनी विचारले, मोठे झाल्यावर काय बनण्याचे तुझे स्वप्न आहे? त्याने सांगितले, मोठे होईपर्यंत जिवंत राहण्याचे माझे स्वप्न आहे! महाराष्ट्राच्या कुपोषित भागा ...
कुपोषणाच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा नाही. बरेचसे उपाय वरवरचे. शिवाय भ्रष्टाचार. धरसोडीच्या योजना. आदिवासींपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. रोजगार नाही. उपजीविकेची साधनं नाहीत. आरोग्यसेवा नाही. डॉक्टर नाहीत. महागाईनं पोट भरता येत नाही. सगळा नन्नाच ...
दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी उपग्रहांचा वापर पहिल्यांदा अमेरिकेनं केला. त्यातूनच ओसामा बिन लादेनचा खात्मा झाला. पाकिस्तान-अफगाण सीमेवरील तालिबान्यांना नेस्तनाबूत करण्यात आलं. आणि आता पाकिस्तानात घुसून भारतानं तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आ ...
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, घर, बँक, एटीएम.. कितीतरी कागद याठिकाणी वाया जातो. काही सरकारी विभागांना तर कागद रीतसर नष्ट करावे लागतात. त्यामुळे हे कागद रद्दीमध्ये न देता सरसकट जाळले जातात. काही शाळांत याच कागदापासून हातकागद आणि कलात्मक वस्तू बनवल्या ...