एक होता सुधीर

By Admin | Updated: May 19, 2014 11:26 IST2014-05-17T21:31:30+5:302014-05-19T11:26:12+5:30

मुख्य सहायकांपैकीसुद्धा दुस:या किंवा तिस:या सहायकाची भूमिका त्याच्या वाटय़ाला यायची; मात्र त्यातही तो छाप पाडून जायचा व म्हणूनच लक्षात राहायचा.

One was Sudhir | एक होता सुधीर

एक होता सुधीर

 हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे एक अजबखाना आहे. भगवानदास मूलचंद लुथरिया असं नाव घेतलं, तर कुणाच्या लक्षातही येणार नाही; मात्र सुधीर असं सांगितलं, तर लगेचच त्याचे किती तरी चित्रपट आठवतील. मुख्य खलनायकाच्या मुख्य सहायकांपैकीसुद्धा दुस:या किंवा तिस:या सहायकाची भूमिका त्याच्या वाटय़ाला यायची; मात्र त्यातही तो छाप पाडून जायचा व म्हणूनच लक्षात राहायचा. या ज्येष्ठ अभिनेत्याचं नुकतंच निधन झालं. 

त्याला वाहिलेली स्मरणांजली.
 
वार’. 1975मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पुढच्या वर्षी 40 वर्षे होतील. विजयचा (अमिताभ बच्चन) दावरच्या टोळीतला प्रतिस्पर्धी. लहानपणापासून हा जयचंद विजयच्या डोक्यात जाऊन बसलेला. विजय बूटपॉलीश करीत असताना रेस खेळण्यासाठी जाणारे दावर आणि जयचंद. सुटाबुटातले, सभ्य दिसणारे मुंबईतले स्मगलर.
जयचंदच्या ओठांमध्ये सिगारेट. बूटपॉलीश करून झाल्यानंतर विजयच्या पुढय़ात पाच पैशांचं नाणं फेकतो. त्या वेळी चिडून ‘साब, पैसा उठा के दो। हम बूटपॉलीश करता है, कोई भीक नहीं माँगता।’ असं तो जयचंदला सुनावतो. आपल्यासारख्या माणसाला टीचभर पोरानं सुनावल्यानं  चकित झालेला जयचंद दावरकडे प्रतिक्रियेसाठी पाहतो. दावर त्याला ‘या पोराला पैसे उचलून दे,’ असं सांगतो. जयचंद घुश्शातच टाकलेले पैसे उचलून त्या पोराच्या हातावर टेकवतो. दोघं पुढे जातात. दावर जयचंदला म्हणतो, ‘इस लडके के तेवर देखे तुमने? ये लडका जिंदगीभर बूटपॉलीश नहीं करेगा। एक ना एक दिन ये जरूर कुछ बनेगा।’
‘दीवार’मधला हा प्रसंग. मास्टर अलंकार, इफ्तेखार आणि सुधीर यांच्या कसलेल्या अभिनयामुळे तो चांगलाच लक्षात राहिला. किंबहुना, याच प्रसंगापासून विजयच्या बंडखोरपणाची जाणीव प्रेक्षकांना होते. यातल्या सुधीरची आठवणसुद्धा त्याच्या कसदार अभिनयामुळे प्रेक्षकांना राहिली. 
सुधीरला या गाजलेल्या चित्रपटात फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं, तर बरंच फुटेज मिळालं आहे. सुधीरच्या भेदक नजरेतून, वेशभूषा आणि देहबोलीतून अंडरवल्र्ड बदमाषाची प्रतिमा हुबेहूब साकारली होती. विजयचा पोलीस अधिकारी 
असलेला भाऊ रवी (शशी कपूर) याच्या 
कारवायांमुळे त्रस्त झालेल्या दावरच्या टोळक्याची मीटिंग सुरू आहे.
