शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मध्यरात्रीची मुंबई..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:05 IST

जगभरातली महानगरं रात्रभर जागी असतात, तर मुंबई का नको?- अशा आग्रहातून मुंबईच्या काही भागात ‘नाइटलाइफ’ सुरू करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नाइटलाइफ म्हणजे केवळ धनवंतांना मद्यपानादी मौजमजेचा परवाना नव्हे, तर मुंबईसारख्या महानगराची अर्थचक्रं अधिक वेगाने फिरवण्यासाठी या धोरणाचा हातभार लागेल, अशी अपेक्षा या सरकारी निर्णयामागे आहे.

ठळक मुद्देमुंबईचा चेहरा बदलणार्‍या या निर्णयाच्या निमित्ताने रात्रीच्या मुंबईचा फेरफटका..

- मनीषा म्हात्रेनाईटलाइफच्या निमित्तानं मुंबईत फेरफटकारात्रीची मुंबई मला तशी नवी नाहीच, अनेकदा कामानिमित्त घरी पोहचायला उशीर होतोच. मात्र पहाटेपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर भटकण्याची ओढ काही वेगळीच होती. मुंबईतल्या ‘नाइटलाइफ’च्या निर्णयाच्या निमित्तानं ही संधी मी घेतली.बाराच्या ठोक्याला कार्यालय सोडून थेट वरळी सी फेस गाठले. कट्टय़ावरचा सुखावणारा वारा, त्यात कुठे वाढदिवस साजरा होतोय, तर कुठे एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून सिगारेटच्या धुराड्यात हरवलेल्या मैत्रिणींचं कोंडाळं..प्रवासाच्या सुरुवातीलाच ‘ऐ दिल है मुशकिल जीना यहां.. जरा हट के जरा बच के ये है बम्बई मेरी जाँ’ हे गाणं ओठी आलं आणि वरळी सी फेसवरून हाजीअलीमार्गे प्रवास सुरू झाला.वाटेतच ‘मुंबई 24 तास’मध्ये सहभागी झालेल्या अँट्रीया मॉलमधील गर्दी दिसून आली. तेथे न जाता पुढे ताडदेवच्या वाटा तुडवत ग्रॅण्टरोडमार्गे जात असताना, रस्त्याकडेला मंद प्रकाशात ग्राहकाची वाट बघत थांबलेल्या तरुणी, महिला नजरेस पडल्या. त्यांच्या जोडीलाच ठिकठिकाणच्या सिग्नलला चहा आणि बन मस्का पावची व्यवस्था करणार्‍या मंडळींच्या सायकलींनीही आडोसा घेतलेला दिसला.रात्री दीड वाजता पोलीस, प्रशासन यांना मॅनेज करून पहाटेपर्यंत चालणारी दुकानेही एकामागोमाग एक दिसत होती.डोंगरीच्या एसव्हीपी रोड परिसरातील पानवाला भलताच मशहुर. प्रशासनाला दाखविण्यासाठी बाराच्या ठोक्याला शटर बंद करून बाहेरच त्याने थाटलेल्या पानाच्या टपरीवर पहाटे 4 वाजेपर्यंत घोळका असतो. अनेकजण फोनवरूनच ऑर्डर देतात, त्यानुसार बिझनेस सुरू असतो. एसव्हीपी रोडवरून मोहम्मद अली मार्गावर दिवसभर थकून रस्त्याकडेला झोपलेला वर्ग. कुठे रस्त्याकडेला पोलिसांची नजर चुकवून गांजा ओढणारी मंडळीही अधूनमधून दिसत होती.रस्त्याकडेला असलेले देलीकेट्सेन हॉटेल ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी तितकेच ‘डेडीकेटेड’ दिसून आले. शटर अर्धवट बंद करत रात्री उशिरापर्यंत येथील जेवण व्यवस्था सुरू होती. रस्त्याने जाताना पायधुनीचे झमझम हॉटेल लागले. ते म्हणे 3 वाजेपर्यंत सुरू असते आणि  एक तासासाठी बंद करून पुन्हा पहाटे 4 पासून सर्वांसाठी खुले होते!रात्रीचे पावणेदोन. भेंडी बाजारात गेले. नवाब सीख पराठा आपल्यापर्यंत पोहोचण्याची, आपला नंबर लागण्याची वाट लोक पहात होते.  तिथल्या कर्मचार्‍यांशी गप्पा सुरू केल्या. त्यांचं म्हणणं होतं, नाइटलाइफमध्ये आमचाही समावेश व्हायला हवा. आताच्या ट्रायलमध्ये केवळ र्शीमंतांचाच विचार केला गेला आहे..तिथून आणखी पुढे गेले. मागच्या दरवाजाने पहाटेपर्यंत सुरू असलेल्या र्शी क्रिष्णा चहावाला. चहा, वडापाव आणि बनपावसाठी तरुणांनी तिथे गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शिरा, पराठय़ांसह शीतपेयं, आइस्क्रीम मिळत होते, तर छोट्या छोट्या दुकानातील खानावळी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा पुरवत होत्या. कामाठीपुराच्या वाटाही शौकिनांनी गजबजलेल्या दिसल्या. रात्रीचे पावणेतीन. जाफरभाई दिल्ली दरबार हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे ठरवले. खरे तर, दीड वाजताच त्यांचे शटर बंद झाले होते. तेथे धडकताच दरवाजाकडील सुरक्षा रक्षकाकडे जेवणाबाबत विचारणा केली. त्यानं सांगितलं, ‘मॅडमजी शटर बंद है. मगर खाना शुरू है.. आप अंदर जाईये. जो चाहिये वो मिल जायेगा!.’ असे म्हणताच आतमध्ये प्रवेश केला. सर्वसामान्य लोक तिथे मोठय़ा प्रमाणात होते. तीन शिफ्टमध्ये येथील कामकाज चालतं. जवळपास 25 ते 30 कामगार तिथे कामाला जुंपलेले होते. रात्र वाढत होती, तशी तिथली गर्दीही वाढत होती. आता लागला मदनपुरा. परिसरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला 3 वाजेपर्यंत खाण्याचे स्टॉल्स लागलेले दिसले. विशेषत: महिलाही रात्री उशिराने मदनपुरा विभागात कुटुंबीयांसोबत खाण्यासाठी बाहेर पडत होत्या. रात्री 3.19. क्लेअर रोड येथून मुंबई सेंट्रलच्या पदपथांना बेड समजून त्यावरच अंगावर पांघरूण ओढून झोपलेली मंडळी जागोजाग दिसत होती.  रेल्वे स्थानकाबाहेरही ये-जा सुरू होतीच. रात्री 3.30च्या सुमारास अँट्रीया मॉलबाहेर गाडीने ब्रेक घेतला. दीडच्या सुमारास दिसलेली थोडीशी वर्दळही नाहीशी झाल्याने सुरक्षा रक्षकांनी दरवाजातच आडवा टेबल मांडून प्रवेशास नकार दिला.‘ग्राहकच नाही, दीडची गर्दीही अखेरच्या सिनेमाच्या शोची आहे’, असे तेथील सुरक्षा रक्षकाचे म्हणणे होते. मॉलमध्ये दोन पब आहेत, तर अन्य ठिकाणी फूड कॉर्नर आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशीच हा मॉल खुला असतो असे त्यांचे म्हणणे होते. गर्दी आणि त्यांची गरज पाहूनच पुढील पावले उचलण्याचा निर्णय आस्थापनांनी घेतला आहे.याच ठिकाणाहून बर्‍याच वाटा कमला मिलच्या दिशेने वळल्या. तब्बल 42 रेस्टॉरंट्स आणि पब्ज यांनी गजबजलेले कमला मिल कंपाउण्ड हे संकुल दक्षिण-मध्य मुंबईत, लोअर परळमध्ये येते. उत्तुंग इमारतींमधून असणारी बड्या कंपन्यांची-वृत्तवाहिन्यांची हेड ऑफिसेस, आलिशान निवासी इमारती आणि ही जीवनशैली तोलून धरणारे, सजवणारे मॉल्स, शोरूम्स, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यामुळे नवी ओळख प्राप्त झालेले लोअर परळ मुळात गिरणगावचा अविभाज्य हिस्सा. भायखळा-शिवडी-वरळी-लालबाग-परळ-नायगाव यांचा अंतर्भाव असणार्‍या गिरणगावाला मुंबईतील वस्रोद्योगाचा कणा असणार्‍या 58 कापड गिरण्या, त्यामध्ये काम करणारे जवळपास अडीच लाख गिरणी कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि गिरणी कामगारांना जीवनावश्यक सेवा-सुविधा पुरवणारे अन्य कष्टकरी यांनी मिळून आकार दिला. राष्ट्रीय वस्रोद्योग महामंडळ (एनटीसी) आणि खासगी मालक यांच्या ताब्यात असणार्‍या या कापड गिरण्या मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी 600 एकर जमिनीवर वसल्या होत्या.कालांतराने गिरणगाव तर उठलेच; पण त्या जागी नवर्शीमंत स्थलांतरितांच्या वाढत्या गरजा आणि शौक पुरे करण्यासाठी शहरातील विकास नियंत्रण नियमावलीची होता होईल तितकी पायमल्ली करत एक नवी ‘उपभोगवादी संस्कृती’ रुजवण्यात आली.  रात्री उशिरापर्यंंत येथे मध्यम तसेच उच्चभ्रू वर्गातील तरुणाई, कॉर्पोरेट सेक्टरमधील वर्गांची गजबज असते. मात्र रात्री साडेतीन वाजता येथीलही गेट बंद असल्याचे दिसले. सुरक्षा रक्षकाने आतमध्ये सोडण्यास नकार दिला. फक्त वीकेण्डलाच येथे गर्दी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याच दरम्यान दारूच्या नशेत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळींनाही त्याने दरवाजाच्या आतूनच बाहेरचा रस्ता दाखवला.पुढे कुलाबा, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह येथे 4 वाजेपर्यंंत तुरळक गर्दी होती. मात्र त्यात चहाची किटली हातात घेऊन फिरणार्‍यांच्या संख्येत मात्र वाढ झालेली दिसली. दुसरीकडे गिरगाव चौपाटीकडे शुकशुकाटच होता. तेथूनच बीकेसी मार्गावर आले. बीकेसीमध्येही स्मशान शांतता दिसून आली.पश्चिम उपनगरात खार परिसरातही रात्री उशिरापर्यंंत रस्त्याकडेला असलेला स्टॉलवर भुर्जी पावसहीत कबाब, मासे चवीने खाणारे खवय्ये दिसले. वांद्रे, बॅण्ड स्टॅण्डजवळील अनेक फेमस दुकानांबाहेर गर्दी दिसून येते.मुळात मध्यरात्री दीड-दोन तासांचा ‘पॉवर नॅप’ सोडला तर मुंबई कधीच झोपत नाही. डोळा लागला रे लागला की मुंबईला जाग येते! पण हे जागतिक कीर्तीचं शहर आताही दोन घटकांची वामकुक्षी त्यागून 24 तास लख्ख जागं राहण्याचा सराव करतंय. ही अविर्शांत धावपळ मुंबईला मानवेल का, या प्रश्नावरून सध्या ऊहापोह सुरू आहे..

