झारखंडमधल्या पाडय़ांवर.

By Admin | Updated: January 31, 2016 10:12 IST2016-01-31T10:12:55+5:302016-01-31T10:12:55+5:30

एक छोटीशी साबणाची चिपटी, एखादं नवंकोरं ब्लेड, एखादं निळंशार प्लॅस्टिक मेणकापड. या सा:या वस्तू ‘बदलाची’ प्रतीकं ठरू शकतात यावर एरवी कुणी विश्वास ठेवला नसता.

On the Padayas in Jharkhand | झारखंडमधल्या पाडय़ांवर.

झारखंडमधल्या पाडय़ांवर.

सुधारक ओलवे
 
एक छोटीशी साबणाची चिपटी, एखादं नवंकोरं ब्लेड, एखादं निळंशार प्लॅस्टिक मेणकापड. या सा:या वस्तू ‘बदलाची’ प्रतीकं ठरू शकतात यावर एरवी कुणी विश्वास ठेवला नसता.
मात्र झारखंडमधल्या गरिबीत रुतलेल्या आदिवासी पाडय़ा-वस्त्यांवरच्या गरोदर माता आणि नवजात शिशूंचं आरोग्य यांच्या जगण्यात या गोष्टी क्रांतिकारी ठरल्या. डॉ. प्रसंता त्रिपाठी यांनी स्थापन केलेल्या ‘एकजूट’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेमुळे या भागात एका बदलाची सुरुवात झाली.
मी 2क्क्4 मध्ये पहिल्यांदा झारखंडला गेलो होतो. देशातल्या अतिदुर्गम, अतिग्रामीण भागातील पार तळागाळातली खेडी या निमित्तानं मला पहिल्यांदा भेटली. नागरीकरणापासून कित्येक मैल दूर असलेल्या या खेडय़ांत विजेचे खांबही पोहचले नव्हते तर बाकी गोष्टी दूरच. जुन्या पारंपरिक रीतिभातींप्रमाणं जगणारी, शेती करणारी ही माणसं. ‘एकजूट’च्या एका प्रोजेक्टसाठी इथल्या गरोदर माता आणि नवजात बालकांचे फोटो काढण्यासाठी मी या भागात गेलो होतो.
वस्तीतल्या बायाबापडय़ांशी बोलायचं म्हणून गावातल्या मुलींनाच ‘एकजूट’ संस्थेनं प्राथमिक प्रशिक्षण दिलं होतं. बाळंतपण करण्यापूर्वी साबणानं हात स्वच्छ धुणं, गरोदर मातेला जमिनीवर न झोपवता प्लॅस्टिकच्या कापडावर झोपवणं, बाळाची नाळ कापण्यासाठी स्वच्छ, नवंकोरं ब्लेड वापरणं या साध्या साध्या गोष्टी बाळंतपण करणा:या ‘सुईणी’लाही सांगण्यात येत होत्या. स्वच्छता आणि आरोग्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल होतं. परिणाम म्हणून बाळाच्या नाळेला शेळीच्या लेंडय़ा चोळणं बंद झालं. त्यातून आजार होतात हे बायाबापडय़ांना पटू लागलं. 
या काळात मी इतकी बाळंतपणं पाहिली की, प्रसवकाळात आणीबाणी आलीच तर अडलेल्या बाईला मी बरीच मदत करू शकतो!!
किती वर्षे लोटली या गोष्टीला.
गेल्या वर्षी 2क्15 मध्ये म्हणजे 11 वर्षानंतर मी पुन्हा त्याच भागात गेलो. इटुकल्या वस्तूंचा हात धरून तिथं शिरलेला चांगला बदल आता नजरेत भरण्याइतपत मोठा झाला होता. 
जी मुलगी माङया डोळ्यादेखत जन्माला आली ती आता चांगली उंचपुरी माङयासमोर उभी होती. दणकट, हट्टीकट्टी. माता आणि नवजात बाळांच्या आरोग्यासाठी गेल्या काही वर्षात इथं जे काम झालं त्यामुळे बाळं जगली, त्यांच्या वाटय़ाला सुदृढ बालपण आलं. गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानं ‘एकजूट’च्या महिला सहभाग-सक्षमीकरण मॉडेलच्या कर्तबगारीची प्रशंसा केली आहे. माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्यावर या कामाचा सकारात्मक परिणाम झाल्याचं अहवालात नोंदवलं आहे.
अर्थात अजून बरंच काही घडायचं आहे, सुधारणांची गरज आहे. मात्र माणसं स्वत:हून वैद्यकीय सेवांचा आग्रह धरू लागली आहेत आणि जन्माला येणा:या प्रत्येक बाळासाठी आता भरपूर जगण्याची आशा निर्माण झाली आहे.
झारखंडच्या आदिवासी पाडय़ांवर नव्या जगण्याचा हा प्रारंभ आहे. एका बदलाची सुरुवातच!!

Web Title: On the Padayas in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.