शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हे काही महायुद्ध नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:05 IST

आताची परिस्थिती आणीबाणीची आहे.  लोकांमध्ये इतकी अस्वस्थता कधीच नव्हती; पण त्याला इतकं काय घाबरायचं?

ठळक मुद्देफक्त काही आठवडे आम्हाला घरात, सोफ्यावर आरामात बसायचं आहे. महायुद्धापेक्षा तर ही परिस्थिती बिकट आणि गांभीर्याची नाही ना? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? 

- जॉर्जिओ रॉसेटी

कोरोना व्हायरसनं आमच्याकडे थैमान घातलं आहे. लोक भयभीत झाले आहेत. सरकारनंही लोकांना घराबाहेर न पडण्याची, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याची विनंती केली आहे. काही प्रतिबंधात्मक उपायही योजले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला इथल्या बर्‍याच उद्योगधंद्यांना टाळे लागले आहे. बार, रेस्टॉरण्ट्स, चित्रपटगृहे, थिएटर्स बंद आहेत. बहुतेक कंपन्या, संस्थांनी आपापल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी दिली आहे. ज्या कर्मचार्‍यांना कार्यालयीन ठिकाणी जाण्याशिवाय गत्यंतरच  नाही, असे लोकच फक्त प्रत्यक्षात कामावर जात आहेत. आत्यंतिक गरजेशिवाय आणि आता बाहेर पडावंच लागेल, अशी परिस्थिती उद्भवल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे. अनेकांनी आपापल्या घरात किराणा साठवून ठेवला आहे. तो संपल्यावर, पुन्हा भरण्यासाठी फक्त काही वेळ ते किराणा दुकानांत जात आहेत.आमचं अख्खं शहर रिकामं आहे. रस्त्यावर सन्नाटा आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून मीही घराबाहेर पडलेलो नाही; पण जे फोटो आणि व्हिडीओ मी पाहिलेत, त्यातलं चित्र तरी असं दिसतं आहे. जणू काही एका आभासी आणि अतार्किक परिस्थितीत आम्ही सारेच जगतो आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच अशी परिस्थिती आम्ही अनुभवतो आहोत. काय करावं, कोणालाच काहीच सुचत नाहीये; पण सरकारी सूचना मात्र प्रत्येक जण आता गांभीर्यानं पाळतो आहे.सगळ्याच गोष्टी बंद पडल्याचा फटका मुलांच्या शिक्षणालाही बसला आहे. पण त्यावर पर्याय म्हणून अनेक शाळांनी आता डिजिटल, व्हच्यरुअल क्लासरूम्सचा पर्याय अवलंबायला सुरुवात केली आहे.आताची परिस्थिती आणीबाणीची आणि अभूतपूर्व अशी आहे. लोकांमध्ये इतकी भीती यापूर्वी मला कधीही दिसली नव्हती. तरीही एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावीशी वाटते, आमचं घराणं स्वातंत्र्यसैनिकांचं आहे. आपल्या वयाच्या केवळ पंचविशीत असताना माझ्या दोन्ही आजोबांनी दुसर्‍या महायुद्धात भाग घेतलेला आहे. त्या महायुद्धाच्या जखमांचे व्रण घेऊन आयुष्यभर ते जगले. काय असतील त्या वेदना? आता तर फक्त काही आठवडे आम्हाला घरात, सोफ्यावर आरामात बसायचं आहे. बाकी काहीच करायचं नाहीये. महायुद्धापेक्षा तर ही परिस्थिती बिकट आणि गांभीर्याची नाही ना? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? त्यातल्या त्यात वाईट गोष्ट एकच की, आमचं सोशल लाइफ जवळपास पूर्णत: बंद झालं आहे. मित्र आणि आमच्या नातलगांसोबतच्या आमच्या भेटीगाठी बंद झाल्या आहेत. आमच्यासारख्या सोशल लोकांना ही गोष्ट जरा कठीणच जातेय; पण त्याची मनोमन तयारी आता प्रत्येकानं केली आहे.प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार बाहेर पडू शकतो, कामावर जाऊ शकतो, किराणा आणण्यासाठी वाटेल तेव्हा बाहेर पडू शकतो; पण त्यावर प्रत्येकानंच स्वनियंत्रण आणलं आहे. गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून सुपरमार्केटसारख्या ठिकाणी मात्र काही निर्बंध आणले आहेत. तिथे काही काळ थांबावं लागू शकतं एकमेकांपासून दोन किंवा चार मीटरचं अंतर राखून रांगेत उभं राहावं लागू शकतं; पण त्याची मानसिक तयारी आता प्रत्येकानंच ठेवली आहे. (लेखक इटलीतील रहिवासी आहेत.)

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)