व्यावसायिकांची सावध भूमिकारात्री बाहेर पडणारी गर्दी आणि क्रयशक्ती रोडावल्याने ‘मुंबई 24 तास’ उपक्रमाबाबत सेवा क्षेत्रातील समूह, व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून रात्री बाहेर पडणार्‍यांची संख्या कमी होत आहे. गेल्या महिन्यात नाताळ आणि थर्टि फस्र्ट डिसेंबरला गर्दी घटल्याचे स्पष्ट झाले. नववर्षाचे स्वागत उत्साहात करता यावे यासाठी दरवर्षी आस्थापनांना पहाटेपर्यंंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाते. यंदा अपेक्षित गर्दी नसल्याने शहरातील कमला मिल, मरिन ड्राइव्हप्रमाणे प्रसिद्ध ठिकाणांवरील आस्थापना मध्यरात्री 3 पर्यंंत बंद झाल्या होत्या. एरव्ही 1 जानेवारीच्या पहाटे 5 वाजेपर्यंंत मरिन ड्राइव्ह येथे गर्दी असते. ती हटवण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम हाती घ्यावी लागते. मात्र यंदा मध्यरात्री 2 वाजताच गर्दी स्वत:हून पांगली. 25 आणि 26 जानेवारीला जोडून सुटी आल्याने मोठय़ा संख्येने नागरिक पर्यटनासाठी शहराबाहेर पडले होते. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्राय डे होता. यामुळेही मुंबई 24 तास उपक्रमाला अल्पप्रतिसाद मिळाला असावा, असा अंदाजही या अधिकार्‍याने व्यक्तकेला. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा तारांकित हॉटेल आहेत. त्यातील आस्थापनांना पहाटेपर्यंंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे. हद्दीत सुमारे 11 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. मात्र कार्यालयांचे प्रमुख केंद्र असल्याने कामानिमित्त काही तास हद्दीत ये-जा करणार्‍यांची संख्या (फ्लोटिंग पॉप्युलेशन) सुमारे आठ लाखांच्या घरात आहे. शनिवार आणि रविवारी ही संख्या 10 ते 50 हजारांपयर्ंत र्मयादित राहते. यंदा 31 डिसेंबरला मरिन ड्राइव्हवर जमलेली गर्दी दीड-दोनच्या आसपास पांगल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 25 जानेवारीलाही मरिन ड्राइव्हवर गर्दी कमी होती, असे त्यांनी सांगितले.अन्य एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार प्रयोग सुरू होण्याआधी स्थानिक पोलीस लोअर परळ, वांद्रे-कुर्ला संकुलातील बंदिस्त आवारातील आस्थापनांच्या व्यवस्थापनासोबत संपर्कात होते. बहुतांश व्यवस्थापनांनी 31 डिसेंबरला व्यवसायात आलेल्या तुटीचे उदाहरण देत सावध भूमिका घेऊन उपक्रमात सहभागी होणार असल्याचे पोलिसांना सांगितले. या सर्व आस्थापना शनिवारी विशेषत: दुसर्‍या व चौथ्या शनिवारी आणि सार्वजनिक सुटीच्या आदल्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी, व्यवसाय याबाबत अंदाज बांधत आहेत. रात्री बाहेर पडणार्‍या गर्दीतील जास्तीत जास्त भाग आपल्या आस्थापनेत यावा यासाठीही अभ्यास सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई 24 तास उपक्रमात सहभागी होणार्‍या आस्थापना सवलतीच्या आकर्षक योजनांची माहिती देणार्‍या जाहिराती घेऊन नागरिकांसमोर येऊ शकतील, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.manishamhatre05@gmail.com(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)