एकावेळी एकच..

By Admin | Updated: January 10, 2015 12:43 IST2015-01-10T12:43:36+5:302015-01-10T12:43:36+5:30

हल्ली बर्‍यापैकी स्वयंपाक करतो ! माझ्या पत्नीच्या मते त्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो म्हणते, मी एकावेळी एकच पदार्थ बनवू शकतो! ती स्वयंपाक करते तेव्हा स्टोव्हवर चार-पाच तरी पदार्थ शिजवले जात असतात.

One at a time .. | एकावेळी एकच..

एकावेळी एकच..

>- धनंजय जोशी
 
हल्ली बर्‍यापैकी स्वयंपाक करतो ! माझ्या पत्नीच्या मते त्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो म्हणते, मी एकावेळी एकच पदार्थ बनवू शकतो! ती स्वयंपाक करते तेव्हा स्टोव्हवर चार-पाच तरी पदार्थ शिजवले जात असतात.
मला पत्नी नेहमी म्हणत असते, ‘माणसानं (म्हणजे मी बरं का!) एकात एक काम करायला शिकलं पाहिजे!’ आता त्याबद्दल दोन गोष्टी!
एक म्हणजे आम्हाला दोघांना तेवढाच वेळ लागतो! दुसरं म्हणजे माझ्याअंतर्गत समरूप झालेली सान सा निमची शिकवण!
(आणखी एक गंमत आठवली. मी ‘अनेक’ वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा आश्रमामध्ये राहिलो होतो. - सात वर्षे ! स्वामी कालिकानंद तेव्हा म्हणाले होते, ‘धनंजय, अमेरिकेत चार गोष्टी मिळाल्या म्हणजे माणूस खरा ‘पोचला’ असं समजायला हरकत नाही !’ त्या म्हणजे, ‘बेसबॉल, हॉट डॉग, अँपल पाय आणि शेव्हरोले (गाडी)! 
स्वामी मला स्वयंपाकाबद्दल सांगायला विसरले होते! त्यानंतर मी अनेक वर्षे पंचवीस साधकांसाठी तोच स्वयंपाक करीत असे!) 
असो! ‘एकात एक’ तर मला कधीच जमलं नाही! एकावेळी एकच मात्र ‘सहज’ जमलं!
त्याची किल्ली खूप सोपी आहे. तुमची एकाग्रता इतकी विलक्षण होऊन जाते. जेव्हा तुम्ही एकाच वेळी एकच गोष्ट किंवा क्रिया करता तेव्हा तुमचं मन शंभर टक्के त्या क्रियेमध्ये मग्न झालेलं असतं! चार गोष्टी एका वेळेस करताना जेव्हढा वेळ लागेल त्याच्या एकचतुर्थांश तरी वेळ लागेल अशा साधनेमध्ये ! अशा तर्‍हेनं केलेला स्वयंपाक म्हणजे साधनाच की!
सान सा निमची एक गंमतीदार गोष्ट ! 
ते नेहमी आम्हाला सांगायचे, ‘तुम्ही वाचताना फक्त वाचायचं, जेवताना फक्त जेवायचं!’
‘फक्त’ हा महत्त्वाचा शब्द! ‘मल्टिटास्किंग’च्या अगदी विरुद्ध!
एकदा प्रॉव्हिडन्स झेन आश्रमामध्ये नवीन साधिका सान सा निमला भेटायला आली. तेव्हा ते सकाळचं वर्तमानपत्र वाचत होते आणि ब्रेकफास्टपण करत होते. त्यांची शिकवण तिनं वाचलेली होती! ती म्हणाली, ‘सान सा निम, तुम्ही नेहमी म्हणता,  की जेवताना नेहमी फक्त जेवावं आणि वाचताना फक्त वाचावं! मग तुम्ही करता ते कसं वेगळं?’
सान सा निम तिच्याकडून बघून खळखळून हसले आणि म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा फक्त जेवता आणि वाचता, तेव्हा फक्त जेवावं आणि वाचावं!

Web Title: One at a time ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.