समुद्रमार्गे येणारं सोनं पोलिसी कारवाईत पकडलं गेल्यानं अस्वस्थ झालेला दावर, जयचंद आणि त्यांचे साथीदार यांच्यात खलबत सुरू आहे. या नव्या इन्सपेक्टरला उडवा, खलास करा, असा सल्ला जयचंद दावरला देतो. नव्यानंच या टोळीत सामील झालेला विजय गंभीर होऊन ही चर्चा ऐकत असतो. ‘एक पुलिसवालेपर हमने हमला किया तो सारी पुलिस फोर्स दुश्मन बन सकती है। एक इन्सपेक्टर को मारेंगे तो दुसरा आ जाएगा,’ असं सांगून जयचंदचा सल्ला मनावर न घेण्याविषयी दावरचं मन वळवू पाहतो. त्या वेळी जयचंद ‘क्या यही एक वजह है विजय, और कोई दुसरी वजह नही?’ असं विचारतो. त्याक्षणी संतापाचा स्फोट होऊन ‘हां, वो मेरा भाई है,’ असं सांगत जयचंदचं मानगुट विजय पकडतो. रवी विजयचा भाऊ आहे, हे जयचंदला माहिती असावं अशी शंका प्रेक्षकांना येते, इतकी ताकद जयचंदच्या नजरेत, आवाजात आणि अभिनयामध्ये आहे.
सुधीर या एकेरी नावानंच प्रसिद्ध असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याचं मुंबईत निधन झालं. भगवानदास मूलचंद लुथरिया असं त्याचं खरं नाव. बच्चनची सरशी असताना सुधीर ‘सत्ते पे सत्ता’मध्येही होता. त्याच्या सात भावांपैकी एक. ‘धर्मात्मा’ या फिरोज खानच्या चित्रपटात रणजितच्या सोबतीनं तो सहखलनायक होता. सुधीरनं अनेक ¨हदी चित्रपटांतून खलनायकी भूमिका केल्या. मुख्य खलनायकाच्या अवतीभवती तो असे. 1954पासून सुधीर चित्रपटसृष्टीत होता. देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे कृष्णधवल चित्रपटांत तो नायक किंवा सहनायक होता. देखणोपणा या गुणामुळे चित्रपटसृष्टीत केवळ नायकाच्या भूमिका वाटय़ाला येतात, असं नाही. खलनायकाला नायकापेक्षा बराच स्कोप असू शकतो. अनेक नायक आणि एक खलनायक असला, तर खलनायकच ख:या अर्थानं त्या चित्रपटाचा हिरो ठरतो, हे शोलेमुळे दिसून आलंय. तर, नायकाला साजेसं व्यत्तिमत्त्व असताना सुधीरला तशा भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. 
 पुढे छोटय़ा चरित्र-भूमिकांत सुधीर दिसत असे. ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘शान’सह अनेक चित्रपटांत तो होता; पण लक्षात राहिला तो ‘दिवार’मुळे. अलीकडे शाहरुख खानसोबत तो ‘बादशाह’ चित्रपटातही होता. भागू या नावानं चित्रपटसृष्टीत सुधीर ओळखला जाई. अगदी कोवळ्या वयात चित्रपटांत आला. 45 ते 5क् वर्षे अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. 
गेली अनेक दशकं ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. एकाकी अवस्थेत राहत होते. अंधेरीतील त्यांच्या बंगल्यापलीकडे त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शाहरुख खाननं ‘त्यांच्याकडे भोजनासाठी जाणं राहूनच गेलं,’ अशा शब्दांत दु:ख व्यक्त केलं आहे. एका देखण्या व्यक्तिमत्त्वाचा, खलनायकासोबतच्या दुय्यम गुंडाच्या भूमिका वाटय़ाला आलेल्या या अभिनेत्याचा ठसा त्याच्या अस्सल अभिनयामुळे पडद्यावर उमटला होता, हे कुणाला नाकारता येणार नाही.
(लेखक लोकमत पुणो आवृत्तीमध्ये 
बातमीदार आहेत़)
 

Web Title: One was Sudhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.